Marathi News Updates : वक्फ सुधारणा विधेयक काल मध्यरात्रीच्या सुमारास लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना दिसत असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. तसेच आज मुंबईसह उपनगरांत ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याबरोबरच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यासह राजकीय वर्तुळातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा आपण येथे घेणार आहोत.
Mumbai-Maharashtra News Live Today, 3 April 2025 : दिवसभरात राज्यात घडलेल्या सर्व महत्त्वच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, “देवेंद्र फडणवीस नवाज शरीफ आणि जिनांच्या विचारांवर…”
फटाक्याची वात लावायची आणि पळून जायचं हे भाजपाचं धोरण आहे. फटाका फुटला की यायचं आणि सांगायचं वात आम्हीच लावली होती. पण वात लावल्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला. तसंच वक्फ विधेयक जमिनींवर डोळा ठेवून आणण्यात आलं आहे असाही आरोप केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनाही प्रत्युत्तर दिलं.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्याकडून २ तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल
पुण्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनू कुकडे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे नाव आहे. शंतनू कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका सेलमध्ये अध्यक्ष पदावर काम करत होते. त्यांच्याविरोधात समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भल्या पहाटे विजांच्या कडकडाटात बिगर मौसमी पाऊस
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून बिगर मौसमी पाऊस पडत असून वारेही वाहत आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला फळबागांतीचा घास नुकसानीच्या उंबरठ्यावर आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलांमुळे बिगर मौसमी पाऊस पडतो आहे. तसेच गुढीपाडव्याच्या दरम्यान सकाळी हलकीशी थंडी वाजत होती. उन, वारा, पाऊस व थंडीची चाहूल लागली त्यामुळे फळबागा सह आबालवृद्धांना रूग्णालय गाठावे लागत आहे.
मागील दोन दिवस वैभववाडी मध्ये पाऊसाने हजेरी लावली तर आज गुरुवारी पहाटे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश परिसरात पाऊस झाला. त्यामुळे आंबा, काजू, नारळ, जांभूळ ,कोकम आदी फळबागावर परिणाम झाला आहे. आंबा पीक काढणीस तयार असताना पाऊस झाला तसेच वेगवान वारे वाहू लागले आहेत त्यामुळे फळपीक नुकसान होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेती व बागायती कामांची लगबग सुरू आहे तर काजू आंबा बागायतदार दिवसभर बागायती मध्ये असतात, निसर्ग कोपातून शिल्लक राहिलेल्या फळपिक उत्पादन घेण्यासाठी झटत आहेत.
शिवसेना नेते राहूल एन कनाल यांनी बिग ट्री एंटरटेनमेंटचे सीईओ आशिष हेमराजानी यांना पत्र लिहून बुकमायशोने स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या कार्यक्रमांचे प्रमोशन थांबवण्याची विनंती केली आहे.
Shiv Sena leader Rahool N Kanal writes a letter to Big Tree Entertainment CEO Ashish Hemrajani, requesting BookMyShow to stop promoting comedian Kunal Kamra’s events. pic.twitter.com/IL4Euip4Jz
— IANS (@ians_india) April 3, 2025
वक्फ कायदा आणणे म्हणजे हा भाजपाचा खोडसाळपणा – इम्तियाज जलील
– वक्फ कायदा आणणे म्हणजे हा भाजपाचा खोडसाळपणा आहे. मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे केले जात आहे. आम्ही शांत बसणार नाही. मुस्लिम बोर्डाने विरोध करण्याची भूमिका घेतली असून, आम्ही त्यांना साथ देऊ आणि न्यायालयात जाऊ असा इशारा एम.आय.एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला आहे. हा कायदा म्हणजे देशाची दिशाभूल आहे, फाटक्यात पाय घालू नका, अशी टीका त्यांनी केली.
– वक्फ विधेयक त्यांच्याकडे संख्याबळ आहे. अधिवेशनात मुस्लिम प्रतिनिधी नसताना, आम्ही कधी जबरदस्तीने काम करू शकतो हे त्याचे एक उदाहरण आहे अस इम्तियाज जलील यांनी सांगितले. अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजीज्यू यांचे भाषण ऐकले, हे विधायक का आणले. हे सांगताना त्यांनी देशाची दिशाभूल केली आहे. त्यांनी वक्फ कमिटीवर शिया, बोहरी आणि महिला सदस्य असतील असे त्यांनी सांगितले, मात्र हे सदस्य तर आधीपासूनच आहेत. महिलांच्या नावाने खोटं नाटक का करता? महिलांना आरक्षण देण्यासाठी पाच दिवसांचे अधिवेशन घेतले. कायदा मंजूर केला, मात्र अंमलबजावणी कधी हे का सांगितले नाही. अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.
– वक्फ समितीवर इतर समाजाचे सदस्य नेमण्याची घोषणा केली, मुस्लिम समाजात हुशार शिक्षित माणसं नाहीत का? इतर कोणत्या ट्रस्ट वर मुस्लिम व्यक्ती का नियुक्त करत नाहीत असे प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थितीत केले. आमच्या फाटक्यात पाय घालू नका, “कहीपे निगाहे कहीं पे निशाणा” अस धोरण सुरू आहे. हा कायदा का आणला ते पहावे. आधी ट्रिपल तलाक, मांस खाण्याचा मुद्दा, हिजाब, आता अनेक वर्षांपूर्वी मेलेला औरंगजेब असे मुद्दे बाहेर काढून मूळ मुद्द्यापासून बाजूला घेतले जात आहे. मुस्लिम बोर्डाने विरोध दर्शवला आहे, आम्ही त्याच्या सोबत आंदोलन करणार, आणि न्यायालयात देखील जाणार असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला
ट्रम्प यांनी लावलेल्या टेरिफवरून देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी… संजय राऊतांचा आरोप
अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के टेरिफ लावले आहेत आणि कालच्याच दिवशी वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ट्रम्प यांनी लावलेल्या टेरिफची चर्चा होऊ नये यासाठी हे बिल आणलं गेलं, कालचा दिवस त्यासाठीच निवडला हे सर्वांना माहिती आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के टेरिफ लावलं आहे. ज्यामुळे रुपया कोसळला, शेअर बाजार कोसळला, अराजक माजलं आहे. अनेक उद्योंगांवर संकट आलं आहे. भविष्यात देशामध्ये जे आर्थिक अराजक माजणार आहे त्याचं हे द्योतक आहे, त्यावरून लक्ष काढण्यासाठी हे संपत्ती विधेयक आणलं आहे असे संजय राऊत म्हणाले.