Marathi Breaking News Highlights : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तासभर भेट झाल्यानंतर त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये धार्मिक प्रार्थनास्थळ हटवल्यामुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यासंदर्भात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अमरावती-मुंबई विमान सेवेला आजपासून सुरुवात होत असून उद्घाटनासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.

Live Updates

Mumbai-Maharashtra News Live Today, 16 April 2025 : नाशिकसह महाराष्ट्रभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

19:42 (IST) 16 Apr 2025

Maharashtra News LIVE Updates : सावधान! हापूस आंबा म्हणून तुम्ही खाताय कर्नाटकी आंबा?

नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या आंब्याचा सीझन तेजीत सुरू आहे. एपीएमसी बाजारात रोज एक लाखाहून अधिक आंब्यांच्या पेट्या दाखल होत आहेत. त्यातच कोकणातील हापूस आंब्याला मोठी मागणी असते. मात्र, कोकणी हापूसच्या नावाने कर्नाटकी आंबा विकला जाण्याची शक्यता आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात रोज एक लाखहून अधिक आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. त्यामध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या ६० ते ७० हजार पेट्या येत आहे. तर ३० ते ४० हजार पेट्या कर्नाटक व दक्षिणेतील हापुसदृश्य आंबे दाखल होत आहे. त्यात कर्नाटकच्य्या आंब्यांची आवक देखील वाढत चालली आहे. हे कर्नाटकचे आंबे घाऊक बाजारात आणि बाजाराबाहेरही रत्नागिरी-देवगड हापूस म्हणून विकले जाऊ लागले आहेत. त्यामुळे अस्सल हापूस खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.

17:49 (IST) 16 Apr 2025

Sanjay Raut at Nashik Melava: छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे शिवसेनेनेही संघर्ष केला – संजय राऊत

“छावा चित्रपटात आपण छत्रपती संभाजी महाराजांचा छळ पाहिला. तसा संघर्ष आपल्या वाटेला आला आहे”, असे विधान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नाशिक येथील मेळाव्यात बोलताना केले. वाईट काळाचा सामना करणारी व्यक्तीच उज्ज्वल भविष्याची निर्माती होऊ शकते, असेही यावेळी राऊत म्हणाले.

16:38 (IST) 16 Apr 2025

Kunal Kamra Case Hearing: कुणाल कामरा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

कुणाल कामरा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असून कामराच्या वकिलांचा युक्तिवाद चालू आहे. “ज्या व्यक्तीचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्या व्यक्तीने अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण पूर्णपणे निराधार आहे”, असा युक्तिवाद कुणाल कामराच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

15:30 (IST) 16 Apr 2025

मुघल साम्राज्य, निजाम काळात जमीनदारी…पारवा येथे इतिहासाची साक्ष देत उभा आहे ‘वाडा चिरेबंदी’…

राजकारण आणि समाजकारणात प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील महत्वाचे घराणे म्हणजे पारवेकर. मोघल साम्राज्यापासून पारवेकर कुटुंब जमीनदार म्हणून महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकात ओळखले जातात. …सविस्तर बातमी
15:23 (IST) 16 Apr 2025

पालघर नगरपरिषद क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर; जीवितहानी टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कार्यवाही

इमारत कोसळून जीवितहानी होऊ नये या दृष्टीने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालघर नगर परिषद क्षेत्रातील अतिधोकादायक, धोकादायक व रचनात्मक दुरुस्ती अशा ८९ इमारतींची यादी नगर परिषदेकडून जाहीर करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
15:17 (IST) 16 Apr 2025

कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा…महायुतीकडून आश्वासनांची अपूर्णता…नाशिकच्या निर्धार शिबिरात आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांवर बरसले

राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे. बीड प्रकरण असो वा महिलांवरील वाढते अत्याचार. …सविस्तर बातमी
15:06 (IST) 16 Apr 2025

शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय सुविधांअभावी रुग्णांचे हाल; मनसेचा रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. किरकोळ उपचारांसाठी रुग्णांना ठाणे, मुंबई येथील रुग्णांलयांत पाठविले जाते. …अधिक वाचा
14:18 (IST) 16 Apr 2025

सिमेट, डांबरीकरणामुळे कोंडलेला झाडांचा श्वास मोकळा करा

रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंटीकरण करताना रस्त्यालगतच्या झाडांसाठी आजूबाजूला जागा सोडण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या मुळाला पाणी मिळत नाही. …सविस्तर वाचा
14:11 (IST) 16 Apr 2025

कुटुंबाकडून शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचे सर्वेक्षण

शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण, शिक्षणावर होणारा प्रत्येक कुटुंबाचा खर्च, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती, याबाबतची माहिती संकलित करण्यासाठी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. …सविस्तर बातमी
14:02 (IST) 16 Apr 2025

डोंबिवलीतील नांदिवलीत विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये बेकायदा इमारतीची उभारणी

६५ इमारती तोडण्याचे नियोजन सुरू असताना भूमाफियांचे पालिकेला आव्हान …सविस्तर वाचा
14:00 (IST) 16 Apr 2025

गोदावरीच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी एक हजार कोटीचा प्रस्ताव

२०८ किलोमीटरच्या या कालव्याच्या दुरुस्तीमुळे पाणी पोहचण्याचा कालावधी ३५ दिवसांवरून २८ दिवसांपर्यंत कमी होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. …अधिक वाचा
13:52 (IST) 16 Apr 2025

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये ATM, आता धावत्या ट्रेनमध्ये पैसे काढण्याची सुविधा; देशातला पहिलाच प्रयोग!

ATM in Train: मुंबई-नाशिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये एटीएम सुविधेची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
13:31 (IST) 16 Apr 2025

आदित्य ठाकरे यांच्या स्वागताला उदंड गर्दी अन मंचाचा खाडकन आवाज…नाशिकमधील निर्धार शिबिरातील प्रकार

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या शिबिरास बुधवारी सकाळी नाशिकमधील गोविंदनगर येथील मनोहर गार्डनच्या सभागृहात ‘आम्ही इथेच’ या सत्राने सुरुवात झाली. …सविस्तर वाचा
13:29 (IST) 16 Apr 2025

अहिल्यानगरमध्ये प्रवाशांवर रणरणत्या उन्हात थांबण्याची वेळ, मनपाच्या ‘ना हरकत’ अभावी बसस्थानकाचे काम रखडले

मनपाने दोन दिवसांत ना हरकत दाखला न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी दिला आहे. भोसले यांनी तसे पत्रही मनपा आयुक्तांना दिले आहे. …अधिक वाचा
13:16 (IST) 16 Apr 2025

‘एचएसआरपी’ला अमरावतीकरांचा अल्प प्रतिसाद, आतापर्यंत केवळ ५ हजार ४८२ वाहनांवर..

प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) निर्देशानुसार २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवून घेण्यासाठी अमरावतीकरांचा अल्प प्रतिसाद असल्याचे समोर आले आहे. …सविस्तर वाचा
13:15 (IST) 16 Apr 2025

‘जलजीवन मिशन’मधील ठेकेदारांचे रोहित पवार, नीलेश लंकेशी लागेबांधे; सुजय विखे यांचा हल्लाबोल

माजी खासदार सुजय विखे आज, मंगळवारी दुपारी अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथील कार्यक्रमास उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार व नीलेश लंके यांच्यावर पलटवार केला. …सविस्तर बातमी
13:10 (IST) 16 Apr 2025

नवी मुंबई: पालिकेच्या ५० हजारांहून अधिक मुदतबाह्य नस्ती नष्ट

महापालिकेच्या सर्व विभाग आणि विभागीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन स्वच्छतेला प्राधान्य देत कागदपत्रे आणि नस्तींचे निंदणीकरण, तपासणी, नष्टीकरण आणि निर्लेखनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. …सविस्तर वाचा
12:56 (IST) 16 Apr 2025

सोलापूरचा पारा ४३ अंशांच्या दिशेने

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून सोलापुरात चाळिशी पार केलेल्या तापमानाचा पारा आता ४३ अंशांच्या दिशेने जात आहे. मंगळवारी येथील तापमान ४२.२ अंशांवरून ४२.८ अंशांवर पोहोचले होते. हे तापमान यंदाच्या उन्हाळ्यात उच्चांकी मानले गेले.

गेल्या फेब्रुवारीपासून सोलापुरात उन्हाळा चांगलाच जाणवत आहे. मार्चनंतर एप्रिल उजाडताच तापमानात आणखी असह्य वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी रात्री वारे चांगले खेळत होते. परंतु आता कोरड्या हवामानात उष्मा जाणवत आहे. घरात रात्री उष्म्याने झोपलेली मुले जागी होत आहेत. त्यांची झोप उडाल्याचे चित्र दिसून येते. मुलांसह वृद्ध मंडळींचे आजारपण वाढले आहे.

सध्या सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. रस्त्यावर उष्णतेच्या झळांमुळे नागरिक उन्हात घराबाहेर पडणे टाळत आहेत. आवश्यक कामांसाठी घराबाहेर पडताना डोक्यावर सावली देणारी टोपी, गमछा आणि डोळ्यांवर थंडावा देणारा काळा गॉगल परिधान करणे पसंत केले जात आहे. उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी उसाचा रस, लस्सी, ताक, मठ्ठा, लिंबू सरबत आणि इतर थंड पेयांचा आस्वाद घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. आईस पार्लरसह रसपानगृहे, ज्यूसबार गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळते.

12:56 (IST) 16 Apr 2025

डोंबिवलीत भोपर गावात शेतकऱ्याला धमकाविण्यासाठी बंदुकीतून हवेत गोळीबार

डोंबिवली जवळील भोपर गावातील एका ४३ वर्षाच्या शेतकऱ्याला किरकोळ कारणावरून गावातील हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत गावातील एका ग्रामस्थाने मारहाण केली. …वाचा सविस्तर
12:32 (IST) 16 Apr 2025

सोलापूर : भूखंडासाठी विवाहितेचा छळ करून तिहेरी तलाक, पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा

तनजिला अहमदअली पठाण (वय २२, रा. मुस्लीम पाच्छा पेठ, सोलापूर) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. …सविस्तर बातमी
12:30 (IST) 16 Apr 2025

नागपूरच्या तरुणाने कॅलिफोर्नियात उडवले १३ किलोचे विमान

अवघ्या काही ग्राम वजनाचे विमान आकाशात घिरट्या घालू शकते आणि हे फक्त एरोमोडेलिंगचे प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थीच करू शकतो. …अधिक वाचा
12:24 (IST) 16 Apr 2025

परप्रांतीयांनाही परभणीतून जन्मदाखले, दाखला मिळवण्यासाठी खोटी माहिती ; १७ जणांविरुद्ध गुन्हा

अनेक खोटे जन्म दाखले देण्यात आल्याची तक्रार सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी परभणीत येऊन पोलीस ठाण्यात दिली होती. …वाचा सविस्तर
12:12 (IST) 16 Apr 2025

सरणावरही मरणयातना; उरण नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे स्मशानभूमींत अंधार

शुक्रवारी शरीरातील मोरा येथील भवरा स्मशानभूमीतील वीज गायब झाली आहे. त्यामुळे मोबाइलच्या उजेडात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ मृतांच्या नातेवाईकांवर आली होती. …अधिक वाचा
12:05 (IST) 16 Apr 2025

डोंगरी महोत्सवास पाटणमध्ये प्रारंभ, शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन; पहिल्याच दिवशी प्रतिसाद

कृषी औजारे, कृषी संलग्न वाहने, बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व्हावी यासाठी या महोत्सवात दालने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. …अधिक वाचा
12:04 (IST) 16 Apr 2025

Monsoon 2025 : हवामानतज्‍ज्ञ म्‍हणतात, “तोपर्यंत शेतकऱ्यांनी नियोजन…”

यंदा मोसमी पाऊस दमदार पडेल, अशी आनंदवार्ता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. जून ते सप्टेंबर या चारही महिन्यांत मोसमी पावसासाठी प्रादेशिक आणि जागतिक हवामानविषयक स्थिती अनुकूल राहील. …सविस्तर वाचा
12:04 (IST) 16 Apr 2025

अकोलेकरांवर जलसंकट; महापालिकेकडून पाणी कपात; आता पाचव्या दिवशी पाणीपुरवठा

अकोला महापालिकेकडून आज, १६ एप्रिलपासून पाणी कपात केली जाणार असून आता चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणीपुरवठा केला जाईल. …अधिक वाचा
12:01 (IST) 16 Apr 2025

मी लुटारूंकडे लक्ष देत नाही; आमदार कथोरेंची वामन म्हात्रेंवर बोचरी टीका

मी लुटारूंकडे लक्ष देत नाही. मी हातभार लावणाऱ्यांकडे लक्ष देतो. ज्यांनी लुटायचे धंदे केले त्यांना जर मी महत्व दिले तर स्मारकाच्या ठिकाणीही टपऱ्या उभ्या राहतील. …सविस्तर वाचा
11:59 (IST) 16 Apr 2025

अविनाश आदिकांनी घेतली अजित पवारांची भेट, श्रीरामपूरमधील घडामोडींकडे राजकीय चर्चा

अनुराधा आदिक यांनी अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली व श्रीरामपूरमधील पक्षप्रवेशाच्या घडामोडी निदर्शनास आणल्या. …वाचा सविस्तर
11:59 (IST) 16 Apr 2025

Aaditya Thackeray on Eknath Shinde: एसंशि अमरावतीहून थेट गावी जाणार आहेत – आदित्य ठाकरे

देवेंद्र फडणवीस बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते.. आमचं सरकार येणार, सरकार आल्यानंतर वगैरे… काय काय सांगत होते ते. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार म्हणाले होते. सातबारा कोरा करणार म्हणाले होते. वीजमाफी सांगितली होती. फडणवीसांचं सरकार बसलं, त्यांचे १३६ आमदार निवडून आलेत. हे फडणवीसांचंच सरकार आहे. एसंशि तिथे चिकटण्यासाठी चिकटले आहेत. कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील. आता अमरावतीहून थेट गावी जाणार आहेत. कारण नाराजीचं नाट्य सुरू झालंय. आता पुढचं मी काही बोलत नाही – आदित्य ठाकरे</p>

11:55 (IST) 16 Apr 2025

Aaditya Thackeray on Mahayuti Govt: भाजपाच्याच कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत – आदित्य ठाकरे

या राज्यात भाजपाच्याच कार्यकर्त्यांची हत्या होत असेल तर आपण सगळ्यांनी करायचं काय? महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? – आदित्य ठाकरे</p>

अमरावतीमधील नवीन विमानतळ (फोटो – MADC X Handle)

Mumbai-Maharashtra News Live Today, 16 April 2025 : महाराष्ट्राची बित्तंबातमी…