Maharashtra Breaking News Updates, 31 July 2024 : येत्या काही दिवसांताच राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. याकरता जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत ही प्रामुख्याने निवडणूक रंगणार आहे. त्यामुळे या दोन्ही आघाड्यांमध्ये मोठा भाऊ कोणता याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आत्तापासूनच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी पाहुयात.

Live Updates

Marathi News Today, 31 July 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा.

20:05 (IST) 31 Jul 2024
ग्राहकांचे २ कोटी ९२ लाख हडपणाऱ्या नागपाल बांधकाम ग्रुपच्या पिता-पुत्राला सहा दिवसांची पोलीस कोठडी

छत्रपती संभाजीनगर - सोसायटीच्या देखभालीसाठी ग्राहकांकडून एकाचवेळच्या दुरुस्ती रक्कमखाली गोळा केलेले २ कोटी ९२ लाख ३१ हजार रुपये हडपणाऱ्या विकास बाप-लेकाला मंगळवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. दोघाही पिता-पुत्राला बुधवारी न्यायालयात उभे केले असता त्यांना ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

नागपाल ग्रुपचा रमेश नागपाल आणि त्याचा मुलगा नीलकंठ नागपाल, अशी अटकेतील बांधकाम व्यावसायिकांची नावे असल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपालने २०१५ मध्ये कांचनवाडी परिसरात मिडोज हिल मिस्ट नावाने २ बीएचके फ्लॅट व रो-हाऊसचा भव्य प्रकल्प बांधला हाेता. १७२ घरांच्या या प्रकल्पाला सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रसाद महाजन यांच्यासह जवळपास १६१ ग्राहकांनी घरे विकत घेतली होती. २०१८ पासून महाजन या साेसायटीचे अध्यक्ष आहेत.

दरम्यान, सर्व सदस्यांकडून ठरावीक रक्कम घेऊन सोसायटीच्या बँक खात्यात ठेवून व्याजावर सोसायटीची देखभाल दुरूस्ती करण्याचे ठरविले होते. नागपालनेही तसे कबूल केले होते. त्यामुळे एकाचवेळी देखभाल-दुरुस्तीची (वन टाइम मेंटेनन्स) प्रत्येकी रक्कम म्हणून १ लाख ४८ हजार ५२४ रुपये आणि वीजदेयक व अन्य कायदेशीर शुल्क म्हणून ५० हजार जमा केले होते. गुन्हा दाखल झाल्यावर आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी तपास केला. याप्रकल्पाच्या २०१८ ते २०२१ च्या अंकेक्षण अहवालानुसार नागपाल बाप-लेकाने सर्व रक्कम बेकायदेशीररित्या अन्य प्रकल्पांत खर्च केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार नागपालकडे आणखी तपास सुरू होता. मात्र, तो तपासात सहकार्य करीत नव्हता. त्यामुळे दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

19:20 (IST) 31 Jul 2024
ठाण्याचे माजी महापौर नईम खान यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

ठाणे : कळवा-मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात काही दिवसांपुर्वीच जाहीर प्रवेश केला असतानाच, त्यापाठोपाठ काँग्रेसचे नेते, ठाणे महापालिकेचे माजी महापौर नईम खान यांनी बुधवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

वाचा सविस्तर...

18:36 (IST) 31 Jul 2024
भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डने स्वतःवर झाडली गोळी

बुलढाणा: बुलढाणा पोलीस विभाग, राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात किंबहुना राज्यात खळबळ उडविणारी घटना बुलढाणा शहरात नुकतेच घडली आहे. यामुळे बुलढाणा शहर आणि पोलीस दल अक्षरशः हादरले आहे

वाचा सविस्तर...

17:25 (IST) 31 Jul 2024
मध्य रेल्वे विस्कळीत, चुकीच्या सिग्नलमुळे मालगाडीने रुळ बदलला!

मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकावर मालगाडीने रुळ बदलल्याने लोकल ट्रेन्स थांबून राहिल्या आहेत. पुढील सूचना येईपर्यंत लोकल सेवा खंडित झाली आहे. त्यामुळे प्रवासांनी रुळांवरून प्रवास सुरू केलाय.

17:14 (IST) 31 Jul 2024
अमरावती : ‘विदेशी नोटा भारतीय चलनात बदलून देता का?’ आंतरराज्‍यीय टोळीतील तीन महिला…

अमरावती : दर्यापूर येथील रहिवासी उमेश सुरेश गावंडे (३८) यांच्या मिनी बँक ऑनलाइन सेंटरवर जाऊन दोन पुरुष व एका महिलेने आपल्या जवळील विदेशी नोटा दाखविल्या. त्या विदेशी नोटा भारतीय चलनात बदलून देता का, अशी विचारणा त्यांनी उमेश गावंडे यांना केली. उमेश गावंडे यांनी होकार दिल्यावर आरोपींनी त्यांच्याजवळून ५० हजार रुपये घेतले. त्याचवेळी त्यांना एक बॅग देत त्यात विदेशी नोटा असल्याचे आरोपींनी त्यांना सांगितले.

वाचा सविस्तर...

16:44 (IST) 31 Jul 2024
"उद्धव ठाकरेंकडून चिथावणीची भाषणा", चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

उद्धव ठाकरेंना चिथावणीची भाषा शोभत नाही. हे राज्य संस्कारमय राज्य आहे. सर्व समाज , सर्व धर्म एकत्र राहतोय. समाजसमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धव ठाकरेंकडून विभाजनाची भाषा होत असून यावर आमचा आक्षेप आहे - चंद्रशेखर बावनकुळे</p>

16:38 (IST) 31 Jul 2024
गोंदिया जिल्हयात वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू, १३०६ घरांची पडझड

गोंदिया: जिल्हात मागील दहा ते बारा दिवस झालेल्या संततधार पावसामुळे १३०६ वर घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन २५ जनावरे वाहून गेल्याने पशुपालकांचे नुकसान झाले. तर वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने १२ दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीत पुढे आली आहे.

वाचा सविस्तर...

16:37 (IST) 31 Jul 2024
भविष्य निर्वाह निधीला विलंब, सरकारी कर्मचाऱ्यांनी ‘हे’ करावे

नागपूर: राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीच्यावेळी भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम प्राधिकृत करण्यासाठी अनेकदा विलंब होतो. ते टाळायचे असेल तर भविष्य निर्वाह निधीबाबत नोंद न झालेले क्रेडिट व अग्रीमाचे समायोजन करण्याचे आवाहन प्रधान महालेखाकार कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

16:15 (IST) 31 Jul 2024
गडचिरोली वन विभागात रोपवन लागवड घोटाळा; चातगाव वनपरीक्षेत्र अधिकारी पडवे निलंबित

गडचिरोली : घोटाळ्यांच्या आरोपांनी कायम चर्चेत राहणाऱ्या गडचिरोली वनविभागात पुन्हा एक रोपवन लागवड घोटाळा उघड झाला असून याप्रकरणी चातगाव वनपरीक्षेत्र अधिकारी संजय पडवे यांना निलंबित करण्यात आले आहे. पडवे यांच्या गैरव्यवहाराची वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्यात आली होती. चौकशीत ते दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

वाचा सविस्तर...

16:00 (IST) 31 Jul 2024
हास्य कलाकार तरूणीला अश्लील ई-मेल पाठवणाऱ्या चाहत्याविरोधात गुन्हा

२७ जुलैला खारघर येथे राहणाऱ्या तिच्या वडिलांना ॲमेझॉनवरून एक पार्सल आले. तिच्या वडिलांनी ते उघडले तेव्हा त्यांना आत एक लेडीज पर्स मिळाली.

सविस्तर वाचा...

16:00 (IST) 31 Jul 2024
अमरावती : एकतर्फी प्रेमातून केले युवतीवर चाकूने वार, नागरिकांनी आरोपीला चोपले

अमरावती : गेल्‍या एक वर्षांपासून पाठलाग करून त्रास देणाऱ्या आरोपीने एका १८ वर्षीय युवतीच्‍या गळ्यावर चाकूने वार केला. ही थरारक घटना बुधवारी सकाळी येथील राजापेठ परिसरातील रेल्‍वे भुयारी मार्गावर घडली. या घटनेनंतर नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले. युवतीवर येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती सध्‍या धोक्‍याबाहेर आहे.

वाचा सविस्तर

15:47 (IST) 31 Jul 2024
पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द; केंद्रीय लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची नागरी सेवा परीक्षा २०२२च्या अर्जातील अनियमिततेमुळे तात्पुरती उमेदवारी रद्द केली आहे. UPSC द्वारे घेतलेल्या कोणत्याही परीक्षेला बसण्यासही त्यांना मनाई केली आहे.

15:19 (IST) 31 Jul 2024
ठाणे: घोडबंदर मार्गावरील खड्डे आणि असमतल रस्त्यामुळे अपघातांची भीती

रस्ता असमतल झाला असून दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

सविस्तर वाचा...

15:09 (IST) 31 Jul 2024
"एकतर तू राहशील, नाहीतर मी", उद्धव ठाकरेंचं वक्तव्य; रोख कोणाकडे?

सगळं सहन करून मी उभा राहिलो आहे. एक तर तू राहशील किंवा मी राहीन, असं उद्धव ठाकरे आज म्हणाले. त्यांचा रोख कोणाकडे आहे? यावर आता चर्चा सुरू आहे.

13:35 (IST) 31 Jul 2024
कल्याणमधील खडेगोळवलीतील राधाकृष्ण मंदिरात चोरी

कल्याण - कल्याण पूर्व येथील खडेगोळवली भागातील राधाकृष्ण मंदिराचे कुलूप रात्रीच्या वेळेत फोडून चोरट्याने मंदिरातील दानपेटी पळून नेली आहे. दानपेटीत भाविकांनी वाहिलेली सात हजार रूपयांची वहाणावळ होती. मंदिर विश्वस्तांच्या बैठकीनंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. दिलीप सुधीर नबोज्जा यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. खडेगोळवली येथे महालक्ष्मी वसाहतीच्या बाजुला राधाकृष्ण मंदिर आहे. या मंदिराची देखभाल परिसरातील रहिवासी करतात. दररोज कल्याण, उल्हासनगर भागातून अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.

गेल्या आठवड्यात या मंदिराच्या पुजाऱ्याने संध्याकाळची दिवाबत्ती केल्यानंतर रात्रीच्या वेळेत नेहमीप्रमाणे मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार कुलूप लावून बंद केले. राधाकृष्ण मूर्तीसमोर दानपेटी आहे. या दानपेटीत मोठी रक्कम असेल असा विचार करून एक अज्ञात चोरटा गेल्या आठवड्यात रात्रीच्या वेळेत मंदिराचे मुख्य प्रवेशव्दाराचे कुलूप तोडून मंदिरात आला. त्याने मंदिरातील इतर वस्तुंची चाचपणी केली. त्यात त्याला काही मौल्यवान मिळाले नाही. मग चोरट्याने सहज उचलता येणारी दानपेटी घेऊन पळ काढला. या दानपेटीत सात हजार रुपये होते. गेल्या दोन वर्षापासून कल्याण, डोंबिवलीतील मंदिरांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दोन महिन्यापू्वी कचोरे येथील गावदेवी मंदिरात चोरी झाली होती.

13:29 (IST) 31 Jul 2024
Tomato Rate : टोमॅटो आमचा, दरही आमचाच..! साताऱ्यात उत्पादकांची दर निश्चितीची चळवळ

Tomato Price in Satara बिघडलेले हवामान आणि टोमॅटोच्या पिकावर वेगवेगळ्या साथीचे आक्रमण झाल्याने बाजारात टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाव वधारले आहेत. मात्र याचा फायदा सध्या शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी आणि विक्रेत्यांनाच अधिक होत आहे. सविस्तर वाचा…

13:28 (IST) 31 Jul 2024
महाराष्ट्रात २० हजार कोटींची गुंतवणूक, किर्लोस्कर कंपनीने केला राज्य सरकारबरोबर करार

https://twitter.com/Devendra_Office/status/1818536988154188132

13:26 (IST) 31 Jul 2024
Money Laundering Case Against Ex MP : जळगाव : माजी आमदार जैन पिता-पुत्र अडचणीत; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी खटला

Money Laundering Case Against Ex MP And Ex MLA जिल्ह्यातील राज्यसभेचे माजी सदस्य ईश्वरलाल जैन, त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्यासह २१ जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाकडून नागपूर येथील विशेष न्यायालयात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी (मनी लाँडरिंग) खटला दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…

13:11 (IST) 31 Jul 2024
'लाडकी बहीण योजने'साठी झुंबड; अमरावती जिल्‍ह्यातून ३.६० लाख अर्ज

अमरावती : मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेल्‍या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जिल्‍ह्यात आतापर्यंत ३ लाख ६० हजार महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. जिल्ह्यासाठी साडेचार लाख लाभार्थींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी २९ जुलै अखरे ३ लाख ५१ हजार ७७२ महिलांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया सोमवारपासून तहसील स्तरावर सुरू झाली असून पात्र व अपात्र महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे. तहसील स्तरावर तयार केलेली ही यादी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाने स्थापन केलेल्या समितीकडे पाठवली जाईल व नंतर प्रत्येक गावातील अंगणवाडी व पंचायतीमार्फत पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाईल.

ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरण्याकरिता गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सीआरपी बचत गट तसेच सेतू सुविधा केंद्रातील डाटा ऑपरेटर यांच्यामध्ये ऑफलाईन अर्जांचे वाटप करून ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

12:51 (IST) 31 Jul 2024
प्रकल्पातील सुख सुविधा कधी मिळणार… करारातच संबंधित माहिती देणे आता बंधनकारक, महारेराचा निर्णय

Maharera: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनके विकासकांकडून गृहनिर्माण प्रकल्पात जलतरण तलावासह अनेक पंचतारांकित सुविधा देण्यात येणार असल्याच्या जाहिराती केल्या जातात.

सविस्तर वाचा...

12:17 (IST) 31 Jul 2024
चंद्रपूर : कर्ज फेडण्यासाठी खंडणी वसुलीचा डाव, दुकानासमोर ठेवला बनावट बॉम्ब

दुकानासमोर बॉम्बची पिशवी ठेवल्यावर आरोपी युवकांनी भगवती वस्त्र भांडारचे मालक शिरीष बोगावर यांना व त्यांच्या पत्नीला मोबाईलवर फोन केला.

सविस्तर वाचा...

12:17 (IST) 31 Jul 2024
वर्धा : दोघांचे मृतदेह आढळले; एकाची आत्महत्या, तर दुसरा मासे पकडण्याच्या नादात गेला होता वाहून

आर्वी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. स्कुटीत सापडलेल्या चिठ्ठीत नेमके काय लिहून आहे, याचा तपशील देण्यास पोलिसांनी नकार दिला.

सविस्तर वाचा...

12:16 (IST) 31 Jul 2024
अकोला पश्चिमचा गड राखण्याचे भाजपपुढे आव्हान

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे.

सविस्तर वाचा...

12:16 (IST) 31 Jul 2024
‘टाटा कॅन्सर रुग्णालया’तील डॉक्टरांची निवृत्ती वय वाढविण्याची पंतप्रधानांकडे मागणी! एकाचवेळी आठ डॉक्टर होणार निवृत्त…

Tata Cancer Hospital News: आमची कार्यक्षमता व अनुभव यांचा विचार करता केंद्र शासन व राज्य शासनाच्या तसेच एम्स संस्थेतील निवृत्तीच्या वयोमर्यादेप्रमाणेच आमचेही निवृत्तीचे वय वाढविण्यात यावे, ही आमची रास्त अपेक्षा असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा...

12:15 (IST) 31 Jul 2024
राज्यातील धान्य वितरण दहा दिवसांपासून ठप्प, काय आहे कारण जाणून घ्या

ऑफलाईन पध्दतीने धान्य वितरणाची सोय उपलब्ध नसल्याने, अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिका धारकांना धान्य वितरण बंद झाले आहे.

सविस्तर वाचा...

12:14 (IST) 31 Jul 2024
पुणे: धरणांच्या परिसरात रात्रभर संततधार, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

धरणांच्या परिसरात असाच पाऊस कायम राहिल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

सविस्तर वाचा...

12:13 (IST) 31 Jul 2024
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून अजित पवारांवर कुरघोडी? पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयांच्या अचानक तपासणीचा आदेश

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर कुरघोडी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा...

11:59 (IST) 31 Jul 2024
कोल्हापूर: राधानगरी धरणाचे सर्व सात दरवाजे तासाभरात उघडले; विसर्ग वाढल्याने सतर्कतेचा इशारा

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने राधानगरी धरण गेल्या आठवड्यात भरले आहे. या धरणाचे सर्व सात दरवाजे आज उघडण्यात आले. केवळ एका तासात दरवाजे उघडल्याने भोगावती नदीपात्रात ११,५०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. सविस्तर वाचा…

11:56 (IST) 31 Jul 2024
क्लस्टर योजनेसाठी पालिकेची जमीन गहाण; प्रकल्पासाठी महाप्रीत घेणार कर्ज

ठाणे महापालिका क्षेत्रात सिडको पाठोपाठ महाप्रीत संस्थेकडून समुह पुनर्विकास योजनेतर्गंत किसननगर भागात इमारती उभारण्याची काम करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…

11:49 (IST) 31 Jul 2024
पिंपरी : हद्द झाली! मृत जनावरांच्या दहनातही गैरव्यवहार

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत शहरातील मृत जनावरे उचलणे, त्याची विल्हेवाट लावण्याचे काम दिल्लीवाला अँड सन्स या संस्थेमार्फत केले जात होते. कामाच्या पावत्यांमध्ये फेरफार करीत एक लाख २२ हजारांचा आर्थिक अपहार केल्याने संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात आले. सविस्तर वाचा…

cm eknath shinde slams maha vikas aghadi over maratha reservation

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Marathi News Live Today, 31 July 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा.

Story img Loader