Marathi News Updates: कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. याचबरोबर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुनावनी सुरू झाली असून, या प्रकरणातील नवनवे होत आहेत. तसेच छत्रपती संभाजीराजे यांनी कोणतेही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे नसल्याने रायगड किल्ल्यावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला राज्यातील काहींनी विरोध केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेबाची कबर आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियानच्या मृत्यूचा मुद्दाही गाजला होता. त्याबाबत अधिवेशनानंतरही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Live Updates

Maharashtra News Live Today, 28 March 2025 : राज्यात गाजत असलेले कुणाल कामरा-एकनाथ शिंदे प्रकरण, रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणासह महत्त्वाच्या घडामोडी.

20:09 (IST) 28 Mar 2025

पिंपरी- चिंचवड: महानगरपालिका सेवेतून वर्ग १ च्या पाच अधिकाऱ्यांसह २७ जण सेवानिवृत्त

स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या ६ अशा एकुण २७ कर्मचा-यांचा आज अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला,

सविस्तर वाचा...

20:06 (IST) 28 Mar 2025

खुशखबर! ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी वयोमर्यादेत वाढ…

वर्धा : राज्य लोकसेवा आयोग अर्थात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे सरकारी नोकऱ्यांचे आगार. प्रत्येक बेरोजगार आयोगाच्या जाहिरातीकडे लक्ष ठेवून असतो. पात्रतेनुसार जागा निघाल्या की त्यासाठी अर्ज करण्याची धावपळ उडते. यात वयोमर्यादा ही एक महत्वाची अट असते. ती पात्र नं करणारा उमेदवार मग नाराज होत नशिबाला कोसतो, अशी उदाहरणे दिसून येतात.

सविस्तर वाचा

19:57 (IST) 28 Mar 2025

धक्कादायक! 'त्या' दरोडेखोरांना कुलुपबंद घरांची माहिती पुरविणारा खबरी…

भंडारा : एका खाजगी चारचाकी वाहनावर चालक म्हणून तो काम करत होता. भाड्याने गाडी करणाऱ्या ग्राहकांना किंवा प्रवासासाठी गाडी ठरविलेल्या घरमालकांना तो नियोजित स्थळी पोहचवून द्यायचा. त्यामुळे कोणते घर किती वेळासाठी कुलूपबंद राहणार हे त्याला चांगले ठाऊक होते.याचा फायदा घेत तो कुलुपबंद घरांची माहिती तो कुख्यात गुंड किंवा चोरांना पुरवायचा. त्यानुसार चोरीची योजना पध्दतशीरपणे आखली जायची आणि शिताफीने चोरी केली जायची.

सविस्तर वाचा

19:27 (IST) 28 Mar 2025

‘सूक्ष्म सिंचन योजने’त ५ कोटींचा गैरप्रकार; ‘कृषी’तील १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कृषी अधिकारी कार्यालयातून शेतक-यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जाताे. यात ठिबक व तुषार सिंचन संचाची योजना आहे.

सविस्तर वाचा...

19:16 (IST) 28 Mar 2025

‘ज्ञानेश्वर माऊली’ दिंड्यांचा यंदा एकत्रित सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार

आज, शुक्रवारी या उपक्रमाबाबत परिसरातील दिंडीचालक व देवस्थान प्रतिनिधींची नेवासा येथे ज्ञानेश्वर मंदिरात बैठक झाली.

सविस्तर वाचा...

18:50 (IST) 28 Mar 2025

विद्यार्थिनीकडून विनयभंगाचा आरोप; मुख्याध्यापकाची आत्महत्या

मुलीच्या काही नातेवाईकांनी सुनील कारामुंगे यांना मारहाण केली. शिवाय शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

सविस्तर वाचा...

18:46 (IST) 28 Mar 2025

काँग्रेस नेते दीपक सलामपूरीया अपघातात ठार; टिप्परने दिली जोरदार धडक

बुलढाणा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेगाव शहर माजी  अध्यक्ष दीपक सलामपुरिया यांचा टिप्परने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला. शेगाव शहरातील मुरारका उच्च माध्यमिक शाळे जवळील वळणावर आज शुक्रवारी, २८ मार्चला हा दुर्दैवी अपघात घडला.दीपक सलामपुरिया यांची  शेगाव बाळापुर मार्गावर वर मुरारका हायस्कूल जवळ  दूध डेयरी आहे. आज शुक्रवारी दुपारी  ते दुकानावरून समोरच्याच खुल्या जागेत लघवीसाठी गेले होते.

सविस्तर वाचा

18:29 (IST) 28 Mar 2025

पोलिसांच्या निष्काळजीमुळेच माझ्या वडिलांचा खून...वालदेंच्या मुलीने थेट...

नागपूर : कुख्यात गुन्हेगार नीलेश मेश्राम हा तलवार घेऊन साथीदारांसह मंगळवारी रात्री आमच्या घरात शिरला. आम्हाला जीवे मारण्याची धमकी देऊन दार उघडण्यासाठी दबाव टाकला.  त्याच्या हातातील शस्त्र बघून आम्ही घाबरलो. त्यामुळे आम्ही दार उघडले नाही. नीलेश आणि त्याच्या साथीदाराने घरावर दगडफेक केली.

सविस्तर वाचा

17:56 (IST) 28 Mar 2025

पुणे : रस्ता चुकल्याने २४ चाकी अवजड ट्रक लक्ष्मी रस्त्यावर, ट्रकचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई

रस्ता चुकल्याने ट्रक नेमका कोणत्या दिशेने न्यायचा, याची माहिती नसल्याने ट्रक चालक गोंधळून गेला होता.

सविस्तर वाचा...

17:54 (IST) 28 Mar 2025

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी अर्थसंकल्पामध्ये पाचशे कोटींची तरतूद – अजित पवार

दहा लाखाच्या आतील कामे दर्जेदार पद्धतीने होत नसल्याने आता या पुढे टेंडरने कामे दिली जाणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

17:09 (IST) 28 Mar 2025

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात, असा आहे दौरा,  संघभूमी, दीक्षाभूमीला भेट देणार, कडेकोट बंदोबस्त

नागपूर -  पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ३० मार्चला नागपूर  दौऱ्यावर येत  आहेत. त्यांचे या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार पासून कार्यक्रम स्थळी व त्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वंयसेवक ते प्रचारक असा प्रवास असणाऱ्या मोदींनी ते पंतप्रधान झाल्यानंतर नागपूरमध्ये येऊनही संघभूमीवर जाणे टाळले होते.

सविस्तर वाचा

16:50 (IST) 28 Mar 2025

अटल बिहारी वाजपेयी संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणारे पहिले पंतप्रधान, तर नरेंद्र मोदी हे…

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी नागपूरला येत आहेत. सकाळी नऊ वाजता नागपुरात आगमन झाल्यावर ते रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्मृतिमंदिर, दीक्षाभूमी, माधव नेत्रालय तसेच अमरावती मार्गावरील सोलार एक्सप्लोझिव्हला भेट देतील. यानिमित्त संघभेटीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे.

सविस्तर वाचा

16:47 (IST) 28 Mar 2025

कडोंमपा, महावितरणची सुविधा, देयक केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदार, पाणीपट्टी देयक थकबाकीदार यांच्यासाठी ३१ मार्चपर्यंत अभय योजना पालिकेने लागू केली आहे.

सविस्तर वाचा...

16:46 (IST) 28 Mar 2025

कल्याण परिमंडळातील पाच हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

चोरून वीज घेऊन घराचा वीज पुरवठा सुरू केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर फौजदारी केली जाणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सविस्तर वाचा...

16:46 (IST) 28 Mar 2025

गुन्ह्यात लहान मुलांचा वापर चिंताजनक, बाल संरक्षण अधिकारी ॲड. पल्लवी जाधव यांची माहिती

अलीकडच्या काळात गुन्ह्यांमध्ये लहान मुलांचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. लहान मुलांवर झटकन संशय घेतला जात नाही.

सविस्तर वाचा...

16:35 (IST) 28 Mar 2025

मोदींच्या दीक्षाभूमी भेटीआधी सौंदरीकरणासाठी जागेची मागणी

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्चला नागपूर दौऱ्यादरम्यान दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाने दीक्षाभूमीच्या सौंदरीकरण व विकास कार्यासाठी शेजारची २१ एकर जमीन पंतप्रधान मोदींनी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. जागतिक कीर्तीचे स्मारक असलेल्या दीक्षाभूमीच्या सौंदरीकरण व विकास कार्यासाठी जागा अपुरी पडत आहे.

सविस्तर वाचा

16:35 (IST) 28 Mar 2025

"सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग..." पीक कर्जाची परत फेड करण्यासाठी अजित पवारांचे आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२८ मार्च) एका कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केले. ते म्हणाले, “मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितलं होतं की सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. आज तारीख आहे २८ मार्च, मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो. ३१ मार्चच्या आत आपआपले पीक कर्जाचे पैसे भरा”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

16:24 (IST) 28 Mar 2025

अडीच लाख बिल न भरल्यामुळे प्रशासकीय इमारतीची वीज खंडित…

गोंदिया:- चालू आर्थिक वर्ष संपायला आता फक्त तीन दिवस उरले आहेत. या तीन दिवसांत महावितरणने चालू व थकीत वीजबिलांची वसुली जोमाने सुरू केली आहे. घरगुती व व्यावसायिक ग्राहक तसेच शासकीय कार्यालयां कडून ही थकीत वीज बिलांच्या वसुली साठी कठोर कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

16:12 (IST) 28 Mar 2025

वाग्रस्त नागपूर जिल्हा सहकारी बँक दोन वर्षांत नफ्यात आणणार, प्रशासनाचा दावा

नागपूर : सुमारे दीडशे कोटींचा घोटाळा झाल्यानंतर बडघाईस आलेल्या नागपूर जिल्हा सहकारी बँकेला पुढील दोन वर्षांत नफ्यात आणण्याचा विश्वास या बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ मध्ये १५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता.

सविस्तर वाचा

16:08 (IST) 28 Mar 2025

काय म्हणता? २० हजार प्रकरणांची २८ कोटी ३२ लाखांत तडजोड!

यवतमाळ : ‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये’, असे म्हटले जाते. तरीही अनेकदा न्यायासाठी न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ कोणावरही येवू शकते. एकदा कायदेशीर लढाई सुरू झाली की, मग दिवस, महिने, वर्षे असा कितीतरी काळ केवळ निकालाच्या प्रतिक्षेत व्यतित होतो. अनेकदा तर न्यायालयात जाणारे संपतात, पण प्रकरण सुरूच राहते.

सविस्तर वाचा

15:50 (IST) 28 Mar 2025

कोरटकरला तेलंगणात पळून जाण्यात भाजपचाच हात, काँग्रेस प्रवक्त्याच्या आरोपाने खळबळ , कोरटकरसोबत असणारा पडवेकर कोण ?

चंद्रपूर: शिवद्रोही प्रशांत कोरटकर याची चंद्रपुरातील आलिशान हॉटेलात मुक्कामाची व्यवस्था करण्यापासून तर तेलंगणा राज्यात पळूण जाण्यात मदत करण्यापर्यंत त्याच्यासोबत असणाऱ्या प्रशिक पडवेकर यालाही कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान हा पडवेकर हा भाजपचा  कार्यकर्ता असून तो मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात काम करीत होता असा धक्कादायक आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे व गृहखात्याने याबाबत खुलासा करावा अशी मागणी केली आहे.

सविस्तर वाचा

15:12 (IST) 28 Mar 2025

'तुझ्यात 'मी', माझ्यात 'तू', संसार आपला फुलत राहू दे…' घटस्फोटाच्या उंबरठ्यावरील १६ संसार पुन्हा बहरले

अकोला : "तुझ्यात 'मी', माझ्यात 'तू', संसार आपला फुलत राहू दे...नजर नको कुणाची लागो, आपला संसार कायम बहरत राहू दे..." असा दृढनिश्चय करून घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या १६ जोडप्यांनी नात्यातील कटुता दूर केली. घटस्फोट घेऊन विभक्त होण्याऐवजी मुलांसह एकत्रित राहण्याचा निर्णय दुरावलेल्या जोडप्यांनी घेतला.

सविस्तर वाचा

15:11 (IST) 28 Mar 2025

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँकेत ४० लिपीक पदांवर चक्क अभियंत्यांच्या नियुक्ता… त्यामुळे…

नागपूर: महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे एखाद्या सरकारी खात्यात शिपाई पदासाठीही जागा निघाल्यास पदव्यूत्तर अभ्यासक्रम केलेले विद्यार्थीही या पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करतांना दिसतात. हाच प्रकार राज्यातील शिखर बँक असलेल्या दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लिमीटेडमध्येही बघायला मिळत आहे.

सविस्तर वाचा

14:49 (IST) 28 Mar 2025

“उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्षही होतील…”, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नाशिक, धाराशीव, परभणी येथील खासदारांनी त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले. उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्व पायदळी तुडवले. ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावे लागेल, त्या दिवशी मी माझे शिवसेनेचे दुकान बंद करेन, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते.

सविस्तर वाचा

14:39 (IST) 28 Mar 2025

चेन्नईतील संघ कार्यालयावर बाॅम्ब स्फोट अन् माधव नेत्रपेढीची कल्पना… पंतप्रधान नरेंद्र मोदींचा…

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरातील माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टच्या विस्तारीत रुग्णालयाचे भूमिपूजन ३० मार्चला सकाळी १० वाजता आयोजित केले गेले आहे. या संस्थेच्या निर्मितीची कथा रोचक आहे. त्यानुसार चेन्नईतील संघ कार्यालयात ८ ऑगस्ट १९९३ मध्ये बाॅम्ब स्फोट झाला.

सविस्तर वाचा

13:58 (IST) 28 Mar 2025

दंगल, जाळपोळ आणि बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर मुंबई पोलीस सतर्क

समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये रमजान ईदच्या दिवशी डोंगरी परिसरात हिंदू-मुस्लिम दंगल, जाळपोळ आणि बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. या पोस्टमध्ये बेकायदेशीर रोहिंग्या, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर अशा घटनांमध्ये सहभागी होऊ शकतात, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ट्वीट करणाऱ्या व्यक्तीने नवी मुंबई पोेलिसांना टॅग केले होते. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे.

13:36 (IST) 28 Mar 2025

नागपुरात न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पुन्हा बुलडोझर कारवाईला ब्रेक

नागपूर : दंगल प्रकरणातील आरोपी अहेफाज अफसर व मो. सफवान अब्दुल राशीद यांच्या घरावरील बुलडोझर कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली. यापूर्वीही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन आरोपींच्या घरावरील कारवाई थांबवण्यात आली आहे.

सविस्तर वाचा....

13:26 (IST) 28 Mar 2025

हरभरा आयात शुल्क दहा टक्के लावल्याने देशांतर्गत उत्पादकांना दिलासा

लातूर – केंद्र सरकारने २०२४ च्या मे महिन्यामध्ये हरभऱ्याचे आयात शुल्क ६६ टक्क्यावरून ०% वर आणले होते त्यामुळे विदेशातून हरभऱ्याची मोठी आवक झाली. देशांतर्गत हरभऱ्याचे भाव पडले होते मे २०२४ ते मार्च २०२५ पर्यंत सुमारे १२ लाख टन हरभरा आयात झाला आहे. दरवर्षी तो सरासरी दीड लाख टन इतकाच टांझानियातून आयात होतो, याशिवाय वाटाण्यावरील आयात शुल्क शून्य टक्के असल्यामुळे ३६ लाख टन वाटाणा ही आयात झाला आहे.

सविस्तर वाचा....

13:19 (IST) 28 Mar 2025

महायुतीत तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद; लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार

१५ वी विधानसभा गठीत होऊन जवळपास चार महिने उलटल्यानंतर राज्य विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या. महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांना प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद मिळाले. मुख्य विरोधी पक्षाकडे लोकलेखा समितीचे अध्यक्षपद सोपविण्याची प्रथा असली तरी शिवसेनेऐवजी (ठाकरे) काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

13:18 (IST) 28 Mar 2025

सहमतीने घटस्फोट घेणाऱ्या दाम्पत्यांच्या संख्येत वाढ, ४ वर्षांत साडेबारा हजारांवर प्रकरणे न्यायालयात

नागपूर : गेल्या चार वर्षांमध्ये पती-पत्नीमध्ये घटस्फोट होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत घटस्फोटाची १२ हजार ६७९ प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात दाखल झाली. यामधील १२ हजार ३४२ दाम्पत्यांनी घटस्फोट घेतला.

सविस्तर वाचा....