Marathi News Updates, 14 October 2024 : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून दोघांना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणाचे धागेदोर थेट लॉरेन्स बिश्नोई गटापर्यंत पोहोचल्याने पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. त्यामुळे सातत्याने वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत. तर, दुसरीकडे आज सकाळपासून दोनवेळा बॉम्ब हल्ल्याची धमकी प्राप्त झाली आहे. मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी सुरक्षा यंत्रणांकडे आली. त्यामुळे हे विमान तत्काळ दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं. तर, दुसरीकडे आज पहाटे चारच्या सुमारास मुंबई हावडा मेलला टायमर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.
तर, दुसरीकडे राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांना जोर आला आहे. आज दिल्लीत काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीसाठी नाना पटोले दिल्लीत गेले आहेत. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर लहान वाहनांची टोलपासून मुक्ती केली आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेऊयात.
गडचिरोली : दहा लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल दाम्पत्याने गडचिरोली पोलिसांसमोर १४ ऑक्टोबरला आत्मसमर्पण केले. हिंसक नक्षल चळवळीत ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व प्रेमाचा प्रवास लग्नबंधनापर्यंत पोहोचला. मात्र, नक्षल चळवळीत वैवाहिक आयुष्य जगता येत नसल्याने नऊ वर्षांनंतर त्यांनी आत्मसमर्पणाची वाट निवडली.
नागपूर : रामेटकमधील पेंच नदीच्या कालव्यावर फिरायला गेलेल्या आठ विद्यार्थ्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. ते सर्व जण कालव्यात आंघोळीसाठी उतरले. मात्र, चार विद्यार्थी वाहून गेले. त्या चारही विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला तर चार जण थोडक्यात बचावले.
नाशिक – केंद्र सरकारने कामगार संघटनांचे हक्क हिरावून घेणारे, संपावर बंदी घालणारे, कंत्राटी पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या चार श्रम संहिता राज्यात लागू करू नयेत, बारमाही कंत्राटी कामगारांना कायम करणे, आदी मागण्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्याची मागणी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे.
पुणे : पुणे शहराला पणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला जॅकवेल, नवीन, जुने पर्वती जलशुध्दीकरण केंद्र, लष्कर, वडगाव, वारजे, एसएनडीटी जलशुद्धीकरण केंद्र तसेच भामा आसखेड प्रकल्प अंतर्गत पाणी पुरवठा होणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत विषयक तसेच देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
पुणे : सोसायटीच्या आवारात शिरुन मोटार, तसेच दोन दुचाकीं पेटवून देणाऱ्या तिघांना मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी दोन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने विधानसभेसाठी बारा जागांवर दावा केला आहे. निवडणुकीत पक्षाला प्रतिनिधित्व दिले नाही तर, निवडणुकीचा प्रचारही केला जाणार नाही, अशी भूमिका रिपाइंचे राज्य संघटक परशुराम वाडेकर यांनी घेतली आहे.
नाशिक – शहर परिसरात बिबट्याचा वावर आता नवीन राहिलेला नाही. सोमवारी सकाळी रासबिहारी- मेरी जोडरस्त्यावरील मानेनगरात क. का. वाघ कृषी महाविद्यालयाच्या परिसरात बिबट्याने एका बकरीचा फडशा पाडला. माजी नगरसेविका प्रियंका माने यांनी यासंदर्भात वनविभागाचे नियतक्षेत्र अधिकारी राजेंद्र ठाकरे यांना माहिती दिली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याने शिकार केलेली बकरी नारायण तूपसमुंदर यांची आहे. वनविभागाने परिसराची पाहणी केली असता ठिकठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले. परिसरातील बिबट्याचा वावर पाहता तो जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी वन अधिकाऱ्यांकडे केली. माने नगर, धात्रक फाटा, म्हसरूळ, आडगाव या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून ४१७ उमेदवारांची निवड झाली. या उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात आली आहे. असे असतानाही मागील १० महिन्यांपासून त्यांना नियुक्ती मिळालेली नाही.

तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा अखेर सांगाडाच हाती लागला. त्याची क्रूरपणे हत्या करून मृतदेह शेताच्या बंधाऱ्यात पुरण्यात आल्याचे आढळून आले. हिवरखेड परिसरात हा धक्कादायक घटनाक्रम घडला असून यामुळे खामगाव तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये आतापर्यंत १ जानेवारी २०११ नंतरचे झोपडीवासीय घरांसाठी पात्र होत नव्हते. परंतु धारावी पुनर्विकासात पात्र व अपात्र वा बहुमजल्यांवरील सर्वच झोपडीवासीयांना घरे देण्यात येणार आहेत.
मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल येथील आणखी तीन भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज सकाळी उद्धव ठाकरे यांची सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपासणी झाली. तुमच्या शुभेच्छांमुळे सर्व काही ठीक आहे. आणि ते कामावर परतण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यास पूर्णपणे तयार आहे – आदित्य ठाकरे</p>
This morning, Uddhav Thackeray ji did a pre planned detailed check up at the Sir HN Reliance Hospital.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 14, 2024
With your best wishes, All is well, and he is fully ready to get to work and serve the people.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे काठोकाठ भरलेली असताना मुंबईतील अनेक भागांमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रासले आहेत.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘छोटी तारा’ ही वाघीण म्हणजे या जंगलाची तारका. तिचे बछडेही तिच्यासारखेच.पर्यटकांना सहज दर्शन द्यायची जी सवय ‘छोटी तारा’ला होती, तीच तिच्या बछड्यांना देखील. सविस्तर वाचा…
नाशिक : दिंडोरी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. बागलाण या आदिवासी राखीव मतदार संघातून त्यांनी तयारी सुरु केल्याने भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्या गोटात अस्वस्थता आहे.
नवी मुंबई : सिडको महामंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर २६ हजार सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी जाहीर केलेल्या सोडत प्रक्रियेसाठी पहिल्याच दिवशी १२ हजार ४०० इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी केल्याने या सोडत प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. त्याकरता संजीवराजे निंबाळकर यांच्या घरी बैठक सुरू झाली असून रामराजे निंबाळकर आणि शरद पवारही तिथे पोहोचले आहेत.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Shiv Sena leader Sanjay Nirupam says, "…The way Baba Siddique was murdered is a matter of concern. The government has taken it as a challenge. It is a challenge for the government. But to conclude on the basis of one incident that the entire law… pic.twitter.com/JA07jFDlbv
— ANI (@ANI) October 14, 2024
पनवेल : चॉकलेटचे आमिष दाखवून कळंबोलीमध्ये रविवारी सकाळी साडेअकरा वाजता एका दुकानदाराने ९ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची रितसर तक्रार पालकांनी कळंबोली पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून विविध मागण्या मान्य होत नसल्याने पुण्यातील पेट्रोल पंपचालकांनी उद्यापासून (मंगळवार) बेमुदत बंद करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोलियम कंपन्या इंधन वाहतुकीबाबत चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवत असून, इंधन चोरीचे प्रमाण वाढले आहे. सविस्तर वाचा…
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील फेरीवाला हटाव पथक आणि अतिक्रमण नियंत्रण पथकातील १३४ कामगारांच्या पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी बदल्या केल्या आहेत.
सोमवारी पहाटे ३.०५ वाजता मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाला ट्विटरद्वारे हावडा-मुंबई मेलमध्ये टायमर बॉम्ब ठेवल्याची आणि त्याचा स्फोट नाशिक स्थानक येण्यापूर्वी होणार असल्याची धमकी मिळाली.
कल्याण शहरात गेल्या आठवड्यापासून विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांवर लावलेले फलक फाडण्याची जोरदार चढाओढ लागली आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पश्चिम मतदारसंघातील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील इच्छुक उमेदवार साईनाथ तारे, मोहने येथील संध्या साठे यांनी नवरात्रोत्सवानिमित्त लावलेले फलक अज्ञात इसमांनी फाडून राजकीय आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुण्यात आणखी नवे दोन मेट्रो मार्ग !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 14, 2024
१) खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी
२) नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग
या दोन मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली असून यामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.
पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या…
#WATCH | Delhi | On Maharashtra Govt announcing full toll exemption for all light motor vehicles entering Mumbai, Shiv Sena MP Naresh Mhaske says, "This could have been done only under the leadership of CM Eknath Shinde. The people of Maharashtra are welcoming this decision…" pic.twitter.com/W3ft35Dcg1
— ANI (@ANI) October 14, 2024
गेल्या अनेक वर्षांपासन जनतेची, प्रवाशांची मागणी होती की या मुंबई एन्ट्री पॉइंटवरील नाक्यावर होणारी गर्दी, वाहतूक कोंडी यामुळे टोलमधून सूट मिळावी. मी जेव्हा आमदार होतो, तेव्हा मी यासंदर्भात टोलमाफीचं आंदोलनही केलं होतं. कोर्टातही गेलो होतो. मला समाधान आहे की खासगी कारने प्रवास करणाऱ्यांना लाखो मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार आहे. यामुळे वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण होणार नाही. याचा मुंबईत येणाऱ्यांना फायदा होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांसह, मुख्यमंत्री माझा लाडका प्रवासी योजना आम्ही आज राबवली. मुंबईतील टोलमाफीचा निर्णय हा ऐतिहासिक असून मास्टरस्ट्रोक आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
लाडकी बहीण योजना आम्ही केली, त्याच्या पूर्वतयारीसाठी एक वर्ष लागलं. निवडणुका डोळ्यासंमोर ठेवून काम केलेलं नाही. जनतेची मागणी गेल्या अनेकवर्षांपासूनची होती, त्यामुळे आम्ही टोलमाफी केली, याचं आम्हाला समाधान आहे. याची पोचपावती आम्हाला जनता नक्की देणार आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षण कळीचा मुद्दा ठरणार आहे. निवडणुकीनंतर नोकरी व शिक्षणातील आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला. सविस्तर वाचा…
आता पुन्हा एकदा परतीच्या पावसाची थबकलेली वाटचाल सुरू झाली आहे.
तुमचं-आमचं हित पाहणाऱ्या राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतले काही महत्त्वपूर्ण निर्णय :-
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 14, 2024
✅ मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.
✅आगरी समाजासाठी महामंडळ
✅समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर…