Marathi News Live Updates, 11 October 2024 : राज्यात विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. पुढील काही दिवसांमध्ये या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीसह महायुतीमधील सर्वच नेत्यांनी राज्यभरात दौरे सुरु केले आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महायुतीमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह सर्वच नेत्यांचे दौरे आणि सभा सुरु आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आता दसरा असल्यामुळे राज्यात मुंबई, नागपूरसह बीडमध्ये काही दसरा मेळावे होतात. या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडींवर आणि राज्यातील सामाजिक घडामोडींवर आपलं लक्ष असेल.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 11 October 2024

13:34 (IST) 11 Oct 2024

अमर्याद काळासाठी विद्यार्थ्याची हकालपट्टी म्हणजे त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीचा मृत्यूच

मुंबई : लैंगिक छळ करण्यात आल्याच्या तक्रारीप्रकरणी विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीने दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठात शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची हकालपट्टी केली होती.

हे ही वाचा…

13:33 (IST) 11 Oct 2024
फेरीवाला समितीची अधिसूचना काढा, कोणी केली ही मागणी

पुणे : विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शहर फेरीवाला समितीची अधिसूचना काढावी, अशी मागणी पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. ही मागणी मान्य करून राज्य सरकार शहरातील फेरीवाल्यांना न्याय देणार का, याकडे लक्ष लागले आहे.

वाचा सविस्तर…

13:32 (IST) 11 Oct 2024
निवडणुकीचे पडघम वाजू लागताच भाषा, साहित्य-संस्कृतीला लाभ

निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वी गेल्या काही दिवसांमधील सरकारच्या या निर्णयांनी भाषा आणि साहित्य-संस्कृतीला लाभ झाला आहे. खरं तर हे निर्णय यापूर्वीच व्हायला हवे होते अशी समीक्षा करायची की निवडणुकीच्या तोंडावर हा होईना हे निर्णय झाले याचा आनंद मानायचा ही बाब व्यक्तीसापेक्ष आहे.

वाचा सविस्तर…

13:31 (IST) 11 Oct 2024
कल्याण- डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी (ता.१५) सकाळी १० ते संध्याकाळी सहा या वेळेत देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या यांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने दिली.

वाचा सविस्तर…

13:31 (IST) 11 Oct 2024
अमरावती : शिवशाही बसला आग; जीवितहानी नाही

अमरावती : अकोला येथून अमरावतीकडे येत असलेल्‍या शिवशाही बसला बडनेरा ते अमरावती मार्गावर बडनेरा पोलीस ठाण्‍यासमोर टायर फुटून अचानक आग लागली. यामुळे या वर्दळीच्‍या मार्गावर एकच गोंधळ उडाला.

सविस्तर वाचा….

13:13 (IST) 11 Oct 2024

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सरकारी बांधकामे ठप्प, ही आहेत कारणे

नागपूर : सध्या महाराष्ट्रात निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुती सरकारने रोज लोकप्रिय घोषणांची मालिका सुरू केली आहे. विकासकामांच्या घोषणा केल्या जात आहेत. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. अशा परिस्थितीत सरकारकडे देणी चुकती करण्यासाठी निधी उपलब्ध नाही.

सविस्तर वाचा….

13:05 (IST) 11 Oct 2024
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून चौघांची फसवणूक, कोल्हापूरातील व्यक्तीविरोधात गुन्हा

मुंबई : सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील चौघांची सुमारे १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसाद बापूसाहेब कांबळे याच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर (एआरए) मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

12:58 (IST) 11 Oct 2024
डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत महापालिकेने घेतला मोठा निर्णय!

पुणे : डेक्कन येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावर महापालिकेच्या वतीने मेघडंबरी उभारण्यात येणार आहे. तसेच येथील स्मारक व गरवारे भुयारी मार्गाच्या परिसराचे सुशोभीकरण देखील केले जाणार आहे.

वाचा सविस्तर…

12:57 (IST) 11 Oct 2024
डोंबिवलीतील जवाहिऱ्याला बनावट सोन्याची नाणी विकून दोन कोटी ८१ लाखाची फसवणूक

डोंबिवली : येथील पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील पांडुरंगवाडी भागात राहत असलेल्या एका जवाहिऱ्याला मुंबईतील लालबाग येथील एका इसमाने दोन कोटी ८१ लाखाची वेष्टनात बंदिस्त बनावट सोन्याची नाणी विकली.

वाचा सविस्तर…

12:55 (IST) 11 Oct 2024
ठाणे : चोरीचा संशय घेतल्याने नातवाकडून आजीची वरवंट्याने ठेचून हत्या

ठाणे : पतीच्या निवृत्ती वेतनाचे १२ हजार रुपये घरातून अचानक गायब झाल्याने शिवीगाळ आणि संशय घेणाऱ्या ७७ वर्षीय आजीची तिच्या २० वर्षीय नातवाने वरवंट्याने ठेचून हत्या केली. अभि चौहान असे हत्याप्रकरणातील आरोपीचे नाव आहे.

वाचा सविस्तर…

12:36 (IST) 11 Oct 2024
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर धावपट्टीची चाचणी यशस्वी, मुख्यमंत्री शिंदे,फडणवीसही उपस्थित

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विमानाची यशस्वी चाचणी झाली आहे. यावेळी नवी मुंबई विमानतळावर सुखोई विमाना आणि आणखी एका विमानाने उड्डाण करत यशस्वी चाचणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदी नेत्यांची उपस्थिती होती. विमानाची यशस्वी चाचणी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धावपट्टीची पाहणी केली.

https://platform.twitter.com/widgets.js
12:34 (IST) 11 Oct 2024
डायबेटिक फूटमुळे मोठ्याप्रमाणात रुग्णांना गमवावे लागतात प्राण!

मुंबई : मधुमेही रूग्णांमध्ये डायबेटिक फुट ची समस्या सध्या वाढताना दिसून येत आहे. पाच वर्षांहून अधिक काळ मधुमेहाने त्रस्त असणाऱ्या रूग्णांमध्ये पाच ते सात रूग्णांना पायाच्या अल्सरचा सामना करावा लागतो.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 11 Oct 2024
वाढदिवसाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन मैत्रिणीशी बळजबरी शारीरिक संबंध

नागपूर : एकाच महाविद्यालयात शिकत असल्यामुळे त्या दोघांची ओळख झाली. काही दिवसांतच एकमेकांशी मैत्री झाली. मात्र, मैत्री करण्यामागे युवकाचा भलताच हेतू होता.

सविस्तर वाचा….

12:02 (IST) 11 Oct 2024
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाव कसे ठरले माहिती आहे का? आधी या नावावर झाला होता विचार

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुका व संघाचे शतकोत्तर वर्षात पदार्पण होणार असून या पार्श्वभूमीवर १२ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव होत आहे.

सविस्तर वाचा….

11:42 (IST) 11 Oct 2024
देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

नाशिक : देवळाली कॅम्प येथील फायरिंग रेंजवर तोफखान्याच्या सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट होऊन दोन अग्निविरांचा मृत्यू झाला आहे.

वाचा सविस्तर…

11:17 (IST) 11 Oct 2024
काँग्रेस मुलाखती ! अपेक्षित ते आलेच नाही, तर आलेल्यांची फिरकी

वर्धा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतीचा सोपस्कार गुरुवारी सायंकाळी आटोपला.

सविस्तर वाचा….

11:07 (IST) 11 Oct 2024
पिंपरीतील ‘त्या’ प्रकरणात प्रेयसीचाही मृत्यू; लॉजमध्ये प्रियकर आणि प्रेयसी…

पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्याचा प्रयत्न करून प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती. हा सर्व प्रकार खराळवाडी मधील हॉटेल राज प्लाजा या लॉजवर घडला.

वाचा सविस्तर…

10:55 (IST) 11 Oct 2024
रतन टाटांची झेप ! स्वदेशी ‘इंडिका’पासून ‘जॅग्वार’पर्यंत…

रतन टाटा यांनी ‘टाटा मोटर्स’ला जागतिक पातळीवर पोहोचविले. वाहननिर्मिती क्षेत्रातील ते सर्वांत मोठे नाव बनले. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात या कंपनीचा विस्तार झाला. टाटा यांच्या नेतृत्वाखाली ‘टाटा मोटर्स’ने अनेक अनोख्या मोटारी सादर केल्या. त्यातील ‘इंडिका’ आणि ‘नॅनो’ या मोटारी बहुचर्चित ठरल्या. प्रवासी वाहन क्षेत्रात सध्या ‘टाटा मोटर्स’ ही प्रमुख कंपनी बनली आहे.

वाचा सविस्तर…

10:54 (IST) 11 Oct 2024
कोरेगाव पार्क भागात ‘हिट अँड रन’, भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : कोरेगाव पार्क भागाील एबीसी फार्म रस्त्यावर मध्यरात्री भरधाव मोटारीने दोन दुचाकींना धडक दिली. मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील तीन तरुण किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी पहाटे मोटारचालक तरुणाला अटक केली.

वाचा सविस्तर…

10:54 (IST) 11 Oct 2024
रतन टाटा, त्यांचे टँगो, टिटो अन् लालबागचा मी…

मी लालबागमध्ये सर्वसामान्य कुटुंबात राहणारा. माझी आजी कुलाब्याला राहते. तिकडे बाजूलाच युनायटेड सर्व्हिसेस क्लब आहे. तिकडे टिटो आणि टँगो या दोन जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानांसह साहेब (रतन टाटा) यायचे.

वाचा सविस्तर…

10:52 (IST) 11 Oct 2024
पिंपरी : पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय ‘येथे’ होणार; बुधवारी मागणी आणि गुरुवारी ताथवडेतील २० हेक्टरचा मिळाला भुखंड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ताथवडे येथील वळूमाता केंद्र येथील २० हेक्टर जागा उपलब्ध होणार आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे समस्या मांडली. त्यानंतर गुरुवारी ( १० ऑक्टोबर) जागा देण्याचा शासनाने निर्णय घेतला.

वाचा सविस्तर…

10:52 (IST) 11 Oct 2024
पिंपरी : आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेला आता लागणार आर्थिक शिस्त

पिंपरी : अर्थसंकल्पात कोणताही बदल करायचा असल्यास विभागप्रमुखांनी तसा प्रस्ताव लेखा व वित्त विभागास सादर करावा. परस्परबदल करून आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करू नयेत. दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत लेखा विभागाकडे दायित्वाची माहिती सादर करावी. रस्त्यांच्या कामांची तरतूद इतर कोणत्याही कामावर वर्ग करू नये, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

वाचा सविस्तर…

10:49 (IST) 11 Oct 2024

वालधुनीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रकल्प आराखडा, प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून निविदा मागिवली

अंबरनाथ : प्रदुषणामुळे गटारगंगा झालेल्या वालधुनी नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा सादर करण्यासाठी अनुभवी कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.

वाचा सविस्तर…

10:48 (IST) 11 Oct 2024
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना घर जप्तीपासून तूर्त दिलासा

मुंबई : बिटकॉइन फसवणुकीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटिशीविरोधात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा अपिलीय न्यायाधिकरणाकडे दाद मागत नाहीत. तसेच त्यांनी केलेल्या अपिलावर निर्णय दिला जात नाही, तोपर्यंत त्यांच्या घर आणि फार्म हाऊसवर जप्तीची कारवाई करणार नाही, अशी हमी ईडीने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली.

सविस्तर वाचा….

10:48 (IST) 11 Oct 2024

कोकण मंडळाची यंदा केवळ १,३२२ घरांसाठी सोडत, आजपासून अर्ज विक्री-स्वीकृती

म्हाडाच्या कोकण मंडळाने सहा ते सात हजार घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र कोकण मंडळाने गुरुवारी केवळ १,३२२ घरांसह ११७ भूखंडांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

वाचा सविस्तर…

10:43 (IST) 11 Oct 2024
“अजित पवारांना महायुतीमधून बाजूला…”, विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

“महायुतीच्या सरकारमध्ये वाद आता नेहमीचेच झाले आहेत. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद होत आहेत. मात्र, हे वाद राज्याच्या हिताचे नाहीत. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील वाद हे स्वत:च्या हितासाठी सुरु आहेत. राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना ८० निर्णय घेतले जातात. महायुतीमधून अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु असावेत. अजित पवार हे अनेकवेळा अर्थखात्याचे मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे ते शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतील. मात्र, अलीकडे सर्वच ठिकामी शिस्त बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे”, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

भरधाव मोटारीची दोन दुचाकींना धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुण्यातील कोरेगाव पार्क भागाील एबीसी फार्म रस्त्यावर मध्यरात्री भरधाव मोटारीने दोन दुचाकींना धडक दिली. मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील तीन तरुण किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी पहाटे मोटारचालक तरुणाला अटक केली.