Mumbai News Updates, 24 November 2022 : राज्यात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव केला आहे. या ठरावावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे विधान केले आहे. बोम्मई यांच्या या विधानानंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. याच मुद्द्यावरून विरोधी बाकावरील पक्षांनी राज्यातील शिंदे गट-भाजपाला लक्ष्य केले आहे. तर महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकमध्ये जाणार नाही, असे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे गटातील नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये जाऊन भेट घेतली आहे. आदित्य ठाकरेंच्या या बिहार दौऱ्यामुळेही वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, सोयाबीन, कापूस आदी पिकांना मिळणारा भाव या मुद्द्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबई येथील अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. स्वाभिमानीच्या या आंदोलनाचीही सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. राज्यातील या घडामोडींसह देश तसेच जगभरातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra Mumbai News , 24 November 2022 : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सिन्नरमध्ये एका ज्योतिषाची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारपरिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला असून महाराष्ट्रात हे प्रकार नवीन असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय अनेक नेत्यांकडूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना प्रत्युत्तर दिले. वाचा सविस्तर बातमी…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उचलून धरला असून, भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार टीका सुरू आहे. याशिवाय शिवरायांचा अपमान करणाऱ्यांसोबत न राहता मुख्यमंत्री शिंदेंनी सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे, असंही वारंवार म्हटलं जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत घेत भूमिका मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. वाचा सविस्तर बातमी…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उचलून धरण्यात आला असून, भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार टीका सुरू आहे. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तत्काळ हटवलं जावं, अशीही जोरदार मागणी सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत घेत भूमिका मांडली. वाचा सविस्तर बातमी…
श्रध्दा वालकर हत्या प्रकऱणात दिल्ली पोलिसांनी आता भाईदरच्या खाडीत सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. आफताबच्या मोबाईलचे लोकेशन खाडी परिसरात आढळल्यानंतर संशय बळावला होता. श्रध्दाचा मोबाईल किंवा काही पुरावे त्याने खाडीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे.
शहरात चालू वर्षात हेल्मेट न वापरल्याने ८३ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून २६१ वाहनधारक गंभीररित्या जखमी झाले. डोक्याला मार लागल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचे अपघाताच्या कारणाच्या विश्लेषणात स्पष्ट झाले.
शिरूरचे खासदार अमोल कोल्हे काम करत नाहीत, कामाची जबाबदारी घेत नाहीत आणि संबंधित काम झाल्यानंतर केवळ श्रेय घेतात, अशी टीका केंद्रीय जलशक्ती व अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी गुरुवारी केली.
डोंबिवली-ठाकुर्लीतील एका विकासकाने पाच वर्षापूर्वी घर खरेदीदारांना कमी किमतीत सदनिका विकत देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण एक कोटी ५५ लाख ५६ हजार रुपये उकळले.
खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकार कोसळणार असल्याचा दावा केला असून त्यानंतर भाजपा नेते आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. यादरम्यान आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सिन्नरमध्ये एका ज्योतिषाची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावरुन मुख्यमंत्र्यांना टोला लगावला असून महाराष्ट्रात हे प्रकार नवीन असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यपालांचं विधान, जितेंद्र आव्हाड अटक, श्रद्धा वालकर अशा इतर मुद्द्यांवरही भाष्य केलं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. कोश्यारी, त्रिवेदी यांच्या याच विधानानंतर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले आहेत. वाचा सविस्तर
एकनाथ शिंदे स्वत:चे भविष्य तयार करणारी व्यक्ती आहे. त्यामुळे ते कोणाकडेही भविष्य पाहणार नाहीत, अशी आम्हांला खात्री आहे. उलट तेच भविष्यकाराचे भविष्य सांगतील. नेत्याला कोणी कार्यकर्त्यांनी सांगितल्यास नेता तिथे जात असतो.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांवर दावा करण्याची तयारी केली असल्याचं सांगितल्यानंतर आता आणखी एक विधान केलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिलं असून सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्यात समाविष्ट केले पाहिजेत असा दावा केला आहे. यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त होत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून महाराष्ट्र असा-तसा वाटला का? अशा शब्दांत सुनावलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सविस्तर बातमी
वीज देयकांची थकबाकी असल्याने रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा बनावट संदेश पाठवून किंवा मोबाइलवर संपर्क साधून नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकाराचे जाळे राज्यभर पसरले आहे.
उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनीदेखील शिंदे गटावर कठोर शब्दात टीका केली आहे. बंडखोर आमदारांचा स्वाभिमान आता कोठे गेले आहे, असा सवाल राऊत यांनी केला. राऊतांच्या याच टीकेला आता शिंदे गटातील नेते दादा भुसे यांनी प्रत्युतर दिले आहे. ते आज (२४ नोव्हेंबर) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. वाचा सविस्तर
कर्नाटकच्या बंगळुरूतील एका खासगी महाविद्यालयातील वसतीगृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलींच्या वसतीगृहातील स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा लावून एका विद्यार्थ्याने मुलींचे तब्बल १२०० अर्धनग्न व्हिडीओ बनवले आहेत.
दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरण देशात गाजत असताना उत्तर प्रदेशातील सीतापूरमधून असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. पंकज मौर्या नावाच्या व्यक्तीने पत्नीचा खून करून मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. अन्य एका साथीदाराच्या मदतीने आरोपीने पत्नीला निर्घृणपणे संपवलं आहे.
सविस्तर बातमी वाचा…
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेचा सध्या मध्य प्रदेशातून प्रवास सुरू आहे. या यात्रेत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रादेखील सहभागी झाल्या आहेत. गांधी बहिण-भावांचा फोटो काँग्रेसने ट्विटरवर शेअर केला आहे.
उत्तर प्रदेशातील मथुरा पोलिसांनी एक अजब दावा केला आहे. शेरगड आणि हायवे पोलीस ठाण्यातील गोदामांमध्ये साठवलेला ५८१ किलो मारिजुआना ड्रग्जचा साठा उंदरांनी फस्त केल्याचा दावा मथुरा पोलिसांनी विशेष नार्कोटिक्स ड्रग्ज न्यायालयात केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डीला गेले असताना अचानक त्यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी सिन्नरमध्ये जाऊन एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंचे कान टोचले आहेत. “ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य बघणं म्हणजे २१ व्या शतकात सर्व जग चाललं असताना आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखं आहे,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.
शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीला ७५ तोळं सोनं अर्पण केलं आहे. प्रताप सरनाईक आपल्या कुटुंबीयांसबत तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी तब्बल ३७ लाख ५० हजार किंमतीचे ७५ तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले. आपण केलेला नवस पूर्ण झाल्याने दागिने अर्पण केल्याचं प्रताप सरनाईक यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केलं असून, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या यांनी म्हटलं आहे. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले आहेत. आता भाजपाच्यात मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे आव्हान दिलं असल्याने देवेंद्र फडवणीस आणि महाराष्ट्र सरकार काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यायचा असेल, तर तुम्ही काय कराल? धावण्याचा सराव, आहारावरील नियंत्रण आणि व्यायाम असे पर्याय तुम्ही द्याल. मात्र, लंडनमध्ये राहणाऱ्या एका पुणेकराने मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी चक्क लठ्ठपणावरील शस्त्रक्रियेला (बेरियाट्रिक सर्जरी) पसंती दिली.
वयाच्या सहाव्या वर्षापासून अपस्माराच्या (एपिलेप्सी) झटक्यांनी ग्रासलेल्या १९ वर्षीय तरुणीला शस्त्रक्रियेनंतर अपस्मार मुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या आजारामुळे तिला दररोज दोन वेळा अपस्माराचा झटका (फीट) येत असे.
कल्याण शहराच्या पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात चिंचपाडा रोड येथील अनुग्रह टावर या इमारतीत बिबट्या शिरल्याची खळबळ घटना समोर आली आहे. वनविभागाचे कर्मचारी, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील पोलीस कारवाईवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. “ठाण्यात सरकार एकाच घरातील तीन तीन लोकांवर मोक्का लावत आहे,” असा गंभीर आरोप केला. तसेच मुंब्र्यात मला बरबाद करण्यासाठी रचलेला तो डाव मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, असंही नमूद केलं. ते बुधवारी (२३ नोव्हेंबर) ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर
गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे नेतेही गुजरातमध्ये जाऊन पक्षाचा प्रचार करत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमध्ये जाऊन प्रचारसभेला संबोधित केलं. या मुद्द्यावरून आता आदित्य ठाकरेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडलं आहे. आपल्या राज्यातील उद्योग पळवणाऱ्या गुजरातमध्ये महाराष्ट्रातील मंत्री प्रचार करत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वाचा सविस्तर