Maharashtra News Today, 24 October 2023: दसरा म्हणजे जसं विचारांचं सोनं लुटण्याचा दिवस असतो, तसाच तो राज्यातल्या जनतेसाठी राजकीय मेळाव्यांचा आणि त्यातील आरोप-प्रत्यारोपांचा, टीका-टिप्पणीचाही दिवस आता ठरू लागला आहे. आज मुंबईत शिंदे गट व ठाकरे गट अशा शिवसेनेच्या दोन्ही गटांचे स्वतंत्र मेळावे होत असून त्यातून हे दोन्ही गट आगामी राजकीय दिशा कोणती असेल, यावर सूतोवाच करण्याची शक्यता आहे. नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना परखड शब्दांत सुनावल्यामुळे त्याचाही परिणाम या मेळाव्यांमधील भाषणांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
Maharashtra News in Marathi: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
ठाणे : कळवा, विटावा आणि दिघा भागातील रहिवाशांना पायी ठाणे रेल्वे स्थानक गाठता यावे यासाठी खाडीवर विटावा ते चेंदणी कोळीवाडा असा पादचारी पुल तयार करण्यात आला आहे. या पादचारी पुलामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून विटावा येथून अवघ्या पाच ते सात मिनीटांत ठाणे स्थानक गाठता येऊ लागले आहे.
पिंपरी: व्यावसायिक मालमत्तांना आग लागण्याचे प्रमाण जास्त असल्याने शहरातील व्यावसायिक इमारतींचे अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाणार आहे.
पाहा सरसंघचालक मोहन भागवक यांचं दसरा विजयोत्सव सोहळ्यातील संपूर्ण भाषण!
ॐ श्री विजयदशमी उत्सव युगाब्द 5125 आश्विन शुद्ध दशमी नागपुर महानगर https://t.co/mt34RZlGfA
— RSS (@RSSorg) October 24, 2023
नागपूर : बाबासाहेबांनी १९५६ साली धम्मदीक्षेच्या माध्यमातून सामाजिक क्रांती केली. सामाजिक क्रांतीचा हा सोहळा साजरा करण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्यावतीने विशेष परेड काढण्यात आली. नांदेडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संघटनेच्या वतीने ही परेड काढण्यात आली.
गडचिरोली : पायाभूत सुविधांची वानवा, नक्षलग्रस्त व मागास अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १३ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पशुधन विकास अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी इतक्या संख्येने विद्यार्थ्यांची ‘एमपीएससीत’ निवड झाल्याने शिक्षण क्षेत्रातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतीमधील उद्वाहनाला यापुढे जाळीचे दरवाजे असू नयेत अशी शिफारस गोरेगाव उन्नत नगर आग प्रकरणी नेमलेल्या आठ सदस्यीय समितीने केली आहे. आग दुर्घटनांच्या वेळी उदवाहनाच्या (लिफ्ट) जागेतून आग आणि धूर पसरण्यास वाव मिळतो. यास्तव अशा इमारतीमधील उद्वाहनाला बंद स्टीलचे दरवाजे असणे सक्तीचे करण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे.
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात दसऱ्याच्या दिवशी विचारांचं सोनं लुटण्याची परंपरा आहे. राज्यात दसऱ्याच्या दिवशी आज अनेक राजकीय सभा होत आहेत. त्याचदरम्यान तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दसरा सणाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे ते नागपूर तब्बल ८०० किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून सुरुवात झाली.
बुलढाणा: जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांमागील दुष्टचक्र कायमच आहे! खरीप हंगाम तोट्याचा ठरला असताना झेंडूलादेखील जेमतेम भाव मिळाला. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली.
बुलढाणा: महाराष्ट्र सरकारने घेतलेला गड किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय हा छत्रपतींच्या इतिहासाशी बेइमानी असल्याची प्रखर टीका मनसेचे बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे यांनी केली आहे. शिवछत्रपतीच्या नावाने राज्य करण्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारच्या या निर्णयाविरुद्ध जन आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शासन प्रशासनाला पाठविलेल्या निवेदनात त्यांनी हा निर्णय खपवून घेतल्या जाणार नाही. शिवप्रेमी याला विरोध करतील असा इशारा दिला आहे.
गडचिरोली : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या महत्त्वाकांक्षी कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मेडीगड्डा धरणावरील पुलाला तडे गेल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
नागपूर : मिहान परिसरात दागिने निर्मितीसाठी एक ‘क्लस्टर’ मिळणार आहे. तेथे अद्ययावत दागिने निर्मिती हब झाल्यास सुवर्ण अलंकार व्यवसायाला बळ मिळेल, असा विश्वास उपराजधानीतील सराफा व्यावसायिक राजेश रोकडे, राजेश लोंदे, अंशुल हरडे, हर्षल दारोडकर यांनी व्यक्त केले.
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली अशोक विजयादशमीला दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. बाबासाहेबांनी सकाळी ९ वाजता भदंत चंद्रमणी महस्थाविर यांच्यामार्फत दीक्षा ग्रहण केली होती. त्रिशरण आणि पंचशील म्हणत हा कार्यक्रम पार पडला.
पुणे : पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन व्हावे, याकरिता आलेल्या लाखो भक्तांना सोन्याची साडी परिधान केलेल्या देवीचे दर्शन झाले.
बुलढाणा: सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेस गोवा येथे आयोजित एफसीबीए सोहळ्यात ‘बेस्ट ऑडिट प्रॅक्टिस’ आणि ‘बेस्ट आयटी हेड ऑफ द इयर’ या दोन पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
संजय राऊत म्हणतात, “देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही असून इथे ५०० कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं. जे यातून सुटलं, ते…!”
ठाणे: साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. नेमकी हि बाब लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी यंदाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध वस्तुंवर सवलती जाहीर केल्या आहेत.
शिवसेनेचा एकच दसरा मेळावा आहे. इतर मेळावे होत असतात. बाडगा जरा मोठ्यानं बांग देत असतो. नपुंसक जास्त कांदे खात असतो. हात पसरवून बाळासाहेबांच्या बरोबर फोटो लागले आहेत. पोटात कळ आल्यासारखा चेहरा केलाय फोटोत. लगेच जायचंय अशा हावभावाचा. बाळासाहेबांबरोबर असे फोटो लावण्याची आमची किंवा उद्धव ठाकरेंची कधी हिंमत झाली नाही. आम्ही शिवसेनेचे मालक नाही आहोत. आम्ही शिवसेनेचे विश्वस्त आहोत. हात पसरवून तुम्ही फडफड दाखवलीये, ती शेवटची आहे. तुमचा पुढचा दसरा मेळावा होणार नाही. तुम्ही डुप्लिकेट लोक आहात. हा डुप्लिकेट मेळावा आहे – संजय राऊत
नागपूर : काटोलमधील सोनखांब परिसरात एक ३० वर्षीय व्यक्ती रेल्वेतून खाली पडला. चेहरा विस्कटलेल्या अत्यवस्थ अवस्थेत लोहमार्ग पोलिसांनी त्याला प्रथम रेल्वे रुग्णालय व त्यानंतर नागपुरातील मेडिकलशी संलग्नित ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले. यशस्वी शस्त्रक्रियेतून तो बरा झाला. त्याने पत्ताही सांगितला असून लवकरच त्याला घरी पाठवले जाणार आहे.
ठाणे: ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात मंगळवारी, आज, ५९५ देवी मुर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी सुमारे चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जणार आहे.
श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांना सध्या फार कंठ फुटला आहे. ते एका गरब्यात गेले आणि त्यांनी गर्जना केली की देश का बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा. मग कधी बोलत नव्हता? जो बच्चा श्रीराम म्हणतोय, त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचतंय. त्याचा बंदोबस्त करा. पंचवटी रामाचंच ना? त्या नाशिकमधल्या पंचवटीत ड्रग्जचा सर्वात जास्त व्यापार चालू आहे. हे फडणवीसांना माहिती आहे का? पैठण तीर्थक्षेत्र आहे. तिथे काल अडीचशे-तीनशे कोटींचं ड्रग्ज सापडलं. आपका ड्रग्ज लेके श्रीराम नहीं बोलेगा. तुरुंगातून ड्रग्जमाफियांना पळवून लावलं जातंय आणि काय सांगतायत फडणवीस की जय श्रीरामच्या घोषणा द्या. श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल – संजय राऊत
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. या मेळाव्यात सरसंघचालक स्वयंसेवकांना काय संदेश देतात हे महत्त्वाचे असते.
आपण अनेक घटना बघतो आणि सहज लक्षात येतं. मणिपूर सध्या शांत होत आहे.च पण आपापसांत हा वाद कसा झाला? गेल्या अनेक वर्षांपासून तिथे मैतेई व कुकी सोबत राहात होते. अचानक वाद कसा झाला? भारताचं सीमेवरचं राज्य आहे ते. तिथे असे वाद होणं यात कुणाचा फायदा आहे? बाहेरच्या शक्तींचाही फायदा आहे. बाहेरचेच लोक होते का हे सगळं करणारे? सरकार मजबूत आहे आणि तत्परही आहे. खुद्द गृहमंत्री तिथे तीन दिवस जाऊन राहिले. सर्व प्रयत्न केले. देशाचं सरकार तिथे शांततेसाठी कटिबद्ध आहे. तरीही वाद चालू राहिले. कारण शांतीचा प्रयत्न चालू असतानाच कुठलातरी वाद निर्माण केला जात होता. ही हिंसा भडकवणारे लोक कोण होते? हे होत नाहीये, हे केलं जात आहे. त्यामुळे खूप सारं काम करावं लागेल. तिथे लोकांची मनं दुखावली आहेत. फक्त शांती नाही, आता समाजाला जोडण्याचंही काम करावं लागेल. संघाचे स्वयंसेवक आधीही तेच करत होते, आजही तेच करत आहेत. अशा स्थितीतही समाजात फूट निर्माण होऊ नये, यासाठी त्या परिस्थितीतही आपला जीव हातात घेऊन काम करत आहेत. मणिपूरमध्ये स्वयंसेवकांनी केलेल्या कामावर आम्हाला गर्व आहे. पण तिथे सगळ्यांना काम करावं लागेल. सरकारची इच्छाशक्ती तर आहेच. पण त्याचबरोबर प्रशासनाच्या कृतीशीलतेचीही गरज आहे. अविश्वास कमी करण्यासाठी तिथल्या नेतृत्वालाही काम करावं लागेल – सरसंघचालक मोहन भागवत
भारतात काही लोक असे आहेत ज्यांना असं वाटत नाही की भारत सक्षमपणे उभा राहावा. त्यामुळे भारतीय समाजात फूट पाडण्याचं काम हे लोक करत असतात. परस्पर अविश्वासामुळे आपणही कधीकधी त्याला फसतो. भारताचा विकास झाला, तर आपापसांतील कलह मिटतील, दु:ख जाईल, शोषण कमी होईल. यांच्या आधारावर स्वार्थाचा धंदा करणाऱ्या अंतर्गत ताकदींवरही भारताच्या विकासामुळे निर्बंध येतील. त्यामुळे हे लोक भारताच्या विकासाला कायम विरोध करत असतात. विरोध करण्यासाठी कुठल्यातरी विचारसरणीचा स्वीकार हे लोक करत असतात – मोहन भागवतDussehra 2023 Marathi News :
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आई-बाबा आणि सासू-सासरे यांचा आशीर्वाद घेऊन राज्यातील तमाम युवांच्या प्रश्नांवर सीमोल्लंघनासाठी निघालो.. यावेळी आपल्या संस्कृती-परंपरेप्रमाणे आई, ताई, पत्नी या सर्वांनी औक्षण केलं आणि पत्नी कुंतीने दही-साखरेचा चमचा हाती देऊन शुभेच्छा दिल्या… – रोहित पवार
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आई-बाबा आणि सासू-सासरे यांचा आशीर्वाद घेऊन राज्यातील तमाम युवांच्या प्रश्नांवर सीमोल्लंघनासाठी निघालो.. यावेळी आपल्या संस्कृती-परंपरेप्रमाणे आई, ताई, पत्नी या सर्वांनी औक्षण केलं आणि पत्नी कुंतीने दही-साखरेचा चमचा हाती देऊन शुभेच्छा दिल्या… pic.twitter.com/0wIEboHi92
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 24, 2023
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाला सुरुवात…
आपल्या नेतृत्वामुळे भारताचं विशिष्ट स्थान जगातल्या अग्रगण्य देशांत तयार झालं आहे – मोहन भागवत
आजचे तीन भाषणे तीन तऱ्हा आज नागपूर येथे मा. मोहनराव भागवत यांच्या भाषणातून सकारात्मक विचार मिळतील सायं. अस्सल शिवसैनिक एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या विकासावर बोलतील, बाळासाहेबांचा विचार मांडतील आणि त्याचवेळी शिवाजी पार्क वरून उध्दव ठाकरे – माझा पक्ष चोरला – माझा बाप चोरला – माझे आमदार पळविले – खंजीर, खोकी, आणि अशीच बडबड ऐकायला मिळेल – केशव उपाध्ये
आजचे तीन भाषणे तीन तऱ्हा
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 24, 2023
आज नागपूर येथे मा. मोहनराव भागवत यांच्या भाषणातून सकारात्मक विचार मिळतील
सायं. अस्सल शिवसैनिक एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या विकासावर बोलतील, बाळासाहेबांचा विचार मांडतील
आणि त्याचवेळी शिवाजी पार्क वरून उध्दव ठाकरे
– माझा पक्ष चोरला
– माझा बाप…
आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मेळाव्याचं चांगलं नियोजन केलं आहे. न भूतो, न भविष्यती असा सर्व विक्रम मोडणारा दसरा मेळावा यंदा होईल. शिवतीर्थावरचा दसरा मेळावा नसेल, शिमगा मेळावा असेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सरकारच्या नावाने, मुख्यमंत्र्यांच्या नावाने, मोदींच्या नावाने… सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिमगा करण्याचं काम ते करत आहेत. त्यामुळे दसऱ्याना न घेता तो शिमग्याला घ्यायला हवा होता. आरोप-प्रत्यारोपाशिवाय त्यांच्याकडे दुसरं काहीही नाही. तेच रडगाणं असेल. तीच जुनी रेकॉर्ड असेल. दुसरं काहीही नाही. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं. म्हणजे हिंदुत्वाचेही विचार गेले आणि बाळासाहेबांचेही विचार गेले. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
Maharashtra News in Marathi: मुंबईत आज दोन राजकीय मेळावे!