Marathi News Updates : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यामध्ये महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दाही चर्चेत आहे. दुसरीकडे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणावरून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणात काय कारवाई होणार? याबाबत विरोधक सरकारला सवाल विचारत आहेत. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरु केल्याचंही पाहायला मिळत आहे.

याच अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाचा बुधवारी नाशिकमध्ये मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या बूथ संघटन बांधणीचंही कौतुक केलं. त्यामुळे यावरही राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अजूनही चर्चेत आहे. त्याचबरोबर मुंबईत मराठी भाषेच्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सरु आहेत. याबरोबरच राज्यातील राजकीय व इतर सर्वच बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.

Live Updates

Mumbai-Maharashtra News Live Today, 17 April 2025 : राज्यातील सर्वच बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.

20:48 (IST) 17 Apr 2025

भिवंडीतील अल्पवयीन मुलाच्या खुनाचा गुन्हा पाच वर्षानंतर उघड, भिवंडीत पुरलेल्या मुलाचे अवशेष सापडले

भिवंडी येथील नेहरूनगर भागातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा खून झाल्याचा प्रकार पाच वर्षानंतर उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मौलाना गुलाब उर्फ गुलाम रब्बानी शेख याला उत्तराखंडमधून अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. ...वाचा सविस्तर
20:37 (IST) 17 Apr 2025

भिवंडीतील बेकायदा रिक्षांवर होणार कारवाई, परिवहन विभागामार्फत कारवाई करण्याचे पालिका आयुक्तांनी दिले निर्देश

भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शहरातील बेकायदा रिक्षांवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी दिले आहेत. ...सविस्तर वाचा
20:32 (IST) 17 Apr 2025

गुन्हे शाखा १ कडून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, २२ कोटींचे अमली पदार्थ जप्त, दोन महिलेसह तिघांना अटक

दक्षिण आफ्रितून तस्करी करून हे कोकेन भारतात आणण्यात आले होते. ...वाचा सविस्तर
20:28 (IST) 17 Apr 2025

वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेस अटक

ठाणे: स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या एका महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली. यावेळी तिच्याकडे असलेल्या तीन पिडित महिलांची सुटकाही करण्यात आली.

ठाणे स्थानक परिसरात काही असहाय महिलांना फूस लावून देह विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक चेतना चाैधरी यांना मिळाली हाेती. त्याच माहितीच्या आधारे बुधवाकी चौधरी यांच्या पथकाने सापळा रचला. या सापळ्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली. यावेळी तिच्या रखवालीत असलेल्या तीन पिडीत महिलांची सुटकाही करण्यात आली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेसोबत आणखी काेणी साथीदार आहेत का? तिने आणखी किती महिलांना या जाळयात ओढले याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

19:56 (IST) 17 Apr 2025

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भाईंदरच्या वेशीवर वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल; विरुद्ध दिशेने प्रवासामुळे अपघाताचा धोका

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ते रूंदीकरण काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यासमुळे भाईंदर येथे वाहतूक कोंडी ...अधिक वाचा
19:41 (IST) 17 Apr 2025

भाजपा साताऱ्यात निवडणार नवा जिल्हाध्यक्ष, प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आढावा बैठक

भारतीय जनता पक्षातर्फे सभासद नोंदणीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. आता लवकरच मंडलाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. जिल्ह्यात नव्याने जिल्हाध्यक्ष निवडले जाणार आहेत. ...सविस्तर वाचा
19:34 (IST) 17 Apr 2025

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाबाबत बैठक ठरली.. पण, नागरिक नाराज

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाविरोधात आंदोलन करणारे स्थानिक रहिवाशांसोबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अखेर बैठक आयोजित केली असून ही बैठक येत्या शनिवारी सकाळी मानपाडा भागातील एका वातानुकूलीत सभागृहात पार पडणार आहे. ...सविस्तर वाचा
19:30 (IST) 17 Apr 2025

सोलापूर बाजार समितीत भाजपमध्येच लढत

भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत तयार केलेले सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनेलविरुद्ध त्यांच्याच पक्षाच्या आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्या परिवर्तन पॅनेलचे आव्हान उढे ठाकले आहे. ...सविस्तर वाचा
19:23 (IST) 17 Apr 2025

कर्जतच्या नगराध्यक्षांविरुद्ध सुधारित अविश्वास प्रस्ताव

कर्जत : राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी नवीन कायदा केल्यामुळे कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे आज, बुधवारी १३ नगरसेवकांनी पुन्हा एकदा सुधारित अविश्वास प्रस्ताव दाखल केला. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिकनगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार आता पालिका सदस्यांनाच देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने काल, मंगळवारी घेतला. नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्यावर १० दिवसांत सभा बोलवून मतदान घेण्याचे बंधनही जिल्हाधिकाऱ्यांवर घातले आहे. त्यानुसार सुधारित प्रस्ताव दाखल करण्यात आला.

सन २०२० मध्ये या कायद्याद्वारे मंत्री व सरकारला अधिकार प्राप्त होते. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेसची सत्ता होती. १७ पैकी १२ सदस्य संख्याबळामुळे रोहित पवार यांची तशी एकहाती सत्ता होती. भाजपचे विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे अवघे दोन सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे ८ काँग्रेस ३ व भाजपचे २ अशा एकूण १३ जणांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

प्रस्ताव दाखल केल्यानंतर प्रक्रियेसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे, हे लक्षात आल्यानंतर महायुती सरकारने कर्जतच्या नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी थेट कायद्यात बदल केल्याचे मानले जाते. नवीन कायद्याने नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा अधिकार सदस्यांना देण्यात आला. यामुळे नगराध्यक्ष राऊत यांना अध्यक्षपदावरून हटवण्याचा कालावधी कमी होणार आहे आणि यामागे सभापती राम शिंदे यांचा मोठा सहभाग असल्याची चर्चा आहे.

19:23 (IST) 17 Apr 2025

शिळफाटा रस्त्यावरील पलावा काटई उड्डाण पुलाचे ३१ मे रोजी उद्घाटन, आमदार राजेश मोरे यांची माहिती

मागील आठ वर्षापासून रखडलेला कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा काटई उड्डाण पुल ३१ मे रोजी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. ...अधिक वाचा
19:22 (IST) 17 Apr 2025

कर्जतजवळ कालव्यात बुडून दोन बहिणींसह तिघांचा मृत्यू

रुग्णालयामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलींच्या आईने हंबरडा फोडला. एकाच वेळी स्वतःच्या दोन मुली गमावल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचा टाहो पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले. ...सविस्तर वाचा
19:12 (IST) 17 Apr 2025

घारीची पिलांसोबत पुनर्भेट ! सांगलीतील पक्षी मित्रांचा पुढाकार

यावेळी खोपा बर्डचे सचिन शिनगारे, ॲनिमल राहतचे कौस्तुभ पोळ, बर्ड साँग संस्थेचे सदस्य श्री. पाटील व मेहत्रस आदींनी आई व पिलाची पुनर्भेट घडवून आणण्यात मोलाची कामगिरी केली. ...सविस्तर बातमी
19:04 (IST) 17 Apr 2025

शेअर बाजारातील गुंतवणुकीत तोटा... तणावाखाली असलेल्या तरुणाचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीमध्ये प्रचंड तोटा झाल्याने एका तरुणाने स्वतःवर गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी भांडुप परिसरात घडली. ...सविस्तर वाचा
19:03 (IST) 17 Apr 2025

सांगली : रुग्णसेवेचा नियमित आढावा घेण्याचे आदेश

सांगली : जिल्ह्यात धर्मादाय २९ तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेची सुविधा असलेली ६८ रुग्णालये आहेत. या रुग्णालयात नियमानुसार रुग्णसेवा होते की नाही याची खात्री धर्मादाय आयुक्त व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावी आणि महिन्याला आढावा घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बुधवारी दिल्या.

जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालये, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालये व इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, डॉक्टर्स व प्रतिनिधी यांच्यासमवेत आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस शासकीय रुग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, सहायक धर्मादाय आयुक्त डॉ. प्रियांगिनी पाटील, उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे, धर्मादाय रुग्णालय निरीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.

19:01 (IST) 17 Apr 2025

मुर्शिदाबाद अत्याचाराचा सांगलीत हिंदू एकता आंदोलनकडून निषेध

सांगली : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराचा आणि हिंसाचाराचा बुधवारी सांगलीत हिंदू एकता आंदोलनच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार केंद्र शासनाने बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली.

सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले, संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाला असताना मुर्शिदाबादमध्ये विधेयकाविरुद्ध निघालेल्या मोर्चावेळी हिंदूंच्या घरावर हे करण्यात आले. तसेच मंदिरावरही हे करून मूर्ती फोडण्याचे प्रकार घडले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री ममता यांनी अत्याचार करणारे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मुस्लिम मतासाठी पाठीशी घालत आहेत. यामुळे राज्य शासन बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी.

यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, दत्ता भोकरे, मनोज साळुंखे, प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, राजू जाधव, अवधूत जाधव, सोमनाथ घोडके, प्रकाश चव्हाण, शिवाजी पाटील, यश पाटील, अभिमन्यू भोसले आदी हिंदू एकता आंदोलनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

19:00 (IST) 17 Apr 2025

सातारा:मिरवणुकीतील फटाक्यांमुळे डोंगराला आग, शेकडो एकरवरील निसर्गसंपदा जळून खाक

अखेर दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. ...वाचा सविस्तर
18:58 (IST) 17 Apr 2025

साताऱ्यातील कारखान्यात ‘हुकुमाची राणी’...

वैविध्यपूर्ण विषयांवर आधारित मालिका साकारणाऱ्या सन मराठी वाहिनीवर २१ एप्रिलपासून दररोज सायंकाळी ७ वाजता ‘हुकुमाची राणी’ ही मालिका प्रसारित होणार आहे. ...वाचा सविस्तर
18:54 (IST) 17 Apr 2025

जतजवळ अडीच कोटींची लूटणाऱ्या सात जणांना अटक, चालकासह सराफाला मारहाण

या प्रकरणी उमदी (ता. जत) पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...सविस्तर बातमी
18:45 (IST) 17 Apr 2025

महाबळेश्वर पर्यटन महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांना टोल माफी

महाबळेश्वर येथे २ ते ४ मे या दरम्यान तीन दिवसीय महापर्यटन उत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
18:39 (IST) 17 Apr 2025

राज्य मंत्रिमंडळाची चौंडीला २९ एप्रिलला बैठक, अहिल्यादेवींचे जन्मस्थान; ग्रामीण भागात प्रथमच बैठक

अहिल्यादेवींच्या जयंतीचे त्रिशताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत ही बैठक होणार असल्याची माहिती मिळाली. ...सविस्तर वाचा
18:32 (IST) 17 Apr 2025

राहाता : तरुणाचे अपहरण करून खून; ६ जणांविरुद्ध गुन्हा

मृतदेह स्कोडाच्या डिकीत टाकून सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात टाकल्याची घटना उघडकीस आली. सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी ६ संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. ...अधिक वाचा
18:31 (IST) 17 Apr 2025

म्हसवडमध्ये बंदुकीच्या धाकाने सव्वादोन लाखांची चोरी

सातारा : म्हसवड येथे सातारा - पंढरपूर महामार्गालगत असलेल्या एका बंगल्यात भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून डॉक्टर महिलेला बंदुकीचा धाक दाखवून दोन लाख तीस हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. अशी माहिती म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की म्हसवड येथील डॉ. नरेंद्र पिसे यांच्या घरात दुपारी तीन अज्ञात बुरखाधारी चोरांनी प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील महिला व लहान मुलाला एका खोलीत कोंडले. डॉ. श्रीमती पिसे यांनी प्रसंगावधान दाखवत पती डॉ. आकाश यांना फोन करून घरात चोर घुसल्याचे सांगितले, तसेच खोलीच्या दुसऱ्या दरवाजातून बाहेर येऊन बंगल्याचा मुख्य दरवाजा बंद केला.

कपाटातून साहित्य अस्ताव्यस्त करून एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोन लाख रुपये असा एकूण दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

त्यानंतर बंगल्याचा मुख्य दरवाजा बंद असल्याने चोरटे पाठीमागील दरवाजातून बाहेर आले. श्रीमती पिसे यांनी चोरट्यांच्या गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून पळ काढला. त्यानंतर काही वेळाने म्हसवड पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. म्हसवड पोलीस ठाण्यात डॉ. सुप्रिया पिसे यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत.

17:46 (IST) 17 Apr 2025

सव्वा लाखाचा गांजा जप्त; दोघांना अटक

अहिल्यानगरः गांजा विक्रीसाठी संगमनेरहून अहिल्यानगर शहरात आलेल्या दोघांना तोफखाना पोलिसांनी पकडले. संदीप ऊर्फ संजय राजू मालुंजकर (वय २५) व सचिन प्रताप कतारी (वय २६, दोघे रा. संजय गांधीनगर, संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून १ लाख २७ हजार ५०९ रुपये किमतीचा ८ किलो ५३५ ग्रॅम गांजा व ५ लाखांची मोटार जप्त करण्यात आली.

काल, मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सावेडी उपनगरातील सोनानगर चौकात ही कारवाई करण्यात आली. सोनानगर चौकातील विराम हॉटेलसमोर, मोकळ्या जागेत एका राखाडी रंगाच्या होंडा कंपनीच्या मोटारीत (एमएच ०१ एई ७२१३) दोघे गांजा विक्रीसाठी थांबल्याची माहिती निरीक्षक कोकरे यांना मिळाली होती.

वाहनात संदीप उर्फ संजय राजू मालुंजकर व सचिन प्रताप कतारी हे दोघे होते. डिक्कीत पांढऱ्या गोणीत गांजा आढळला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील करत आहेत. नायब तहसीलदार गणेश भानवसे, उपनिरीक्षक पाटील, अंमलदार योगेश चव्हाण, सुधीर खाडे, भानुदास खेडकर, सुनील चव्हाण, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, वसीम पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

17:11 (IST) 17 Apr 2025

मंत्री उदय सामंत यांनी अचानक जरांगे यांची घेतली भेट, २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण मागणीचे आंदोलक मनोज जरांगे यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अचानक भेट घेतली. राजकारणाच्या पलीकडेही काही संबंध असतात असे सांगत सामंत यांनी महायुतीमधील नाराजीचा कोणताही संदर्भ या भेटीमागे नाही. जरांगे यांनी केलेल्या मागण्यांबाबत २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याशी चर्चा करू, असे सामंत म्हणाले. गेले काही दिवस आरक्षण मागणीचा मुद्दा थंडावल्याचे चित्र जरांगे यांच्या गोटात दिसत असतानाच सामंत यांनी त्यांची भेट घेतल्याने त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. या भेटीच्या वेळी खासदार संदीपान भुमरे हेही उपस्थित होते.

कोणतीही गुपित चर्चा झाली नाही. राजकारणाच्या पलीकडे नाते जपणारा माणूस आहे. त्यामुळे कोणी टीका करत असेल तर त्यांच्याकडे लक्ष देत नाही, असे सामंत म्हणाले. या भेटीनंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वीच्या मागण्या केल्या. काही मंत्री अडलेली कामे करत आहेत. त्यामध्ये आशिष शेलार, उदय सामंत यांचे नाव घेतले. मात्र, आरक्षणाच्या मागण्या मान्य करण्यासाठी आवश्यक ती कारवाई मुख्यमंत्र्यांनी करावी, अन्यथा संयम ढळेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

17:03 (IST) 17 Apr 2025
आईसाठी दोन खोल्यांची जागा द्यावी, खंडपीठाचे मुलाला आदेश

छत्रपती संभाजीनगर : मालमत्तेतून मोठ्या मुलाने बेदखल केलेल्या आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाचे न्या. आर. एम. जोशी यांनी वडिलांच्या मालमत्तेतील घरात आईला मोठ्या मुलाने दोन खोल्या द्याव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले.

उषा यांना पतीच्या निधनानंतर मोठ्या मुलाने घरातून बाहेर काढले. ती छोट्या मुलासोबत राहू लागली. उस्मानपुरा येथे संत एकनाथ रंगमंदिरासमोर आनंद निवास पतीने घेतले तेव्हा मोठ्या मुलासह पत्नीचा त्यात हिस्सा ठेवला. याचिकाकर्ती महिला ७८ वर्षे वयाची आहे. असे असताना तिला घरातून बाहेर काढल्याने ती छोट्या मुलासोबत राहताना तिने अनेक वर्षे काढलेल्या घरात राहायला जाण्याची तीव्र इच्छा होऊ लागली. त्या घरात उषा यांचाही हिस्सा होता.

या प्रकरणी उषा यांनी ॲड. अनिल बजाज यांच्या वतीने खंडपीठात याचिका दाखल करून वयोवृद्ध महिलेस किमान दोन खोल्या पतीच्या घरात राहण्याची सोय व्हावी, असा युक्तिवाद केला. खंडपीठाने वरिष्ठ नागरिक कायद्यानुसार नियमित न्यायालयात जाऊन अधिकार ठरवून घ्यावे असे निर्देश दिले. संबंधित घरात स्वतंत्र राहण्यासाठी किचन आणि एक रूम द्यावी असे खंडपीठाने स्पष्ट केले. राज्य शासनाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील सुजित कार्लेकर यांनी काम पाहिले.

17:02 (IST) 17 Apr 2025

प्राजक्त तनपुरे यांचे उपोषण मागे, व्यापाऱ्यांचा बंद, विटंबनाप्रकरणी मुंबईत आंदोलनाचा अंबादास दानवेंचा इशारा

अहिल्यानगरः राहुरीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबनाप्रकरणी तपास लागला नाही तर मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला. त्यांच्यासह माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत आज तिसऱ्या दिवशी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपोषण मागे घेतले.

विटंबना प्रकरणातील आरोपी अटक करण्यात पोलिसांकडून दिरंगाई होत आहे, घटनेला २१ दिवस लोटल्यानंतरही तपास लागला नाही, याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार तनपुरे यांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणास पाठिंबा देण्यासाठी राहुरी शहरातील व्यापाऱ्यांनी आज, बुधवारी कडकडीत बंद पाळला तसेच वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन पक्षाने एकत्रितपणे अहिल्यानगर-मनमाड राज्यमार्ग रोखून धरला.

उपोषणस्थळी ग्रामपंचायत पदाधिकारी, तरुण मंडळांनी, विविध संघटनांनी भेटीत पाठिंबा दिला. उपोषणात महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना तनपुरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी राहुरीत भेटीवेळी दिलेल्या आश्वासनाची ध्वनिफीत उपस्थितांना ऐकवली.

16:37 (IST) 17 Apr 2025

जालन्यात शेतकऱ्यांच्या अनुदानात ५० कोटींचा गैरप्रकार, आमदार लोणीकर यांचा आराेप

लोणीकर यांनी सांगितले की, २०२०-२०२१ आणि २०२१-२०२२ या काळात जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच गारपीट किंवा शेती नाही अशा बनावट शेतकऱ्यांची नावे अनुदानाच्या यादीत घुसविण्यात आली. ...अधिक वाचा
16:28 (IST) 17 Apr 2025
"काड्या करणं बंद करा", चंद्रकांत खैरेंबाबत प्रश्न विचारताच अंबादास दानवे संतापले

पत्रकार परिषदेत चंद्रकांत खैरे यांच्याबाबत अंबादास दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नांवर बोलताना अंबादास दानवे चांगलेच संतापले. अंबादास दानवे म्हणाले की, तुम्ही काड्या करणं बंद करा. चंद्रकांत खैरे यांनीच काल परवा सर्व काही सांगितलेलं आहे. तेच बोललेले आहेत, मी तर काही बोललेलोही नाही. त्यामुळे आमच पक्षाचं काम पाहायला आम्ही सक्षम आहोत, तुम्हाला बातम्या छापायच्या तर छापा अन्यथा छापू नका", असं म्हणत अंबादास दानवे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

https://www.youtube.com/watch?v=eETxAECoemY

16:19 (IST) 17 Apr 2025

प्लास्टिक पिशव्या बनवणाऱ्या कारखान्यावर छापा, तासवडे औद्योगिक वसाहतीत कारवाई

प्रदूषण नियंत्रण महामंडळाने या कारवाईत तब्बल चार टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून, त्याची किंमत कित्येक लाखात आहे. ...सविस्तर बातमी
15:57 (IST) 17 Apr 2025

अकरा वर्षांच्या थकीत वेतनासाठी शिक्षिकेचा लढा, शिक्षण विभागातील अनागोंदी कारभार

अल्पसंख्याक आयोगाने आता यासंदर्भात २२ एप्रिल रोजी सुनावणी ठेवली आहे. प्रधान सचिवांच्या पत्रानुसार आता वेतन काढण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. ...सविस्तर वाचा

Mumbai-Maharashtra News

खासदार संजय राऊत यांची भाजपावर टीका, (फोटो-संग्रहित छायाचित्र)