Maharashtra Breaking News Live Updates, 18 October 2024: केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आणि राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. येत्या काही दिवसांत महायुती व महाविकास आघाडीचं जागावाटप व त्यानंतर उमेदवारांच्या याद्या जाहीर व्हायला सुरुवात होईल. यातून अनेक इच्छुकांची नाराजी आणि उमेदवारांचा प्रचार एकाच वेळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच भेटीगाठींना वेग आला असून निवडणुकांचा राजकीय पट आता रंगू लागल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Breaking News Today, 18 October 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ संबंधित सर्व घडामोडींचा आढावा!

13:11 (IST) 18 Oct 2024
वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या पोलिसांना कोयत्याचा धाक, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करुन कोयत्याचा धाक दाखविण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली.

सविस्तर वाचा…

13:10 (IST) 18 Oct 2024

बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात असमर्थता

मुंबई : पिंपरी – चिंचवड परिसरातील कॅन्टोन्मेंट मंडळाच्या मालकीच्या जागेवर उभ्या असलेल्या निर्माण ऑर्केडच्या तळघरातील गोदामाचे कोणत्याही परवानगीविना मद्यालय, उपाहारगृहामध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 18 Oct 2024

विद्यमान आमदारांना ‘हरियाणा पॅटर्न’चा धसका, उमेदवार बदलणार, की राहणार, याबाबत भाजपचे ‘नवे’ निकष

पुणे : हरियाणातील विजयामुळे भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही ‘हरियाणा पॅटर्न’ वापरण्याच्या हालाचाली भाजपकडून सुरू झाल्या असून, जातीय समीकरणांचा प्रभावी वापर केला जाणार असल्याचे समजते.

सविस्तर वाचा…

13:07 (IST) 18 Oct 2024

मतदान आळसाची पुणेकरांची सवय जुनीच!

पुणे : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी भर पत्रकार परिषदेत राज्यात सर्वाधिक कमी मतदान हे पुणे आणि ठाण्यात होत असल्याची वास्तुस्थिती मांडली आणि मतदान करण्यात पुणेकर निरुत्साही असल्याचे उघड झाले.

सविस्तर वाचा…

12:42 (IST) 18 Oct 2024
रायगडमधील दोन मतदारसंघांवरून महायुतीत वादाची ठिणगी

शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्ह दिसत आहेत.

सविस्तर वाचा…

12:42 (IST) 18 Oct 2024
नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

नाशिक मध्य प्रमाणे नांदगाव या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) मतदारसंघाची वाटचाल मैत्रीपूर्ण लढतीच्या दिशेने होत आहे.

सविस्तर वाचा…

12:21 (IST) 18 Oct 2024

Maharashtra Politics Live Updates: भाजपाला धक्का, राजन तेली ठाकरे गटात जाणार; ‘या’ नेत्याचं नाव घेत म्हणाले, “…म्हणून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला”!

गेल्या १५ वर्षांपासून दीपक केसरकर कोकणात काम करत आहेत. पण ते करत असताना कुणालाही विश्वासात न घेणं, भाजपा-सेना युती असताना व ते जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही भाजपाला त्यांनी कधीच विकासाच्या कामात वाटा दिला नाही. कायम अन्याय केला गेला. १५ वर्षांत त्यांनी केलेली एकही घोषणा पूर्ण केलेली नाही. एमआयडीसी २०१३ साली आमच्याकडे आली. पण आत्तापर्यंत इथे कोणताही कारखाना आणण्याचा प्रयत्न झालेला नाही. बेरोजगारीच्या मुद्द्यावर केसरकरांनी काहीही केलेलं नाही. निवडणूक जवळ आल्यावर वेगवेगळ्या घोषणा करायच्या असं धोरण आहे.

केसरकरांचा प्रचार कसा करणार? कारण त्यांनी जिल्ह्यात काहीच काम केलेलं नाही. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला.

मी राणेंबरोबर काँग्रेसमध्ये गेलो. पण ती माझी चूक होती. आम्ही शिवसेनेमुळेच नावारुपाला आलो. त्यामुळे ती चूक आज मी दुरुस्त करतोय. माझा आक्षेप त्यांच्यापेक्षा त्यांचा लहान मुलगा नितेश राणे याच्याबद्दल आहे. सातत्याने कुरघोडी करून काम करू द्यायचं नाही ही आमच्या मतदारसंघात परिस्थिती होती. मी हे सातत्याने चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीसांनाही वेळोवेळी सांगितलंय. अनेकदा संधी देऊनही मतदारसंघात मुद्दाम लोकांना भडकावण्याचा प्रयत्न होत होता. या गोष्टीला कंटाळूनच मला हे पाऊल उचलावं लागलं. मी भाजपाच्या कोणत्याही नेत्यावर नाराज नाही. – राजन तेली

11:43 (IST) 18 Oct 2024
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते ठाकरे गटात

फूट पडल्यानंतर अन्य सर्व मतदारसंघात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या सभा किंवा मेळावे झाले होते. सिल्लोडमध्ये मात्र असे होऊ शकले नव्हते.

सविस्तर वाचा…

11:42 (IST) 18 Oct 2024
पुसद मतदारसंघासाठी ‘बंगल्यात’च रस्सीखेच; थोरले की धाकटे? नाईक कुटुंबात पेच

नाईक घराणे महाराष्ट्र राज्य निमिर्तीच्या आधीपासूनच राजकारणात सक्रिय आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री या कुटुंबाने राज्याला दिले.

सविस्तर वाचा…

11:42 (IST) 18 Oct 2024
शरद पवारांनी राज्याला विकासापासून दूर ठेवले – उदयनराजे

जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे ठोस काम पवारांनी केल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे बोलताना केला.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 18 Oct 2024
कोणत्याही महाविकास आघाडीसोबत नाही – राजू शेट्टी

बहिणीला १५०० रुपये द्यायचे आणि भावाचा खिसा कापायचा असा उद्योग सरकारने सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सविस्तर वाचा…

11:40 (IST) 18 Oct 2024
विद्यमान कायम; इच्छुक वाढले, संधी कोणाला? चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांतील चित्र

चंद्रपूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ सोडायला महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष तयार नाही. महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार, हे स्पष्ट आहे.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 18 Oct 2024
मारेकऱ्यांचा बाबा सिद्दिकी यांना कार्यालयाजवळच मारण्याचा कट, आरोपींच्या चौकशीतून माहिती उघड; आतापर्यंत ५ लाख रुपयांच्या व्यवहारांची माहिती

अटक आरोपींकडून दोन पिस्तूल, तीन मॅगझीन, २८ काडतुसे, पाच मोबाइल, दोन आधार कार्ड जप्त करण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 18 Oct 2024
मालवण : राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी वेल्डिंग करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला अटक

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला होता.

सविस्तर वाचा…

11:38 (IST) 18 Oct 2024
नववी, दहावीला १५ विषयांचा अभ्यास

सकाळी शाळा, खासगी शिकवणी, प्रवेश परीक्षांची तयारी असा विद्यार्थ्यांचा तणावपूर्ण दिनक्रम आता अधिकच आव्हानात्मक होणार आहे.

सविस्तर वाचा…

11:38 (IST) 18 Oct 2024
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचे मोठे पाऊल; हॉटेल, ढाबा, बेकरीसाठी गॅसचा वापर सक्तीचा

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील हॉटेल, ढाबा आणि बेकरी या ठिकाणी लाकूड व कोळसा जाळण्यास महापालिकेने बंदी घातली आहे.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 18 Oct 2024
डहाणू-जव्हार मार्गाची दुरवस्था; खड्डे, चिखलामुळे वाहनचालक त्रस्त, तातडीने कार्यवाहीची मागणी

डहाणू-जव्हार राज्यमार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात मोठमोठे खड्डे आणि चिखलामुळे वाहनचालकांना येथून प्रवास करणे अवघड जात आहे.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 18 Oct 2024
पिंपरी: मित्राच्या पत्नीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार; अत्याचाराचे चित्रीकरण, पीडितेसह सर्वजण उच्चशिक्षित

आरोपी असलेल्या पतीने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी आपल्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 18 Oct 2024
अभ्यासक्रमाशिवाय राज्यातील शाळांचे वार्षिक वेळापत्रक आता ‘सीबीएसई’नुसार… काय आहे निर्णय?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तिसरी ते बारावीसाठी अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा एससीईआरटीने जाहीर केला होता.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 18 Oct 2024
पिंपरी: दोन अल्पवयीन विद्यार्थिनींशी शाळेतील कर्मचाऱ्याचे अश्लील चाळे, महापालिकेने खासगी संस्थेला चालवण्यास दिलेल्या शाळेतील धक्कादायक प्रकार

शाळेतील १३ वर्षीय मुलीने मुख्याध्यापकांना १५ ऑक्टोबर रोजी भेटून शेख याने ‘बॅड टच’ केल्याचे सांगितले.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 18 Oct 2024
इंडिगोच्या तीन विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, समाज माध्यमावर धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

इंडिगोच्या तीन विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे एका माथेफिरूने समाज माध्यमावर टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 18 Oct 2024
पवारांनी २५ वर्षांपूर्वी दिलेले आश्वासन अजित पवारांनी पाळले, इद्रिस नायकवडी यांचा शरद पवारांना चिमटा

इद्रिस नायकवडी यांनी आपल्या निवडीवर आजवरच्या उपेक्षेबाबत पवारांना चिमटा काढत अजित पवार यांचे कौतुक केले.

सविस्तर वाचा…

11:08 (IST) 18 Oct 2024

Maharashtra Politics Live Updates: सुरेश धस-मनोज जरांगे भेटीची चर्चा!

बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भाजपा नेते सुरेश धस यांनी गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे विधानसभा उमेदवारीसाठी शेकडोंनी अर्ज आले असताना दुसरीकडे भाजपा नेते त्यांच्या भेटीला गेल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ तारीख लाइव्ह अपडेट्स

Maharashtra Breaking News Today, 18 October 2024: महाराष्ट्रातील सर्व घडामोडींची बित्तंबातमी!