Marathi Breaking News Highlights : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तासभर भेट झाल्यानंतर त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये धार्मिक प्रार्थनास्थळ हटवल्यामुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यासंदर्भात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अमरावती-मुंबई विमान सेवेला आजपासून सुरुवात होत असून उद्घाटनासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.

Live Updates

Mumbai-Maharashtra News Live Today, 16 April 2025 : नाशिकसह महाराष्ट्रभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

11:53 (IST) 16 Apr 2025

Aaditya Thackeray on Mahayuti Govt: १०० दिवसांत एकही चांगली योजना नाही – आदित्य ठाकरे

या सरकारला १०० दिवस उलटून गेले आहेत. पहिले १०० दिवस हनिमून पिरियड मानला जातो. या काळात मुख्यमंत्री जे काही करतात, त्याचं कौतुक साधारणपणे केलं जातं. पहिल्या १०० दिवसांत एकही चांगली योजना कुणासाठी आणलेली नाही – आदित्य ठाकरे</p>

11:51 (IST) 16 Apr 2025

Aaditya Thackeray on Sanjay Raut – संजय राऊत पटकन काहीतरी बोलून जातात – आदित्य ठाकरे

मी राऊत साहेबांना फोन केला. त्यांना विचारलं की संजय काका उद्या काय बोलायचंय, मला विषय काय दिलाय? तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे, ते पटकन काहीतरी बोलून जातात. त्यांनी मला सांगितलं महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे यावर बोल – आदित्य ठाकरे</p>

11:41 (IST) 16 Apr 2025

सांगलीत गुन्हेगारांचा धारदार शस्त्राने खून, दोघांना अटक

खून करणाऱ्या दोन संशयितांना २४ तासांत गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी गजाआड केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. …सविस्तर वाचा
11:35 (IST) 16 Apr 2025

अहिल्यानगरमध्ये आठ मंडळांच्या अध्यक्षांसह, स्पिकर मालकांविरुद्ध गुन्हे, आंबेडकर जयंती मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण

मिरवणुकीदरम्यान मंडळ अध्यक्ष व डीजे मालक यांनी कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवून मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण केले. …सविस्तर वाचा
11:29 (IST) 16 Apr 2025

आधी राज ठाकरे-एकनाथ शिंदेंची भेट, नंतर नेत्यांची सूचक विधानं; महायुतीत मनसे येणार का?

Eknath Shinde-Raj Thackeray: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. …सविस्तर वाचा
11:21 (IST) 16 Apr 2025

राज्यात दुचाकी टॅक्सीविरोधात आंदोलन पेटणार…संतप्त ऑटोरिक्षा व ऑनलाईन टॅक्सीचालक म्हणतात…

शासनाने ऑनलाईन टॅक्सीला मंजुरी दिली आहे. या निर्णयाने रोजगार हिरावणार असल्याचा आरोप करत ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र आणि विदर्भ ॲप- बेस्ड टॅक्सी युनियनसह इतरही काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. …सविस्तर वाचा
11:20 (IST) 16 Apr 2025

लातूरच्या तंत्रनिकेतनमध्ये जूनपासून अभियांत्रिकी महाविद्यालय, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून लातूरकरांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची मागणी होती. ‘लोकसत्ता’ मधूनही या मागणीचा पाठपुरावा केला होता. …अधिक वाचा
11:10 (IST) 16 Apr 2025

माजलगावात भाजप कार्यकर्त्याचा खून

छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास भाजप कार्यालयासमोर पक्षाच्या विस्तारकाची सत्तुराचे वार करून हत्या करण्यात आली. बाबासाहेब आगे (वय ३५, रा. किट्टीआडगाव) असे हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. तर नारायण शंकर फपाळ असे आरोपीचे नाव असल्याची माहिती माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिली.

हत्येच्यावेळी नारायण फपाळ हा बलात्कारी, बलात्कारी असे म्हणत जाेरजोरात ओरडत होता. त्यानंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. आरोपी नारायण फपाळ याला पोलिसांनी अटक केल्याचे पोलीस निरीक्षक सूर्यतळ यांनी सांगितले. आरोपी नारायण फपाळ याची सासुरवाडी ही किट्टीआडगाव आहे आणि हेच भाजप कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांचे गाव आहे.

11:00 (IST) 16 Apr 2025

उष्णतेपासून बचावासाठी पालिकेच्या नागरिकांना सूचना

तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना, उन्हाचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी नवी मुंबई पालिका प्रशासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून काही मार्गदर्शक सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. …सविस्तर वाचा
11:00 (IST) 16 Apr 2025

भंडारा वन परिसरात १४ वर्षांनंतर दिसला ‘इंडियन ग्रे वुल्फ’

भंडारा वन विभागाच्या रावनवाडी परिसरात ‘इंडियन ग्रे वुल्फ’ म्हणजेच भारतीय लांडगा आढळला. …अधिक वाचा
10:59 (IST) 16 Apr 2025

नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्यास जमावाचा विरोध; अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर, १५ ते २० जण ताब्यात

काठे गल्ली भागातील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम काढण्यासाठी महानगरपालिका आणि पोलिसांनी तयारी सुरू केल्यानंतर बुधवारी रात्री परिसरात जमावाने विरोध करण्याचा प्रयत्न केला. …वाचा सविस्तर
10:58 (IST) 16 Apr 2025

Sanjay Raut on Nashik Violence : भाजपाचे लोक दंगलीसाठी मुहूर्त काढून बसलेले असतात – संजय राऊत

ते नंतरही कारवाई करू शकत होते. पण आजचा दिवस निवडला. कारण आज शिवसेनेचं नाशिकमध्ये शिबिर होतंय. म्हणून आजचा दिवस कारवाईसाठी निवडला. तुम्ही आमच्यावर जळताय, जळू आहात तुम्ही. तुम्ही घाबरट आहात. तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भिती वाटते. म्हणून तुम्हाला असले फालतू उद्योग करत आहात. भाजपचे लोक कधी कुठे दंगल घडवायची वगैरेचे मुहूर्त आधी काढून ठेवतात. त्याचे मुहूर्त काढण्यासाठी पंचांग घेऊन यांचे लोक बसलेले असतात – संजय राऊत</p>

10:53 (IST) 16 Apr 2025

नागपूर हिंसाचार – महापालिका आयुक्त म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या बुलडोझर कारवाईच्या नियमावली बाबत माहितीच नाही, राज्य शासनाकडून…

शहरात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर नागपूर महापालिकेने बुलडोझरने कारवाई केली. …अधिक वाचा
10:52 (IST) 16 Apr 2025

उल्हासनगरात पुन्हा स्लॅब कोसळला; एक जखमी, जीवितहानी नाही

उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात एक साठ वर्षे व्यक्ती गंभीर झाले आहेत. आत्तम प्रकाश अपार्टमेंट असे या इमारतीचे नाव असून ही इमारत कॅम्प पाच भागात आहे. …सविस्तर बातमी
10:44 (IST) 16 Apr 2025

धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना लवकरच ना हरकत प्रमाणपत्र; शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सिडकोचे आश्वासन

नवी मुंबईतील धोकादायक इमारतींमधील घर खरेदी केल्यानंतर सिडको मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. …वाचा सविस्तर
10:35 (IST) 16 Apr 2025

Eknath Shinde-Raj Thackeray Meet: दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली? उदय सामंत म्हणतात…

अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली हे मी आज सकाळी माध्यमांमधून ऐकतोय. काल राज ठाकरेंना एकनाथ शिंदे का भेटले याचा खुलासा एकनाथ शिंदेंनी केला आहे. त्यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण होतं. शिवसेनेच्या प्रवासावर, पूर्वीच्या कार्यप्रणालीवर दोघांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे बंद दरवाजाआड कोणतीही चर्चा झाली नाही. तिथे मनसेचे अमेय खोपकर, संदीप देशपांडे व अभिजीत पानसे होते. मीही तिथे होतो. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंचं बाँडिंग पक्कं आहे. त्यामुळे कालच्या भेटीचा कोणताही राजकीय संदर्भ नाही – उदय सामंत

10:30 (IST) 16 Apr 2025

Amravati Airport Inauguration : लवकरच स्टार एअरलाईन्स, इंडिगोच्याही सेवा सुरू होणार…

यवतमाळ, अकोला भागातले प्रवासीही अमरावती विमानतळाहून मुंबईला जातील. येत्या काळात स्टार एअरलाईन्स व इंडिगो एअरलाइन्सदेखील इथे सेवा सुरू करत आहेत. भविष्यात अमरावती ते दिल्ली व अमरावती ते पुणे अशा सेवांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अमरावती विमानतळाला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं नाव मिळावं अशी माझी इच्छा आहे – रवी राणा

10:29 (IST) 16 Apr 2025

Amravati Airport Inauguration : पुढच्या वर्षीपासून अमरावतीत पायलट ट्रेनिंग स्कूल

नवनीत राणा खासदार असताना त्यांनी या विमानतळासाठी निधी आणला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एमएसआरडीसीच्या माध्यमातून अनेक कामं केली. स्वत: मुख्यमंत्री व नवनीत राणा दिल्लीला परवानग्यांसाठी गेले होते. अमरावतीतच पायलट ट्रेनिंग स्कूल पुढच्या वर्षीपासून सुरू होत आहे – रवी राणा

10:28 (IST) 16 Apr 2025

Amravati Airport Inauguration : अमरावती विमानतळ उद्घाटनासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मुंबईहून विमानानं रवाना

सगळ्यांचं हे स्वप्न होतं. तो मुहूर्त आज साधला गेला आहे. अत्यंत उत्साहाचं वातावरण अमरावतीमध्ये आहे. त्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार नवनीत राणा, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री, राज्यमंत्री असे अनेक मान्यवर या उद्घाटनासाठी मुंबईहून विमानाने अमरावतीला येत आहेत – रवी राणा

अमरावतीमधील नवीन विमानतळ (फोटो – MADC X Handle)

Mumbai-Maharashtra News Live Today, 16 April 2025 : महाराष्ट्राची बित्तंबातमी…