Marathi News Updates : वक्फ सुधारणा विधेयक काल मध्यरात्रीच्या सुमारास लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना दिसत असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. तसेच आज मुंबईसह उपनगरांत ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याबरोबरच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यासह राजकीय वर्तुळातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा आपण येथे घेणार आहोत.

Live Updates

Mumbai-Maharashtra News Live Today, 3 April 2025 :  दिवसभरात राज्यात घडलेल्या सर्व महत्त्वच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

20:33 (IST) 3 Apr 2025
मुंबई, पुण्यात फ्लॅट खरेदी, नागपुरातूनच करा रजिस्ट्रेशन; राज्यात मालमत्तांची ‘फेसलेस नोंदणी’
नवीन महसूल प्रणालीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे भविष्यात घर खरेदी-विक्री, जमीन व्यवहार आणि नोंदणी अधिक सुटसुटीत आणि सुलभ होणार आहे. ...Read Full Details
20:21 (IST) 3 Apr 2025
मोबाईलवर खेळू न दिल्याने विद्यार्थाची आत्महत्या; अंबरनाथ तालुक्यातील धक्कादायक प्रकार
आत्महत्येचा प्रकार कळताच पालकांना धक्का बसला. मुलगा मोबाईलमध्ये बेटल ग्राऊंड प्रकारातील खेळ खेळत असल्याची माहिती पालकांनी दिली आहे. ...Read More
20:17 (IST) 3 Apr 2025
अनधिकृत टँकर भरणाप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल, दिवा आणि मुंब्रा भागात २७ अनधिकृत नळ जोडण्या खंडित
आगासन गाव येथे ६ नळजोडण्या तर ४ टँकर ठिकाणे उध्दवस्त करुन ६ पंप जप्त करण्यात आले. या कारवाईत पाच पंप जप्त करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. ...Read More
20:05 (IST) 3 Apr 2025

ठाण्यातील बांधकाम संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन मिराणी यांची नियुक्ती

ठाणे : ठाण्यातील बांधकाम व्यवसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई एमसीएचआय ठाणेच्या नवीन व्यवस्थापकीय समितीची निवड करण्यात आली असून यामध्ये अध्यक्षपदी सचिन मिराणी यांची अध्यक्षपदी तर, सरचिटणीसपदी फैयाज विराणी यांची निवड करण्यात आली आहे.

क्रेडाई एमसीएचआय ठाणेच्या अध्यक्षपदावर जितेंद्र मेहता हे कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या व्यवस्थापकीय समितीचा कार्यकाळ संपुष्टात आला. यामुळे या व्यवस्थापकीय समितीवरील पदाधिकाऱ्यांची नव्याने निवड करण्यात आली आहे. यानुसार, क्रेडाई एमसीएचआय ठाणेच्या अध्यक्षपदी सचिन मिराणी यांची अध्यक्षपदी तर, सरचिटणीसपदी फैयाज विराणी यांची निवड करण्यात आली आहे. पुढचे अध्यक्ष म्हणून गौरव शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी राजुल वोरा, अमरसिंग ठाकूर, मनिष खंडेलवाल, सह सचिव पदी मंथन मेहता, खजिनदार पदी जय वोरा, सह खजिनदारपदी मनीष देढीया यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय, पुनर्विकास समिती अध्यक्ष पदी महेश बोरकर तर, सचिव पदी अमित दातार यांची निवड करण्यात आली आहे. व्यावसायिक समिती अध्यक्ष पदी हिरेन छेडा तर, सचिव पदी मोनीष शाह, झोपडपट्टी पुनर्विकास समिती अध्यक्ष पदी भुषण भानुशाली, सचिव पदी देवेंद्र गुप्ता, मुंब्रा-कौसा शीळ समितीचे अध्यक्ष पदी एहतेशाम खान, जिल्हाधिकारी आणि टीएमसी कार्यालय समन्वय समितीचे अध्यक्ष संदीप महेश्वरी तर सचिवपदी जय वोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रेडाई एमसीएचआय ठाणेच्या युथ विंगच्या अध्यक्ष पदी निमीत मेहता, सचिव पदी प्रतिक पाटील, सहसचिव पदी अक्षीत परमार, खजीनदार पदी हर्षिल शाह, सह खजीनदार पदी यश मुथा आणि वैभव बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

19:52 (IST) 3 Apr 2025
दोन मित्रांचा गळा चिरून खून की अपघाती मृत्यू ? … संभ्रम कायम
भूषण ज्ञानेश्वर कडवे (२७, जुनापाणी, काटोल) आणि बॉबी सोहनलाल उईके (४५, कळमना झोपडपट्टी, नागपूर) ही मृत तरुणांची नावे आहेत. ...Read More
19:42 (IST) 3 Apr 2025
भंडारा : दहशत संपली! शेतकऱ्याचा बळी घेणारा वाघ अखेर…
शिकार करण्यासाठी आलेल्या वाघाला शार्पशूटरने डार्टचा वापर करून बेशुद्ध केले आणि वाघाला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर नागपूरच्या गोरेवाडा येथील राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात वाघाला हलवण्यात आले. ...Learn More
19:30 (IST) 3 Apr 2025
ठाणे जिल्हा रुग्णालयात जिभेच्या कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया, रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय ठरतय आधारवड
ठाणे जिल्हा रुग्णालयात प्रथमच मौखिक कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयामुळे ठाणे जिल्ह्यातील रुग्णाना आता, काहीसा दिलासा मिळू लागला आहे. ...Read More
19:15 (IST) 3 Apr 2025
आतकोली कचराभुमीच्या संरक्षक भिंतीलगत बांबूच्या वनाची उभारणी, ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय
भिवंडी येथील आतकोली भागातील कचराभुमीचा स्थानिक नागरिकांना दुर्गंधी तसेच कचरा वाहतुकीचा त्रास होणार नाही याची दक्षता काटेकोरपणे घेण्याच्याही सूचना ठाणे महापालिकेचे आयुक्तांनी दिल्या आहेत. ...Learn More
19:13 (IST) 3 Apr 2025

नाशिक : गोविंदनगर बोगद्याजवळ मोटारीचा पेट

नाशिक : शहरातील उड्डाणपुलाला असलेल्या गोविंदनगर बोगद्याजवळ गुरुवारी दुपारी एका चारचाकी वाहनाने पेट घेतला. काही क्षणात गाडी आगीने वेढली गेली. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उन्हाळ्यात वाहनांनी पेट घेण्याच्या घटना घडत असतात. गुरूवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गोविंदनगर बोगद्याजवळून मोटार जात असताना अचानक इंजिनातून धूर निघू लागला. काही कळण्याच्या आत मोटारीने पेट घेतला.

चालक त्वरीत बाहेर पडला. काही मिनिटांतच मोटार खाक झाली. रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी आणि स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला आणि पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी काही वेळातच आग विझवली. परंतु, तोपर्यंत मोटार जळून खाक झाली होती. या अपघातामुळे काही वेळ गोविंदनगर बोगदा आणि परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे किंवा इंधन गळतीमुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

18:42 (IST) 3 Apr 2025
शिळफाटा रस्त्यावरील महावितरणच्या विजेच्या खांबांचा वाहतुकीला अडथळा
रस्त्याची मार्गिका दोन्ही बाजुने अरूंद झाली आहे. या अरूंद जागेत दररोज वाहन कोंडी होत आहे. या कोंडीमुळे वाहन चालक रस्ता सीमारेषा भागातून वाहने चालवितात. या वाहनांना विजेचे खांब अडसर येऊ लागले आहेत. ...Learn More
18:36 (IST) 3 Apr 2025
सप्तश्रृंग गड चैत्र उत्सवासाठी सज्ज, सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
चैत्र उत्सव पाच ते १२ एप्रिल या कालावधीत सप्तश्रृंगी गडावर होत आहे. यात्रोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. ...Learn More
18:33 (IST) 3 Apr 2025
नवी मुंबईत मालमत्तांवर सिडकोचे वाढीव हस्तांतरण शुल्क
सिडकोने निवासी मालमत्तेच्या हस्तांतर शुल्कात ५ ते १० टक्के तर, व्यावसायिक गाळयांच्या हस्तांतर शुल्कात तब्बल ५० टक्क्यांनी शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...Learn More
18:21 (IST) 3 Apr 2025
मराठीत बोलणार नाही, मनसे कार्यकर्त्यांनी दाखविला हिसका, कोपरी परिसरातील एसबीआयच्या शाखेत घडला प्रकार
कोपरी भागातील एसबीआय बँकेच्या शाखेतील महिला अधिकारीला पत्र देऊन मराठीचा वापर बँकेच्या दैनंदिन व्यवहारात करण्याची मागणी केली. ...Learn More
18:05 (IST) 3 Apr 2025
रत्नागिरीत टाटा पंच कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक; एकजण ठार तर एक जखमी
स्वस्ति मायक्रो फायनान्स कंपनीच्या टाटा पंच कार आणि एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण किरकोळ जखमी झाला. ...Learn More
18:05 (IST) 3 Apr 2025
खैर वृक्षतोडप्रकरणी वनविभागाकडून दोघांना अटक, बदलापूर वनपरिक्षेत्रात कारवाई, पाच दिवसांची कोठडी
बदलापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत सोनावळा वनपरिमंडळातील मौजे कान्होर या राखीव वनक्षेत्रात खैर प्रजातीचे मौल्यवान वृक्षतोड करुन त्यांची वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असताना २ जणांना रंगेहात पकडण्यात आले. ...Read More
18:04 (IST) 3 Apr 2025
मराठीत बोला नाहीतर धडा शिकवू, ठाण्यात मनसेची विविध ठिकाणी आंदोलने, ठाण्यात मनसेचा टपाल विभागालाही दणका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिलेल्या आदेशानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांकडून आंदोलने सुरू झाली आहेत. ...Read More
17:43 (IST) 3 Apr 2025
विजाच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले
रत्नागिरी तालुक्यासह काही ठिकाणी गुरुवारी पहाटेच्या सुमारास विजाच्या कडकडाट आणि ढगांच्या आवाजासह मुसळधार पडलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. ...Read More
17:38 (IST) 3 Apr 2025
अल्पवयीन व अपरिपक्व मासे पकडण्याविरुद्ध कारवाईला आरंभ
मच्छीमारांसाठी आर्थिक उत्पन्नाचे महत्त्वपूर्ण स्त्रोत असणाऱ्या पापलेट माशाच्या लहान पिल्लांना पकडून त्याची विक्री करण्याचा सपाटा पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमारांनी सुरू केला होता. ...Read Full Details
17:29 (IST) 3 Apr 2025

पुणे शहर आणि परिसरात विजेच्या कडकडाटसह जोरदार अवकाळी पावसाची हजेरी

पुणे शहर आणि आसपासच्या भागात विजेच्या कडकडाटसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

16:37 (IST) 3 Apr 2025
उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोगावर प्रतिबंध करणाऱ्या शिंपल्यासारख्या गुलाबी मशरूमचा शोध
आण्विक जीवशास्त्र आणि अनुवांशिक अभियांत्रिकी विभागातील शिक्षकांनी हा प्रयोग साकारला आहे. ...Read More
16:09 (IST) 3 Apr 2025

राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसैनिक आक्रमक; मराठी भाषेच्या वापरासाठी मनसैनिकांचे ठाण्यातील कर्नाटक बँकेत आंदोलन

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळलेला असूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेचा वापर होताना मात्र दिसून येत नसल्याने गुढीपाडव्याला मनसेच्या सभेतून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन करत ज्या ठिकाणी मराठीचा वापर होत नसेल त्याठिकाणी जाऊन समज देण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्रात मनसैनिक मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. ठाण्यात कर्नाटक बँकेत मनसैनिक घुसत बँकेत मराठी फलक नसल्याने चांगलेच आक्रमक झालेत. ५ दिवसात यात बदल नाही झाला तर मनसे स्टाईल दणका देऊ असा थेट इशारा बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी दिला आहे.

15:29 (IST) 3 Apr 2025

बलात्कार प्रकरणी एकाला अटक; ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा

पुणे : अनाथ मुलीला शिक्षण देण्याच्या बहाण्याने घरी आणून बलात्कार केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकला अटक केली. शंतनू कुकडे (वय ५३, रा. पद्माकर लेन, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचा तो उपाध्यक्ष आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुकडे याला न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.

कुकडे याने दोन अनाथ मुलींना शिक्षणासाठी आणले होते. तुमच्यावरील शिक्षणाचा खर्च करतो, तसेच नोकरी लावून देतो, असे आमिष कुकडे याने मुलींना दाखविले होते. त्याने एका सदनिकेत मुलींची राहण्याची व्यवस्था केली होती. त्याने एका मुलीवर बलात्कार केला, तसेच एकीशी अश्लील कृत्य केले, त्यानंतर एका पीडित मुलीने २९ मार्च रोजी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

पीडित मुलींना संरक्षण द्यावे, तसेच आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) शहराध्यक्ष संजय माेरे यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांना निवेदन देण्यात आले. विभाग प्रमुख राजेश मोरे, मुकुंद चव्हाण, राहुल जेकटे या वेळी उपस्थित होते.

15:28 (IST) 3 Apr 2025

कार्यालयीन अधीक्षकासह दोघांना पकडले;बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात केलेल्या फर्निचरच्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक, तसेच वरिष्ठ सहायकाने एक लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक लाखाची लाच स्वीकारताना दोघांना बुधवारी महाविद्यालयाच्या आवारात पकडले.

या प्रकरणी कार्यालयीन अधीक्षक सुरेश विश्वनाथ बाेनवळे (वय ५३), वरिष्ठ सहायक जयंत पर्वत चौधरी (वय ४९) यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार फर्निचर व्यावसायिक आहे. २०२३ मध्ये त्यांनी वीस लाख रुपयांचे फर्निचर महाविद्यालयास दिले होते. एकूण देयकापैकी दहा लाख रुपयांचे देयक मंजूर करण्यासाठी बोनवळे आणि चौधरी यांनी व्यावसायिकाकडे एक लाख ३० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रार देण्यात आल्यानंतर ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. चौकशीत बाेनवळे, चौधरी याने लाच मागितल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. तक्रारदाराकडून लाच घेणाऱ्या बाेनवळे आणि चाैधरी यांना पकडण्यात आले. दोघांविरुद्ध रात्री उशिरा बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

15:22 (IST) 3 Apr 2025
सफाळ्यात बहरला दुर्मिळ वरुण वृक्ष
८० वर्ष पेक्षा अधिक वयोमान असलेले एक दुर्मिळ अशा वरुण वक्ष (वायवरण) सफाळे सोसायटीच्या भात गिरणी जवळ असणारे वृक्ष बऱ्याच वर्षानंतर बहरले ...Learn More
15:13 (IST) 3 Apr 2025
वाहनांची काच एका मिनिटात वाकवून चोरी करणारा गजाआड; २० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद
रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची काच तोडून आतील मौल्यवान ऐवज लंपास करणार्‍या एका सराईत आरोपीला गुन्हे शाखा १ च्या पथकाने अटक केली आहे. ...Read More
15:13 (IST) 3 Apr 2025

मणिपूर येथील येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा

"मणिपूर येथील परिस्थिती लक्षात घेता येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मांडण्यात आला. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पाठिंबा दिला. मणिपूरमध्ये झालेल्या घटना या अतिशय दुर्दैवी होत्या. यामुळे तेथील समाजमन ढवळून निघाले आहे. तेथे मुक्त व निर्भय वातावरणात निवडणुका होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने तेथे लवकरात लवकर निवडणुका घ्याव्या अशी मागणीही सभागृहात केली," अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे.

15:02 (IST) 3 Apr 2025

विजेच्या धक्याने दाम्पत्याचा मृत्यू

बारामती : बारामती तालुक्यातील सांगवी गावात झोपेत असलेले दाम्पत्य विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली. उन्हाळ्यामुळे पंख्यातून वीज प्रवाह लोखंडीत काॅटमध्ये उतरल्याने दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नवनाथ रामा पवार (वय ४०), संगीता नवनाथ पवार (वय ३८, दोघे रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ आणि संगीता मंगळवारी रात्री जेवण करून झोपले. मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाला. रात्री बाराच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. लोखंडी काॅटशेजारी पंखा लावला होता. वीजप्रवाह वाढल्याने शाॅर्टसर्किट झाले. पंख्यातून वीजप्रवाह काॅटमध्ये उतरल्याने पवार दाम्पत्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती नवनाथ पवार यांचे चुलत भाऊ रामचंद्र यांनी माळेगाव पाेलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली, पोलीस उपनिरीक्षक भोर तपास करत आहेत.

15:01 (IST) 3 Apr 2025

संगमनेरमधील फळबागांना अवकाळीचा फटका

संगमनेर : आज, बुधवारी सायंकाळनंतर अचानक आलेल्या वादळी पावसाने संगमनेर तालुक्याच्या पठार आणि पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती मिळाली. त्याचा फटका प्रामुख्याने फळबागांना बसला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, संगमनेर तालुक्यातील कौठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गाई मृत्युमुखी पडल्या आहे.

काल, मंगळवारपासून तालुक्यात पावसाळी वातावरण आहे. आज सायंकाळनंतर ढगांच्या प्रचंड गडगडाटासह तालुक्याचा पठार भाग आणि पश्चिम पट्ट्यात कमी-अधिक स्वरूपाचा पाऊस झाला. बागायती पट्ट्यातील हिवरगाव पठार, निमज, नांदुरी दुमाला, सावरगाव तळ, चंदनापुरी, मिर्झापूर, धांदरफळ खुर्द आदी गावांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला.

अचानक आलेल्या या पावसामुळे डोंगर भागातून पाणी वेगाने खाली आले आणि शेतात साचले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसत होते. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लावलेली कांदा, उन्हाळी बाजरी, गहू, डाळिंब यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे.

14:58 (IST) 3 Apr 2025

जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसने संघर्षाची तयारी ठेवावी- बालगुडे, काँग्रेसने बूथ समित्या मजबुतीवर भर द्यावा

कोल्हापूर :जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी, असे आवाहन काँग्रेसचे कोल्हापूर निरीक्षक संजय बालगुडे यांनी केले.दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या बालगुडे यांनी जिल्हा काँग्रेस कार्यालयात कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नसले तरी खचून न जात कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम करताना बूथ समित्या भक्कम करण्यावर भर द्यावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होतील याची निश्चिती नसली तरी तयारी केली पाहिजे, असेही बालगुडे म्हणाले.

काँग्रेसची बांधिलकी शिवरायांशी - सतेज पाटील

विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपण्याचे काम काँग्रेसने सातत्याने कसे केले याचा तपशील देऊन काँग्रेस पक्ष म्हणजे आपले घर मानून काम करावे. तरुण पिढीला सामावून घेऊन काम करा, असा सल्ला दिला.

शहराध्यक्ष सचिन चव्हाण, तोफीक मुलाणी, भारती पोवार, संपत चव्हाण, एन. एन. पाटील, सरलाताई पाटील, राणी खंडागळे, संजय पटकारे, प्रवीण पाटील, उदय पोवार यांची भाषणे झाली.

14:57 (IST) 3 Apr 2025

जन्म - मृत्यू दाखले आता टपालाने घरपोच;सांगली महापालिकेची सुविधा

सांगली : नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले जन्म व मृत्यू दाखले आता टपालाने घरपोच देण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध केली असून, या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी केले.

जन्म व मृत्यू दाखले हे नागरिकांना आवश्यक असे दस्तऐवज असून, वेळेत आणि घरी मिळणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत जन्म व मृत्यू दाखले पोस्टाद्वारे घरपोच नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने उपक्रम हाती घेतला आहे.

दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून मागणी नोंदवावी लागणार आहे. यानंतर आवश्यक शुल्क ऑनलाईन भरल्यानंतर दाखला तयार झाल्यावर घरपोच होणार आहे, अशी माहितीही प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

Mumbai-Maharashtra News Live Today, 3 April 2025 :  दिवसभरात राज्यात घडलेल्या सर्व महत्त्वच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर