Maharashtra Breaking News Updates, 17 October 2024 : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर राज्यभर निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पक्षांचे मेळावे, जाहीर सभा, प्रचारफेऱ्यांना सुरुवात झाली आहे. तसेच महायुती, महाविकास आघाडी व नव्यानेच होऊ घातलेल्या तिसऱ्या आघाडीत जागावाटपावर चर्चा चालू आहे. याबाबतच्या बातम्यांचा बातम्यांचा आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वेध घेणार आहोत. तसेच इतर राजकीय व सामाजिक बातम्यांवर आपलं लक्ष असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Today, 17 October 2024 : महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
नवी मुंबई : विधानसभा आचारसंहिता लागू करण्यात आली असून आचारसंहिता झाल्यापासून ७२ तासांत शहर फलकबाजीमुक्त करण्यात येणार असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेने शहरातील फलक हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत शहर फलकमुक्त करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे.
नाशिक : शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखालील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने हाती घेतले आहे. या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रकाश पेट्रोल पंप ते मुंबई नाका चौकपर्यंत पुलाखालून जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
नाशिक : महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या तंबाखूमुक्त शाळा अभियान सुरु आहे. याअंतर्गत राज्य शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या एकूण ३२० शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत.
आकाश माईन या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मनसेच्या पदाधिकारी श्रीमती दीपाली माईन यांचा हा मुलगा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिपाली माईन यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं.
आकाश माईन या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पक्षाच्या पदाधिकारी श्रीमती दीपाली माईन यांचा हा मुलगा. राजसाहेबांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिपालीताईंच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं.#MNSAdhikrut pic.twitter.com/efQIRBFXOy
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 17, 2024
डोंबिवलीतील वाहन कोंडी आठ दिवसात सोडवा, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांचे आदेश
डोंबिवली : डोंबिवली शहरात येत्या आठ दिवसानंतर वाहतूक कोंडी होणार नाही याचे नियोजन करा, असे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी गुरुवारी डोंबिवली दौऱ्यात दिले.
नागपूर : एसटी महामंडळात नुकत्याच झालेल्या ७० हजार ३७८ कोटींच्या (प्रति किलोमीटर ७८ रुपये) करारावर पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबूक अकाउंट हँक झालं असून त्यावरून आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात आला होता. तटकरेंना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी त्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. तसेच फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती. याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसदीबद्दल क्षमस्व !
वर्धा : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयाने विभागीय शिक्षण मंडळावर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करून टाकल्या आहेत.
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या वाढीव निवृत्ती वेतनाबाबत निर्णयानंतर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (ईपीएस-९५) पूर्व विदर्भातील केवळ ८ कर्मचाऱ्यांनाच वाढीव निवृत्ती वेतन सुरू झाली आहे.
नागपूर : नवरात्रीपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत असून बुधवारी (१७ ऑक्टोबर) दिवाळीपूर्वी सोन्याच्या दराने नवीन उच्चांक गाठला.
नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या निधनांतर या मतदारसंघात आता पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसने त्यांच्या मुलाला म्हणजेच रवींद्र चव्हाण यांना येथून उमेदवारी जाहीर केली आहे.
Congress President Shri @kharge has approved the proposal to nominate the following members as party candidates for the bye-elections to the Lok Sabha and Legislative Assembly in the states listed below ? pic.twitter.com/D3P3ezx9Ep
— Congress (@INCIndia) October 17, 2024
अकोला : समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबता-थांबत नसल्याचे चित्र आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला.
ठाणे : शहरात मागील चार ते पाच दिवसांपासून शहरातील मुख्य उड्डाणपूल, चौक, महापालिकेने लाखो रुपये खर्च करून रंगरंगोटी केलेल्या संरक्षण भिंती या सर्वांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा असलेले फलक (कागदी स्टीकर) झळकू लागले आहे.
सपा नेते व आमदार अबू आझमी म्हणाले, महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (पवार) आणि शिवसेना (ठाकरे) नेतेच सहभागी होतायत. छोट्या पक्षांच्या बैठका बाकी आहेत. मी समाजमाध्यमांवर पोस्ट करून त्यांना आठवण करून दिली आहे की आपल्याला खूप उशीर होतो. सर्वजण उमेदवारांच्या याद्या फायनल करत आहेत. काँग्रेस लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचं माझ्या कानावर आलं. माझा कोणावर राग नाही, राहुल गांधी आणि अखिलेश यादव सध्या काश्मीरमध्ये आहेत त्यामुळे तिथे त्यांनी चर्चा करावी यासाठी मी पोस्ट केली. आम्ही १२ जागा मागितल्या आहेत. भिवंडीतकाँग्रेस जिंकू शकत नाही. मात्र, मी तिथे निवडूक जिंकू शकतो.
नागपूर : नैऋत्य मोसमी पाऊस राज्यातून जवळजवळ परतला असताना अवकाळी पावसाचे संकट राज्यावर घोंगावत आहे.
गुन्हा नसताना १९ दिवस कारागृहात डांबले, ४३ वर्षे जुनी फाईल बंद करण्याच्या नादात पोलिसांनी…
नागपूर : ४३ वर्ष जुने प्रकरण बंद करण्याच्या नादात पोलिस विभागाने चक्क न्यायालयासमोर आरोपीशी नावसाधर्म्य असलेल्या भलत्याच व्यक्तीला उभे केले.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लवकरच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु इच्छुकांची वाढलेली संख्या दोन्ही गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असून उमेदवारी न मिळाल्यास काहींनी अपक्ष उभे राहण्याची तयारी सुरू केल्याचे कळते. सविस्तर वाचा…
अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेला तर तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार, असे स्पष्ट संकेत अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे.
राज्य सरकारच्या महाडीबीटी संकेतस्थळारील शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहिलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
निवृत्त लष्करी जवानाने कपाटात ठेवलेल्या रिव्हॉल्वरला धक्का लागल्याने झालेल्या गोळीबारात १३ वर्षीय शाळकरी मुलगा जखमी झाला. धनकवडीतील वनराई कॉलनी भागात ही घटना घडली. याप्रकरणी जवानाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कल्याण : लोकलमधील वाढती गर्दी, प्रवाशाच्या पाठीवर असलेले पिशवीचे ओझे आणि डोंबिवली ते मुंब्रा नवीन रेल्वे मार्गाला असलेली वळणे ही लोकलच्या दरवाजात लोंबकळत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यू कारणीभूत आहेत
नागपूरचे फुटपाथ मोकळे का नाही? उच्च न्यायालयाची महापालिका, पोलिसांना विचारणा…
नागपूर : नागपूरमध्ये फुटपाथवरून चालणे अत्यंत दुर्लभ गोष्ट झाली आहे. शहरातील फुटपाथ ही सार्वजनिक मालमत्ता असून खासगी कार्याकरिता यावर अतिक्रमण करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे कीकॉंट्रेक्टर मंत्री (CM) ने आवडत्या कॉंट्रेक्टर्सना कामं दिली आहेत. कॉंट्रेक्टर्स ने महापालिकेला लूटलं, पैसे काढले, पण कामं झालीच नाहीत!
आता महापालिकेची तिजोरी संपल्यावर… तीच तिजोरी भरण्याच्या नावाखाली मुंबईच्या जमिनी बिल्डरच्या घशात घालणार आहेत! आणि ह्या जमिनी जाणार मात्र कमी किमतीत! म्हणजे गद्दार एकनाथ शिंदे ह्यांची मजा आणि मुंबईकरांना सजा!
तिजोरी रिकामी, जमिनी बिल्डरच्या घश्यात!
सूरतेच्या लूटीचा बदला, भाजप एकनाथ शिंदेंना हाताशी घेऊन घेत आहे!
कॉंट्रेक्टर मंत्री (CM) ने आवडत्या कॉंट्रेक्टर्सना कामं दिली आहेत.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 17, 2024
कॉंट्रेक्टर्स ने महापालिकेला लूटलं, पैसे काढले, पण कामं झालीच नाहीत! ?
आता महापालिकेची तिजोरी संपल्यावर…
तीच तिजोरी भरण्याच्या नावाखाली मुंबईच्या जमिनी बिल्डरच्या घशात घालणार आहेत!
आणि ह्या जमिनी जाणार…
कल्याण : (मोक्का) न्यायमूर्ती अमित शेटे यांनी कल्याण जवळील आंबिवलीच्या इराणी वस्तीमधील चार सराईत गुन्हेगारांची मोक्का आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि महायुतीतील भाजपला आपले संख्याबळ वाढविण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्याबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यात जिल्हा नेतृत्वासाठीही चढाओढ पाहण्यास मिळणार आहे. सविस्तर वाचा…
जिल्ह्यातील भंडारा आणि तुमसर या दोन विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, साकोली विधानसभेत आमदार नाना पटोले यांना तुल्यबळ लढत देऊ शकेल, असा उमेदवार भाजपला अद्यापतरी गवसलेला नसल्याचे चित्र आहे. सविस्तर वाचा…
माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी यंदाची विधानसभा निवडणूक घड्याळ की तुतारी, यापैकी कोणत्या चिन्हावर लढणार, याबाबत अद्याप पत्ते उघड केलेले नाहीत. त्यांच्या या ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिकेमुळे विरोधकांसह मित्रपक्षही बुचकळ्यात पडले असून सिंदखेड राजा मतदारसंघात संभ्रमावस्थेचे चित्र आहे. सविस्तर वाचा…
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांची ८५ कोटी रुपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. बांदल यांची पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयातील तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव यांच्यासह पत्नीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा…