Marathi News Updates महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी संपलं आहे. अधिवेशनात महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले, अनेक प्रश्नांवर चर्चा झाली मात्र विरोधक कामरा आणि कबर यातच अडकून पडले होते अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर या अधिवेशनात कामरा आणि कबर याशिवाय काहीही नव्हतं असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दुसरं समन्स बजावलं आहे. तर रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास संभाजी भिडेंनी विरोध दर्शवला आहे.एकनाथ शिंदेंच्या आयुष्यात कृतज्ञता हा शब्द असेल तर तुम्ही उद्धव ठाकरेंशी कृतज्ञ असलं पाहिजे. तुम्ही सोडून गेलात, तुमचे मतभेद झाले, तुम्ही आमच्यावर टीका करता, आम्ही तुमच्यावर करतो. ज्या प्रकारची भाषा ते उद्धव ठाकरेंबाबत वापरतात त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मोदी शाह यांचं छप्पर ज्या दिवशी उडेल तेव्हा कुठे असाल? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. तसंच उद्धव ठाकरे हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. यासह सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे ती लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Maharashtra News Live Today, 27 March 2025 : “एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंबाबत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे”, संजय राऊत यांचं वक्तव्य; यासह महत्त्वाच्या घडामोडी

13:07 (IST) 27 Mar 2025

पत्नीच्या हत्येप्रकरणात शिक्षा भोगल्यानंतर अल्पवयीन बहिण,भाऊ आणि आईच्या हत्येचा प्रयत्न; डोक्यात दगडी पाटा घालून मारहाण

ठाणे : मुंबई येथे पत्नीची हत्या करून त्या प्रकरणात शिक्षा भोगून आल्यानंतर समशेरअली शहा याने त्याच्या दगडी पाट्याने हल्ला करत बहिण, भाऊ आणि आईच्या हत्येचा प्रयत्न केला. गावातील जागेचा हिस्सा आणि क्षुल्लक कारणावरून त्याने हा प्रकार केला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस समशेरअलीचा शोध घेत आहेत.

सविस्तर वाचा

13:04 (IST) 27 Mar 2025

“चंद्रपूर जिल्हा बँकेबाबत विरोधकांकडून अफवा, बँकेची आर्थिक स्थिती उत्तम,” अध्यक्षांनी थेट…

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाइन प्रणालीवर सायबर हल्ला करून ३ कोटी ७१ लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्यातील एक काेटी ३२ लाखांची रक्कम परत मिळवण्यात बँकेला यश आले आहे. उर्वरित दोन कोटी नऊ लाखांची रक्कम परत मिळवण्यासाठी बँकेने ॲड. लिमये यांची ‘फॉरेन्सिक ऑडिट’साठी नेमणूक केली आहे.

सविस्तर वाचा

12:53 (IST) 27 Mar 2025

गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी चंदूलाल बियाणीस पोलीस कोठडी

जालना : परळी, लातूर, संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक विविध जिल्ह्यातील गुंतवणुकदारांचे ३०० कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या बहुराज्यीय राजस्थानी सहकारी सोसायटीचे चंदूलाल बियाणी यांना जालन्याच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

राजस्थानी मल्टिस्टेट को ऑपरेटीव्ह सोसायटीकडून अनेक ठेवीदारांची विविध जिल्ह्यांतील शाखांमधून फसवणूक झालेली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातही याबाबतचा एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान, तपासाच्या अनुषंगाने जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोसायटीचा अध्यक्ष चंदूलाल मोहनलाल बियाणी (६०) यास बीड येथून अटक केली आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. राजस्थानी मल्टीस्टेट विरोधात ५८ तक्रारी आलेल्या असून, आतापर्यंत पाच कोटी पाच लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. ज्या ठेवीदारांनी या सोसायटीत गुंतवणूक केली आहे, ती रक्कम मिळाली नाही, अशा गुंतवणूकदारांनी जालना आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

12:50 (IST) 27 Mar 2025

आंबिवलीतील इराणी वस्तीमधील कुख्यात गुन्हेगार जाफर इराणी चेन्नईत चकमकीत ठार

कल्याण कल्याण जवळील आंबिवलीतील इराणी वस्तीमधील पाटीलनगर भागात राहत असलेल्या कुख्यात गुन्हेगार सोनसाखळी चोर जाफर गुलाम इराणी (२७) बुधवारी चेन्नई येथे १० किलो सोन्याची चोरून करून आपल्या दोन साथीदारांसह विमानाने हैदराबाद येथे पळून जात होता. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत तो ठार झाला.

सविस्तर वाचा

12:49 (IST) 27 Mar 2025

“…तर एसटीची चाके थांबतील!” कोणी व्यक्त केली ही भीती आणि का?

यवतमाळ : एसटीची भाडेवाढ झाल्यावर दहा टक्क्यांनी प्रवाशी संख्येत घट झाल्याचे या पूर्वी निदर्शनास आले आहे. पण काही दिवसांत पुन्हा परिस्थिती सुधारली. मात्र त्यानंतर दोन महिने उलटून गेले तरी परिस्थिती पूर्व पदावर न येणे व प्रवासी संख्येत मोठी घट होणे हा चिंतनाचा व चिंतेचा विषय आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यात लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा

12:14 (IST) 27 Mar 2025

राज्यस्तरावर वाशीमचा दुहेरी सन्मान, जाणून घ्या नेमकी कामगिरी काय?

अकोला : वाशीम जिल्हा प्रशासनाची अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२४-२०२५ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा झाली असून त्यात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय यश प्राप्त झाले.

सविस्तर वाचा…

11:57 (IST) 27 Mar 2025

मिरची पिकावर तणनाशक फवारत शेतकऱ्याचे नुकसान

जालना : परळी, लातूर, संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक विविध जिल्ह्यातील गुंतवणुकदारांचे ३०० कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या बहुराज्यीय राजस्थानी सहकारी सोसायटीचे चंदूलाल बियाणी यांना जालन्याच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

राजस्थानी मल्टिस्टेट को ऑपरेटीव्ह सोसायटीकडून अनेक ठेवीदारांची विविध जिल्ह्यांतील शाखांमधून फसवणूक झालेली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातही याबाबतचा एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान, तपासाच्या अनुषंगाने जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोसायटीचा अध्यक्ष चंदूलाल मोहनलाल बियाणी (६०) यास बीड येथून अटक केली आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. राजस्थानी मल्टीस्टेट विरोधात ५८ तक्रारी आलेल्या असून, आतापर्यंत पाच कोटी पाच लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. ज्या ठेवीदारांनी या सोसायटीत गुंतवणूक केली आहे, ती रक्कम मिळाली नाही, अशा गुंतवणूकदारांनी जालना आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

11:42 (IST) 27 Mar 2025

स्वस्त धान्य दुकानातून बचत गटांच्या उत्पादित वस्तूंची विक्री, गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी चंदूलाल बियाणीस पोलीस कोठडी

जालना : परळी, लातूर, संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक विविध जिल्ह्यातील गुंतवणुकदारांचे ३०० कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या बहुराज्यीय राजस्थानी सहकारी सोसायटीचे चंदूलाल बियाणी यांना जालन्याच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

राजस्थानी मल्टिस्टेट को ऑपरेटीव्ह सोसायटीकडून अनेक ठेवीदारांची विविध जिल्ह्यांतील शाखांमधून फसवणूक झालेली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातही याबाबतचा एक गुन्हा दाखल आहे. दरम्यान, तपासाच्या अनुषंगाने जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोसायटीचा अध्यक्ष चंदूलाल मोहनलाल बियाणी (६०) यास बीड येथून अटक केली आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. राजस्थानी मल्टीस्टेट विरोधात ५८ तक्रारी आलेल्या असून, आतापर्यंत पाच कोटी पाच लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. ज्या ठेवीदारांनी या सोसायटीत गुंतवणूक केली आहे, ती रक्कम मिळाली नाही, अशा गुंतवणूकदारांनी जालना आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

11:39 (IST) 27 Mar 2025

स्वस्त धान्य दुकानातून बचत गटांच्या उत्पादित वस्तूंची विक्री

छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांतून उत्पादित वस्तू ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी घेतला आहे.

बचत गटांच्या महिला दर्जेदार उत्पादन करतात. मात्र, त्यांच्या उत्पादित वस्तू व साहित्याची विक्री ही केवळ मेळावे व कार्यक्रमाच्या माध्यमातूनच होते. वर्षभर मागणी असतानाही बाजारपेठ नसल्याने हे वस्तू विक्री व्यवहार होत नाहीत. आता स्वस्त धान्य दुकानातून बचत गटाच्या वस्तू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बचत गटांच्या वस्तूंवर ग्राहकांचा विश्वासही आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनासुद्धा या वस्तू विक्रीतून कमिशन देता येईल.

जिल्ह्यात १८ हजार ७५५ बचत गट आहेत. या बचत गटांना ३८ कोटी १६ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. काही बचत गटांनी केलेल्या उत्पादनास मोठी मागणी आहे. अगदी गोधडी शिवून देणाऱ्या बचत गटासही चांगली मागणी आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांतून काही पदार्थ विक्रीस गेले, तर स्वस्त धान्य दुकानदार आणि बचत गट दोघांचाही लाभ होईल, या विचारातून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विलास जाधव व जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

11:37 (IST) 27 Mar 2025

आयपीएल सट्टाप्रकरणी कराडमध्ये दोघा तरुणांना अटक

कराड : सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा १८ वा सिझन सुरू आहे. या टी ट्वेंटी आयपीएल क्रिकेट मॅचच्या माध्यमातून झटपट श्रीमंतीसाठी सट्टा लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने सोमवारी ‘आयपीएल’चा सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक केली. या कारवाईत आरोपींकडून सदर गुन्ह्यातील महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून या प्रकरणातील साखळीच्या शोधासाठी पोलीस पथक मुंबईला रवाना झाले असून त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी छापासत्र सुरू केले आहे.

कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील या धडक कारवाईत संदीप संपत बडेकर व प्रथमेश बाळासाो कटरे (दोघे रा. कराड) अशी आयपीएल सट्टा प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

11:33 (IST) 27 Mar 2025

मोदींच्या उपस्थितीत झालेला शंखनाद वर्ध्यात होणार ? असा प्रसंग व अशा घडामोडी

वर्धा : शंख हा हिंदू पुजा संस्कृतीतील महत्वाचा घटक आहे. पुजेचा आरंभ व सांगता शंखनाद करीत केली जातो. देवघरात पण शंख ठेवून त्याची पूजा होते. तो वाजविण्याचे कसब साध्य करणे सोपे नाही. त्यासाठी तपश्चर्य लागते, असे म्हटल्या जाते. ती एकाने साध्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी येथे गंगापूजन कार्यक्रमासाठी आले होते.

सविस्तर वाचा…

11:33 (IST) 27 Mar 2025

महिला सावकाराच्या घरातील छाप्यात स्टार कासव आढळले; आज तक्रार दाखल होणार

छत्रपती संभाजीनगर येथील नंदनवन कॉलनीत एका महिला अवैध सावकारारी करत असल्याची तक्रार प्राप्त होताच तिच्या घरात बुधवारी दुपारी तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या पथकाने छापा मारला. सायंकाळपर्यंत छाप्या प्रकरणात कारवाई सुरू होती. या छाप्यामध्ये काही कागदपत्रांसह एक स्टार कासवही आढळून आले आहे. या स्टार कासवाचा उल्लेख पंचनाम्यातही नमूद असून कासव वन विभागाच्या ताब्यात दिल्याचे माहिती तालुका उपनिबंध सुरेखा फुफाटे यांनी “लोकसत्ता”शी बोलताना दिली. या प्रकरणी आज, गुरुवारी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईल, असेही फुपाटे त्यांनी सांगितले.

11:28 (IST) 27 Mar 2025

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कोंडी कायम? वर्षभरानंतरही आठपदरीकरणाचा प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या आठपदरीकरणाचा प्रस्ताव वर्षभरापासून राज्य सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) फेब्रुवारी २०२४ मध्ये आठपदरीकरणाचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्यापही या प्रस्तावास मंजुरी न मिळाल्याने आठपदरीकरण रखडले आहे.

सविस्तर वाचा….

11:25 (IST) 27 Mar 2025

जालन्यात शेतकरी कर्जमाफीसाठी विहिरीत लटकलेल्या बाजेवर आंदोलन; आंदोलक शिवसेनेचे (उबाठा) पदाधिकारी

जालना : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील अकोला शिवारात असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत थेट बाज लटकती ठेवून त्यावर बसून बुधवारपासून आंदोलन सुरू केले आहे. कारभारी म्हसलेकर आणि ऋषी थोरात, अशी आंदोलकांची नावे असून, ते दोघेही अनुक्रमे शिवसेना व युवा सेनेचे (उद्धव ठाकरे गट) पदाधिकारी असल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीसाठी यापूर्वी मुंबईत आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता पुन्हा शिवसैनिक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी आक्रमक होताना दिसत आहेत. आज, गुरुवारीजालना – राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील अकोला शिवारात असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत थेट बाज लटकती ठेवून त्यावर बसून बुधवारपासून आंदोलन सुरू केले आहे.

11:16 (IST) 27 Mar 2025

वालधुनीत कचरा रोखण्यासाठी उपाययोजना, नदी संवर्धनासाठी आयुक्तांचा पुढाकार, जनजागृतीत सामाजिक संस्थांचाही सहभाग

उल्हासनगरः प्रदुषणाने गेल्या काही वर्षात गटारगंगा झालेल्या वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी आता पुन्हा नव्याने प्रयत्न केले जात आहेत. महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून नदीत टाकल्या जाणाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुलांवर लोखंडी जाळ्या लावल्या जात आहेत. नाद्यावर फेरिवालेही व्यवसाय करत रात्री कचरा टाकतात. त्यामुळे त्यांनाही येथून हटवण्यात आले असून त्या ठिकाणचा परिसर सुशोभीत करण्यात आला आहे. नागरिकांनाही नदी कचरा न टाकण्याचे आवाहन केले जाते आहे.

सविस्तर वाचा….

11:09 (IST) 27 Mar 2025

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात रंगला “एफ-२” वाघिणीच्या मातृत्वाचा सोहळा

नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे आणि त्यासाठी कारणीभूत ठरत आहे ती “एफ-२” वाघीण आणि तिचे पाच बछडे. याच वाघीण आणि तिच्या बछड्यानी अभयारण्यातील गाईड आणि जिप्सी ड्रायव्हर यांना अडचणीत आणले होते. त्यामुळे अजूनच त्यांना बघण्याची चुरस पर्यटकांमध्ये वाढीला लागली आहे.

सविस्तर वाचा…

11:00 (IST) 27 Mar 2025

मनसेचे माजी आमदार राजू पाटील कुणाल कामराला म्हणाले धन्यवाद

स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने एका शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्याने मोठा गदारोळ माजला. गेल्या 2-3 दिवसांपासून या मुद्यावरून वातावरण तांपलेलं असून राज्यात नवा वादही पेटला आहे. मात्र कुणाल कामरा आपल्या भूमिकेवर ठाम असून माफी मागणार नसल्याचे त्याने स्पष्ट केलं. उलट त्या व्हिडीओनंतर त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एकापाठोपाठ एक असे नवे व्हिडीओही शेअर केले आहेत. त्यातीलच एका व्हिडीओमध्ये त्याने राज्यातील मेट्रोची काम, रस्त्यांची दुर्दशा या मुद्यांवरूनही सरकारला टार्गेट केलं आहे. सत्ताधारी कुणाल कामरावर भडकले असले तरी विरोधकांनी मात्र त्याची बाजू उचलून धरली आहे. कुणाल कामराला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेत, राजू पाटील यांनीही X या सोशल मीडिया साईटवरील त्यांच्या अकाऊंटवर कुणाल कामराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी कुणाला कामराला टॅगही केले असून, डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल त्यांनी कुणालला धन्यवादही दिलेत. यामुळेही हा आता नवा वाद निर्माण होऊ शकतो.

10:42 (IST) 27 Mar 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्यंगचित्राचं होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचं होर्डिंग लावणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल कामराच्या कवितेचा संदर्भ घेऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने हे बॅनर लावल्याचं लक्षात येतं. या बॅनरवर ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का? असा सवाल करण्यात आला आहे.