Latest Marathi News, 28 November 2022 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आज संजय राऊतांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
तर “राज ठाकरेंचे विचार त्यांच्याबरोबर, माझे विचार माझ्याबरोबर आहेत. आम्ही स्पष्टपणे बोलतो. आमच्या ‘ओठात एक आणि पोटात एक’ अशी भावना कधीच नसते. हे बऱ्याच जणांना माहिती आहे. म्हणून मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला होता. कधी कधी आम्ही जे बोलतो ती आमची वैयक्तिक भूमिका असते, ती पक्षाची भूमिका नसते.” अजित पवार म्हणाल आहेत.
राज्यभरातील विविध क्षेत्रांमधील ताज्या व महत्त्वपूर्ण घडामोडी वाचा फक्त एकाच क्लिकवर
Maharashtra Live News, 28 November 2022 : राज्यभरातील विविध क्षेत्रांमधील ताज्या व महत्त्वपूर्ण घडामोडी वाचा फक्त एकाच क्लिकवर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमाध्ये अथर्वशीर्षाचा समावेश केला आहे. मग केवळ गणपतीच का, ३३ कोटी देव आहेत. त्यांनाही अभ्यासक्रमात घ्या, अशी उपरोधिक टीका करून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ‘कुठे घेऊन चाललो आपण शिक्षण’ असा सवाल सोमवारी उपस्थित केला.
कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या हातामधील, पिशवीतील किमती ऐवज चोरुन नेणाऱ्या तीन जणांना कल्याण लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी सोमवारी शिताफीने अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल, हातामधील पैशाचा बटवा पळून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्याध्यक्षांवर शासनाने आकसापोटी बदलीची कारवाई केल्याचा आरोप करत नागपुरातील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालीटी रुग्णालयातील अनेक परिचारिका सलग तिसऱ्या दिवशी काळ्या फिती लावून सेवा देत आहेत. शासनाने तातडीने मागणी मान्य न केल्यास २९ नोव्हेंबरपासून संघटनेने कामबंदचा इशारा दिला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलीस प्रवाशांची लूट होत असल्याचा तक्रारी वाढत असून परिणामी रेल्वे पोलिसांवर आता लोहमार्ग अतिरिक्त पोलीस महासंचालक लक्ष्य ठेवणार असून अचानकपणे तपासणी करून सर्व प्रकाराचा छडा लावण्यात येणार आहे. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या, अवैध वस्तू बाळगणाऱ्या प्रवाशांना कायद्याचा धाक दाखवून पैसे उकळणाऱ्या रेल्वे पोलिसांवर टांगती तलवार असणार आहे.
नुकताच गृहमंत्रालयाकडून राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक-उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. परंतु, या बदल्यामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर गृहमंत्रालयाने अर्थकृपा केली तर ठराविक अधिकाऱ्यांना वारंवार साईड पोस्टींगला ठेवले.
मुरबाड तालुक्यातील सायले येथील डोईफोडी नदीपात्रात बेकायदेशीरपणे विहीर बांधकाम केल्याप्रकरणी तलाठी संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कामगार नेते आणि धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांचा मुलगा ऋग्वेद यांच्याविरोधात टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ आता याचप्रकरणात राजन राजे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : ‘भारत जोडो’ यात्रेबाबत रोज नवनवीन पैलू समोर येत आहेत. यात्रेत सहभागी किंवा यात्रेशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सबंध आलेले आता राहुल गांधीविषयी भरभरून बोलतात. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्थानिक लोकांमध्ये मिसळून त्यांचे दु:ख कसे जाणून घेतले, स्थानिक पदार्थांची आग्रहपूर्वक चव कशी घेतली, याचे किस्से सांगतात. बातमी वाचा सविस्तर…
पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक शाळेत मोफत रायफल शूटिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे या शाळेतील मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम यांनी मोडकळीस आलेले टेबल आणि इतर टाकाऊ साहित्य वापरून रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र तयार केले आहे. बातमी वाचा सविस्तर…
उरण : उरण ते पनवेल व नवी मुंबई यांना जोडणाऱ्या जासई येथील उड्डाणपुलाचे काम आठ वर्षांपासून रखडले असून येत्या मार्च २०२३ ला हा पूल प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला जाणारा असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बातमी वाचा सविस्तर…
लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा आणि धर्मांतर विरोधी कायदाही लागू करावा, दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी हिंदू संघटनांच्यावतीने सोमवारी शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. बातमी वाचा सविस्तर…
पोलिसांच्या तावडीतून फरार झालेला बँक दरोडा आणि हत्या प्रकरणातील आरोपी अनिल दुबे याला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने वसईतून अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी त्याला वसई न्यायालयात आणले असताना पोलिसांना गुंगारा देऊज तो पळून गेला होता. बातमी वाचा सविस्तर…
काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार आणि राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन झाले. जिल्हा परिषद उपाध्यक्षच्या शासकीय निवास स्थानाजवळ शिंदे- भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. बातमी वाचा सविस्तर…
नागपूर: ती प्रचंड जखमी झाली आहे. तिला उपचाराची नितांत गरज आहे. मागचा पाय जवळजवळ खराब झाला आहे. पंजाचे हाड देखील खराब झाले आहे. बातमी वाचा सविस्तर…
पहाटे दोन वाजताची वेळ. थंडीमुळे सर्वत्र शुकशुकाट. लाखनी उड्डाणपुलावर वाहनांची तुरळक गर्दी. अशातच, एक ट्रक उड्डाणपुलावर धावत असतानाच अचानक पेट घेतो. पाहता पाहता ट्रकला लागलेली आग रौद्ररूप धारण करते. जिल्ह्यातील लाखनी उड्डाणपुलावर सोमवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास ‘बर्निंग ट्रक’चा थरार अनेकांनी अनुभवला. बातमी वाचा सविस्तर…
मागील काही दिवासंपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंच्या वक्तव्यांनंतर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी टीका केली आहे. यावरून राजकीय वातावरणही चांगलच तापलं आहे. तर सीमा भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. या पार्श्वभूमीवरच आता हे दोन्ही मंत्री बेळगावला जाणार आहेत. चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. वाचा सविस्तर बातमी…
आगामी पिंपरी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने विभागीय मेळावे सुरू केले असून त्याद्वारे शहरातील नागरी प्रश्नांवरून भाजपला लक्ष्य केले आहे. पाणीपुरवठा, रेडझोन, खंडित विजपुरवठा, लघुउद्योगांच्या समस्या आदी मुद्द्यांवर राष्ट्रवादीने भाजपवर हल्लाबोल केला आहे.
१५ लाखांची रोकड आणि ३०० ग्रॅम अस्सल सोन्याच्या मोबदल्यात ७८० ग्रॅम वजनाचे प्रक्रिया न केलेले सोने देतो असे सांगून एका भामट्याने सराफाची फसवणूक केल्याचा प्रकार भिवंडीतील पारनाका परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
“छत्रपती शिवरायांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर अद्याप कोश्यारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सरकारला शिवभक्तांच्या भावना समजत नसतील तर उठाव होणारच.”, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आज संजय राऊतांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी…
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महापुरुषांचे विषय काढून वाद नको, अशी भूमिका घेतली. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही रविवारी (२८ नोव्हेंबर) आपल्या सभेत अशीच भूमिका घेतली. यानंतर पत्रकारांनी अजित पवारांना महापुरुषांच्या विषयावर राज ठाकरेंनी तुमचं ऐकलं का? अशी विचारणा केली. त्यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते सोमवारी (२८ नोव्हेंबर) पुण्यात माध्यमांशी बोलत होते. वाचा सविस्तर बातमी…
शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांवर टीका केली. वाचा सविस्तर बातमी…
“आम्ही वाट बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान होऊन सुद्धा हे सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, आमदार जे स्वाभिमानाच्या गोष्टी करून पक्ष सोडून गेले ते आमदार हे अजुन हात चोळत कसे बसले आहेत, किती वेळ बसणार आहेत हात चोळत, तोंड शिवून? हे आम्ही पाहतो आहोत, महराष्ट्राला आम्ही दाखवतो आहोत. असं संजय राऊत म्हणाले आहेत.