Mumbai Maharashtra News Updates : लोकसभा निवडणूक पार पडून आता महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि जनतेला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. यानिमित्त शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांचे राज्यव्यापी दौरे सुरू झाले आहेत. तसेच युत्या आणि आघाड्यांमध्ये बैठकांना सुरुवात झाली आहे. दुसऱ्या बाजूला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai Maharashtra News: राज्यासह देशभरातील बातम्यांचे अपडेट्स

15:17 (IST) 13 Jun 2024
डिजिटल फलक रात्री ११ नंतर बंद; पालिकेच्या पथकाची तपासणी मोहीम

मुंबई : डिजिटल जाहिरात फलक रात्री ११ नंतरही सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित जाहिरात संस्थेविरोधात कारवाई करण्यात येईल. अतिप्रखर प्रकाशमान डिजिटल जाहिरात फलकांमुळे रात्री त्रास होत असल्याच्या तक्रारींनंतर पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

सविस्तर वाचा

15:16 (IST) 13 Jun 2024
पालिकेची दोन कनिष्ठ महाविद्यालये कागदावरच; परवानगी मिळूनही शिक्षण विभागाचा सावळागोंधळ

नवी मुंबई: राज्य शासनाने नवी मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार दोन शाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठी नऊ महिन्यांपूर्वी म्हणजे सप्टेंबर २०२३ मध्ये परवानगी दिली असताना शहरात पालिकेची महाविद्यालये स्थापनेची प्रक्रिया कागदावरच राहिली आहेत.दहावीच्या निकालानंतर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदतही संपत आली, परंतु नवी मुंबई महापालिकेची कुकशेत व कातकरी पाडा येथील कनिष्ठ महाविद्यालये कागदावरच राहिलेली आहेत.

सविस्तर वाचा

15:16 (IST) 13 Jun 2024
एपीएमसीत कारवाई १३ लाखांचा अंमली पदार्थ जप्त; दोन जण अटक

नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एपीएमसी मध्ये कारवाई करीत अंमली पदार्थ विक्री साठी आणलेल्या तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्या कडून १३१. ५० ग्रॅम वजनाचा एम डी अंमली पदार्थ आढळून आलेला जप्त करण्यात आला आहे. त्याचे बाजार मूल्य १३ लाख १५ हजार असून त्यांनी एम डी कुठून आणले याचा तपास सुरु आहे. 

सविस्तर वाचा

15:10 (IST) 13 Jun 2024
नागपूर जिल्ह्यात चामुंडा बारुद कंपनीत स्फोट, पाच कामगारांचा मृत्यू, आठ ते दहा कामगार जखमी

नागपूर : जिल्ह्यातील वाडीपासून काही अंतरावर असलेल्या धामनाजवळील स्फोटक बवणाऱ्या एका चामुंडा बारूद कंपनीत मोठा स्फोट होऊन त्यात पाच कामगार दगावले असून आठ ते दहा कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर वाचा…

15:07 (IST) 13 Jun 2024
मध्य रेल्वेचा खोळंबा, लोकलमधून उतरून रेल्वे रूळावरून चालत जाण्याची प्रवाशांवर वेळ

मुंबई : गेल्या दोन आठवड्यांपासून मध्य रेल्वेवर खोळंबा नाट्य सुरू आहे. मध्य रेल्वेवरील विक्रोळी येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा कोलमडली. बराच वेळा लोकल एकाच ठिकाणी उभी राहिल्याने प्रवासी हवालदिल झाले होते.

वाचा सविस्तर…

15:03 (IST) 13 Jun 2024
मुंबई : कफ परेडमधील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील ४०० मीटर रस्ता मोकळा

मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामासाठी बंद करण्यात आलेला कफ परेड येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील उत्तरेकडील ४०० मीटर लांबीचा रस्ता अखेर वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) या रस्त्याची दुरुस्ती करून नुकताच तो वाहतुकीसाठी खुला केला आहे.

वाचा सविस्तर…

14:56 (IST) 13 Jun 2024
सातशे वारकरी, ५५ वर्षांची परंपरा; ‘श्रीं’च्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

बुलढाणा : मागील पंचावन्न वर्षांची वारीची वैभवशाली परंपरा कायम ठेवत शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीने आज आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले.

सविस्तर वाचा…

13:32 (IST) 13 Jun 2024
पिंपरी : मेट्रोच्या निगडीपर्यंतच्या कामाला सुरुवात; कधीपर्यंत धावणार मेट्रो?

पिंपरी : लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन झालेल्या पिंपरी ते निगडी या ४.५१९ किलोमीटर अंतराच्या महामेट्रोच्या विस्तारित मार्गाचे काम अखेर सुरू झाले आहे. त्यातील मार्गिकच्या ‘व्हायडक्ट’ या कामाचा ठेका केंद्र सरकारच्या रेल विकास निगम लिमिटेडला देण्यात आला आहे. सध्या मार्गावरील माती परीक्षणाचे काम सुरू आहे. या कामाची मुदत १३० आठवडे आहे. मुदतीत काम पूर्ण झाले तरच तीन वर्षांनी निगडीपर्यंत मेट्रो धावेल.

सविस्तर वाचा…

13:21 (IST) 13 Jun 2024
सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून अजित पवार गटात वाद? छगन भुजबळ म्हणाले, “मी इच्छूक होतो”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार गट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या उमेदवार म्हणून निवड केली आहे. मात्र यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. यावर स्वतः भुजबळ यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, मी स्वतः राज्यसभेसाठी इच्छूक होतो. माझ्याबरोबर आनंद परांजपे, बाबा सिद्दीकी आणि इतर काही नेते इच्छूक होते. मात्र आमचे मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे या सर्वांची काल एक बैठक झाली. त्या बैठकीत आम्ही राज्यसभेच्या उमेदवारीबाबत सारासार विचार केला. त्या चर्चेअंती सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं, त्यांच्या नावाचा अर्ज भरायचा हे सर्वानुमते ठरलं आहे.

13:12 (IST) 13 Jun 2024
नाराज मराठा समाजाला आपलेसे करण्यासाठी महायुतीच्या आमदारांचा खटाटोप

सोलापूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या आमदारांसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे.

सविस्तर वाचा..

13:12 (IST) 13 Jun 2024
महापालिका निवडणुका टाळल्याने गडकरींच्या मताधिक्यात घसरण

नागपूर : वेळेत महापालिकेच्या निवडणुका न घेतल्याने त्याचा फटका भाजपला नागपुरात बसला असून पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांचे मताधिक्य घटण्यामागे हे एक कारण असल्याचे कार्यकर्ते बोलू लागले आहेत.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 13 Jun 2024
अल्पवयीन मुलाबरोबर पार्टीत सामील झालेल्या १५ जणांची चौकशी; कल्याणीनगर अपघात प्रकरणात सखोल तपास

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाबरोबर पबमधील पार्टीत सामील झालेल्या १५ मुलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पार्टीत सामील झालेल्या मुलांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा केले होते. उर्वरित ४८ हजारांचे बिल अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाने दिल्याची माहिती चौकशीत मिळाली.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 13 Jun 2024
सासऱ्याची सुनेवर वाईट नजर, क्रोधाचा भडका उडाला अन् मुलाने…

वर्धा : नात्याला काळिमा फासल्या जात असल्याचे लक्षात येताच क्रोधाचा भडका उडाल्यास नवल नाही. त्यातच मुलीसमान म्हटल्या जाणाऱ्या सुनेवर जर सासराच घृणीत नजर ठेवत असेल तर त्याचा शेवटही वाईटच होणार. अशाच एका घटनेत एकाचा जीव गेलाच.

सविस्तर वाचा…

13:10 (IST) 13 Jun 2024
सावधान… राज्यातील अनेक वीज निर्मिती संच बंद! झाले असे की…

नागपूर : राज्यातील बऱ्याच भागात मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत मोठी घट होऊन महानिर्मितीसह खासगी कंपनीच्या काही संचातील वीजनिर्मिती थांबवली गेली आहे. तर काही संचातून क्षमतेहून कमी वीजनिर्मिती केली जात आहे.

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 13 Jun 2024
मुंबई : पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार, २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांकडून प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी गुरूवार, १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे.

सविस्तर वाचा…

11:08 (IST) 13 Jun 2024
“नरेंद्र मोदी यांनी विजय ढापलाय?” रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील ‘त्या’ घटनेप्रकरणी उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार

“नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीतील विजय ढापलाय (चोरलाय) का? असा प्रश्न मी नव्हे तर जनता उपस्थित करू लागली आहे”, असं वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकीत पैशांचा धबधबा कोसळणार आहे. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही असाच धबधबा पाहायला मिळाला होता. विनायक राऊत यांच्या मतदारसंघात जे झालं ते धक्कादायक आहे. त्याबाबत मी न्यायालयात जाणार आहे. “

“पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा…”, सुनेत्रा पवारांबाबतच्या चर्चांवर रोहित पवारांचा टोला; म्हणाले, “काकी आणि पार्थ यांना…”

लोकसभा निवडणुकांचे निकाल देशात आणि महाराष्ट्रात वेगळी समीकरणं निर्माण करणारे ठरल्याचं मानलं जात आहे. केंद्रात आणि राज्यातही भाजपाप्रणीत आघाड्यांना फटका बसल्याचं निकालांवरून स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालांकडे पाहिलं जात असतानाच आता राज्यसभेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्याचवेळी छगन भुजबळांचंही नाव चर्चे आहे. राज्यसभा निवडणुकीच्या चर्चांवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक पोस्ट केली आहे.

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या चालू असून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ यांची नावं चर्चेत आहेत. यांच्यापैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? यावर तर्क-वितर्क चालू आहेत. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी एक्स हँडलवर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. मात्र, या पोस्टचा रोख नेमका कुणाकडे आहे? हे त्यातून स्पष्ट होत नाहीये.