Marathi News Updates राज्यासह देशभरात आज रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केलेला कॉमेडियन कुणाल कामरा हा आज मुंबई पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे. याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या पाडवा मेळाव्यात वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे, त्यावरून राजकीय वर्तुळात आज प्रतिक्रिया उमटू शकतात. याबरोबरच राज्यात औरंगजेबाची कबर तसेच रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक वादाच्या भोवऱ्यात आहे, या आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी आपण येथे जाणून घेणार आहोत
Mumbai-Maharashtra News Live Today, 31 March 2025 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…
ठाणे : वागळे कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा वेचक महिलेचा मृत्यू, जेसीबीच्या धडकेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या वागळे इस्टेट येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर एका ५० वर्षीय कचरा वेचक महिलेचा जेसीबीच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरा पर्यंत सुरु होती.
वागळे इस्टेट भागात ठाणे महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. याठिकाणी शहराच्या विविध भागातील कचरा आणून त्यांचे वर्गीकरण केले जाते. यासाठी कचरावेचक महिला नेमण्यात आल्या आहेत. सोमवारी नेहमीप्रमाणे कचरा वेचक महिला कचरा जेसीबीच्या भांड्यात भरत होत्या. त्यावेळी ही महिला कचरा गोळा करुन जेसीबीच्या भांड्यात टाकत होती. त्यादरम्यान, जेसीबीच्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमले होते.
विरार मध्ये १२ वर्षीय मुलाची आत्महत्या
वसई : विरार मध्ये राहणार्या १२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्पर्श पाटील असे या मुलाचे नाव आहे.विरार पश्चिमेच्या आगाशी उंबरगोठण येथे स्पर्श पाटील हा १२ वर्षांचा मुलगा आई वडिल तसेच मोठ्या बहिणीसह रहात होता. तो नॅशनल शाळेत ६ वीत शिकत होता.
घरात अभ्यास करत असताना अचानक त्याने आतल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला लगेच उपचारासाठी बोळींज येथील प्रकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांचे एक पथक स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले आहे. यापूर्वी कामरा याला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते. यानंतर आज कामरा चौकशीसाठी हजर राहाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
भाविकांची संख्या बघता त्यांना ऑनलाईन पद्धतीने लुटण्याची नवीन क्लृप्ती समाजकंटकांनी शोधून काढली आहे. त्यानुसार पूणे येथील निरंजन वेलणकरसह इतरही काहींची फसवणूक झाली आहे. …Read Full Details
हिंदु भाविकांच्या ऑनलाईन लुटीची नवीन क्लृप्ती… शेगाव, ओंकारेश्वरसह इतर भावीक लक्ष्य…
नागपूर : प्रत्येक धर्मिय नित्याने त्यांच्या धार्मिक स्थळी दर्शनाला जात असतात. हिंदु भाविकही मोठ्या संख्येने नियमित शेगावातील गजानन महाराज, ओंकारेश्वरसह इतरही भागात दर्शनासाठी जात असतात. या भाविकांची संख्या बघता त्यांना ऑनलाईन पद्धतीने लुटण्याची नवीन क्लृप्ती समाजकंटकांनी काळजी आहे.
महाराष्ट्र अशांत ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. बीड येथील स्फोट हा त्याच्याच एक घटक तर नाही ना असा एक संशय या निमित्ताने निर्माण होतो. त्यामुळे सत्तेतीलच लोक अशांतता निर्माण करत आहेत. गुन्हेगारी घटना करतात ते आरोपी सापडत नाहीये, ती नवी गोष्ट नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा एकंदरीत कारभार, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फार मोठी चिंता व्यक्त होत आहे आणि या पार्श्वभूमीवर सर्वांनी कुठल्या अफवांवर विश्वास न ठेवता भारताची एकता व अखंडता कायम ठेवावी असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
पतीच्या आर्थिक गुन्ह्यासाठी पत्नीला सहआरोपी करता येते? उच्च न्यायालय म्हणाले…
नागपूर : भारतीय संस्कृतीत नवरा-बायकोच्या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. नवरा आणि बायकोने प्रत्येक गोष्टीत एकमेकांच्या साथीने राहावे, असे संस्कार दिले जातात. मात्र नवऱ्याने गुन्हा केला तर त्यात बायकोला सहआरोपी करता येते, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयासमोर आला. अमरावतीच्या एका व्यक्तीने आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्या पत्नीला सहआरोपी केले होते.