Maharashtra Political Crisis Live News Updates, 23 February 2023: गेल्या दोन दिवसांपासून देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पहिले दोन दिवस ठाकरे गटाची बाजू मांडताना अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता शिंदे गटाच्या बाजूने महेश जेठमलानी यांच्याकडून कशाप्रकारे त्यांच्या मुद्द्यांवर प्रतिवाद केला जातो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
या सुनावणीचं सर्वोच्च न्यायालयातून थेट प्रसारण केलं जात आहे.
SC Live News Updates: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!
जयंत पाटलांचा फोटो कार्यकर्त्यांनी लावला होता. पण माझ्या आणि अजित पवारांच्या फोटोवर कुणाचंही नाव नाहीये. त्यामुळे हा अजित पवार आणि माझ्यावर अन्याय आहे. महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. आमचे फोटो आमची परवानगीही न घेता कोण लावतंय? – सुप्रिया सुळेंची 'भावी मुख्यमंत्री' बॅनर्सवर प्रतिक्रिया
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. यात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी भावनिक टिपण्णीही केली. ते नेमकं काय म्हणाले त्याचा हा आढावा…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी म्हणून नेत्यांचा उल्लेख करण्याची पद्धत आहे. भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री.. माझ्या शुभेच्छा आहेत. मी माझ्या अनुभवातून शिकलो की कधीही काहीही होऊ शकतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कुणाला वाटलं होतं का? ते बनले. त्यामुळे ज्याला ज्याला जो जो भावी म्हणून वाटतो, त्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत – सुप्रिया सुळे, अजित पवारांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर्स लागल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया!
“राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो की, कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे”, MPSC च्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट
राज्य सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 23, 2023
आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो की, कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे. #MPSC https://t.co/OA7Y50UfgU
हळूहळू गौप्यस्फोट होत आहेत आणि मी जे बोललो, तेच कसं खरं होतं, हे आता हळूहळू सगळ्यांना समजतंय. पण अजून अर्धच समजलंय, अजून अर्ध्याला वेळ आहे. मी काहीही बोललो, की समोरून दुसरी गोष्ट बोलली जाते. त्यामुळे गोष्टी बाहेर येतात. असंच हळूहळू सगळ्या गोष्टी मी बाहेर आणेन – देवेंद्र फडणवीस
संजय राऊतांना माझ्या क्षमतेवर विश्वास आहे याबद्दल त्यांचे आभार मानुयात. पण अलिकडच्या काळात संजय राऊत जे बोलतायत, ते फार गांभीर्याने घेण्यासारखं नाहीये. त्यांच्या लेव्हलच्या नेत्यानं बोलताना काही संयम पाळला पाहिजे. लोकांना खरं वाटेल असं तरी बोललं पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे – देवेंद्र फडणवीस
गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीच्या परीक्षार्थींनी सुधारीत परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याची मागणी करत आंदोलन पुकारलं होतं. त्यावर आता एमपीएससीनं मोठा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 23, 2023
कपिल सिब्बल ज्येष्ठ वकील आहेत. अनेक दशकं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात भारताची सर्वोच्च घटना आणि सर्वोच्च न्यायालय याचं मूल्य कमी होता कामा नये यासाठी काम केलं. असं झालं तर तो लोकशाहीसाठी शेवटचा खिळा ठरेल. त्यामुळे त्यांनी भावनावश होणं साहजिक आहे. ज्यांनी असंख्य लढाया न्यायालयात लढल्या आहेत. संविधानाचं आणि लोकशाहीचं जतन व्हावं यासाठीच हा प्रयत्न आहे – अनिल देसाई
३ तारखेला शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेनेच्या व्हीपच्या विरोधात मतदान केलं. राजन साळवी या अधिकृत उमेदवाराला मतदान करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. ते न करता त्यांनी राहुल नार्वेकरांना मतदान केलं. त्यामुळे व्हीपचं उल्लंघन त्यांनी केलंय. ३ तारखेला व्हीप लागू होता. राहुल नार्वेकरांनी त्यांची निवड झाल्यानंतर रात्री त्यांनी भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता दिली. त्यामुळे शिवसेनेचा व्हीप तेव्हा लागू होता ते न्यायालयानंही मान्य केलं आहे – अनिल देसाई
महाराष्ट्रातील सत्तांतर आणि त्यातील राज्यपालांची भूमिका यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोरील सुनावणीत जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कपिल सिब्बलांना राज्यपाल बहुमताचा निर्णय घेऊ शकतात का? असा प्रश्न विचारला. त्यावर सिब्बलांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (२३ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान बोलत होते.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता, तर हे ३९ जण कुठल्या दिशेने मतदान करतात हे दिसलं असतं असा सरन्यायाधीशांचा मुद्दा होता. त्यावर आमच्या वकिलांनी सांगितलं की त्यांनी राजीनामा दिला न दिला हा भाग वेगळा. कारण ते अविश्वास ठरावासाठी गेले असते, तर या ३९ जणांचं मतदान ज्या व्हीपमुळे सिद्ध होणार होतं तोच व्हीप ३ तारखेलाही लागू होता – अनिल देसाई
मी कपिल सिब्बल यांच्या मताशी सहमत नाही याचं कारण एवढंच आहे की विधानसभा अध्यक्षांची निवड होते तेव्हा त्यासंदर्भातला प्रस्ताव रितसर दाखल केला जातो. त्यानंतर विधानसभेतले सदस्य मतदान करतात. मतदान झाल्यानंतर निकाल जाहीर केला जातो. सगळ्या नियमांनानुसारच विधानसभा अध्यक्ष निवडले जातात. माझी निवडही तशाच पद्धतीने झाली आहे – राहुल नार्वेकर
अद्यापही सुनावणी पूर्ण झालेली नाही. शिंदे गटाचंही म्हणणं अजून ऐकायचं आहे. घटनापीठ प्रामुख्याने आमदारांच्या अपात्रतेकडे लक्ष केंद्रीत करेल. पण आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं त्यांनी तोंडी सांगितलं. पण अध्यक्षांनी म्हणजे कोणत्या अध्यक्षांनी हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
आज सरन्यायाधीशांनी काही प्राथमिक मुद्देही उपस्थित केले. ३० जूनला बहुमताच्या चाचणीत ठाकरे गटाने भाग घेतला असता, तर कदाचित त्यांना निश्चित करता आलं असतं की अपात्रतेची कारवाई करता येईल की नाही. असं गृहीत धरलं की त्यावेळी ठाकरे सरकार अल्पमतात गेलं असतं, तर न्यायाधीश म्हणाले की नबाम रबिया प्रकरणाप्रमाणे ती परिस्थिती पूर्वलक्ष्यी स्थितीवर आणता आली असती असं न्यायाधीशांनी तोंडी म्हटलं – उज्ज्वल निकम
ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांनी आज भावनास्पर्श युक्तिवाद केला. कारण कायद्याच्या मुद्द्याबरोबर असं झालं नाही, तर लोकशाही संपेल अशा प्रकारचे भावनेला हात घालणारे मुद्देही आले. अर्थात, हे घटनापीठ असल्यामुळे ते या मुद्द्यांचा आणि घटनेचा संबंध कसा लावता येईल, हे घटनापीठ बघेल – उज्ज्वल निकम
सर्वोच्च न्यायालयासमोरील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली आहे. आता मंगळवारी पुन्हा अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडणार आहेत. “मंगळवारी फक्त थोडाच वेळ मी युक्तिवाद करेन”, असं सिंघवी आज सुनावणी संपताना न्यायालयाला म्हणाले आहेत.
The constitution bench hearings will resume on 28th February 2023.#ShivSenaCrisis #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourt
— Live Law (@LiveLawIndia) February 23, 2023
सर्वोच्च नायालयात युक्तिवाद करताना अभिषेक मनू सिंघवी यांनी नबाम राबिया प्रकरणाचा दाखला दिला आहे. “नबाम राबिया प्रकरणातही न्यायालयानं जवळपास आठ महिन्यांपूर्वीची परिस्थिती ग्राह्य धरून त्यानुसार निकाल दिला होता”, असं म्हणत सिंघवी यांनी महाराष्ट्राच्या प्रकरणातही त्याच प्रकारे न्यायालयाने विचार करावा, असा युक्तिवाद केला.
Singhvi: In Nabam Rebia, the court turned the clock back with eight months lapsed in between and the status quo ante was restored. Most of the government was changed.#ShivSenaCrisis #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourt

३० जूनला भाजपाच्या सदस्यांसमवेत शपथविधी घेतला आणि पुन्हा ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भाजपाच्या उमेदवाराला मत दिलं. या दोन्ही वेळी पक्षाच्या व्हीपविरोधात शिंदे गटाचे सदस्य गेले. त्यामुळे दोन्ही वेळा दहाव्या परिशिष्टाचं उल्लंघन झालं – अभिषेक मनू सिंघवी
Dr Singhvi: This act was carried out on 30th June which was swearing in with senior members of BJP. 3rd of July, the same trust vote happened at the speaker's election.#ShivSenaCrisis #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourt

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देता बहुमताच्या चाचणीला सरकार सामोरे गेलं असतं, तर परिस्थिती वेगळी असती, अशा आशयाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात लंच ब्रेकनंतर अभिषेक मनू सिंघवी यांनी पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात केली आहे.

सर्वोच्च न्यायालयायत लंच ब्रेकनंतर थोड्याच वेळात पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार. अभिषेक मनू सिंघवी सध्या ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत.
CJI DY Chandrachud: If whether there's a difference or not is foreclosed by virtue of the fact that you prevented that difference from emerging…

Singhvi: I'll tell why we didn't foreclose.
CJI DY Chandrachud: We'll come back after lunch.
Hearing to resume at 2 pm.#ShivSena
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गेले दोन दिवस ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. युक्तिवादाच्या शेवटी कपिल सिब्बल हे भावनिक झाल्याचंही बघायला मिळालं. दरम्यान, या युक्तिवादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा महाराष्ट्रातील सत्तांतर कायदेशीर की बेकायदेशीर, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का यावरील युक्तिवाद सलग अडीच दिवसांनंतर संपला. युक्तिवादाच्या शेवटी सिब्बल यांनी भावनिक टिपण्णी केली. “मी हरेन किंवा जिंकेन. मात्र, मी इथे फक्त या प्रकरणासाठी उभा नाही,” असं मत सिब्बल यांनी व्यक्त केलं. ते गुरुवारी (२३ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोरील सुनावणीत बोलत होते.
बावनकुळे आणि फडणवीस यांचे वक्तव्य परस्परविरोधी आहे. या दोघांमधून खरं कोण बोलत आहे? हा संशोधनाचा विषय आहे. लोकांच्या मनात राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
तुम्ही जर बहुमत चाचणीला सामोरे गेला असता, तर संंबधित अपात्रतेची नोटीस बजावलेल्या ३९ आमदारांमुळे नेमका काय परिणाम झाला हे स्पष्ट झालं असतं. कारण हे खुलं मतदान असतं. जर या ३९ आमदारांमुळेच तुम्ही ती चाचणी हरला असता आणि हे आमदार अपात्र ठरले असते, तर तुम्हीच जिंकला असता – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
CJI DY Chandrachud: If you had faced the trust vote, these are open votes, and lost- it would have been clear if these 39 people made a difference.#ShivSenaCrisis #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourt

तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेले असता आणि त्यानंतर अपात्रतेची नोटीस बजावलेल्या ३९ आमदारांच्या मतदानामुळे ती चाचणी तुम्ही हरला असता, तर ते आमदार अपात्र ठरल्यानंतर तुम्ही जिंकला असता – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू असताना न्यायालयाने लंच ब्रेक घेतला आहे. लंच ब्रेकनंतर पुन्हा सिंघवी युक्तिवाद करायला सुरुवात करणार आहेत.
एकनाथ शिंदेंचा शपथविधी चुकीचा होता. न्यायालयानं ही सर्व प्रक्रिया पुन्हा करण्याचे आदेश द्यायला हवेत. त्याशिवाय, तेव्हाच्या विधानसभा अध्यक्षांनीही त्याप्रमाणेच निर्णय द्यायला हवा – अभिषेक मनू सिंघवी
CJI DY Chandrachud: So logically what would be the directions of the court?

Singhvi: The act of swearing-in is wrong and your lordships will ask for it to be done again.#ShivSenaCrisis #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourt
आम्ही शरद पवारांचा नाद सोडला आणि दुसऱ्या नादाला लागलो, अशी खोचक टीका शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना केली होती. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुचक प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पिंपरी- चिंचवडमध्ये आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्यांवरही भाष्य केलं.