Marathi News LIVE Updates : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज (सोमवारी) दुपारी २ वाजता विधानसभेत राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा केल्या जणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबरोबरच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँगेस सोडण्याबाबत घोषणा केली आहे. त्यानंतर धंगेकर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय तसेच इतर महत्त्वाच्या घडामोडी आपण येथे जाणून घेणार आहोत.
Maharashtra Live News Update Today, 10 March 2025 : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
नागपुरात उन्हाचा तडाखा… महापालिकेकडून उष्माघातापासून वाचण्यासाठी…
नागपूर : राज्यासह विदर्भातील सर्वाधिक तापमान असलेल्या जिल्ह्यात नागपूरचाही क्रमांक वरचाच आहे. दरम्यान नागपुरात आता हळू- हळू उन्हाचा तडाखा वाढत आहे. नागरिकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी महापालिकेकडून काही उपाय करण्यात आले आहे. या उपायांबाबत आपण जाणून घेऊ या.
Chhatrapati Sambhajinagar Accident : उसाचा ट्रक उलटला, दबून सहा तरुण कामगार ठार; ११ जण जखमी
Pishore Kannad Road Accident Update : छत्रपती संभाजीनगर : ट्रक उलटल्याने त्यातील उसाच्या मोळ्यांखाली दबून सहा तरुण कामगारांचा मृत्यू झाला. तर ११ जण जखमी झाले. सोमवारी पहाटे ही घटना पिशोर ते कन्नड मार्गावरील खाडी चंदन नाल्याजवळ घडली. किसन धर्मु राठोड (वय ३०), मनोज नामदेव चव्हाण (२३), कृष्णा मुलचंद राठोड (३०), मिथुन चव्हाण (२६), विनोद नामदेव चव्हाण (२८, सर्व रा. सातकुंड, ता. कन्नड) व ज्ञानेश्वर देवीदास चव्हाण (३६, रा. बिलखेडा ता. कन्नड), अशी मृतांची नावे आहेत.
शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : शेततळ्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन मुलांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर एका मुलाला वाचवण्यात यश आले. ही घटना पैठण तालुक्यातील बिडकीनजवळील शेकटा शिवारात रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. प्रणव दीपक दाभाडे (वय ०७) व आरुष दत्तात्रय दाभाडे (वय ०५), अशी मृत मुलांची नावे आहेत. आकाश अशोक गावंदे (१३) याला वाचवण्यात यश आले. हे तिन्ही मुले मदन गवांदे यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी उतरली होती.
मेळघाटात होळी कशी साजरी केली जाते?, कोण आहे मेघनाथ बाबा?
अमरावती : शुक्रवारी १४ मार्च रोजी धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे. देशभरात वेगवेगळया भागात हा रंगोत्सव साजरा केला जाईल. याप्रमाणेच होळी साजरी करण्याची एक पद्धत सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात अस्तित्वात आहे. सलग पाच दिवस उदरनिर्वाहाच्या कामांना कात्री लावून आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. पूर्वापार शिरस्ता व रितींचा यात समावेश असतो.
अर्थसंकल्पात तब्बल सात वेळा घोषणा, प्रत्यक्षात प्रकल्प उभारणीचे नाही
नागपूर : तब्बल सात अर्थ संकल्पात घोषणा होऊनही विदर्भातील संत्रा पट्टा अशी ओळख असलेल्या वरुड-मोर्शी पट्ट्यात सरकारकडून एकही संत्री प्रकल्प उभारण्यात आला नाही, शासनाकडून केलेल्या घोषणा फोल ठरल्या आहेत.अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
गडकरी, फडणवीस ' युगपुरुष ', रामदेवबाबांची स्तुतीसुमने
नागपूर: भूमिपूजनानंतर दहा वर्ष रखडलेला योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली उद्योग समुहाच्या संत्री प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबा यांच्या उपस्थित रविवारी नागपुरात पडले. हा समारंभ लक्षात राहिला तो रामदेवबाबांनी गडकरी, फडणवीस यांच्यावर उधळलेल्या स्तुतीसुमनांमुळे. बाबांनी तर गडकरी, फडणवीस ' युगपुरुष ' असल्याचे जाहीर करून टाकले.
राज्यात आणि देशात महिला अत्याचार वाढत आहेत महिला आज कुठेही सुरक्षित नाहीत याचा निषेध करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रस्त्यावर उतरुण आंदोलन केले आहे. मंत्र्यांचे तर खरे सत्कार केले पाहिजेत रोज उठायचे आणि महिलांच्या बाबतीत अपशब्द काढायचे काम करत आहेत, गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करते, पर्समध्ये रामपुरी चाकू ठेवा, मिरची पावडर तेव्हा आणि तुमचे तुम्ही संरक्षण करा.
लाडक्या बहिणींना मत मिळवण्यासाठी वेगवेगळी प्रलोभन देण्यात आली, लाडक्या बहिणींच्या आयुष्यात मानधन वाढ करून देऊ असं म्हटले होते, आज अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहेत, दिलेली संपूर्ण आश्वासन या सरकारने पूर्ण करावी एवढीच अपेक्षा आहेत.
नंदुरबारमध्ये १००१ दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाचे पूजन
नंदुरबार : प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाची महाआरती १००१ दाम्पत्यांच्या हस्ते येथे करण्यात आली. यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.या अध्यात्मिक सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रयागराज येथील महाकलशाची महाआरती करण्याचा मान राज्यात नंदुरबारला प्रथम मिळाला.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर…सराफा बाजार उघडताच…
नागपूर: सोन्याचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी (१० मार्च २०२५) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागपुरातील सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बघून ग्राहकांमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे. सराफा बाजारातील सोमवारच्या सोन्याच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.
पाच वर्षांच्या तुलनेत बीएडचा प्रतिसाद वाढला, प्रवेश परीक्षेसाठी १ लाख १६ हजार ५०० विद्यार्थ्यांची नोंदणी
मुंबई : शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्रातील पदवीसाठी आवश्यक असलेल्या बी.एड (सामान्य व विशेष), बीएड-एमएड, एमएड आणि एम.पी.एड या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्ररीक्षेला नोंदणीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
‘महिलांचे अनोखे रूप, श्रमदानातून जलसंवर्धन’, ‘जलतारा’तून पाणी पातळी वाढविण्याचे प्रयत्न
अकोला : वाशीम जिल्ह्यात जलस्त्रोताचे प्रमाण अत्यल्प आहे. भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नवीन नदी, तलाव निर्माण होणे शक्य नाही. परिस्थितीवर मात करून पाण्याची पातळी वाढवणे गरजेचे आहे. यासाठी जलतारा योजना उपयुक्त ठरणार असून वाशीम जिल्ह्यामध्ये १० लाखापेक्षा जास्त शोषखड्डे निर्माण केली जाणार आहेत.
मेगा पदभरती : कृषी विद्यापीठांमध्ये प्रकल्पग्रस्तांना मोठी संधी, आजपासून ऑनलाइन…
अकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदांपैकी ५० टक्क्यांची प्रकल्पग्रस्तांमधून पदभरती करण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गट क व ड संवर्गातील एकूण ६८० पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी आज, १० मार्चपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली.
आगारप्रमुखावर कारवाईसाठी शेगाव बस स्थानकासमोर ST कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव एसटी आगाराचे प्रमुख गोविंद जवंजाळ व आणखी तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात एसटी बस महिला वाहकाच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल असताना बदली किंवा त्यांच्या विरुद्ध एसटी प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी मागील चार दिवसांपासून शेगाव बस स्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. विभाग नियंत्रक या आरोपींच्या बचावासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत जोपर्यंत कारवाई होत नाही तेव्हा पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा विदर्भ एसटी कामगार संघटनेचे विदर्भ संघटक प्रमोद पोहरे यांनी दिला आहे
"ते खरं ते बोलले" गंगेच्या पाण्याच्या मुद्द्यावर वडेट्टीवारांचा राज ठाकरेंना पाठिंबा
"ते खरं बोलले, त्यांनी काही चुकीचं सांगितलं नाही. मी देखील जाऊन आलो. इतके लोक आल्यानंतर पाणी खूप अस्वच्छ झालं होतं. पाण्यात उभे राहण्याची देखील इच्छा होत नव्हती. जे काही म्हणाले ते सत्य आहे आणि खऱ्याला खरे मानून पुढे गेले पाहिजे. आजकाल राज ठाकरे खरं बोलत आहेत याचं आम्हाला आनंद आहे."
"इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar?" जितेंद्र आव्हाडांची खोचक टिप्पणी
काँग्रेसचे नेते रविद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. "चंत्रकांत पाटील साहेब आता इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar? कारण आता ते तुमचे सखे सोयरे झालेत बरं का", अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
Maharashtra Live Update