Maharashtra Political Crisis Updates : राज्यातील सत्तासंघर्षांवर सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस होता. या निकालाकडे समस्त राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण झाला आहे, आता प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री उशीरा भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्यांविरोधात सुरक्षा दलांनी कारवाई केली. हा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत असताना एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने घुसखोरांना रोखल्यानंतर कुपवाडाच्या सैदपोरा फॉरवर्ड भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली.

Live Updates

Maharashtra News Updates : वाचा राज्यभरातील विविध घडामोडी केवळ एकाच क्लिकवर

11:09 (IST) 16 Feb 2023
नागपूर : उपराजधानीत आकर्षक चित्रांनी सुशोभित भिंती पुन्हा काळवंडण्याच्या मार्गावर

शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासह कलेचा वारसा लाभला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने स्वच्छ व सुंदर नागपूर करण्यासाठी शहरातील विविध भागातील भिंतीवर आकर्षक चित्रे रेखाटण्यात येत आहे.

सविस्तर वाचा…

11:07 (IST) 16 Feb 2023
संत साहित्याचा संस्कृतमध्ये अनुवाद झाला तरच भारत विश्वगुरू! सरसंघचालकांचे प्रतिपादन

महाराष्ट्रासह तामिळनाडू, गुजरात अशा सर्वच राज्यांमध्ये अनेक संत होऊन गेले. या सगळ्याच प्रांतांमध्ये संस्कृतचा अभ्यासही होतो. त्यामुळे येथील संत साहित्याचा संस्कृतमध्ये अनुवाद झाला तरच भारत विश्वगुरू होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. सविस्तर वाचा…

11:06 (IST) 16 Feb 2023
‘ऑरेंज सिटी’ ते ‘क्राईम सिटी’! उपराजधानीत गेल्या दहा वर्षांत तब्बल ८९४ हत्याकांड

नागपूर शहराची ‘ऑरेंज सिटी’ ते ‘क्राईम सिटी’ ओळख निर्माण व्हायला वाढती गुन्हेगारी जबाबदार आहे. शहरातील टोळीयुद्ध आणि कौटुंबिक कलहातून सर्वाधिक हत्याकांड घडले असून गेल्या दहा वर्षांत तब्बल ८९४ हत्याकांडाच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 16 Feb 2023
यंदा राज्यात सर्वाधिक पीक उसाचे; दुसऱ्या क्रमांकावर केळी, तर तिसऱ्या क्रमांकावर संत्री

पुणे : महसूल विभागाच्या ई-पीक पाहणी ऑनलाइन नोंदणी बारमाही पिकांच्या नोंदणीत यंदा ऊस या नगदी पिकाची सर्वाधिक नोंदणी झाली आहे. राज्याच्या सर्वच भागांत एकूण पीक नोंदणीपैकी सुमारे चार लाख पाच हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे.

सविस्तर वाचा…

11:04 (IST) 16 Feb 2023
अमरावती : मेंढ्या, पाळीव जनावरे बेपत्‍ता होण्‍याचे रहस्‍य अखेर उलगडले…

ग्रामीण भागातून अचानकपणे मेंढ्या, पाळीव जनावरे बेपत्‍ता होण्‍याचे प्रकार वाढले होते. या मेंढ्या चोरून नेल्‍या जात होत्‍या, हे लक्षात येत होते, पण चोरांचा सुगावा लागत नव्‍हता. गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने तपास सुरू केला, तेव्‍हा त्‍यांना चोरीची कार्यपद्धती पाहून धक्‍काच बसला.

सविस्तर वाचा…

11:02 (IST) 16 Feb 2023
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात डेक्कनच्या तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकांची उलटतपासणी

पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात बचाव पक्षाकडून बुधवारी डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उलटतपासणी घेण्यात आली.

सविस्तर वाचा…

11:02 (IST) 16 Feb 2023
ठाणे : महेश आहेर यांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध; आव्हाड यांचा गंभीर आरोप

ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून ते संघटीत गुन्हेगारांचा म्होरक्या असल्याचा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांसदर्भाचे पत्र त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिले आहे. सविस्तर वाचा…

11:02 (IST) 16 Feb 2023
दहावी बारावीच्या परीक्षेत वेळ वाढवण्यासाठी शासनाकडून दबाव, राज्य मंडळाच्या स्वायत्ततेबाबत प्रश्नचिन्ह

पुणे : राज्य शासनाकडून दबाव टाकण्यात आल्याने राज्य मंडळाला दहावी बारावीच्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वाढवून द्यावी लागली आहेत. मात्र या निर्णयामुळे राज्य मंडळाच्या स्वायत्ततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सविस्तर वाचा..

11:01 (IST) 16 Feb 2023
‘इन्शुरन्सदेखो’ची १५ कोटी डॉलरची निधी उभारणी

मुंबई : विमा वितरणांती तंत्रज्ञानाधारीत कंपनी ‘इन्शुरन्सदेखो’ने मालिका ए अंतर्गत १५ कोटी अमेरिकी डॉलरची निधी उभारणी अलिकडेच केली. भागभांडवल आणि कर्ज असे दोहोंचे मिश्रण असलेल्या निधी उभारणीत, गोल्डमन सॅक्स ॲसेट मॅनेजमेंट आणि टीव्हीएस कॅपिटल फंड यांच्यासह इन्व्हेस्टकॉर्प, अवतार व्हेंचर्स आणि लीपफ्रॉग इन्व्हेस्टमेंट्स यांनी सहभाग केला.

सविस्तर वाचा…

11:01 (IST) 16 Feb 2023
ठाणे : आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका

नौपाडा येथील सेंट जॉन शाळे समोर गुरूप्रेरणा या तीन मजली इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १३ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत त्यांची सुखरूप सुटका केली. सविस्तर वाचा…

11:00 (IST) 16 Feb 2023
संपत्तीत महिलांना समान वाटा, पुणे जिल्ह्यात महिलांच्या नावे आठ लाख १५ हजार मिळकती

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांना घरांची मालकी मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. आतापर्यंत नऊ लाख २७ हजार ७०६ मिळकतींपैकी आठ लाख १५ हजार ५७३ मिळकतींवर महिलांची नावे लागली आहेत.

सविस्तर वाचा…

11:00 (IST) 16 Feb 2023
Elon Musk यांनी गेल्या वर्षात दान केले तब्बल ‘इतक्या’ किंमतीचे शेअर्स, जाणून घ्या

एलॉन मस्क हे सध्या ट्विटरचे सीईओ आहेत. आपल्या अनेक निर्णयांमुळे ते कायम चर्चेत असतात. टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांनी गेल्या दोन वर्षात मोठी रक्कम दान केली आहे. वाचा सविस्तर बातमी

10:59 (IST) 16 Feb 2023
“महाविकास आघाडीने स्वतःचे घर सांभाळावे, उगीच आमच्या डोक्यावर खापर फोडू नये”, ‘त्या’ आरोपावर देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला

पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी पक्षात बंडखोरी झाल्याने त्यामागे कोणीतरी मोठा नेता असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सविस्तर वाचा…

10:58 (IST) 16 Feb 2023
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यंदा  कोल्हापूरचे प्रा. चंद्रकुमार नलगे यांना  जाहीर झाला आहे. तर ग्रंथाली प्रकाशनास श्री. पु. भागवत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:56 (IST) 16 Feb 2023
Samsung चं टेन्शन वाढलं, Oppo चा दमदार FLIP फोन बाजारात, तब्बल ४ लाख वेळा…

सध्या भारतीय बाजारपेठेत सॅमसंगचे अनेक फ्लिप फोन उपलब्ध आहेत. अनोख्या डिजाईनमुळे हे फीचर सध्या चर्चेत आहे. मात्र, सॅमसंगला आता फ्लिप टेक्नॉलॉजीमध्ये जोरदार टक्कर देण्यासाठी ओप्पोने नवीन फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे. वाचा सविस्तर बातमी

10:54 (IST) 16 Feb 2023
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला; एक दहशतवादी ठार

10:53 (IST) 16 Feb 2023

राज्य शासनाकडून दबाव टाकण्यात आल्याने राज्य मंडळाला दहावी बारावीच्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वाढवून द्यावी लागली आहेत. मात्र या निर्णयामुळे राज्य मंडळाच्या स्वायत्ततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे. वाचा सविस्तर बातमी…

राज्य शासनाकडून दबाव टाकण्यात आल्याने राज्य मंडळाला दहावी बारावीच्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वाढवून द्यावी लागली आहेत. मात्र या निर्णयामुळे राज्य मंडळाच्या स्वायत्ततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.