Marathi News Updates, 14 October 2024 : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून दोघांना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणाचे धागेदोर थेट लॉरेन्स बिश्नोई गटापर्यंत पोहोचल्याने पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. त्यामुळे सातत्याने वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत. तर, दुसरीकडे आज सकाळपासून दोनवेळा बॉम्ब हल्ल्याची धमकी प्राप्त झाली आहे. मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी सुरक्षा यंत्रणांकडे आली. त्यामुळे हे विमान तत्काळ दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आलं. तर, दुसरीकडे आज पहाटे चारच्या सुमारास मुंबई हावडा मेलला टायमर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.
तर, दुसरीकडे राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांना जोर आला आहे. आज दिल्लीत काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीसाठी नाना पटोले दिल्लीत गेले आहेत. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर लहान वाहनांची टोलपासून मुक्ती केली आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेऊयात.
पुणे : मागील काही महिन्यांपासून महिला, लहान मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. या अन्याय अत्याचाराच्या घटनांविरोधात राज्यभरात विविध संघटनांमार्फत आंदोलन करण्यात येत आहे. त्याच दरम्यान आज पुण्यातील गुडलक चौकात शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘वध तीनतोंडी रावणाचा, लढा स्त्री सन्मानाचा’ या आशयाचे मजकूर असलेले फलक हाती घेऊन महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तर हे फलक मेणबत्तीने पेटवून महिलांनी निषेध नोंदविला.
दारुड्या बापाने सख्ख्या १४ वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या तीन महिन्यांपासून ती मुलगी बापाचा लैंगिक अत्याचार सहन करीत होती. शेवटी आईला प्रकार सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन.
— Raj Thackeray (@RajThackeray) October 14, 2024
टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल…
कल्याण, टिटवाळा, बदलापूर रेल्वे स्थानकांमधून सकाळच्या वेळेत सुटणाऱ्या वातानुकूलित लोकलना तुफान गर्दी असते.
न्यूयॉर्कला जाण्यासाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानाला दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले.
जर खंडणी दिली नाही तर कफनची व्यवस्था करावी, असेही फोन करणाऱ्या व्यक्तीने तेव्हा धमकावले होते.
२०१२ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच २९ नगरसेवक निवडून आले.
दहा दिवसांपूर्वी बाणेर टेकडीवर इशान्य भारतातील एका विद्यार्थ्याला मारहाण करुन लुटण्यात आल्याची घटना घडली होती.
नवी मुंबईतील एनआरआय संकुलातील एका सदनिकेत भीषण आग लागली.
राज्य सरकारचं अभिनंदन करतो. निर्णयाचं अतिशय स्वागत करतो. स्वागतार्ह निर्णय आहे. पाहुण्याच्या काठीने साप मेला तरी आनंदच आहे. कोणत्याही कारणाने का होईना टोलमाफीचा निर्णय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज ठाकरेंनी पाठपुरावा केलेल्या ७५ टोल केंद्रावर टोलमाफी करण्याचं श्रेय राज ठाकरेंचं आहे. मागच्या महिन्यात अविनाश जाधव उपोषणाला बसले होते – अभिजीत पानसे
लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर पुन्हा सक्रिय होताना माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी संगमनेर मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची घोषणा केली. विखे यांचे परंपरागत विरोधक, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा मतदारसंघ. या मतदारसंघातून ते १९८५ पासून सलग विजयी झाले. सविस्तर वाचा…
जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्या सातही विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी महायुतीचे आमदार आहेत. पाच मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून प्रत्येकी एक शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. सविस्तर वाचा…
तस्करी करुन आणलेले चार कोटी ४७ लाख रुपयांचे सहा किलो सोने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या(डीआरआय) पथकाने तळेगाव टोल नाका परिसरात जप्त केले. मुंबईहून पुण्यात बसने तस्करी करुन आणलेले सोने पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘डीआरआय’च्या पथकाने ही कारवाई केली. सविस्तर वाचा…
माजी मंत्री झियाउद्दिन अब्दुल रहीम सिद्दीकी उर्फ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतही लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सहभागाच्या चर्चेमुळे पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये सक्रीय असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळी महाराष्ट्रातही हातपास पसरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वाचा…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे भायखळा विधानसभा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी ऊर्फ मुन्ना (४५) यांच्या हत्येचा तपास गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकारणी भायखळा पोलिसांनी तिघांना अटक केली होती. सविस्तर वाचा…
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सोमवारची सकाळ एअर इंडियाच्या मुंबईहून न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळाच्या दिशेनं निघालेल्या विमानातल्या प्रवाशांसाठी प्रचंड धक्कादायक ठरली. तितकीच धक्कादायक ती या प्रवाशांच्या नातेवाईकांसाठीही ठरली. कारण या विमानानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातचं विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी सुरक्षा यंत्रणांकडे आली. त्यामुळे खळबळ उडाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे विमान तातडीनं दिल्लीच्या दिशेनं वळवण्यात आलं.
Mumbai-Howrah Mail received a threat to blow up the train with a timer bomb. Around 4:00 AM, off-control received this message. Train number 12809 was stopped at Jalgaon station and checked. No suspicious object was found in it. After this, the train proceeded towards the…
— ANI (@ANI) October 14, 2024