Maharashtra Political Crisis Live News Updates, 23 February 2023: गेल्या दोन दिवसांपासून देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पहिले दोन दिवस ठाकरे गटाची बाजू मांडताना अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता शिंदे गटाच्या बाजूने महेश जेठमलानी यांच्याकडून कशाप्रकारे त्यांच्या मुद्द्यांवर प्रतिवाद केला जातो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
या सुनावणीचं सर्वोच्च न्यायालयातून थेट प्रसारण केलं जात आहे.
SC Live News Updates: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!
राज्यपाल अशा प्रकारे फुटीर गटाला मान्यता देऊ लागले, तर प्रत्येक दिवशी कुठलातरी नवीन गट जाऊन सरकार पाडू शकेल – सिब्बल
राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाचे आदेश दिले याचा दुसरा अर्थ त्यांनी शिवसेनेतील फुटीलाच मान्यता दिली, पण त्यांना तो अधिकारच नाही. त्यामुळे आम्ही विश्वासदर्शक ठरावालाच आव्हान देत आहोत – कपिल सिब्बल
शिवसेनेचं सरकार असताना काही आमदार राज्यपालांकडे जाऊन सरकार कसं पाडू शकतात? राज्यपालांनी केलेल्या कृतीला कोणताही नैतिक आधार नाही – कपिल सिब्बल
Sibal: When the governor was approached by Eknath Shinde and BJP, and governor told us to have a trust vote, on what basis did he ask us? He obviously recognised the 39, otherwise he wouldn't have asked us for a trust vote.#ShivSenaCrisis #UddhavThackeray #EknathShinde
— Live Law (@LiveLawIndia) February 23, 2023
सरकार स्थापन झालं, तोपर्यंत शिवसेनेतील फुटीचा कोणताही उल्लेख नव्हता. तोपर्यंत शिवसेना हा एक पक्ष होता आणि उद्धव ठाकरे त्याचे अध्यक्ष होते. पण राज्यपालांनी यासंदर्भात उद्धव ठाकरेंना विचारलंच नाही की तुम्ही भाजपाला पाठिंबा देताय की नाही? त्यामुळे एकनाथ शिंदेंना पाचारण करून राज्यपालांनी पक्षातल्या फुटीला मान्यताच दिली, ज्याचा त्यांना घटनेनं अधिकार दिलेला नाही – सिब्बल
Sibal: They said they're in Shivsena. So on what basis did the governor do this? Unless he recognises that the 39 are rebels and have joined hands with BJP.#ShivSenaCrisis #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourtOfIndia

शिंदे गटाला सत्तास्थापनेसाठी पाचारण करून राज्यपालांनी शिवसेनेतील फुटीलाच मान्यता दिली. इथे नव्याने सरकार स्थापन होत नव्हतं. इथे एक सरकार अस्तित्वात होतं. त्यानंतर नवीन सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केला गेला – सिब्बल
राज्यपालांनी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेंना सरकार स्थापनेसाठी पाचारण केलं. पण तोपर्यंत शिवसेना कोणती हेच ठरलं नव्हतं. राज्यपालांना ते ठरवण्याचा राज्यघटनेनुसार अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी केलेली कृती घटनाविरोधी होती – कपिल सिब्बल
सर्वोच्च न्यायालयात आजच्या सुनावणीला सुरुवात झाली असून कपिल सिब्बल यांनी कालच्या मुद्द्यावरून युक्तिवादाला सुरुवात केली आहे.
Sr Adv Kapil Sibal: I now want to come back to the issue of governor. #ShivSenaCrisis #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourtOfIndia

आज अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तीन दिवसांची दिलेली वेळ आज संपेल. मात्र, शिंदे गटाचाही युक्तिवाद शिल्लक असल्यामुळे ही सुनावणी पुढच्या आठवड्यातही चालू राहण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षनाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभारला आहे. अशातच आता ठाकरे गटाला मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हावर समता पार्टीने दावा केला असून ते याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. दरम्यान, यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी समता पार्टीला खतपाणी कोण घालत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
लोकसेवा आयोग बोलण्याची ऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीकाही केली.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
न्यायालय किंवा निवडणूक आयोग कुणासाठीही मॅनेज होत नाही. ज्यांचा आत्मविश्वास गेलेला असतो, ज्यांना राजकारणातलं काही समजत नाही, असेल लोक असे बेछूट आरोप करत असतात. प्रत्येक गोष्टीवर शंका उपस्थित करणं हा त्यांचा अजेंडाच झालेला असावा – अब्दुल सत्तार
“आज पुन्हा सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूंकडून सविस्तर भूमिका मांडली जाईल. त्यानंतरच न्यायालय निकाल देईल. पण निर्णय लगेच लागण्याची शक्यता कमी आहे. कदाचित मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्णय येण्याची शक्यता आहे”, असं अनिल देसाई म्हणाले आहेत.