Mumbai Maharashtra News Updates : लोकसभा निवडणूक पार पडून आता महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि जनतेला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. यानिमित्त शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांचे राज्यव्यापी दौरे सुरू झाले आहेत. तसेच युत्या आणि आघाड्यांमध्ये बैठकांना सुरुवात झाली आहे. दुसऱ्या बाजूला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Maharashtra News: राज्यासह देशभरातील बातम्यांचे अपडेट्स

20:44 (IST) 13 Jun 2024
पावसाळ्यात रेल्वेचा घाटातील प्रवास सुरक्षित, दरड कोसळू नये म्हणून मजबूत जाळ्यांचे आवरण

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने पावसाळापूर्व कामे पूर्ण केली असून मुख्यतेः घाट भागातील कामांवर विशेष भर देण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने व्यापक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यात घाट भागात रेल्वेगाड्या सुरक्षित धावण्यास सज्ज असणार आहेत.

वाचा सविस्तर...

20:27 (IST) 13 Jun 2024
जुन्या मोटारींना पुणेकरांची पसंती! सर्वाधिक मागणी कोणत्या मोटारींना जाणून घ्या…

पुणे : देशभरात जुन्या मोटारींची बाजारपेठ विस्तारत आहे. पुण्यातही आता जुन्या मोटारींना मागणी वाढू लागली आहे. विशेषत: शहरांतर्गत प्रवासासाठी तरुणांकडून जुन्या मोटारींना पसंती मिळत आहे. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून जुन्या मोटारींसाठी अर्थसहाय्य मिळत असल्याने त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

वाचा सविस्तर....

20:12 (IST) 13 Jun 2024
मुलुंडमध्ये मोटारीच्या धडकेत तरुण जखमी

मुंबई: चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारीने मुलुंड परिसरातील पदपथावरून चालणाऱ्या तरुणाला मंगळवारी पहाटे धडक दिली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून मुलुंड पोलिसांनी मोटारचालकाविरोधात कारवाई करून त्याची सुटका केली.

वाचा सविस्तर...

20:01 (IST) 13 Jun 2024
पुणे : गंगाधाम चौकातील अपघात; संतप्त नागरिकांनी रोखला रस्ता…

पुणे : गंगाधाम चौक परिसरात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केले. दिवसा जड वाहनांना बंदीचे आदेश असताना या भागात सर्रास वाहतूक सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे.

वाचा सविस्तर...

20:00 (IST) 13 Jun 2024
मुंबई : कामाच्या वेळेत केलेल्या बदलाला परिचारिकांचा विरोध, नायर रुग्णालयातील परिचारिकांचे १७ जूनपासून आंदोलन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील परिचारिकांच्या कामाच्या वेळेत १६ जूनपासून बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेमध्ये बदल करण्यापूर्वी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना अथवा त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेस कोणत्याही प्रकारची नोटीस न देता हा निर्णय घेतला आहे.

वाचा सविस्तर...

19:49 (IST) 13 Jun 2024
कोल्हापुरात भाजपचा कमी मते मिळालेल्या भागात मताधिक्य वाढवण्याचा निर्धार; विधानसभेच्या तयारीला सुरुवात

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज भाजपा कार्यालयामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची विधानसभा निहाय आढावा बैठक गुरुवारी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बूथ स्तरावर पडलेल्या मतांच्याबाबत याबैठकीत सविस्तर विश्लेषण करण्यात आले.कोल्हापूर लोकसभा निवडणुकी निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यापेक्षा कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघात अधिक मते मिळालेली होती. हे मताधिक्य फारसे अधिक नसले तरी ते लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीला मताधिक्य कसे कमी करता येईल, येथे भाजपला अधिक यश कसे मिळेल याबाबत आज झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.ज्या बुथवर आपण मताधिक्य घेऊ शकलो. तेथे अधिक मताधिक्यांची भर कशी पडेल. तसेच, ज्या ठिकाणी कमी मतदान झाले तेथे कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतची चर्चा करण्यात येऊन योग्य ती पावले टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. चंदगड, कागल, करवीर, राधानगरी, उत्तर, दक्षिण या सहा विधानसभा मतदारसंघांची सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत या बैठका संपन्न झाल्या. यावेळी तालुका अध्यक्ष, विधानसभा निवडणूक प्रमुख, विधानसभा विस्तारक यांची उपस्थिती होती.

18:32 (IST) 13 Jun 2024
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ, तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील घटना

मावळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा सर्व प्रकार तळेगाव दाभाडे नगर परिषदेत घडला आहे. मुख्याधिकारी यांच्यासमोरच घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रियेसाठी बापू भेगडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सविस्तर वाचा...

18:31 (IST) 13 Jun 2024
गडचिरोली : ‘पुट्टेवार’ हत्याकांड; अर्चना पुट्टेवार, प्रशांत पार्लेवारची अटक टाळण्यासाठी काँग्रेस नेत्याची…

गडचिरोली : संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगर रचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ एमएसएमईचा संचालक प्रशांत पार्लेवार यांना कट रचण्यात देसाईगंज येथील एका काँग्रेस नेत्याने मदत केली. आता अटक टाळण्यासाठी हा नेता राज्यातील एका मोठ्या नेत्याचा माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सविस्तर वाचा...

18:16 (IST) 13 Jun 2024
मुसळधार पावसामुळे डोंबिवली जलमय

डोंबिवली : मुसळधार पावसाने गुरुवारी दुपारी जोरदार हजेरी लावल्याने कल्याण डोंबिवली शहराच्या अनेक भागात पाणी तुंबले. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील नाले गटार सफाई योग्य रीतीने न केल्याने पहिल्याच पावसात डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर जलमय झाला.

वाचा सविस्तर...

18:07 (IST) 13 Jun 2024
ओमप्रकाश दिवटे हेच इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त; पल्लवी पाटील यांच्या निवडीला स्थगिती

कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्तपदी पल्लवी पाटील यांच्या नियुक्तीला गुरुवारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) ने स्थगिती दिली आहे. या पदावरील ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती कायम राहिली आहे.

वाचा सविस्तर...

18:07 (IST) 13 Jun 2024
महामार्गावरील सिमेंट काँक्रीटच्या निकृष्ट कामाची पोलिसांनी केली पोलखोल

वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काँक्रीटीकरणासह इतर कामे निकृष्ट असल्याचे नायगाव पोलिसांनी पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. दुभाजक नष्ट, उतारांचा अभाव, खडीचा वापर यामुळे पावसात पाणी साचून वाहतूक कोंडी आणि अपघात होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे काम सुरू असल्यापासून ३ महिन्यातच सुमारे ४० जणांचा अपघाची मृत्यू झाला आहे.

वाचा सविस्तर...

17:50 (IST) 13 Jun 2024
नांदेड, छत्रपती संभाजीनगरसाठी नागपूरहून विमानसेवा लवकरच

नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रमुख शहरांदरम्यान लवकरच विमानसेवा सुरू होत असल्याने राज्यातील हे दोन प्रदेश अधिक जवळ येणार आहेत. स्टार एअरची नागपूर ते नांदेड ही सेवा येत्या २७ जूनपासून आणि इंडिगो एअरलाइन्सची नागपूर- छत्रपती संभाजीनगर येत्या २ जुलैपासून विमानसेवा सुरू होत आहे.

सविस्तर वाचा...

17:32 (IST) 13 Jun 2024
निवडून येताच प्रतिभा धानोरकरांनी दिला राजीनामा, आता नवीन जबाबदारी

चंद्रपूर : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज गुरुवारी वरोरा – भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सुपूर्द केला. २०१९ ते २०२४ या कालावधीत जनसामान्यांची कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा...

17:04 (IST) 13 Jun 2024
चिंचवड विधानसभेवरून शंकर जगताप आणि आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप समोरासमोर! दोघांनी चिंचवडवर केला दावा

चिंचवड विधानसभेवरून विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात चढाओढ लागली आहे. शंकर जगताप हे आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचे दिर आहेत. शंकर जगताप यांनी उघडपणे चिंचवड विधानसभेवर दावा करत इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. यावर आज अश्विनी जगताप यांनी प्रत्युत्तर देत चिंचवड विधानसभा लढणार असल्याचं ठाम मत व्यक्त केलं आहे.

सविस्तर वाचा...

16:52 (IST) 13 Jun 2024
दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला मिळण्यासाठी पुन्हा स्थानिकांकडून केंद्राकडे पाठपुरावा

पनवेल : सहा महिन्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिले विमान उड्डाण होणार आहे. तसेच विधानसभेच्या निवडणूका तीन महिन्यांनंतर होणार असल्याने पनवेल व उरणमधील स्थानिक मतदारांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि. बा. पाटील’ यांचे नाव मिळावे यासाठीचा लढा पुन्हा आक्रमक करण्याचा विचार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा...

16:52 (IST) 13 Jun 2024
अखेर धारावीकरांनी बंद पाडले अदानीचे सर्वेक्षण, अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड उद्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार

मुंबई : धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) धारावी पुर्नविकास प्रकल्पाअंतर्गत मार्चपासून धारावीतील विविध भागातील बांधकामांचे सर्वेक्षण सुरू केले होते. धारावी बचाव आंदोलन, धारावीकरांच्या तीव्र विरोधानंतर डीआरपीपीएलने तूर्तास हे सर्वेक्षण बंद केले आहे.

सविस्तर वाचा...

16:51 (IST) 13 Jun 2024
फ्लेमिंगोला ड्रोनचा धोका तपासण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे गृह विभागाला निर्देश

नवी मुंबई : नवी मुंबईतील पाणथळ प्रदेशात विसावलेल्या फ्लेमिंगोचे छायाचित्रण करण्यासाठी ड्रोनचा वापर वाढत आहे. याबाबत पर्यावरण प्रेमी करून चिंता व्यक्त करण्यात येत असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या गृह विभागाला या समस्येकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

सविस्तर वाचा...

16:50 (IST) 13 Jun 2024
मुंबईत हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण

मुंबई : मुंबईत जानेवारी-मे या कालावधीत हिवतापाचे १,६१२ रुग्ण आढळले. मागील चार वर्षांच्या तुलनेत ही रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे हिवताप निर्मूलनासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका करीत असलेले प्रयत्न अपुरे असल्याचे निदर्शनास आले आहे.

सविस्तर वाचा...

16:49 (IST) 13 Jun 2024
पनवेल : करंजाडे बसच्या फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी

पनवेल : करंजाडे वसाहतीमध्ये घर घेतलेल्या नागरीकांमध्ये त्यांची फसवणूक झाल्याची भावना निर्माण होत आहे. सिडको महामंडळाने येथे खासगी विकासकांना इमारती बांधून रहिवाशांना राहण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र दिले मात्र पाणी, वाहतूकीसाठी बस अशा सोयीसुविधा अद्याप या परिसरात पुरेशा न सुरू झाल्याने नागरिक वैतागले आहेत.

सविस्तर वाचा...

16:48 (IST) 13 Jun 2024
एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता एका ‘क्लिक’वर, गैरप्रकाराला…

नागपूर: एसटी महामंडळासह इतरही शासकीय विभागातील बदल्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. बऱ्याचदा मंत्र्यांशी जवळिक असलेले किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे काम होत असे. एसटी महामंडळाने ही प्रक्रिया पारदर्शी केली आहे. त्यामुळे आता संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने एका क्लिकवर एसटीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची बदली होतील.

सविस्तर वाचा...

16:32 (IST) 13 Jun 2024
टिटवाळा-बनेली येथील २५ एकरच्या भूखंडावर बेकायदा चाळी, अ प्रभागाकडून दिखाव्यापुरती कारवाई

कल्याण : टिटवाळा-बनेली येथील २५ एकरच्या एका मोकळ्या भूखंडावर भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे. राजरोस बेकायदा चाळींची बांधकामे सुरू असताना या बेकायदा चाळींवर अ प्रभागाकडून फक्त दिखाव्या पुरती कारवाई केली जाते, अशा तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या आहेत.

सविस्तर वाचा...

16:31 (IST) 13 Jun 2024
पुनर्वसनातील घर दिल्यानंतरच धारावी प्रकल्पात झोपडी जमीनदोस्त! पुनर्वसन प्रकल्प कंपनीचा दावा

मुंबई : धारावी पुनर्विकासात ५०० चौरस फुटाचे घर हवे, यासह अन्य मागण्यांसाठी धारावी बचाव आंदोलनाने वेग पकडलेला असतानाच धारावी पुनर्वसन प्रकल्प कंपनीने पुनर्वसनातील घराचा ताबा दिल्याशिवाय एकही झोपडी पाडली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

सविस्तर वाचा...

16:30 (IST) 13 Jun 2024
ठाणे : बनावट प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरतीचा प्रयत्न, निवड झालेल्या दोन उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल

ठाणे : बीड येथून बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बनवून त्याआधारे पोलीस भरतीत दोघांनी आरक्षण मिळविल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ओम नगदे आणि आलम शेख यांच्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा...

16:29 (IST) 13 Jun 2024
करचुकवेगिरीची सुपारी; दहा दिवसांत १५ कोटींचा ऐवज जप्त

मुंबई : संयुक्त अरब अमिराती येथून तस्करी करून आणलेली ११२ टन सुपारी सीमाशुल्क विभागाने जप्त केली आहे. नवी मुंबईतील न्हावा-शेवा बंदरात १० कंटेनरमध्ये ही सुपारी सापडली. गेल्या १० दिवसांत न्हावा-शेवा बंदरातून ३०० मेट्रिक टनाहून अधिक सुपारी जप्त करण्यात आली असून त्याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे.

सविस्तर वाचा...

16:28 (IST) 13 Jun 2024
ठाण्यात हरित कचऱ्याची डोकेदुखी; रस्त्यावर जागोजागी छाटलेले वृक्ष पडून

ठाणे : शहरात गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे अनेक वृक्षांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. तर काही ठिकाणी ठाणे महापालिकेने वृक्षांची छाटणी केली. परंतु छाटणी केलेल्या वृक्षांचे खोड, फांद्या रस्त्यावरून उचलल्या जात नसल्याने वाहन चालकांना तसेच पदपथ किंवा रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.

सविस्तर वाचा...

16:27 (IST) 13 Jun 2024
बॉम्बस्फोटातील दोषीला किती काळ एकांतात ठेवणार ? जर्मन बेकरी स्फोटातील आरोपीबाबत उच्च न्यायालयाची तुरुंग प्रशासनाला विचारणा

मुंबई : पुणे येथील जर्मन बेकरीमध्ये २०१० साली घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या हिमायत बेग याला किती काळ एकांतात ठेवणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी नाशिक तुरुंग प्रशासनाला केली.

सविस्तर वाचा...

16:10 (IST) 13 Jun 2024
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा ‘फुगा’ का फुटला ?

नागपूर : लोकसभा निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला राज्यात फारसे यश आले नाही. विदर्भात अकोला वगळता इतरत्र वंचित आघाडीला मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून निर्माण झालेला वंचित बहुजन आघाडीचा ‘फुगा’ पुरता फुटल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा...

15:56 (IST) 13 Jun 2024
VIDEO : ताडोबात वाघ नाही, तर अस्वलाने केली ‘ही’ करामत; पाहून तुम्हीही म्हणाल…

नागपूर : शाळांना परिक्षेनंतर उन्हाळी सुट्या लागतात, पण व्याघ्रप्रकल्पांना मात्र पावसाळी सुट्या लागतात. राज्यातील व्याघ्रपर्यटनाला सुट्या लागण्याचा काळ आता जवळ आला आहे, पण तरीही व्याघ्रप्रकल्पातील काही भागात पर्यटन सुरूच राहणार आहे. मात्र, उन्हाळा आणि हिवाळ्यात पर्यटनाचा जो आनंद मिळतो, तो पावसाळ्यात व्याघ्रप्रकल्पाच्या भागातील पर्यटनातून मिळत नाही. म्हणूनच की काय! सुट्या लागण्याचा काळ जसजसा जवळ येत आहे, तसतसे वन्यप्राणी देखील पर्यटकांना गोड आठवणी देऊन जात आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील हा असाच एक प्रसंग.

सविस्तर वाचा...

15:52 (IST) 13 Jun 2024
रानभाज्या बाजारात दाखल; जांभूळ, करवंदांसह, रानभाज्यामुळे आदिवासी महिलांना मिळतोय रोजगार

बदलापूरः बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरातील बाजारपेठांमध्ये रानभाज्या आणि रानमेवा दाखल झाला आहे. बदलापूर शहराची बाजारपेठ, शहराच्या वेशीवरील एरंजाड, सोनिवली परिसरासह कल्याण अहमनदगर राष्ट्रीय महामार्गावर आदिवासी महिलांकडून रानभाज्यांची विक्री केली जात आहे.

सविस्तर वाचा

15:30 (IST) 13 Jun 2024
साताऱ्यात फडफड्या टोळ सह्याद्रीत आजही अस्तित्व टिकवून

वाई : साताऱ्यातील ठोसेघर या समृद्ध वन व निसर्गसंपदा लाभलेल्या परिसरात ‘फडफड्या टोळ'(हुडेड ग्रासहॉपर) आढळून आला आहे. हा कीटक सह्याद्रीत आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. हा एक छोटासा आकर्षक रंगसंगती, पाठीवर उंचवटा, त्यावर पिवळ्या रंगाची पट्टी, पांढरे डोळे असणारा कीटक त्याच्या सौंदर्यामुळे अधिकच सुंदर भासतो.

वाचा सविस्तर...

rohit pawar on sunetra pawar ajit pawar

 

“पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा…”, सुनेत्रा पवारांबाबतच्या चर्चांवर रोहित पवारांचा टोला; म्हणाले, “काकी आणि पार्थ यांना…”

लोकसभा निवडणुकांचे निकाल देशात आणि महाराष्ट्रात वेगळी समीकरणं निर्माण करणारे ठरल्याचं मानलं जात आहे. केंद्रात आणि राज्यातही भाजपाप्रणीत आघाड्यांना फटका बसल्याचं निकालांवरून स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालांकडे पाहिलं जात असतानाच आता राज्यसभेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्याचवेळी छगन भुजबळांचंही नाव चर्चे आहे. राज्यसभा निवडणुकीच्या चर्चांवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक पोस्ट केली आहे.

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या चालू असून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ यांची नावं चर्चेत आहेत. यांच्यापैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? यावर तर्क-वितर्क चालू आहेत. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी एक्स हँडलवर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. मात्र, या पोस्टचा रोख नेमका कुणाकडे आहे? हे त्यातून स्पष्ट होत नाहीये.

Story img Loader