Maharashtra Breaking News Updates, 17 October 2024 : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर राज्यभर निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पक्षांचे मेळावे, जाहीर सभा, प्रचारफेऱ्यांना सुरुवात झाली आहे. तसेच महायुती, महाविकास आघाडी व नव्यानेच होऊ घातलेल्या तिसऱ्या आघाडीत जागावाटपावर चर्चा चालू आहे. याबाबतच्या बातम्यांचा बातम्यांचा आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वेध घेणार आहोत. तसेच इतर राजकीय व सामाजिक बातम्यांवर आपलं लक्ष असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Breaking News Today, 17 October 2024 : महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

12:06 (IST) 17 Oct 2024
BJP Candidate For Chinchwad Assembly Constituency : ‘चिंचवड’वरून भाजपमध्ये गटबाजी

चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दीर, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा होत आहे. मात्र, त्यावरून भाजपमध्ये अस्वस्थता असून, बुधवारी भाजपच्या १५ माजी नगरसेवकांनी बैठक घेऊन आक्रमक भूमिका घेतली. सविस्तर वाचा…

12:06 (IST) 17 Oct 2024
राज्यातील सर्वात मोठ्या ‘या’ विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मिळेना

राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच सर्व कामकाज पहावे लागत आहे. सविस्तर वाचा…

12:05 (IST) 17 Oct 2024
पुणेकरांच्या मतांपासूनही ‘वंचित’

समाजातील वंचित घटकाला न्याय देण्यासाठी पाच वर्षांपूर्वी वंचित बहुजन आघाडी स्थापन झाली. या आघाडीने २०१९ मध्ये लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे करताना उमेदवारांच्या नावापुढे त्यांचा धर्म आणि जात देण्याचा प्रयोग राबविला. सविस्तर वाचा…

12:04 (IST) 17 Oct 2024
घोरपडे पेठेत जुन्या वाड्यात आग; पाच घरे, दुकानाला झळ

घोरपडे पेठेतील जुन्या वाडाला गुरुवारी पहाटे आग लागली. आगीत पाच घरे आणि दुकानाला झळ पोहोचली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.घोरपडे पेठेतील पंचहौद टॉवरजवळ दुमजली जोशी वाडा आहे. सविस्तर वाचा…

12:03 (IST) 17 Oct 2024
चंदगडमधील उमेदवारीचा वाद गोवामार्गे मुंबईत; महायुतीत नाव पेच, प्रमोद सावंतांच्या घोषणेने महायुतीत ठिणगी

चंदगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा वाद गोवामार्गे मुंबईत पोहोचला आहे. चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केली आहे. सविस्तर वाचा…

12:03 (IST) 17 Oct 2024
सांगलीत नायकवडींच्या निवडीने अजित पवारांचे दुहेरी ‘लक्ष्य’ ! मुस्लिम समाजास संधी देतानाच जयंत पाटील विरोधकांना बळ

अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून मिरजेतील माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून आमदारकीची संधी मिळाली असली तरी पक्षिय राजकारणात त्यांची ओळख राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील विरोधक म्हणूनच आहे. सविस्तर वाचा…

12:02 (IST) 17 Oct 2024
सांगली जिल्ह्यात सरासरीच्या दीडपटीहून अधिक पाऊस; खरीप संकटात तर रब्बी लांबणीवर

यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सरासरीच्या दीडपटीहून अधिक पाऊस नोंदला गेला असून यामुळे काढणीला आलेली खरीप पिके संकटात तर रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. तसेच थंडीचा हंगाम सुरू होऊनही पावसाचा मुक्काम कायम आहे. सविस्तर वाचा…

12:01 (IST) 17 Oct 2024
सत्तेत आल्यास आघाडी सरकार ‘लाडकी बहीण योजना’ चालू ठेवणार; नेत्यांच्या टीकेनंतर जयंत पाटलांकडून निर्वाळा

महायुती सरकारला ‘लाडकी बहीण योजने’चा फायदा होत असल्याचे लक्षात येताच आता महाविकास आघाडीकडूनही सत्तेत आल्यावर ही योजना बंद करणार नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर वाचा…

11:55 (IST) 17 Oct 2024
मोक्याच्या तीन जागांचा लिलाव, महसूलवाढीसाठी मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

मुंबई : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट होत चालली असून महसूलवाढीचे नवा स्राोत नसल्यामुळे महापालिकेने वापरात नसलेले, पण मोक्याच्या जागेवरचे भूखंड भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतला आहे

सविस्तर वाचा…

11:53 (IST) 17 Oct 2024

निवडणुकीसाठी काँग्रेसचा मध्यवर्ती अड्डा, मुंबई मुख्यालय ते बूथ थेट संपर्क.

वर्धा : प्रदेश काँग्रेस कार्यालयाने आता सेंट्रल चॅनल म्हणजेच मध्यवर्ती अड्डा तयार केला आहे. विधानसभा निवडणुकीत सक्षमपणे सुसंवाद साधण्यासाठी तो तयार करण्यात आल्याचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांना कळविले आहे.

सविस्तर वाचा…

11:16 (IST) 17 Oct 2024
न्यायमूर्तीच्या नव्या मूर्तीवरून संजय राऊतांची भाजपा, आरएसएसवर टीका

संजय राऊत म्हणाले, गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात संविधानविरोधी सरकार चालू आहे. हे सरकार रोज भ्रष्टाचार, अत्याचार करत आहे. सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर न्यायमूर्ती कुठलाही निकाल देण्यास हतबलता दर्शवतात. तुम्ही शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांबाबत, त्यांच्या चिन्हांबाबत निर्णय देऊ शकले नाहीत. हा आरएसएस व भाजपाचा अजेंडा आहे. तुम्ही एका पक्षाचा प्रचार करत आहात. ईव्हीएम संदर्भात घोटाळा होतो, परंतु, तुम्ही (सर्वोच्च न्यायालय) त्यांना क्लीन चीट दिली आहे. कायद्याचा वापर करून विरोधी पक्षाला संपवलं जात आहे आणि हे तुम्ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहात आहात हा प्रोपगंडा आहे.

11:15 (IST) 17 Oct 2024
साताऱ्यात आठ मतदारसंघात २६ लाख २८ हजार मतदार, आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई – जिल्हाधिकारी

सातारा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून २० नोव्हेंबरला आठ विधानसभा मतदार संघासाठी साताऱ्यात २६ लाख २८ हजार ८७१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तीन हजार १६५ मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान, आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे. ज्यांच्याकडून आचारसंहितेचे भंग केले जाईल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे

11:14 (IST) 17 Oct 2024
साताऱ्यात आठ लाखांहून अधिक ‘लाडक्या बहिणी’, जिल्ह्यातून ३६९६ अर्ज नामंजूर

सातारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची आज अंतिम मुदत होती. या योजनेसाठी अंतिम मुदतीअखेर जिल्ह्यातील पात्र महिलांची संख्या आता आठ लाख तीन हजार ८०७ वर पोचली, तसेच आतापर्यंत विविध तांत्रिक कारणांनी तीन हजार ६९६ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळू शकला नव्हता. त्यानंतर आधारशी लिंकअप नसणाऱ्यांनी बँकेत जाऊन आधार लिंकअप करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ज्यांनी आधार लिंकअप केले. त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

11:12 (IST) 17 Oct 2024
पाच वर्षात पनवेलमध्ये ४५ हजार महिला मतदार वाढले

पनवेल : पाच वर्षात पनवेल विधानसभा मतदार संघात ४५ हजार १९३ महिला मतदार वाढले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत महिला मतदारांची संख्या २ लाख ५७ हजार १४० एवढी होती. सध्या ही संख्या ३ लाख दोन हजार ३३३ वर पोहचली आहे. आतापर्यंत लाडकी बहिण योजनेचा लाभ पनवेलमधील सव्वा लाख पेक्षा अधिक महिलांना आणि विविध सरकारी योजनेचा लाभ महिलांना मिळाल्याने महायुतीकडून महिलांना केंद्रीत करुन प्रचार केला जात आहे. यासर्व महिलाकेंद्रीत प्रचारामुळे महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांची चिंता वाढली आहे.

11:06 (IST) 17 Oct 2024
“भ्रष्टाचार पाहण्यासाठी न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढली अन्…”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका

शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले, न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन्याय करणाऱ्यांचं मुंडका उडवून टाकण्यासाठी असते. समोर कितीही मोठी व्यक्ती आली, ती श्रीमंत आहे की शक्तिमान आहे ते पाहून मी न्याय करणार नाही यासाठी डोळ्यावर पट्टी असते. परंतु, गेल्या चार वर्षांत असा न्याय झाल नाही. न्यायालयातील काही लोकांनी भारतीय जनता पार्टीला मदत करायचं ठरवलं आहे. उघड्या डोळ्यांनी आता भ्रष्टाचार पाहा, असं हे लोक आता न्यायदेवतेला सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढली आणि डोळ्यावरील पट्टी काढली.