Maharashtra Politics गेल्या दोन दिवसांपासून एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडची असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजधानीत दाखल झाले आहेत. मात्र, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा चालू असताना फडणवीस व अजित पवार दिल्लीत असल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Marathi News Live Update Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा

11:42 (IST) 29 Jan 2025

अखेर बेस्टला मुहूर्त सापडला, विद्युतपुरवठा विभागात भरती सुरू

मुंबई : बेस्टच्या विद्युत विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली. विद्युतपुरवठा विभागातील जोडारी सहाय्यक (जॉइंटरमेट) या पदासाठी बेस्ट उपक्रमाने कर्मचाऱ्यांकडूनच अर्ज मागवले आहेत.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 29 Jan 2025

उल्हासनगरमध्ये सहा दिवसाच्या बाळाची आई, वडिलांकडून ९० हजार रूपयांना विक्री

कल्याण : उल्हासनगरमध्ये एका सहा दिवसाच्या बालिकेची आई, वडिलांनी एका जोडप्याला ९० हजार रूपयांना विक्री केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणात उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

11:40 (IST) 29 Jan 2025

फलटण परिसरात मृत बिबट्या आढळला, जिल्ह्यात महिनाभरातील चौथी घटना

सातारा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर फलटण तालुक्यातील निंभोरे हद्दीत गव्हाच्या शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला असावा, याचा वनविभाग तपास करत आहेत

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 29 Jan 2025

जीबीएस’ला प्रतिबंध करण्यासाठी सोलापुरात घरोघरी सर्वेक्षण, नव्या चार संशयित रुग्णांवर उपचार

सोलापूर : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असताना सोलापुरातही हे रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत चार संशयित रुग्णांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे चारही रुग्ण मूळचे सोलापूरचे नाहीत तर शेजारच्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील आहेत. दोन दिवसांपूर्वी एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 29 Jan 2025

पिंपरी : चिखली, कुदळवाडीतील पाच हजार लघुउद्योजकांना नोटीस; उद्योजकांचा एमआयडीसी बंद करण्याचा इशारा

पिंपरी : चिखली, कुदळवाडीतील भंगार दुकाने, गोदामे, कंपन्या, हॉटेल, वर्कशॉप्स, बेकरी अशी अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड उभारलेल्या पाच हजार आस्थापनांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड १५ दिवसांत काढून टाकावे, अन्यथा ती पाडण्याचा इशारा नोटिशीद्वारे दिला आहे.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 29 Jan 2025

क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; विरार येथील घटना

वसई : विरार पूर्वेच्या कोपर गावात क्रिकेटचा सराव करताना २७ वर्षीय तरुणाचा मैदानातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सागर मोतीराम वझे असे या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 29 Jan 2025

“इथं बीड जिल्ह्याचा बाप बसलाय”, वाल्मिक कराडची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला…

Walmik Karad Audio Clip : वाल्मिक कराड त्याच्या टोळीतील तरुणाला पोलिसांनी मुक्त करावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं या ऑडिओ क्लिपवरून समजतंय.

वाचा सविस्तर

11:35 (IST) 29 Jan 2025

लोखंडी प्लेटा अंगावर पडून चौघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : ट्रकमधील लोखंडी प्लेटा अंगावर पडून चार तरुण मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना २७ जानेवारी रोजी मध्यरात्री शिऊर बंगला जवळील टूनकी शिवारात घडली. सर्व मजुर हे मध्यप्रदेश राज्यातील धरमपुरा (ता. मनासा) येथील रहिवासी असून २० ते २२ वयोगटातील आहेत.

सविस्तर वाचा…

11:34 (IST) 29 Jan 2025

सांगलीत मेफेड्रोन उत्पादन करणारा कारखाना उद्ध्वस्त, ३० कोटींचा साठा जप्त, तिघांना अटक

सांगली : विट्याजवळ कार्वे औद्योगिक वसाहतीमध्ये सांगली पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) उत्पादन करणाऱ्या कारखाना उद्ध्वस्त करत २९ कोटी ७३ लाखांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी गुजरातच्या एका तरुणासह तिघांना अटक केली आहे. हे अमली पदार्थ या ठिकाणी तयार करून त्याची तस्करी केली जात होती

सविस्तर वाचा…

11:33 (IST) 29 Jan 2025

शेतकरी, सरकारची ‘ सोयाबीन कोंडी’ जाणून घ्या, नेमकी स्थिती, तूर खरेदीचे काय होणार

मुंबई : सोयाबीन हमीभाव खरेदीच्या प्रश्नावरून शेतकरी, प्रशासन आणि सरकारची कोंडी झाली आहे. उद्दिष्टापैकी ५७ टक्केच खरेदी झाली आहे. गोदामे भरली असल्यामुळे सोयाबीन ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे नव्याने खरेदी करता येत नाही, दुसरीकडे सोयाबीनचा गुंता सोडविल्याशिवाय तूर खरेदी सुरू करता येईना. त्यामुळे शेतकरी, प्रशासन आणि सरकार सोयाबीन कोंडीत अडकल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 29 Jan 2025

Sanjay Raut on Mahakumbh Stampede – संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

महाकुंभमेळ्यात मोठ्या संख्येनं लाखो लोक येत आहेत. भाजपाचे लोक करोडोच्या गोष्टी करतात. पण ते मार्केटिंग आहे. ही त्यांची प्रचारयंत्रणा आहे. लोकांंना बोलवून कामं दाखवणं हा त्यांचा इव्हेंट आहे. पण कुंभ हा इव्हेंट नसून श्रद्धेचा विषय आहे. इतक्या लोकांना तुम्ही बोलवत आहात, तर त्यांची व्यवस्था काय केली आहे? तिथे महिला रस्त्यावर झोपत आहेत. लोक अजूनही अखिलेश यादव यांच्या काळात झालेल्या कुंभमेळ्याची आठवण काढतात. ती सर्वोत्तम व्यवस्था होती. तिथे व्हीआयपी येतात. आमचे संरक्षण मंत्री आले तर एक दिवस पूर्ण घाट बंद होता. गृहमंत्री आले तर पूर्ण प्रयागराज बंद होतं. केंद्रीय मंत्री येतात तेव्हा पूर्ण परिसर बंद होतो. त्यातूनही व्यवस्थेवर ताण निर्माण होतो. भाजपा महाकुंभमेळ्याच्या माध्यमातून राजकीय प्रचार करत आहेए – संजय राऊत</p>

11:32 (IST) 29 Jan 2025

रील-रॅप गाणे बनवा, बक्षिसे मिळवा!

पिंपरी : महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्याकरिता ‘मी जबाबदार करदाता’ रील-रॅप-गाणे बनवा, स्पर्धेचे आयोजन केले आहे. समाजमाध्यमातून नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असून रिल्स बनविणाऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 29 Jan 2025

वाल्मिक कराडच्या आर्थिक व्यवहारांच्या ईडी चौकशीचे आदेश द्या, जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात मागणी

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कथित आरोपी वाल्मिक कराड याच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) स्वतंत्र गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आली.

सविस्तर वाचा…

11:21 (IST) 29 Jan 2025

Devendra Fadnavis in Delhi: देवेंद्र फडणवीस दिल्लीत

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले असून दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी ते भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील दिल्लीत आहेत. यावेळी धनंजय मुंडे हेदेखील दिल्लीत असणार असल्याची चर्चा चालू असून त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

 

वाल्मिक सायबर सेलमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी फोनवरून बोलत असल्याचं समजतंय. (PC : Walmik Karad Insta, Freepik)

Marathi News  महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा