Maharashtra Breaking News Updates, 16 October 2024 : निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी (१५ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. दरम्यान, यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच राज्यभर निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या सर्व बातम्यांचा आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वेध घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 16 October 2024 : राज्यासह देशभरातील बातम्या

11:02 (IST) 16 Oct 2024
असुरक्षित टेकड्या; भयभीत पुणेकर

पुण्यातील टेकड्या वैभव आहे. हिरवाईने नटलेल्या टेकड्या शहराच्या सौंदर्यात भर घालतात. वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न, कोंडी, प्रदूषणामुळे त्रासलेले नागरिक नियमितपणे शहरातील टेकड्यांवर फिरायला जातात. टेकड्यांवरील फेरफटक्यामुळे दिवसभराचा थकवा दूर तर होतोच, पण त्रासलेल्या नागरिकांना ऊर्जाही मिळते. सविस्तर वाचा…

11:01 (IST) 16 Oct 2024
कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण, का आली ही वेळ !

लष्कर जलकेंद्रातून कोरेगाव पार्क परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मंगळवारी पहाटे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पहाटे साधू वासवानी पुलाच्या कामासाठी जेसीबीने खोदाई करताना ही जलवाहिनी अचानक फुटली. सविस्तर वाचा…

11:00 (IST) 16 Oct 2024
नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

जिल्ह्यात हलके डिझेल ऑईलच्या (एलडीओ) नावाखाली डिझेल विक्रीचा अवैध व्यवसाय फोफावला असून यामुळे पेट्रोलपंप चालकांमध्ये अस्वस्थता आहे. महिनाभरापासून या अवैध व्यवसायाविरुद्ध दाद मागूनही प्रशासनाकडून कारवाई झाली नाही. सविस्तर वाचा…

10:59 (IST) 16 Oct 2024
कराडजवळ हवाला पद्धतीतील पाच कोटी सशस्त्र टोळीने लुटले; चार संशयीत पोलिसांच्या ताब्यात

बंगळुरू महामार्गावर कराडलगतच्या मलकापूर शहर हद्दीतील ढेबेवाडी फाटा येथे हवाला पद्धतीने मुबंईहून दक्षिण भारतात मोटारगाडीने नेली जात असलेली पाच कोटींची रक्कम सशस्त्र टोळीने लुटली. सविस्तर वाचा…

10:45 (IST) 16 Oct 2024
आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल : संभाजीराजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आचारसंहिता लागण्याच्या अगोदर वेगळी असू शकते. आता आचारसंहिता लागली आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागेल. आम्ही त्यांना विनंती केली आहे कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीत पाडण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उमेदवार कसा निवडून आणू शकतो याचा विचार करावा. मनोज जरांगे आमच्याबरोबर आले तर आम्हाला आनंदच होईल.