Mumbai Pune Live News Updates, 23 September 2024 : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नेते राज्यभर दौरे, मेळावे व प्रचाराचे कार्यक्रम करत आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी व महायुतीत जागावाटपावर चर्चा चालू आहेत. राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावर आणि देशाच्या राजकारणात घडणाऱ्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra News Live Today, 23 September 2024 : राज्यासह देशभरातील बातम्या

21:50 (IST) 23 Sep 2024
ठाणे पोलीस दल अभिनंदनास पात्र - प्रमोद पाटील

अक्षय शिंदे याने जे नीच कृत्य केले होते. त्यावरून त्याला भर चौकात फाशी देणे गरजेचे होते. त्याचे जे आता झाले ते खूप समाधानकारक आणि आनंददायी आहे. त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळाली. याबद्दल ठाणे पोलीस दल अभिनंदनास पात्र आहे, असे मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी म्हटले आहे.

21:42 (IST) 23 Sep 2024
‘मोदीजींची जाहिरात बंद करा’, लोकलमधील मोठ्या आवाजातील जाहिरातींमुळे प्रवाशांना त्रास

मध्य रेल्वेवरील लोकल प्रवासात कर्कश्श आवाजात जाहिराती वाजत असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सविस्तर वाचा...

20:28 (IST) 23 Sep 2024
बदलापूर लैगिंक अत्याचार प्रकरण नेमके काय होते?

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमूरड्यांवर अक्षय शिंदे याने अत्याचार केला होता.

सविस्तर वाचा...

20:00 (IST) 23 Sep 2024
चिपळूणसारखे खराब रस्ते महाराष्ट्रात कुठेच नाही, कुंभार्ली घाटातून प्रवास करताना शरद पवार यांनी व्यक्त केली नाराजी

कुंभार्ली घाटातून चिपळूणमध्ये दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना घाटातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागला.

सविस्तर वाचा...

19:42 (IST) 23 Sep 2024
नालासोपार्‍यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, एका आरोपीला अटक

मुंबईत राहणार्‍या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वाचा...

19:18 (IST) 23 Sep 2024
विजेचा धक्का लागल्याने अपघात, नुकसान भरपाईसाठी स्पष्ट नियमावली तयार करा; उच्च न्यायालयात याचिका

नागपूर : विजेचा धक्का लागून होणाऱ्या अपघातात जखमी होणाऱ्या किंवा प्राण गमवणाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत स्पष्ट नियमावली तयार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. नियमावली तयार करण्याबाबत आदेश देण्यासाठी न्यायालयाला असणाऱ्या अधिकारांबाबत माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिले.

वाचा सविस्तर...

19:15 (IST) 23 Sep 2024
चिंचवड: काटे की कलाटे? कोणाला मिळणार शरद पवार गटात स्थान? तुतारी फुंकण्यासाठी…

चिंचवड पोट निवडणूक अपक्ष लढलेले राहुल कलाटे देखील शरद पवार गटात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सविस्तर वाचा...

18:29 (IST) 23 Sep 2024
पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार

पेट्रोल भरण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. अरबाज अरिफ सय्यद (वय २८, रा. कुबेरा कॉलनी, एनआयबीएम रस्ता कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

18:29 (IST) 23 Sep 2024
MPSC Prelims Exam 2024 : संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची नवी तारीख जाहीर… कृषी सेवेच्या पदांचाही समावेश?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा आता १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. कृषी सेवेच्या २५८ पदांचा समावेश याच परीक्षेत करण्यात येणार असून, उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी २१ दिवसांची मुदत दिली जाणार आहे.

सविस्तर वाचा…

18:28 (IST) 23 Sep 2024
डोंबिवलीत चिमुकलीची हत्या करत आईची आत्महत्या

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव पूजा सकपाळ आहे. तर अडीच वर्षाच्या चिमुकलीचे नाव समृध्दी आहे.

सविस्तर वाचा...

18:21 (IST) 23 Sep 2024
मुंबईत आणखी ३७ आपला दवाखाने, सध्या २४३ दवाखाने कार्यान्वित

आता येत्या काही महिन्यांत ३७ नवीन आपले दवाखाने सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

सविस्तर वाचा...

18:07 (IST) 23 Sep 2024
उत्सवाच्या काळात आकाशात काय घडणार? हजारो वर्षानंतर दुर्लभ…

अकोला : एक नवा धुमकेतू ‘त्सूचिन्शान एटलास’ पृथ्वीच्या जवळ येणार आहे. लक्षावधी किलोमीटर दूर असलेल्या या नव्या पाहुण्याच्या दर्शनाचा दुर्लभ योग हजारो वर्षांनंतर जुळून येत आहे, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली. परतीच्या पावसाला निरोप आणि येणाऱ्या धुमकेतूच्या स्वागताला अवकाश प्रेमींनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

वाचा सविस्तर...

18:06 (IST) 23 Sep 2024
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अखेर सुरुवात, जातांना ‘या’ भागांना दणका…

नागपूर : देशातील अनेक भागात अपेक्षेपेक्षा लवकर प्रवेश केलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) जाताना मात्र थोडा उशीर केला आहे. सोमवारपासून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून त्याच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे.

वाचा सविस्तर...

17:50 (IST) 23 Sep 2024
पाकिस्तानी अभिनेत्याच्या चित्रपटाविरोधात मनसेचे आंदोलन

पाकिस्तानने भारतावर २०१६ साली उरी आणि २०१९ यावर्षी पुलवामा येथे अतिरेकी हल्ल्यानंतर भारताच्या सिने वर्कर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलावंतांना भारतात कार्यक्रमास बंदी घातली. परंतु, या बंदीला झुगारून फवाद खान या पाकिस्तानी अभिनेत्याचा 'लिजेंड ऑफ मौला जट' हा चित्रपट भारतात प्रदर्शित होत आहे. सविस्तर वाचा…

17:44 (IST) 23 Sep 2024
कल्याणमध्ये मुलीच्या लग्नाला विरोध केल्यास आईला ठार मारण्याची धमकी

कल्याण – तुम्ही तुमच्या मुलीचे माझ्या बरोबर लग्न लावून दिले नाही. मुलीच्या लग्नाला विरोध केला तर तुम्हाला जीवे ठार मारीन. तुमच्या मुलीला मी तुमच्या समक्ष उचलून घेऊन पळून जाईन, अशी धमकी एका तरुणाने कल्याणमधील खडेगोळवली भागातील एका महिलेला दिली आहे.

सविस्तर वाचा....

17:44 (IST) 23 Sep 2024
मंत्रालयात लिपिक असल्याच्या बतावणीने महिलेची २० लाखांची फसवणूक

पुणे : इंटरनेट पुरवठादार परवाना मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची २० लाख ९२ हजार ३९९ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी तक्रारदार महिलेकडे मंत्रालयात लिपिक असल्याची बतावणी केली होती.

सविस्तर वाचा....

17:34 (IST) 23 Sep 2024
नाशिक: पित्याकडून मुलीवर अत्याचार

पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोस्को कायद्यानुसार संशयितावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:30 (IST) 23 Sep 2024
धक्कादायक! अंगणवाडीमध्ये बुरशी, जाळे लागलेला आहार पुरवठा

भंडारा : एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्पाअंतर्गत अभ्यंकर नगर, हनुमान नगर यासह इतर भागात येत असलेल्या मुक्ताबाई अंगणवाडी केंद्रात महिला बचत गटाच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा रोजी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. हा बालकांच्या जीवाशी खेळ असल्याचा माहिती ,अंगणवाडी सेविका बबिता सारंगपुरे यांनी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम यांना दिली.

वाचा सविस्तर...

17:26 (IST) 23 Sep 2024
पंचनामे न करताच शेतकऱ्यांची प्रकरणे अपात्र, महसूल मंत्री म्हणतात…

अकोला : पीक विमा कंपनीने गत वर्षी खरीप हंगामात पंचनामे न करताच प्रकरणे अपात्र ठरविल्याच्या अनेक तक्रारी जिल्ह्यात समोर आल्या आहेत. त्यावर राज्यस्तरावरील यंत्रणे समवेत पुढील दोन ते तीन दिवसांत बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

वाचा सविस्तर...

17:25 (IST) 23 Sep 2024
राज्यावर कर्मचारी संपामुळे वीज संकट… महावितरणकडून आलेले चर्चेचे निमंत्रण…

नागपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने विविध मागण्यांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला संपाची घोषणा केली आहे. त्यावर महावितरण प्रशासनाने कृती समितीला चर्चेचे आमंत्रण दिले होते. परंतु, समितीने या मागण्या शासन स्तरावरच्या असल्याचे सांगत महावितरणच्या बैठकीस जाण्यास नकार दिला. सोबतच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन होणारच, असा इशाराही दिला आहे.

वाचा सविस्तर...

17:25 (IST) 23 Sep 2024
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ए वर लोखंडी रोधक, रेल्वे मार्गातून जाणाऱ्या प्रवाशांचा मार्ग बंद

डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि एक एच्या (डोंबिवली लोकलचा फलाट) दिवा रेल्वे स्थानक दिशेने अनेक प्रवासी रेल्वे मार्ग ओलांडून, रेल्वे मार्गातून दररोज प्रवास करायचे. अनेक पालक, विद्यार्थी या रेल्वे मार्गाचा वापर करत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या विचारातून रेल्वे प्रशासनाने डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक एवर लोखंडी रोधक बसवून प्रवाशांचा रेल्वे मार्गातून जाण्याचा मार्ग बंद केला आहे.

सविस्तर वाचा....

17:24 (IST) 23 Sep 2024
मुंबई : सेवानिवृत्त गुप्तवार्ता अधिकाऱ्याचे टास्कच्या नादात खाते रिकामे, तीन दिवसांत गमावले ११ लाख

मुंबई : टास्क फसवणुकीच्या माध्यमातून सेवानिवृत्त गुप्तवार्ता अधिकाऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी त्यांना विविध टास्कच्या नावाखाली अवघ्या तीन दिवसांत ११ लाखांना गंडवले आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. बँक व्यवहारांच्या माध्यमातून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

सविस्तर वाचा...

17:24 (IST) 23 Sep 2024
डोंबिवलीत निळजे लोढा हेवनमधील फेरीवाल्यांना नागरिकांनी हटवले

डोंबिवली – डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील निळजे, लोढा हेवन येथील शिवाजी चौकात शनिवारी एका फळविक्रेता फेरीवाल्याने फळ विक्री हातगाडीचा आडोसा घेऊन प्लास्टिक पिशवीत लघुशंका केली. ही पिशवी कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने फळ विक्रीच्या हातगाडीवरील प्लास्टिकच्या खोक्यामध्ये कोंबली. हा किळसवाणा प्रकार एका जागरूक ग्राहकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून समाज माध्यमांमध्ये सामायिक केला. या प्रकारावरून निळजे, लोढा हेवन परिसरातील नागरिकांनी रविवारी रात्री संताप व्यक्त केला.

सविस्तर वाचा....

17:21 (IST) 23 Sep 2024
नाशिक: पूर्ववैमनस्यातून गुंडाची हत्या, सहा जण ताब्यात

नाशिक शहर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत आहे.

सविस्तर वाचा...

17:02 (IST) 23 Sep 2024
निर्देशांकांची विक्रमी शिखरझेप! सेन्सेक्स ८५ हजारांच्या वेशीवर

मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची उच्चांकी घोडदौड कायम असून सेन्सेक्स ८५,००० अंश पातळीच्या नजीक पोहोचला आहे. ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन निर्मिती आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये झालेल्या चौफेर खरेदीने प्रमुख निर्देशांक उच्चांकी शिखरावर स्थिरावले. या जोडीला परदेशी संस्थात्मक गुंतवणूदारांकडून बाजाराकडे अखंड निधी ओघ सुरू आहे.

सविस्तर वाचा....

16:55 (IST) 23 Sep 2024
अंध दाम्पत्याचे बाळ परस्पर दत्तक ! प्रसूतीनंतर अंध महिलेला स्तनपान बंद करण्याच्या दिल्या गोळ्या

ठाणे – कल्याण तालुक्यातील मोहना गोळेगाव येथील एका अंध दाम्पत्याची फसवणूक करून त्यांना कोणत्याही स्वरूपाची माहिती न देता त्यांचे नवजात बाळ छत्तीसगड राज्यातील एका जोडप्याला परस्पर दत्तक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वाचा....

16:54 (IST) 23 Sep 2024
डोंबिवलीतील शिंदे गटातील युवा नेत्याला इशारा, बंडखोरांकडे दुर्लक्ष करून महायुतीचे काम जोमाने करा, श्रीकांत शिंदे यांचा सल्ला

कल्याण – आपण महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे महायुतीला धक्का लागणार नाही, अशी कोणतीही कृती कोणत्याही शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्याने करायची नाही. शिवसेनेच्या डोंबिवली विभागातील सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी महायुतीकडून जो उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकांसाठी दिला जाईल, त्याच्यासाठीच जोमाने काम करायचे आहे, असा सल्ला कल्याण लोकसभेचे शिवसेना खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकारी, नेत्यांना दिला.

सविस्तर वाचा...

16:42 (IST) 23 Sep 2024
केंद्र सरकारवर दहा वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही… केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे पुण्यात विधान

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर केंद्र सरकारची कार्यपद्धती बदलली. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी वृत्तपत्रांत सतत सरकारच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या असायच्या. मात्र, दहा वर्षांत मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. सविस्तर वाचा…

16:41 (IST) 23 Sep 2024
खेळापासून शिक्षणापर्यंत सर्वत्र राजकारणच… केंद्रीय मंत्र्याचे पुण्यात वक्तव्य…

केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्रालयातर्फे ‘विकसित भारत’ अभियानाअंतर्गत मॉडर्न महाविद्यालयात झालेल्या ‘युवा कनेक्ट’ कार्यक्रमात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सविस्तर वाचा…

16:40 (IST) 23 Sep 2024
वक्फ सुधारणांबाबत केंद्रीय मंत्र्याचे भाष्य; म्हणाले, “अपप्रचार नको…”

अपप्रचार तातडीने थांबवावा, कोणीही या विधेयकाची चुकीची मांडणी करून दिशाभूल करू नये, असे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी पुण्यात स्पष्ट केले.

सविस्तर वाचा...

What Nitin Gadkari Said?

“रामदास आठवले राजकारणातले हवामान तज्ज्ञ, सरकार कुणाचंही येऊ द्या..”, नितीन गडकरींचं वक्तव्य

नितीन गडकरी हे गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. शनिवारीच त्यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात एक विधान केलं होतं ज्याची चांगलीच चर्चा झाली. राजाने टीका सहन केली पाहिजे आणि त्यावर विचार केला पाहिजे असं मत त्यांनी मांडलं होतं. नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता नितीन गडकरींनी ( Nitin Gadkari ) केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंबाबतही एक महत्त्वाचं विधान केलं आहे. नागपुरातल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी रामदास आठवलेंबाबत भाष्य केलं.

नितीन गडकरी म्हणाले, "आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही. मात्र रामदास आठवले यांना सरकार येऊन ते पुन्हा मंत्री होण्याची गॅंरटी आहे. सरकार कोणाचेही आलं तरीही रामदास आठवले यांचं मंत्रिपद पक्कं आहे. रामदास आठवले राजकारणातील हवामान शास्त्रज्ञ आहेत. त्यांना हवा कुठल्या दिशेने चालते आहे याचा अंदाज येतो. लालूप्रसाद यादव हे ही रामविलास पासवान यांच्याबद्दल तसंच म्हणायचे",अशी आठवण नितीन गडकरींनी ( Nitin Gadkari ) त्यांच्या भाषणात सांगितली.

Story img Loader