Marathi News Updates महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी संपलं आहे. अधिवेशनात महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले, अनेक प्रश्नांवर चर्चा झाली मात्र विरोधक कामरा आणि कबर यातच अडकून पडले होते अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर या अधिवेशनात कामरा आणि कबर याशिवाय काहीही नव्हतं असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दुसरं समन्स बजावलं आहे. तर रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास संभाजी भिडेंनी विरोध दर्शवला आहे.एकनाथ शिंदेंच्या आयुष्यात कृतज्ञता हा शब्द असेल तर तुम्ही उद्धव ठाकरेंशी कृतज्ञ असलं पाहिजे. तुम्ही सोडून गेलात, तुमचे मतभेद झाले, तुम्ही आमच्यावर टीका करता, आम्ही तुमच्यावर करतो. ज्या प्रकारची भाषा ते उद्धव ठाकरेंबाबत वापरतात त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मोदी शाह यांचं छप्पर ज्या दिवशी उडेल तेव्हा कुठे असाल? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. तसंच उद्धव ठाकरे हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. यासह सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे ती लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Maharashtra News Live Today, 27 March 2025 : "एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंबाबत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे", संजय राऊत यांचं वक्तव्य; यासह महत्त्वाच्या घडामोडी

18:39 (IST) 27 Mar 2025

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी नाशिकमधून रसद -जिल्हाभरातून शेकडो वाहने नेण्याची तयारी

नाशिक - कधीकाळी मुंबईत होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात स्थानिक पातळीवरून मोठी रसद पुरवली जात असे. तेव्हा मनसेचा नाशिक बालेकिल्ला होता. कालांतराने पक्षाला गळती लागली. आणि हा ओघ कमी होत गेला. यंदा रविवारी मुंबईत आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात मोठी रसद पुरविण्याची तयारी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सविस्तर वाचा

18:33 (IST) 27 Mar 2025

गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचाचे नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन

जिल्हा परिषद कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कुठलेही काम होत नसल्याने अखेर महिला सरपंचाने चक्क गळ्यात नोटाचे बंडल घालून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी करीत नाहीत असा आरोप या महिला सरपंचाचा आहे. नांदेड तालुक्यातील इंजेगाव येथील मुक्ताई पंचलिंगे असं या आंदोलन करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

या महिला सरपंचाने अनेक वेळा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी निवेदन दिली. परंतु, त्या मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप या महिला सरपंचांनी केला आहे. नांदेड पंचायत समितीसाठी कायमस्वरूपी गट विकास अधिकारी मिळत नाहीये. गावात स्मशानभूमी नाहीये, अंगणवाडीसाठी इमारत देखील नाहीये अशा विविध समस्या गावांमध्ये आहेत. जिल्हा परिषद कार्यालय मात्र या समस्यांकडं दुर्लक्ष करत असल्याने अखेर या महिला सरपंचांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे सुरू केले आहे.

18:31 (IST) 27 Mar 2025

ठाणे महापालिकेची कागदविरहीत कामकाजाच्या दिशेने पाऊल; १ एप्रिलपासून ई- ऑफिस प्रणाली लागू करण्याची तयारी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कारभारात गतीमानता आणि पारदर्शकता यावी, या उद्देशातून ई- ऑफिस प्रणाली लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या अर्जासह विविध प्रकल्पांच्या प्रस्ताव ऑनलाईनद्वारे हाताळणार असून येत्या १ एप्रिलपासून ही प्रणाली लागू करण्यासाठी पालिकेने विविध विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा

17:55 (IST) 27 Mar 2025

ठाण्यातील पार्किंग धोरणासाठी पुन्हा सर्वेक्षण; सर्वेक्षणादरम्यान केली जाणार रस्त्यांची वर्गवारी निश्चित

ठाणे : गेल्या काही वर्षांपासून कागदावर असलेले पार्किंग धोरण प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने जोरदार हाचाली सुरू केल्या असून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याची वर्गवारी पुन्हा निश्चित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे पार्किंग धोरणाची लवकरच अंमलबजावणी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

सविस्तर वाचा

17:54 (IST) 27 Mar 2025

संतप्त शेतकऱ्यांची सडक अर्जुनीच्या महावितरण कार्यालयावर धडक

गोंदिया:- शेतकरिता असलेला वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सडक अर्जुनी येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. कार्यालयात अभियंत्यासमोर समस्या मांडताना एका शेतकऱ्याच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले. सडक अर्जुनी तालुक्यात रब्बी पिकाअंतर्गत शेतकऱ्यांनी धानाची व इतर पिकाची लागवड केली आहे.

सविस्तर वाचा

17:30 (IST) 27 Mar 2025

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतात " आम्ही मुस्लिम विरोधी नाही"

नागपूर: आम्ही मुस्लिम विरोधी  नाही तर भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणा-यांच्या  विरोधात आहोत.  पाकिस्तान मॅच जिंकल्यानंतर भारतात राहून फटाके फोडणारे जे लोक आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही आहोत, असे बावनकुळे म्हणाले. ते नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर वाचा

17:26 (IST) 27 Mar 2025

ठाणे जिल्ह्यात एकाच दिवशी १६ हजार घरकुलांचे भूमिपूजन; १०० दिवसांचा कृती आराखड्यांतर्गत उपक्रम पार पडला

ठाणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यात १०० दिवसांचा कृती आराखडा आखण्यात आला आहे. या आराखड्यानुसार सर्व शासकीय कार्यालयात कामकाज करण्यात येत असून यामुळे प्रशासकीय कामकाज वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे.

सविस्तर वाचा

17:09 (IST) 27 Mar 2025

खळबळजनक! पोलिसांना सापडला देशी कट्टा, दोन राऊंड ; आयपीएल जुगाराशी संबंध ?

भंडारा : तुमसर तालुक्यातील खापा चौकात उभ्या असलेल्या टवेरा गाडीत पोलिसांना एक देशी कट्टा आणि दोन बुलेट  सापडल्या. तुमसर पोलिसांच्या या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली असून याचा संबंध आयपीएल जुगाराशी असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकाला अटक केली असून अन्य एक आरोपी फरार आहे.

सविस्तर वाचा

17:04 (IST) 27 Mar 2025

प्रियकराने केला प्रेयसीच्या वडिलाचा खून

नागपूर : आठ वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर प्रेयसीने प्रियकराला लग्नास नकार दिला. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रियकराने प्रेयसीच्या वडिलाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता जाततरोडीत घडली. नरेश (५५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. निलेश ऊर्फ नाना विनोद मेश्राम (३५, रामबाग) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

सविस्तर वाचा

16:56 (IST) 27 Mar 2025

बँकेचे ॲप वापरायचे म्हणून घ्यावा लागणार नवा मोबाईल, एसबीआय बँकेमुळे कोट्यवधी नागरिक त्रस्त

नागपूर: स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ही देशातील नामवंत बँक आहे. येथे देशातील कोट्यवधी लोकांचे खाते आहेत. अनेक नागरिकांचे पेन्शन खातेही या बँकेत आहेत. सध्या बँकेने ऑनलाईन सुविधा, मोबाईल ॲप तयार केल्या आहेत. त्याचाही लाभ अनेक नागरिक घेत आहेत. परंतु, बँकेची हीच ऑनलाईन ॲप सुविधा आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

सविस्तर वाचा

16:52 (IST) 27 Mar 2025

बदलापूर पालिकेचा कागदविरहीत कारभार, ई कार्यालय प्रणाली कार्यरत, कारभारात येणार सुसुत्रता

कुळगाव बदलापूर नगरपालिकेने कामाकजातील सुसुत्रतेसाठी १०० टक्के ई कार्यालय प्रणाली राबवली आहे. त्यामुळे दस्तऐवजांचा मागोवा घेणे सोपे होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम प्रायोगित तत्वावर सुरू होते. आता एका क्लिकवर सर्व कागदपत्रे उपलब्ध होणार आहेत.

सविस्तर बातमी...

16:51 (IST) 27 Mar 2025

नगर पथ विक्रेता समिती निवडणुक पुढे ढकला, मनसेची पालिका आयुक्तांकडे मागणी

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील नगर पथ विक्रेता (फेरीवाला) समितीवरील आठ प्रतिनिधींच्या निवडीसाठी पालिका प्रशासनाने ११ एप्रिल रोजी निवडणुक जाहीर केली आहे. पण ही निवडणूक पुढे ढकलून प्रथम नवीन फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी मनसेने पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सविस्तर वाचा...

16:00 (IST) 27 Mar 2025

कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयांमध्ये श्वान दंश इंजेक्शनचा तुटवडा

कल्याण - कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयांमध्ये श्वान दंश इंजेक्शनचा तुटवडा असल्याची माहिती पुढे येत आहे. श्वान दंश झालेला रुग्ण या रुग्णालयांमध्ये गेल्यावर त्याच्यावर धनुर्वाताचे प्रतिबंधात्मक उपचार केले जात आहेत. आमच्याकडे श्वान दंशाचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याची उत्तरे या रुग्णालयांमधील कर्तव्यावरील कर्मचारी देत असल्याच्या रुग्ण नातेवाईकांच्या तक्रारी आहेत.

सविस्तर वाचा

15:56 (IST) 27 Mar 2025

देवी मुर्ती आगमन निमित्ताने ठाण्यात वाहतुक बदल

ठाणे : देवी मुर्ती आगमन मिरवणूकी निमित्ताने कोर्टनाका परिसरात रविवारी ठाणे पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत. या वाहतुक बदलामुळे ठाणे रेल्वे स्थानक, कोर्टनाका परिसरात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.आनंद चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन केले जाते.

सविस्तर वाचा

15:50 (IST) 27 Mar 2025

पल्लवी सरोदे यांच्या स्मरणार्थ रोपांची लागवड; जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखा उपक्रम

ठाणे - ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय साहाय्यक पल्लवी सरोदे (३७) यांचा श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात कमळ आणि वॉटर लिली रोपांची लागवड करण्यात आली आहे. शासनाच्या ‘मिशन- १०० डेज’ या उपक्रमाची सुरूवात अशा पद्धतीने करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

15:31 (IST) 27 Mar 2025

नागपूजवळ तिसऱ्या व चौथ्या अतिरिक्त रेल्वे मार्गाचे काम पूर्ण

नागपूर : रेल्वे माल वाहतूक सुरळीत करणे तसेच प्रवासी वाहतूक रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार चालवण्यासाठी अतिरिक्त रेल्वे मार्ग बांधणीचे काम सुरू असून नागपूरजवळील सेलू आणि सिंदी दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. 

सविस्तर वाचा

15:16 (IST) 27 Mar 2025

इस्लामपूरात जादूटोण्याचा प्रकार; दारात बांधले बकऱ्याचे मुंडके, लिंबू, काट्याची फांजर, हळदी-कुंकू, नारळाची पूजा

सांगली : विज्ञानाच्या शोधामुळे मायाजालच्या जगात वावरत असताना इस्लामपुरात आज सकाळी महिलेच्या दारात करणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बकऱ्याचे मुंडके, पाय दोरीने बांधून दारात अघोरी पूजा करण्यात आली होती. अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी सर्व साहित्य पोत्यात भरुन पोलीसांच्या हवाली केले.

सविस्तर वाचा...

15:08 (IST) 27 Mar 2025

शहापूर किन्हवलीजवळील ग्रामस्थाला शेतकरी महिलेच्या खूनप्रकरणी जन्मठेप

कल्याण - शहापूर तालुक्यातील किन्हवली जवळील खरवली गावातील एका ग्रामस्थाने एका शेतकरी महिलेचा शेतात काम करत असताना तिचे दागिने लुटून आठ वर्षापूर्वी खून केला होता. या खूनप्रकरणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला मोते यांनी संबंधित ग्रामस्थाला जन्मठेप आणि २० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सविस्तर वाचा

15:04 (IST) 27 Mar 2025

ठाण्यात १२९ थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत; ठाणे महापालिकेने बुधवारी दिवसभरात केली कारवाई

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न वसुलीचे दिलेले उद्दीष्ट गाठण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला असून बुधवारी दिवसभरात पाणी पुरवठा विभागाने १२९ थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडून पाणी पुरवठा खंडीत केला आहे. तसेच दिवसभरात दोन कोटी रुपयांहून अधिक देयकांची वसुली केली आहे.

सविस्तर वाचा

15:04 (IST) 27 Mar 2025

डोंबिवलीतील ब्लाॅसम शाळेतील पाच वर्षाच्या जुळ्या बहिणींची १०० गड किल्ल्यांना गवसणी

डोंबिवली - डोंबिवलीतील स. वा. जोशी प्रांगणातील ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेतील पाच वर्ष ११ महिन्यांच्या दोन जुळ्या बहिणींनी मागील अडीच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राच्या विविध भागातील १०० गड किल्ल्यांना आपल्या आई, वडिलांच्या साथीने गवसणी घातली आहे. बालवयातील या भ्रमंतीबद्दल या दोन्ही बालिकांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सविस्तर वाचा

14:33 (IST) 27 Mar 2025

गोंदियात एका पाच महिन्याच्या सारसच्या मृत्यू ने उद्भवले प्रश्न ?

गोंदिया : सारस पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने गोंदिया परिसरात वावर असलेल्या दोन सारस पक्ष्यांना दोन महिन्यापूर्वी जीपीएस-जीएसएम ट्रान्समीटर लावले होते. यापैकी एका सारस पक्ष्याचा ११ केव्ही विद्युत तारांचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवार २६ मार्च रोजी सकाळी गोंदिया तालुक्यातील माकडी परिसरात घडली.

सविस्तर वाचा

14:29 (IST) 27 Mar 2025

राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजारावर गायींसाठी अनुदान; गायींची उत्पादनक्षमता कमी असल्यामुळे…

अकोला : गोशाळांमधील देशी गायींच्या पालनपोषणासाठी राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार ५६९ गायींसाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी ४५ लाख ६० हजार ५०० रुपये अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत लाभार्थी गोशाळांना वितरीत करण्यात आले. प्रति गाय प्रत्येक दिवसाप्रमाणे ५० रुपये अनुदान देण्यात आले.

सविस्तर वाचा

14:28 (IST) 27 Mar 2025

‘डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर लगाम घाला’, नागरिकांनी उच्च न्यायालयात…

नागपूर : विवाह समारंभात कर्णकर्कश डीजेचा सर्रास वापर होत असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ध्वनी प्रदूषणाबाबतच्या नियमांना डावलून शहरातील सभागृहात, लॉनमध्ये रात्री उशिरापर्यंत डीजे, बँड, फटाके यांचा वापर केला जातो. याप्रकारावर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली.

सविस्तर वाचा

14:27 (IST) 27 Mar 2025

बेपत्ता झालेल्या बालिकेच्या मृतदेह तीच्या घरात सापडला

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीला खेटून असणा-या देवीचापाडा गावात राहणारी दोन वर्षांची बालिका मंगळवारी दुपारपासून बेपत्ता होती. तीच्या पालकांनी यासंदर्भातील तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. बुधवारी रात्री घरातील पोटमाळ्यावरुन दुर्गंधी येत असल्याने शोध घेतल्यावर एका पेटीमध्ये बेपत्ता बालिकेचा मृतदेह सापडला. यामुळे देवीचा पाडा गावामध्ये एकच खळबळ माजली.अद्याप बालिकेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही.

सविस्तर वाचा...

14:15 (IST) 27 Mar 2025

पागोटे ते चौक राष्ट्रीय ग्रीनफिल्ड मार्गाच्या भूसर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध

उरण : जेएनपीएच्या राष्ट्रीय मार्ग ३४८ ला जोडणाऱ्या पागोटे ते चौक मार्गासाठी कळंबूसरे येथील शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित केल्या जाणार आहेत. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला. यावेळी या मार्गाच्या भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे सर्वेक्षण सुरू आल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच भांडवलदार, कंपनी प्रशासनाच्या फायद्यासाठी सर्वेक्षणाचा काम सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

सविस्तर वाचा...

13:56 (IST) 27 Mar 2025

एक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉरीडॉर मार्गातील कुंडेवहाळ बोगदा आरपार, डिसेंबरमध्ये रेल्वे कॉरीडॉर सुरू करण्याची घोषणा

पनवेल : एक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सोर्टियम प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जेएनपीटी या मार्गातील कुंडेवहाळ गावाजवळील १६९ मीटरचा बोगदा आरपार खोदण्याचे काम पूर्ण झाले. मागील सहा महिन्यांपासून हे काम सुरु होते.बुधवारी बोगदा वेळीच खणून पूर्ण केल्यामुळे बोगदा आरपार कामाची पाहणी करण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( डीएफसीसी) व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार हे कुंडेवहाळ येथील प्रकल्प ठिकाणी आले होते.

सविस्तर वाचा...

13:52 (IST) 27 Mar 2025

एसटी कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी ७६४ नवीन फेऱ्या, लांब पल्ल्याच्या…

नागपूर: उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत (एसटी) जादा वाहतूक करण्यात येणार आहे. उन्हाळी जादा वाहतूकीसाठी  दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

सविस्तर वाचा

13:35 (IST) 27 Mar 2025

करोनात वडिलांचा मृत्यू, आईने केले दुसरे लग्न; आजीला सांभाळणे अवघड झाल्याने मुलीचे…

अकोला : करोना महामारीच्या संकटात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आईने दुसरे लग्न करून स्वतंत्र संसार थाटला. अल्पवयीन मुलीची जबाबदारी आली ती वयोवृद्ध आजीवर. घरची परिस्थिती हालाखीची. सांभाळ कसा करावा या विवंचनेत असलेल्या आजीच्या डोक्यात विचार आला आणि त्यांनी नातीच्या लग्नाचा घाट घातला. घडले मात्र वेगळेच.

सविस्तर वाचा

13:34 (IST) 27 Mar 2025

हाताला सलाईन लावून सेवा देणारा वैद्यकीय अधिकारी सव्वा लाखांची लाच घेताना जेरबंद

गडचिरोली : काही महिन्यांपूर्वी आजारी असताना हाताला 'सलाईन' लावून सेवा देणाऱ्या अतिदुर्गम लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला सव्वा लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. डॉ. संभाजी भोकरे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून त्याने आरोग्य सहायकाकडून थकीत वेतनाचे पुरवणी देयक काढण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली होती.

सविस्तर वाचा

13:12 (IST) 27 Mar 2025

डोंबिवलीतील फडके रोड रविवारी शोभायात्रेनिमित्त वाहतुकीसाठी बंद

डोंबिवली - नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त डोंबिवली श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले जाते. शहर परिसरातील नागरिक अधिक संख्येने या उपक्रमात सहभागी होतात. चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी झालेले असतात. रविवार, ३० मार्च रोजी चैत्रपाडवा असल्याने या दिवशी फडके रस्त्यावरील वाहतूक पहाटे चार ते दुपारी एक या काळात बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिली.

सविस्तर वाचा