Maharashtra Political Crisis Updates : राज्यातील सत्तासंघर्षांवर सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस होता. या निकालाकडे समस्त राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण झाला आहे, आता प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे.
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री उशीरा भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्यांविरोधात सुरक्षा दलांनी कारवाई केली. हा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत असताना एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने घुसखोरांना रोखल्यानंतर कुपवाडाच्या सैदपोरा फॉरवर्ड भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली.
Maharashtra News Updates : वाचा राज्यभरातील विविध घडामोडी केवळ एकाच क्लिकवर
पुणे : मराठी भाषेसाठी दिलेले लक्षणीय योगदान आणि कार्याबद्दल राज्य शासनाने सुरू केलेला ज्येष्ठ भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ. अशोक केळकर यांच्या नावाने देण्यात येणारा मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेला जाहीर झाला आहे.
पुणे : चिऊ-काऊच्या, परिकथेच्या गोष्टी ऐकत आणि भातुकलीचा खेळ खेळत बालवयात प्रत्येकजण मोठा होतो. पण याच वयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणाऱ्या पुण्यातील वेदांशी भोसले हिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविला आहे.
सांगली : नात्यातील मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी कुंडल येथील नागेश हंबीरराव होवाळ (वय ३६) या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी ठोठावली.
पहाटेच्या शपथविधीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, “मी कोणाशी बोलायचे तो माझा अधिकार”, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथील कार्यक्रमासाठी आले होते. येथे त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली.
अमेरिकेतील अर्कान्सास येथील खासदाराने विधेयकावर सुरु असलेल्या जनसुनावणी दरम्यान एका ट्रान्सजेंडर महिलेला सर्वांसमोर अतिशय घाणेरडा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अर्कान्सास राज्यातच नाही तर संपूर्ण अमेरिकेतून टीका होत आहे.
महापालिका परिवहन उपक्रमाचा यंदाच्या वर्षीचा म्हणजेच २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी प्रशासनाकडून परिवहन समितीच्या सभेत सादर करण्यात येणार असून त्यात केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या तसेच परिवहनच्या निधीतून पर्यावरणपूरक वीजेवरील बसगाड्या खरेदी करण्यावर भर देण्यात येणार आला आहे.
महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठीय तसेच सर्व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात गुरुवारी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप सुरू केला, त्यामुळे विद्यापीठातील सर्व कामकाज ठप्प झाले होते. सविस्तर वाचा…
चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना चंद्रपूर जिल्ह्यात केवळ बॅनर, पोस्टर व होर्डिंगपुरती मर्यादित ठरली आहे. जिल्हा प्रमुख नितीन मत्ते व सहसंपर्क प्रमुख बंडू हजारे या दोघांशिवाय तिसरा नेता या पक्षाशी जुळलेला नाही. विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांत एकही मोठा नेता किंवा मोठा कार्यक्रम शिंदे गटाला घेता आला नाही.
फेब्रुवारीमधील पहिला पंधरवडा संपला तरी एस.टी. कर्मचाऱ्यांना जानेवारीचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे एस. टी. कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष धगधगत आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी अर्थ खाते आणि एस.टी. महामंडळाची मंत्रालयात गुरुवारी सायंकाळी बैठक पार पडणार आहे. यावेळी, राज्य सरकार एस. टी. महामंडळाला ३५० कोटी रुपये निधी देण्याची शक्यता आहे.
पुणे : भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात खासदार गिरीश बापट सक्रिय झाले आहेत. खासदार बापट यांच्या उपस्थितीत कसब्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा केसरीवाड्यात आयोजित करण्यात आला आहे.
सोयाबीन, कापसाच्या भावासह पीकविम्याच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नक्षलवादी-दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला.
पुणे : कामगार विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दोन दलालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. या प्रकरणी या दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नबाम रेबिया कायदा लागून असा निकाल लावा असं त्यांचे जे म्हणणे होते, त्यावर आमचे म्हणणे आहे की ते प्रकरण वेगळे आहे, म्हणून सात न्यायाधीश खंडापीठाने निकाल द्यावा असं आमचे म्हणणं आहे.
भारतासह जगभरात नुकताच साजरा झालेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त तरूणाईने तब्बल आठवडाभर अलिंगनादी सोहळे साजरे केले. मात्र, यवतमाळातील दोन चिमुकल्यांनी चक्क वृक्षाला अलिंगन देत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करीत समाजाला कृतीतून मोठा संदेश दिला.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण झाला आहे, आता प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे.
पुणे : ”काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मत म्हणजे विकास थांबवणे. दोन्ही पक्षांनी केवळ स्वतःसाठी मतांचे राजकारण केले आहे. देशाच्या विकासाठी त्यांनी कधीच राजकारण केले नाही, त्यांना विचारधारा नाही. भाजपाची विचारधारा पक्की असून, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा आहे”, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
गरीब कुटुंबातील एका मुलामध्ये ‘थॅलेसेमिया’चे निदान झाले. रक्त संक्रमणातून मुलाला ‘एचआयव्ही’ची बाधा झाली. वयाच्या सात वर्षांपर्यंत वेदना सहन करणाऱ्या मुलावर ‘थॅलेसेमिया’ आणि ‘सिकलसेल’ केंद्राचे संचालक डॉ. विंकी रुघवाणी यांनी उपचार केले.
सध्या नशेखोरांच्या दुनियेत ‘एमडी’ ड्रग्ज सर्वांत प्रसिद्ध आहे. मात्र, यवतमाळसारख्या ग्रामीण भागात हे ड्रग्ज मिळत नाही. त्यामुळे आता येथील तरूण मुंबईतून या ड्रग्जच्या तस्करीत उतरले आहेत. यवतमाळातील एक तरूण मुंबईतून एमडी ड्रग्जची तस्करी करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकला. सविस्तर वाचा…
राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. अवघ्या राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...
पुणे : माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंदारे यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वाहन कर्ज सल्लागारानेच बँकेची ४७ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विद्यापीठ रस्ता आणि टिळक रस्ता शाखेत हा प्रकार घडल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी आदित्य नंदकुमार सेठिया (रा. प्रेमनगर, बिबवेवाडी) याच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण शहर हे शहरी, ग्रामीण पट्ट्यात विभागले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार रुग्ण सेवा मिळण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने दोन सर्वोपचारी रुग्णालये उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. या रुग्णालयांना शासन सर्वेातपरी आर्थिक साहाय्य करील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे दिले. सविस्तर वाचा…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू खासगी सचिव म्हणून सुमित वानखेडे यांची राजकीय व प्रशासकीय वर्तुळात ओळख आहे. ते मूळचे आर्वीकर तर त्यांची सासुरवाडी वर्धेची. मात्र त्यांचा सर्वाधिक वेळ जातो ते जनतेच्या समस्या ऐकण्यात. सविस्तर वाचा…
धान केंद्र वाटप, भरडाईत तफावत, संस्थांची तपासणी न करणे आदी कारणांमुळे धान घोटाळे होत असतानाही केवळ कागदोपत्री कारवाई करणाऱ्या भंडारा जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण रमेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर मध्ये उद्या (१७ फेब्रुवारी) भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याचे आगमन होत आहे. ते हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. सविस्तर वाचा…
शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने आणि त्याच्या साथीदारांनी काही सुशिक्षित बेरोजगारांची ३२ लाखांनी फसवणूक केली. सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वादानंतर प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत सर्व नेत्यांनी उपस्थित राहून एकीचा संदेश दिला असला, तरी आधीच गटबाजीने विखुरलेल्या प्रदेश काँग्रेसमधील एकी किती काळ टिकणार, असा प्रश्न काँग्रेसमधील जुन्याजाणत्यांना पडला आहे.
मुंबई : क्रिकेटपटू पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढण्यावरून झालेल्या वादातून टोळक्याने जोगेश्वरी पश्चिम परिसरात एका व्यावसायिकाच्या गाडीची तोडफोड केली. तसेच प्रकरण मिटवण्यासाठी व्यावसायिकाकडे ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी सहाजणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर फूड प्लाझासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागविलेल्या निविदेला २ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक कंपन्यांच्या मागणीनुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई : यंदा गणेशोत्सवातील तीन दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत धनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. वर्षभरातील १५ दिवस सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात येते.
राज्य शासनाकडून दबाव टाकण्यात आल्याने राज्य मंडळाला दहावी बारावीच्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वाढवून द्यावी लागली आहेत. मात्र या निर्णयामुळे राज्य मंडळाच्या स्वायत्ततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.