Maharashtra News Today, 24 October 2023: दसरा म्हणजे जसं विचारांचं सोनं लुटण्याचा दिवस असतो, तसाच तो राज्यातल्या जनतेसाठी राजकीय मेळाव्यांचा आणि त्यातील आरोप-प्रत्यारोपांचा, टीका-टिप्पणीचाही दिवस आता ठरू लागला आहे. आज मुंबईत शिंदे गट व ठाकरे गट अशा शिवसेनेच्या दोन्ही गटांचे स्वतंत्र मेळावे होत असून त्यातून हे दोन्ही गट आगामी राजकीय दिशा कोणती असेल, यावर सूतोवाच करण्याची शक्यता आहे. नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना परखड शब्दांत सुनावल्यामुळे त्याचाही परिणाम या मेळाव्यांमधील भाषणांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
Maharashtra News in Marathi: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील आणखी एक माजी नगरसेवक विलास चावरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येलाच वांद्रे विधानसभेतील माजी नगरसेवक फोडण्याचा मुहूर्त साधत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. चावरी यांच्यासह खारदांडा परिसरातील कोळी बांधवांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सांगली : शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास निघालेल्या कार्यकर्त्यांच्या मोटारीला कवठेमहांकाळ तालुक्यात अपघात होऊन एक जण ठार तर चौघे जखमी झाले आहेत. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
नाशिक – अमली पदार्थ माफिया ललित पाटीलचे धागेदोरे जिल्ह्यातील देवळा तालुक्यापर्यंत येवून पोहोचले आहेत. ललितचा चालक सचिन वाघ याने देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथे काही प्रमाणात अमली पदार्थ लपविल्याची तसेच काही अमली पदार्थ लोहोणेरजवळील गिरणा नदीपात्रात टाकल्याची कबुली दिल्याने साकीनाका पोलिसांनी देवळा तालुक्यात छापासत्र तसेच शोध मोहीम हाती घेतली आहे. सरस्वती वाडीत काही माल मिळाला असला तरी नदीपात्रातून अद्याप हाती काही लागले नाही.
नागपूर : मोसमी पाऊस यंदा सरासरी पूर्ण न करताच परतला आणि राज्यात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा सुरू झाला. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तो अधिक होता. मात्र, आता राज्यातील वातावरणात बदल होत असून नागरिकांना लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. यामुळे राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.
बुलढाणा: दसरा व धम्मप्रवर्तन दिनाची धामधूम सुरू असताना बुलढाणा चिखली राज्यमार्गावर झालेल्या अपघातात एक युवक ठार तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. चिखली बुलढाणा राज्य महामार्गावरील केळवद नजीक आज मंगळवारी ( दि २४) दुपारी ही दुर्घटना घडली.
चंद्रपूर : रावण आमचा देव असल्याने कुठल्याही परिस्थितीत रावण दहन करू नये, रावणाची प्रतिमा निर्माण करू नये अशी भूमिका आदिवासी बांधवानी घेतली. यामुळे घुग्घुस शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्था लक्षात घेता पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले.
मालेगाव : अटकेत असलेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयीन प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. हे सर्व आरोप खोटे असून आपली बदनामी करणारे असल्याचा आक्षेप घेत याप्रकरणी भुसे यांनी अंधारे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
मुंबईः निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानदेव वानखेडे यांनी सायबर फसवणूक झाल्याबाबतची तक्रार ओशिवरा पोलिसांकडे केली आहे. ओशिवरा पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी : केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लिंकरोड पत्राशेड येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातील ‘इ’ इमारतीतील १११ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत काढण्यात आली. त्यांना घराचा ताबा देण्यात आला.
आज महाराष्ट्रात एवढे गंभीर प्रश्न आहेत, मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा गंभीर होत असताना, ओबीसींच्या मनात एवढे प्रश्न असताना सरकारकडून समाजाची खूप अपेक्षा आहे. अपेक्षाभंगाचं दुःख सहन करण्याची शक्ती संपली आहे. शिवशक्ती परिक्रमा करण्याकरता महाराष्ट्रात गेले तेव्हा माझ्याकडे कोणतंही पद नव्हतं तरीही जेसीबीने फुले टाकून माझं स्वागत केलं. मी काय केलं जे मी त्यांना देऊ शकते. मी तुम्हाला फक्त स्वाभिमान देऊ शकते. मुंडे साहेबांना कधीच वाटलं नव्हतं की ते मुख्यमंत्री, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री होतील. कष्ट करत असताना राजकारणात येत असताना त्यांनी एकच सांगितलं की पंकजा तुझ्या पदरात ही जनता टाकतोय, यांची काळजी घे. ज्यादिवशी तुम्ही ११ कोटी जमवत होतात ना त्या दिवशी माझ्या मुलाने मला फोन केला आणि सांगितलं की मम्मी एवढे पैसे जमा केलेत. तू हे पैसे घेणार आहेस का. मी हे पैसे घेणार नाही, पण त्या लोकांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही, असं मी त्याला म्हणाले. भगवान बाबाच्या साक्षीने एक वाक्य सांगते, मला एवढे दिवस वाटत होता माझा मुलगा, बहिणींवर माझा हक्क आहेत. तेव्हा मी मुलाला सांगितलं की तुझ्यापेक्षाही काकणभर यांची जबाबदारी आहे. तुझ्यापेक्षा जास्त प्रेम हे करतात. काय केलंय यांनी असं. मला मिळालेलं शेवटचं पद. ग्रामीण विकास पद होतं माझ्याकडे. तुमच्या गावागावात ग्रामपंचायती कार्यालय दिलं, मुख्यमंत्री रस्ता योजना दिला, काम करताना चपला झिजवायला लागल्या नाही - पंकजा मुंडे
आवाज पूर्ण देशात पोहोचला पाहिजे. तुम्हा सर्वांनी उन्हा तान्हात येऊन माझ्या या सीमोल्लघंनासाठी गर्दीचं सीमोल्लंघन केलं, यासाठी तुमचे आभार - पंकजा मुंडे
मी तुमच्या नजरेतून पडले नाही. तु्महाला लाज वाटेल, अपमान वाटेल असं कृत्य केलं नाही. त्यामुळे डोंगर कपारीत तुम्ही येथे आलात. इथं आलेले माणूस एका जातीचा नाही. धनगर, माळी, मराठा, समाजातील लोक येथे उपस्थित - पंकजा मुंडे
शेतकरी सुखी नाही, ऊसतोड मजुरांना मजुरी वाढवून मिळायला हवी - पंकजा मुंडे
कोण घुसलं माझ्या मेळाव्यात, हळूच कोणीतरी माईकची वायर बंद केली. माझा आवाज आता दाबू शकत नाही - पंकजा मुंडे
बुलढाणा : राज्यातील गड किल्ले खाजगी व्यक्तीच्या ताब्यात देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे संतप्त पडसाद बुलढाण्यात उमटले. शिवप्रेमी विचार मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निर्णयाचा तीव्र निषेध केला.
वाशिम : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीम अनुयायांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी केली होती. नालंदा नगर येथून मोठ्या उत्साहात अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये नागरिकांनी समता आणि शांततेचा संदेश देत जय भीमचा जयघोष दिला.
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांची तुफान गर्दी केली आहे. सावरगावमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेसाठी मोठा जनसागर लोटला आहे.
धुळे: प्रलंबित मागण्यांसाठी आयटक संलग्न आशा व गटप्रर्वतक संघटनेतर्फे येथे मोर्चा काढण्यात आला. सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी अशा शिक्षण झालेल्या आशा स्वंयसेविकांना इंग्रजी सफाईदारपणे वाचता येत नाही. असे असतानाही त्यांना ऑनलाईन माहिती भरणे, अॅपमध्ये काम करण्याची सक्ती केली जात आहे. त्यांना ७२ शीर्षाखाली कार्यक्षेत्रातील जनतेला सेवा पुरवावी लागते.
तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दसरा सणाचे औचित्य साधत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे ते नागपूर तब्बल ८०० किलो मीटरच्या युवा संघर्ष यात्रेला आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले वाडा,लाल महाल येथून पुढे आप्पा बळवंत चौक, पत्र्या मारुती चौक, पेरू गेट, गांजवे चौक,नवी पेठ मार्गे टिळक स्मारक मंदिरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली यात्रा ११ वाजून ३० मिनिटांनी टिळक स्मारक येथे पदयात्रा पोहोचली. कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पोहोचताच फुलांची उधळण करीत त्यांचं स्वागत केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या युवकांच्या हितासाठी निघालेल्या, 'युवा संघर्ष यात्रेला माझा पाठिंबा आहे! - स्वाक्षरी मोहीम' या आशयाचा फलक पाहताच शरद पवार यांनी त्या फलकावर स्वाक्षरी करून युवा संघर्ष यात्रेला पाठींबा दर्शविला.
पुणे: बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती मिळणार असून टिळेकरनगर ते खडी मशीन या दरम्याची दीड एकर जागा महापालिका प्रशासनाच्या ताब्यात आली आहे.
पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात त्याची मैत्रीण ॲड. प्रज्ञा कांबळे सामील असल्याचे तपासात उघडकीस आले असून, लवकरच तिला अटक करण्यात येणार आहे.
नागपूर : अंबाझरी तलावावर आंघोळ करताना एक युवक बुडायला लागला. तलावावर गस्तीवर असलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांचे लक्ष गेले. त्यांनी लगेच पाण्यात उड्या घेऊन त्या युवकाचे प्राण वाचविले. प्रवीण (रा.परभणी) असे त्या युवकाचे नाव आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान पुन्हा मिळवण्यासाठी नवाझ शरीफ यांच्याकडे अनेक कायदेशीर आणि राजकीय मार्ग आहेत. आणि आपल्या राष्ट्राला बहुसंकटातून बाहेर काढण्यासाठी जादूची कांडी त्यांच्याहीकडे नाही. तरीही, शनिवारी रात्री लाहोरमधील विराट मेळाव्याला संबोधित करताना, त्यांनी भारताविषयी पाकिस्तानच्या देशांतर्गत चर्चा पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला. “शेजाऱ्यांशी लढत राहून कोणताही देश प्रगती करू शकत नाही,” असा आग्रह धरणाऱ्या शरीफ यांनी यापूर्वी तीनदा पंतप्रधानपद भूषवले आहे.
मुंबई : वसई-विरारचा पाणी प्रश्न मार्गी लावणाऱ्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुन्हा एकदा रखडले आहे. ३० ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र पंतप्रधानांचा मुंबई दौरा रद्द झाल्याने लोकार्पण पुन्हा लांबणीवर पडले आहे. तर वसई-विरारकरांची अतिरिक्त पाण्याची प्रतीक्षा वाढली आहे.
डोंबिवली: बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीत गुरुवार, शुक्रवार या दोन दिवसात तीन बेकायदा इमारतींवर प्रभाग अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली. सलग दोन दिवसांच्या या कारवाईने भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
नागपूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी बारा वाजता उघडकीस आली. प्रज्ज्वल विलास शंभरकर (२०, नवेगाव, ता. भीवापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
नागपूर : दीक्षाभूमीवर यंदा मोठ्या प्रमाणात पुतळ्यांची दुकानेही लावण्यात आली आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. या पुतळ्यांच्या किंमती हजार रुपयांपासून ते लाख रुपयांपर्यंत आहेत. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या एका पुतळ्याची किंमत वीस लाख रुपये आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महाराष्ट्रातील जनतेला दसऱ्याच्या निमित्ताने व्हिडीओच्या माध्यमातून शुभेच्छा!
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1716685276456862151
नागपूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी शहरातील विविध भागांतील क्रिकेट बुकींनी जरीपटका आणि लकडगंजमध्ये बैठक सुरू केली आहे. भारतविरुद्ध न्यूझीलँड संघादरम्यान झालेल्या सामन्यावर क्रिकेट नारा रोडवरील मराठा सावजीच्या वरच्या माळ्यावर सट्टेबाजी सुरू असताना जरीपटका पोलिसांनी छापा घातला. पोलिसांनी युवराज हरयानीला ताब्यात घेतले. मात्र, आर्थिक व्यवहार करून त्याला सोडून दिल्याची चर्चा आहे.
कल्याण – मागास, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ठाणे जिल्ह्यातील संस्था संचालित २६ मागासवर्गीय वसतीगृहांना मागील तीन वर्षापासून अनुदान मिळत नसून पूर्णपणे अनुदानावर चालणाऱ्या या वसतीगृहांमधील विदयार्थी, शिक्षक आणि सेवकांचे निधीच्या चणचणीमुळे हाल सुरू आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन उपस्थित
नागपूर : ऑर्गनिक पावरडच्या नावाखाली औषधी विक्रेत्याची १६ लाखांनी फसवणूक करणाऱ्या नायजेरीयन टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. कारवाई दरम्यान नायजेरियन आरोपीने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी नायजेरीयन आरोपीला पकडले, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी पत्रपरिषदेत दिली.
पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी होण्यासाठी हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे देणे योग्य आहे.
Maharashtra News in Marathi: मुंबईत आज दोन राजकीय मेळावे!