Mumbai Pune Live News Updates, 23 September 2024 : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नेते राज्यभर दौरे, मेळावे व प्रचाराचे कार्यक्रम करत आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी व महायुतीत जागावाटपावर चर्चा चालू आहेत. राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावर आणि देशाच्या राजकारणात घडणाऱ्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Live Today, 23 September 2024 : राज्यासह देशभरातील बातम्या

16:27 (IST) 23 Sep 2024
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

1. लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय.

(सामान्य प्रशासन)

2. बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी

(महिला व बाल विकास)

3. धान उत्पादकांना दिलासा : आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर

(अन्न नागरी पुरवठा)

4. कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश

(इतर मागास बहुजन कल्याण)

5. जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (विधी व न्याय)

6. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. १४८६ कोटीचा प्रकल्प

(सार्वजनिक बांधकाम)

7. करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा (वित्त)

9. यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते

(वस्त्रोद्योग)

10. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड (महसूल)

11. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद

(ग्राम विकास)

12. राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दूप्पट वाढ (ग्रामविकास)

13. मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प

(सार्वजनिक बांधकाम)

14. हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार

(ऊर्जा)

15. एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार

(परिवहन)

16. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ ( नियोजन)

17. राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ

(नियोजन)

18. राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण

(कौशल्य विकास)

19. छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये

(उच्च व तंत्रशिक्षण)

20. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा

(क्रीडा)

21. जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी

(जलसंपदा)

22. श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मुळ मालकांना परत करणार (महसूल)

23. दूध अनुदान योजना सुरु राहणार. उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान

(दूग्ध व्यवसाय विकास)

24. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर

( सांस्कृतिक कार्य विभाग)

16:05 (IST) 23 Sep 2024
मराठवाड्यात भाजपने कंबर कसली, अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक

लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे.

सविस्तर वाचा…

16:05 (IST) 23 Sep 2024
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी चेन्नीथला म्हणाले, “आता एकच लक्ष्य, महाराष्ट्र सत्ताबदल”

नागपूर : भाजपला सत्तेतून हटवणे एवढेच महाविकास आघाडीचे लक्ष आहे. आता यावर कुठलीही चर्चा होणार नाही. निवडणूक निकालानंतरच महाविकास आघाडी त्या संदर्भात चर्चा करेल, असे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी नागपूरमध्ये सांगितले.

वाचा सविस्तर…

16:04 (IST) 23 Sep 2024
पनवेलमधील पाणी पुरवठा बंद

पनवेलमधील नागरिकांना पावसाळ्यातच पुढील चार दिवसांचे पाण्याचे नियोजन गुरुवारपासून करावे लागणार आहे.

सविस्तर वाचा…

16:04 (IST) 23 Sep 2024
सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाची बातमी… लाईक्स, फालोअर्स आणि सबस्क्राईबर…

नागपूर : समाजमाध्यमांवर सक्रिय असणाऱ्यांमध्ये इंस्टाग्राम, फेसबूक आणि यु-ट्यूबवर फालोअर्स वाढविणे, सबस्क्राईबर वाढविणे, लाईक्स वाढविणे आणि शेअर वाढवून देण्याच्या नावावर सायबर गुन्हेगारांनी राज्यभरात जाळे विणले आहे. या जाळ्यात राज्यातील हजारो युवक अडकले असून सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीसंदर्भात राज्यभरात तक्रारी दाखल होत आहेत.

वाचा सविस्तर…

16:03 (IST) 23 Sep 2024
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर नक्षलग्रस्त गर्देवाडात ‘लालपरी’ अवतरली; गावात पहिल्यांदाच…

गडचिरोली : एकेकाळी नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम गर्देवाड्यात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर पहिल्यांदा एसटी बस सुरु झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. नऊ महिन्यांपूर्वी पोलिसांनी याठिकाणी पोलीस मदत केंद्र उघडून नक्षलवादी कारवायांवर अंकुश निर्माण केला होता. या भागातील नागरिकांनी आजपर्यंत गावात एसटी बस पाहिली नव्हती. पण ताडगुडा येथील पुलाचे आणि रस्त्याचे बांधकाम वेळेत पूर्ण करुन या भागात पहिल्यांचा एसटी बस पोहोचवण्यात प्रशासनाला यश आले.

वाचा सविस्तर…

15:07 (IST) 23 Sep 2024
सरकार समाजा-समाजांत तेढ निर्माण करतंय; धनगर आरक्षणावरून अजित पवार गटाचा हल्लाबोल

धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याबाबतच्या हालचाली सरकार पातळीवर चालू असल्यामुळे आज आदिवासी नेत्यांची मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीबाबतची माहिती देताना नरहरी झिरवाळ म्हणाले, धनगर समाजाला आम्ही विरोध करतोय असं नाही. आम्हाला असं वाटतं की त्यांना वेगळे आरक्षण द्यायला हवं. त्यांना साडेतीन टक्के आरक्षण आहे. त्यांचा आदिवासींमध्ये समावेश केला जाऊ नये असं आम्हाला वाटतं. आम्ही याबाबत सरकारकडे विनंती केली आहे. सरकार मात्र त्यासाठी बैठका घेतंय. सरकार समाजा-समाजांमध्ये तेढ निर्माण करतंय. त्यामुळे राज्यातील आदिवासींच्या वरिष्ठ नेत्यांना एकत्र बोलावण्याचा उद्देश बोलावलं आहे. सरकार त्यांना सहकार्य करतंय. त्यांना अजून आरक्षण दिलेलं नाही. परंतु, सरकार त्या आरक्षणाला अनुकूल असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सरकारने आमचंही ऐकून घ्यावं. सरकारपुढे आम्ही काय मुद्दे मांडायचे, याबाबतच्या चर्चेसाठी आम्ही आज एकत्र येणार आहोत. आदिवासींचे लोकप्रतिनिधी, आदिवासींच्या संघटना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

15:02 (IST) 23 Sep 2024
Mumbai Mega Block On Western Line : पश्चिम रेल्वेवर साडेसहा तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामानिमित्त ब्लॉक मालिका सुरू आहे. सोमवारी मध्यरात्री साडेसहा तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. तर, मंगळवारी रात्री ११.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत साडेसहा तासांचा ब्लॉक असेल. सविस्तर वाचा…

14:45 (IST) 23 Sep 2024
Kala Ghoda In Mumbai : काळा घोडा परिसरात शनिवार रविवारी वाहनांना बंदी

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेल्या काळा घोडा परिसरातील पाच रस्ते हे दर शनिवारी व रविवारी सायंकाळी केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान वाहनांसाठी बंद राहतील. सविस्तर वाचा…

14:19 (IST) 23 Sep 2024
बेलापूरात शिंदे-फडवणीसांना ‘बहिणी’ची साद; मंदा म्हात्रे ‘लाडक्या’ ठरतील का याचीच चर्चा अधिक

राज्यस्तरीय कोळी भवनाच्या शुभारंभ प्रसंगी नवी मुंबईत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी उमेदवारीसाठी घातलेली ‘साद’ सध्या शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. सविस्तर वाचा…

13:55 (IST) 23 Sep 2024
नागझिराचा राजा ‘बाजीराव’पाठोपाठ आणखी एका वाघाचा मृत्यू

नागपूर : नागझिरा अभयारण्यात सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका वाघाचा मृतदेह आढळल्याने नागझिरा प्रशासन हादरले आहे. नागझिराचा राजा अशी ओळख असणारा ‘टी-९’ हा वाघ काल मृतावस्थेत सापडला होता. तर आज सकाळी ‘टी-४’ या वाघिणीचा बछडा मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.

वाचा सविस्तर…

13:06 (IST) 23 Sep 2024
डोळ्यांचे पारणे फिटणार?

अखेर राष्ट्रीय हरित लवादाने नदी सुधार प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करून त्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता पुणे शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या मुठा नदीचे स्वरूप एकदम पालटणार असून, शहरातील नागरिक त्यामुळे नक्की हर्षभरित होणार, यात शंका बाळगण्याचे कारण नाही. सविस्तर वाचा

13:05 (IST) 23 Sep 2024
खड्ड्यांची धास्ती ‘पीएमआरडीएला’ही! दुरवस्थेला मेट्रोला जबाबदार ठरवून रस्ता दुरुस्तीसंदर्भात नोटीस

पुण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाराजी व्यक्त केल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुढे आल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानेही (पीएमआरडीए) त्यांच्या हद्दीतील खड्ड्यांची धास्ती घेतली आहे. सविस्तर वाचा

12:14 (IST) 23 Sep 2024
भंडाऱ्यात ‘नरेंद्र’ विरुद्ध ‘नरेंद्र’ सामना रंगणार?

भंडारा : विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त जवळ येत असला तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायमच आहे. त्यातच भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाच्या जागेचा पेच सोडवणे युतीसह आघाडीसाठीही डोकेदुखी ठरत असल्याचे दिसते आहे. आघाडी आणि युतीत सहभागी सर्वच पक्ष या जागेवर आपापला दावा सांगत आहेत. यामुळे ही जागा नेमकी कुणाच्या वाट्याला जाणार, याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.

वाचा सविस्तर…

12:13 (IST) 23 Sep 2024
विखे यांचे वर्चस्व असलेल्या नगर जिल्हा बँकेच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक

नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर बँकेच्या कारभाराविषयीच्या चर्चा तशा थंडावल्या होत्या. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे नगर जिल्हा बँकेच्या कारभाराविषयी शंका घेणारे वक्तव्य केले.

वाचा सविस्तर…

11:47 (IST) 23 Sep 2024
मेळघाटात खासगी बस पुलावरून कोसळली; ४० प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

अमरावती : अमरावतीहून धारणी येथे जात असलेली खासगी प्रवासी बस सेमाडोह नजीक पुलावरून कोसळून झालेल्‍या भीषण अपघातात ४० प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

वाचा सविस्तर…

10:52 (IST) 23 Sep 2024
“भाजपा-शिंदे गट अजित पवारांचा काटा काढणार, तो कार्यक्रम सुरू झालाय”, ठाकरे गटाचा मोठा दावा

भारतीय जनता पार्टी व मिंधे गट एक नंबरचे कारस्थानी लोक आहेत. ते जवळच्याच मित्रांचा काटा काढतात. आता ते अजित पवारांचा काटा काढतील. निवडणुकीनंतर मिंधे गटाचा काटा काढतील, गर्दन उडवतील. कारण भाजपावाले लोक निर्दयी आहेत. आम्ही त्यांचा अनुभव घेतला आहे. देशातील त्यांच्या इतर मित्रपक्षांनी देखील त्यांचा अनुभव घेतला आहे. भाजपाने सध्या अजित पवारांना दूर लोटण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. मिंधे गटाचे काही लोक त्यात सहभागी आहेत. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात आपापल्या पक्षाला अधिक जागा मिळतील असं भाजपा आणि मिंधे गटातील लोकांना वाटतं. ‘गरज सरो, वैद्य मरो’प्रमाणे ते लोक आता अजित पवारांना बाजूला करणार आहेत. यातला पहिला बळी अजित पवारांचा असेल, तर दुसरा बळी शिंदे गटाचा असेल.

“रामदास आठवले राजकारणातले हवामान तज्ज्ञ, सरकार कुणाचंही येऊ द्या..”, नितीन गडकरींचं वक्तव्य

नितीन गडकरी हे गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. शनिवारीच त्यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात एक विधान केलं होतं ज्याची चांगलीच चर्चा झाली. राजाने टीका सहन केली पाहिजे आणि त्यावर विचार केला पाहिजे असं मत त्यांनी मांडलं होतं. नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता नितीन गडकरींनी ( Nitin Gadkari ) केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंबाबतही एक महत्त्वाचं विधान केलं आहे. नागपुरातल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी रामदास आठवलेंबाबत भाष्य केलं.

नितीन गडकरी म्हणाले, “आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही. मात्र रामदास आठवले यांना सरकार येऊन ते पुन्हा मंत्री होण्याची गॅंरटी आहे. सरकार कोणाचेही आलं तरीही रामदास आठवले यांचं मंत्रिपद पक्कं आहे. रामदास आठवले राजकारणातील हवामान शास्त्रज्ञ आहेत. त्यांना हवा कुठल्या दिशेने चालते आहे याचा अंदाज येतो. लालूप्रसाद यादव हे ही रामविलास पासवान यांच्याबद्दल तसंच म्हणायचे”,अशी आठवण नितीन गडकरींनी ( Nitin Gadkari ) त्यांच्या भाषणात सांगितली.