Maharashtra Politics गेल्या दोन दिवसांपासून एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडची असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजधानीत दाखल झाले आहेत. मात्र, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा चालू असताना फडणवीस व अजित पवार दिल्लीत असल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Update Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा
धारावीतील अनधिकृत शाळेचे इरादापत्र रद्द, शाळेतील ७०० विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन होणार
मुंबई : धारावीतील मॉर्निंग स्टार या शाळेमुळे पुन्हा एकदा अनधिकृत शाळांचा मुद्दा ऐरणीवर आला असून ही शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र असे असतानाही शाळा प्रशासनाने शासनाच्या सर्वच आदेशांना केराची टोपली दाखवली आहे.
दोडामार्ग मध्ये एस टी बसच्या धडकेने जंगली नर सांबराचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात बोडदे ते खोक्रल मुख्य रस्त्यावर टेंबवाडी येथे जंगली नर सांबराचा मांगेली दोडामार्ग एस टी बसला धडकून मृत्यू झाला. धडकेनंतर सांबर पंधरा फूट फरफटत गेले पुढील टायर एस टी मध्ये सिंगे अडकून एका बाजूने एस टी बस पलटी झाली असती, सुदैवाने विद्यार्थी बालंबाल बचावले.चालकाने प्रसंगावधान राखत बस मागे घेऊन अडकलेल्या सांबर नर याला ग्रामस्थ यांच्या मदतीने बाजूला केले.
चालकाने प्रसंगावधान दाखवले अर्जंट ब्रेक लावला असता तर प्रवासी शाळकरी मुले याना इजा झाली असती. घटनेची माहिती पोलिस पाटील यांनी दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.मांगेली देऊळवाडी ते दोडामार्ग एस टी. बस ही दोडामार्ग येथे जाण्यासाठी निघाली खोक्रल गावातून पुढे बोडदे टेंबवाडी येथे आली असता काजू बागेजवळ सकाळी साडेसहा वाजता अचानक नर सांबराने रस्ता पार करून पलीकडे जाण्यासाठी गटारातून उडी मारली तोच एस टी बसच्या धडकेत मृत्यू झाला.
गुजरातमध्ये दुचाकी पोहचविण्यानिमित्ताने फसवणूक
मुंबई : गुजरातमध्ये दुचाकी पोहचविण्याच्या बहाण्याने एका ट्रान्सपोर्ट कंपनीने घाटकोपरमधील एकाला १७ हजार रुपयांना गंडा घातला. तसेच दुचाकीही गायब केली. याप्रकरणी फसवणूक झालेल्याने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराप्रकरणी आई व तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा
मुंबई : सांताक्रुझ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीची आई व तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित मुलीच्या आईच्या प्रियकराने तिवर अत्याचर केला. तसेच आईने हा प्रकार कोणालाही न सांगण्याबाबत धमकावले होते
जळगाव जिल्ह्यात नवरदेव-नवरीची यात्रा भरणारे गाव
जळगाव : महाराष्ट्रात ठिकठिकाणी देव-देवतांच्या नावाने यात्रोत्सव भरत असतात. मात्र, जळगाव जिल्ह्यात असे एक गाव आहे, जिथे देव-देवतांची नव्हे तर, नवरदेव-नवरीची यात्रा कित्येक वर्षांपासून भरत आहे. यंदाही पौष अमावास्येनिमित्त धरणगाव तालुक्यातील भोणे या गावी जगावेगळी अशी ही यात्रा भरली आहे.
सविस्तर वाचा…
महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणारा आरोपी अटकेत
मुंबई : पैशांचे आमिष दाखवत महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपीला भांडुप पोलिसांनी अटक केली. आरोपीला अटक करतानाच पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कल्याणमधील चिंचपाडा येथील बेकायदा जीन्स कारखाने जमीनदोस्त; प्रदूषणामुळे रहिवासी होते हैराण
कल्याण पूर्वेतील आय प्रभागातील चिंचपाडा भागातील २२ जीन्सचे कारखाने आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी पोलीस बंदोबस्तात पालिका तोडकाम पथकाच्या साहाय्याने मंगळवारी जमीनदोस्त केले. सविस्तर वाचा…
पानसरे हत्या प्रकरण : सहा आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन
मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून अटकेत असलेल्या सहा आरोपींना उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. आरोपी बऱ्याच काळापासून अटकेत असल्याच्या कारणास्तव त्यांना जामीन मंजूर केला जात असल्याचे न्यायालयाने उपरोक्त निर्णय देताना स्पष्ट केले.
ठाण्यात फक्त कमळ ! गणेश नाईकांच्या घोषणेने शिवसेनेत अस्वस्थता
देशात एक काळ असा होता की जेव्हा ‘ओन्ली विमल’ ही जाहीरात सर्वत्र गाजत होती. आता देशात ‘ओन्ली कमळ’ हा एकमेव नारा सर्वत्र घूमत आहे. ठाणे शहरात भविष्यकाळात सुशासन हवे असेल, तुम्हाला २४ तास पाणी हवे असेल तर ठाण्यातही ‘ओन्ली कमळ’ हा नारा घुमायला हवा. सविस्तर वाचा…
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांनी शासनाचा साडे नऊ कोटी रुपये कर थकविला
कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांना शासनाचा साडे नऊ कोटी कर थकविल्याचे उघडकीस आले आहे. गौण खनिज उत्खननाचा कर (रॉयल्टी) न भरल्याने जिल्हा प्रशासनाकडून या कंपन्यांना नोटिस बजावण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
आयुक्तांनी फिरविला शब्द, ८० कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण
पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील ड्रेनेज लाइन आणि मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी ठेवण्यात आलेल्या ८० कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्याचा ‘प्रताप’ महापालिका प्रशासनाने केला आहे.
Supriya Sule on Ajit Pawar: “तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे”!
अजित पवार धनंजय मुंडेंना वाचवत आहेत असं वाटतंय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सुप्रिया सुळेंनी “तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे”, असं सूचक उत्तर दिलं आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना लक्ष्य केल्याचं त्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिसून आलं.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी वित्तीय तूट व्यवस्थापन कायदा आणला. जेणेकरून राज्यांच्या खर्चामध्ये शिस्त यावी. त्यानंतर मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. त्यात या कायद्याला आणखीन ताकद देण्यात आली. नंतर मोदी सरकारमध्ये वित्तीय तूट व्यवस्थापन व्यवस्थित झालं. पण नंतर या कायद्याचं केंद्र व राज्यांत काय नियंत्रण आहे याबाबत मी सातत्याने प्रश्न उपस्थित केले. कारण या कायद्याने एका मर्यादेच्या पुढे राज्यांना पैसे खर्च करता येत नाहीत. गेल्या अडीच ते तीन वर्षांत मी या कायद्यावर बोलत आले. आज निती आयोगाचा अहवाल आला आहे. त्यानुसार राज्याच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीत घसरण झालेली आहे. हे नीती आयोगाचे शब्द आहेत. आपण तिसऱ्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर गेलो आहोत. निर्यातीत गुजरातच्या मागे आहोत. इझ ऑफ डूइंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र आणखी खाली गेला आहे. महाराष्ट्र सरकारला याचा अभ्यास करून नियोजन करणं गरजेचं आहे. नाहीतर हे राज्य संकटात येण्याची दाट शक्यता असल्याचं मी सांगत होते. आज नीती आयोगानं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. ही संपूर्ण सरकारची जबाबदारी आहे. एका माणसाला आपण जबाबदार धरू शकत नाही. नैतिकता म्हटलं की या सरकारला आवडत नाही. जसा सत्तेत आल्यावर गुलाल तिन्ही पक्षांनी खेळला, तशा आज निती आयोगानं केलेल्या उल्लेखाची नोंद तिन्ही पक्षांना घ्यावी लागेल. अर्थमंत्रालयानं वेगवेगळ्या आर्थिक मुद्द्यांवर आक्षेप नोंदवले. पण मंत्रिमंडळ बैठकीत हे आक्षेप फेटाळण्यात आले – सुप्रिया सुळे
लाईव्ह |?मुंबई | पत्रकारांशी संवाद ?️ 29-01-2024
— Supriya Sule (@supriya_sule) January 29, 2025
https://t.co/9fMJGRe2eL
बनावट विवाह लावून धुळ्यातील तरुणाची फसवणूक, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील नऊ जणांविरोधात गुन्हा
नाशिक : पैशांच्या लोभापोटी अनेकांशी बनावट विवाह लावून तरुणांची फसवणुक करणार्या दलालांसह नऊ जणांविरोधात धुळे येथील पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. संशयितांकडे अनेक बनावट आधारकार्ड आढळून आले असून या प्रकरणात वाशिम, यवतमाळ, अमरावती, नाशिक, मालेगाव येथील महिला, मुलींसह युवकांचा सहभाग आढळून आला आहे.
धुळ्यात ‘बर्ड फ्लू’ प्रादूर्भावापूर्वीच २७ पथके तैनात, कुक्कुट व्यावसायिकांना सूचना
नाशिक : धुळे जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूपासून एकाही पक्षाचा मृत्यू झाला नसतानाही पशुसंवर्धन विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात येत आहेत. सतर्कता म्हणून २७ जलद प्रतिसाद पथके कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.गिरीश पाटील यांनी दिली.
सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात वाहनांची तोडफोड, दहशत माजविणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा
पुणे : सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात टोळक्याने दहशत माजविली. कोयते उगारुन टोळक्याने दुचाकी, रिक्षा, तसेच मोटारीच्या काचा फोडल्या. याप्रकरणी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आनंद शाहू चव्हाण (वय ३४, रा. शिवमल्हार सोसायटी. कोंढवा) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चहाची तल्लफ काळ ठरली…! चहा पिण्यासाठी थांबले आणि अपघातात मृत्युमुखी पडले; शीव पनवेल महामार्गावरील घटना
नवी मुंबई : आज सकाळी सहाच्या सुमारास शीव पनवेल महामार्गावर जुईनगर रेल्वे स्टेशन समोर एका भरधाव कारने दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक रिक्षा चालक ठार झाला तर दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झाला.
कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण, दोन महिलांविरुद्ध गुन्हा
पुणे : पदपथावर लापलेल्या दुचाकीवर कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला दोन महिलांनी धक्काबुक्की केल्याची घटना हडपसर भागात घडली. वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण केल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
पुणे : नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार मंगळवारी स्वत: रस्त्यावर उतरले. वाघोली परिसरातील कोंडी, सिग्नल व्यवस्था, कोंडीची ठिकाणांची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त अधिकाऱ्यांबरोबर दीड किलोमीटर चालत गेले.
पिंपरी : आता ‘जीबीएस’ची चाचणी वायसीएम, नवीन थेरगाव रुग्णालयात होणार
पिंपरी : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे निदान करण्यासाठीची ‘एनसीव्ही’ चाचणी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आणि नवीन थेरगाव रुग्णालयात मोफत केली जाणार आहे. या आजाराची माहिती देण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे.
GBS Patients in Pune: पुण्यात केंद्राचं पाहणी पथक दाखल
पुण्यात GBS अर्थात गुइलेन बॅरे सिंड्रोम बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचं उच्चस्तरीय पाहणी पथक पुण्यात दाखल झालं आहे.
डोंबिवलीत सहा लाखाच्या गांजासह तीन जणांना अटक, मध्यप्रदेशातून रेल्वेतून गांजा डोंबिवलीत
डोंबिवली : कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण, डोंबिवली शहरे नशामुक्त करण्याचे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत मागील दोन दिवसात उपायुक्तांच्या नियंत्रणाखालील विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने डोंबिवली शहराच्या विविध भागात कारवाई करून तीन गांजा तस्करांना अटक केली.
तासगावमध्ये २८ मुलांना प्रसाद खाल्ल्यावर विषबाधा
सांगली : मंदिरातील प्रसाद खाल्ल्यावर आरवडे (ता.तासगाव) येथील २८ मुलांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना रात्री घरी पाठविण्यात आले. रविवारी एका मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादातील शिल्लक राहिलेल्या पदार्थाचे वाटप सोमवारी दुपारी स्थानिक शाळेतील पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले. हा प्रसाद खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या, मळमळ याचा त्रास होऊ लागला.
सांगलीतील पुराचा धोका असलेल्या भागासाठी ४६८ कोटींचा आराखडा, जागतिक बँकेसमोर सादरीकरण
सांगली : पुराच्या पाण्याचा धोका असलेल्या भागासाठी ४६८ कोटींचा आराखडा महापालिकेच्यावतीने तयार करण्यात आला असून याचे जागतिक बँकेच्या प्रतिनिधीसमोर सादरीकरण करण्यात आले. महापालिकेच्या सभागृहात जागतिक बँकेचे पथक, मित्रा पथक आणि आराखडा तयार करणाऱ्या कंपनीचे अधिकारी यांची बैठक पार पडली.
वाल्मिक कराडच्या आर्थिक व्यवहारांच्या ईडी चौकशीचे आदेश द्या, जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात मागणी
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कथित आरोपी वाल्मिक कराड याच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) स्वतंत्र गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आली.
डोंबिवलीच्या श्रेयस गुरव यांची मुंबई रणजी संघात निवड
डोंबिवली : डोंबिवलीतील क्रिकेटपटू श्रेयस गुरव यांची मुंबई रणजी संघात निवड झाली आहे. क्रिकेटमध्ये मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रेयस यांचा रणजी संघ निवडीच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. या क्षणाची श्रेयस यांचे प्रशिक्षक, सहकारी क्रिकेटपटू वाट पाहत होते.
सविस्तर वाचा…
आरटीईसाठी १४ ते २७ जानेवारी पर्यंत ३१ हजार अर्ज प्राप्तप्रवेशासाठी, २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
ठाणे : आरटीई अंतर्गत होणाऱ्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला १४ जानेवारीपासून सुरुवात झाली. हे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला २७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. आताही मुदत वाढविण्यात आली असून २ फेब्रुवारी पर्यंत बालकांना अर्ज करता येणार आहे.
निसर्गसंपन्न परिसर म्हणून कोट्यावधींची घरे घेतली पण, तेच नष्ट होतेय
ठाणे : येथील वर्तकनगर भागातील रेंमड कंपनीच्या परिसरात जुने उद्यान आहे. या परिसरात आम्ही ज्यावेळी घरे घेतली, त्यावेळी त्या उद्यानाचा उल्लेख रेरामध्ये करण्यात आलेला होता. निसर्गसंपन्न परिसर असल्यामुळे आम्ही कोट्यावधी रुपयांची घरे खरेदी केली पण, त्याच निसर्गचा ऱ्हास होणार असेल तर, आमच्या घरांचा काहीच अर्थ उरणार नाही, अशा प्रतिक्रिया आता स्थानिक रहिवाशांमधून उमटू लागल्या आहेत.
ठाण्याच्या गडकरी रंगायतनची आसन क्षमता होणार कमी, जुन्या खुर्च्यांच्या जागी लागणार नवीन एैसपैस खुर्च्या
ठाणे : शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे काम गेले काही दिवस सुरू असून या कामादरम्यान, नाट्यगृहातील जुन्या खुर्च्या काढून त्याठिकाणी नवीन एैसपैस खुर्च्या बसविल्या जाणार असल्याने आसन क्षमता ५० ते ६० खुर्च्यांनी कमी होणार आहे.
ठाणे जिल्ह्यात चौका-चौकात अपघाताचे केंद्र
ठाणे : गेल्याकाही वर्षांमध्ये ठाणे शहरात नागरिकरण वाढले असताना त्यासोबतच अपघातांचे केंद्रही आता वाढू लागले आहे. मागील वर्षी अर्थात २०२४ मध्ये तब्बल २३० जणांना आपले प्राण अपघातात गमवावे लागले. यामध्ये दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. रस्ते ओलांडताना हे अपघात होत असतात.
वाल्मिक सायबर सेलमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी फोनवरून बोलत असल्याचं समजतंय. (PC : Walmik Karad Insta, Freepik)
Marathi News महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा