Maharashtra Breaking News Updates, 16 October 2024 : निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी (१५ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. दरम्यान, यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच राज्यभर निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या सर्व बातम्यांचा आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वेध घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 16 October 2024 : राज्यासह देशभरातील बातम्या

18:21 (IST) 16 Oct 2024
कोजागरीला दुधाला उच्चांकी दर, एक लिटर ८३ रुपये

पुणे : कोजागरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी दुधाच्या मागणीत मोठी वाढ होते. यंदा कोजागरीला दुधाची आवक कमी प्रमाणावर झाली. घाऊक दूध बाजारात एक लिटर दुधाला ८३ रुपये लिटर असा भाव मिळाला.

वाचा सविस्तर…

16:57 (IST) 16 Oct 2024

कार्तिक यात्रा कालावधीत गर्दी व्यवस्थापन, स्वच्छतेला प्राधान्य, कार्तिकी नियोजनासाठी प्रशासनाची बैठक

पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविकांना अधिकच्या सुविधा देण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

16:20 (IST) 16 Oct 2024
मराठवाड्यात ‘लाडक्या बहिणीं’च्या मतपेढीचा ‘योजना’बद्ध आकार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या ४६ मतदारसंघामध्ये सुमारे ७५ लाख ४९ हजार ६७० महिला मतदार आहेत. यातील २६.३५ टक्के जणींपर्यंत लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरपर्यंतचा हप्ता पोहचला आहे. याशिवाय लखपती दीदी, …. योजना यांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय असताना सत्ताधारी पक्षांचे या मतपेढीवर लक्ष आहे.

वाचा सविस्तर…

16:18 (IST) 16 Oct 2024
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले

बदलापूर : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जाहिर केलेल्या ब्राह्मण समाजासाठीच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाच्या अध्यक्षपदी बदलापूरच्या आशिष दामले यांनी निवड करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

16:00 (IST) 16 Oct 2024
धक्कादायक… विविध आजारांच्या लक्षणांमध्ये बदल; बालरोगतज्ज्ञ म्हणतात, “करोनापश्चात…”

नागपूरसह विदर्भात लहान मुलांच्या विविध आजारांच्या लक्षणांमध्ये बदल झाल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. हा प्रकार बघून शहरातील बालरोगतज्ज्ञही आश्चर्य व्यक्त करत आहेत. या लक्षणांमुळे बालकांमध्ये विविध समस्या उद्भवत असून शहरातील बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणाबाबत आपण जाणून घेऊ या. सविस्तर वाचा…

16:00 (IST) 16 Oct 2024
‘धूम स्टाईल’ वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढली

शहरात भरधाव वाहन चालवणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून धूम स्टाईल’ वाहने पळवणाऱ्यांची हिंमत वाढत आहे. गेल्या दहा महिन्यांत वाहतूक पोलिसांनी १६ हजार ४५१ वाहनांवर कारवाई केली. १७ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सविस्तर वाचा

15:59 (IST) 16 Oct 2024
धमकीसत्र थांबेना… नवनीत राणा, रवी राणांना पोलीस सुरक्षा पुरविण्‍याची मागणी

माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद येथून धमकीचे पत्र मिळाल्‍यानंतर राणा समर्थकांमध्‍ये चिंतेचे वातावरण आहे. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना तातडीने पोलीस सुरक्षा पुरविण्‍यात यावी, अशी मागणी त्‍यांचे खासगी सचिव उमेश ढोणे यांनी राणा दाम्‍पत्‍याच्‍या सुचनेवरून पोलीस आयुक्‍तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सविस्तर वाचा…

15:58 (IST) 16 Oct 2024
Video : थरारक… ‘त्या’ दोन वाघिणींमध्ये तुंबळ लढाई, पर्यटकांच्या डोळ्यासमोर…

निवडणूक आयोगाने काल निवडणुकीची घोषणा केली आणि विविध पक्षांमध्ये जणू एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी युद्ध सुरू झाले. ही कुरघोडी एरवीदेखील सुरूच असते, निवडणुकीत त्याला जणू युद्धाचे स्वरूप येते. सविस्तर वाचा…

15:57 (IST) 16 Oct 2024
गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्यासह दोघे निलंबित, अटक न करण्यासाठी पाच लाखांची लाच

फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक फौजदार संतोष क्षीरसागर यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. सविस्तर वाचा…

15:56 (IST) 16 Oct 2024
पिंपरी- चिंचवड: ऑनलाइन गेमध्ये लाखो रुपये हरला, युट्यूबवरील बुलेट चोरीचे व्हिडिओ पाहून चोरी करायला शिकला, अन..

ऑनलाईन गेममध्ये पैसे लावण्यासाठी बुलेट चोरी करणाऱ्या आरोपीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. तसेच बुलेट विक्रीमध्ये सहभागी असलेल्या चार जणांना देखील अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

15:56 (IST) 16 Oct 2024
भाजपच्या मुरबाडवर शिवसेनेचा दावा, शिवसेनेचे वामन म्हात्रे, सुभाष पवार एकनाथ शिंदेंच्या भेटीला

बदलापूर : बुधवारी बदलापूर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भिवंडी लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुरबाड मतदारसंघाची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा…

15:55 (IST) 16 Oct 2024
शालेय पोषण आहार योजनेत महत्त्वाचा बदल… आता काय होणार? 

राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्राअंतर्गत शाळांतील विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) प्रणालीद्वारे पुरवण्यात येणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत, तसेच निविदा प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. सविस्तर वाचा…

15:34 (IST) 16 Oct 2024
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, “कामठीतून लढणार नाही, पक्ष ज्याला…”

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते त्यांच्या कामठी ( जि.- नागपूर) मतदारसंघांतून लढणार नाही, पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणार,असे जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा…

14:35 (IST) 16 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : परभणी जिल्ह्यातील लढतींचे स्वरूप अनिश्चित

विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असली तरी जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघातील लढतींबाबत अद्यापही मोठी संदिग्धता आहे. त्या त्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्या विरोधात कोण लढणार याबाबत अद्यापही निश्चितता नाही तर प्रत्येक मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही बाजूंनी अनेकांनी दावे केले आहेत.

सविस्तर वाचा…

13:45 (IST) 16 Oct 2024
तरुणांना निवडणूक खुणावतेय, मात्र भवितव्य अधांतरी! प्रा. बदखल, डॉ. खुटेमाटे, बंडू धोतरे, डॉ. गावतुरे, ॲड. घोटेकर संधीच्या शोधात

वैद्यकीय क्षेत्रासोबतच शिक्षण, कायदा व सामाजिक कार्यात नावलौकिक असलेले तरुण विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे या तरुणांनी उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखतीही दिल्या आहेत. सविस्तर वाचा…

13:42 (IST) 16 Oct 2024
मानधनात वाढ, मात्र तरीही ‘या’ लाडक्या बहिणी नाराजच.

वर्धा, राज्यातील महिला वर्गासाठी जे जे करता येईल त्याची घोषणा राज्य सरकार करून चुकले. लाडकी बहिण योजना चांगलीच गाजली. पण याच शासनाच्या अख्तयारीत काम करणाऱ्या काही भगिनी मात्र शासन निर्णयाने नाराजीत गेल्या आहेत. सविस्तर वाचा…

13:41 (IST) 16 Oct 2024

13:22 (IST) 16 Oct 2024
डोंबिवली पश्चिमेत अभूतपूर्व वाहन कोंडी, रिक्षा संघटनेचा आंदोलनाचा इशारा

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या चौक, रस्त्यांवर संध्याकाळच्या वेळेत एकही वाहतूक पोलीस, सेवक तैनात नसल्याने पश्चिमेतील महत्वाचे रस्ते, चौक दररोज वाहन कोंडीत अडकत आहेत.

सविस्तर वाचा…

12:58 (IST) 16 Oct 2024
छेडानगर जंक्शन अखेर वाहतूक कोंडीमुक्त

मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर गेली सहा वर्षे सुरू असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या छेडानगर जंक्शनने अखेर मोकळा श्वास घेतला.

सविस्तर वाचा…

12:37 (IST) 16 Oct 2024

उरणकरांच्या सुरक्षेसाठी ३४ ठिकाणी सीसीटीव्ही

उरण : गेल्या अनेक महिन्यापासून उरण शहरातील सीसीटीव्ही बंद असून येत्या काही दिवसातच उरणकरांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या ३४ ठिकाणी शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 16 Oct 2024

वैद्यकीय क्षेत्रासोबतच शिक्षण, कायदा व सामाजिक कार्यात नावलौकिक असलेले तरुण विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. सविस्तर वाचा…

12:15 (IST) 16 Oct 2024
ठाण्यात जागोजागी कचऱ्याचे ढिग; काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद असल्याने कचराकोंडी

संपुर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जागोजागी कचऱ्याचे ढिग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे रस्ते आणि गृहसंकुलांच्या बाहेरील परिसरात साचलेला कचरा कुजून दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक हैराण आहेत. सविस्तर वाचा…

12:14 (IST) 16 Oct 2024
महाविकास आघाडीत जळगाववरून तिढा! शरद पवार आग्रही; चारदा पराभव, तरीही काँग्रेस हट्ट सोडेना

जिल्ह्यातील सातपैकी सहा जागांवर महाविकास आघाडीचे मतैक्य झाले असले तरी जळगाव जामोद मतदारसंघाचा तिढा कायमच आहे. या जागेसाठी शरद पवार आग्रही असून त्यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचा आग्रह धरल्याचे वृत्त आहे. सविस्तर वाचा…

12:14 (IST) 16 Oct 2024
Maharashtra Election 2024 : अहमदपूरच्या राजकारणाला नवे वळण

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक निवडणुकीत दोन मराठा उमेदवारातचं प्रमुख लढत होते व मराठा उमेदवारच आमदार म्हणून निवडून येतो. हा मतदारसंघ ‘ओबीसी’ बहुल आहे त्यामुळे या मतदारसंघात यापुढे ओबीसीचाच उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी सर्वपक्षीय ओबीसींची एकजूट झाली आहे. सविस्तर वाचा…

11:07 (IST) 16 Oct 2024
“एकनाथ शिंदे हे कॉमनमॅन’ नव्हे तर ‘कॉन्ट्रॅक्टर मंत्री’, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

“एकनाथ शिंदे हे कॉमनमॅन’ नाही तर ‘काँट्रक्टर मंत्री’ आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत अशावेळी खंजीर खूपसला, ज्यावेळी ते रुग्णालयात होते. कठीण काळात होता. त्यांचे दोन ऑपरेशन झाले होते. त्यावेळी काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिंदे गटाबाबत राग आहे. येत्या निवडणुकीत राज्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

11:07 (IST) 16 Oct 2024
Maharashtra Election 2024 : तुमसर विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार चरण वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)मध्ये प्रवेश केल्याने तेच महाविकास आघाडीचे तुमसर मतदारसंघातील उमेदवार असतील, हे निश्चित मानले जात आहे. सविस्तर वाचा…

11:06 (IST) 16 Oct 2024
टोलमुक्तीनंतर आनंदनगर टोलनाक्याची रचना बदलणार

मुंबईच्या प्रवशद्वारावरील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी संपूर्ण टोलमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हलक्या वाहने कोंडीत अडकू नये यासाठी आता आनंदनगर टोलनाक्यावर नव्याने रचना करण्याचे नियोजन टोल कंपनीकडून सुरू आहे . सविस्तर वाचा…

11:05 (IST) 16 Oct 2024
मेट्रो ते विमानतळ मोफत बससेवा; प्रवाशांच्या सोयीसाठी टी२ टर्मिनल मेट्रो स्थानकविमानतळ एमएमआरसीची सेवा

मेट्रो स्थानकावरून इच्छितस्थळी जाता यावे, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी)‘मल्टी-मॉडेल इंटिग्रेशन’ सेवेच्या माध्यमातून टी-२ टर्मिनल मेट्रो स्थानक ते विमानतळ (पी४ एंट्री) दरम्यान विशेष मोफत बससेवा सुरू केली. सविस्तर वाचा…

11:04 (IST) 16 Oct 2024
Maharashtra Polls 2024 : पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसचे २२ जण विधानसभेसाठी इच्छुक

शहरात कमी ताकद असलेल्या काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी २२ जण इच्छुक आहेत. पिंपरी मतदारसंघातून दहा, चिंचवडमध्ये नऊ आणि भोसरीतून तिघांनी मुलाखती दिल्या आहेत. सविस्तर वाचा…

11:03 (IST) 16 Oct 2024
मुख्यमंत्र्यांचा एक निर्णय अन् महापालिकेचे काही कोटींचे नुकसान; ३२ गावांमधील मालमत्ता कर वसुलीला राज्य सरकारची स्थगित

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याच्या अगोदर काही तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील मालमत्ता कर वसुलीला स्थगिती दिली आहे. याचा फटका पालिकेच्या उत्पन्नाला बसणार असून, विकासकामांवर देखील परिणाम होणार आहे. सविस्तर वाचा…