Marathi News Today, 24 May 2023 : राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. राजकीय भेटीगाठीही वाढल्या आहेत. शिंदे गटातील काही आमदार आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याचं सांगत आहेत. दुसरीकडे विरोधकांकडून विविध मुद्द्यांवर शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगितल्यानंतर त्यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या अपडेट्स एका क्लिकवर…
Maharashtra News Today : राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या अपडेट्स एका क्लिकवर...
मुंबई: मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील मे महिन्यात होणाऱ्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी त्यांना भाजपाकडून दोन वर्षांपूर्वीच ऑफर आल्याचा गौप्यस्फोट केला. तसेच तेव्हाच महाविकासआघाडी सरकार कोसळलं असतं, असं म्हटलं. यानंतर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी देशमुखांकडे सर्व पुरावे असून त्यांनी हे पुरावे शरद पवारांनाही दाखवल्याचं नमूद केलं.
नागपूर: कोराडीतील प्रस्तावित औष्णिक वीज प्रकल्प कोराडीत नको म्हणून केंद्रीय नितीन गडकरीसह काँग्रेसने दंड थोपटले असताना ‘प्रहार’ ने मात्र हा प्रकल्प कोराडीत करा, अशी करण्याची मागणी केली आहे.
पुणे: औंध येथील जिल्हा रुग्णालयाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकास करण्याबाबत मंत्रालयात नुकतीच बैठक झाली.
मुंबई: शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि तो कोणत्याही व्यक्तीला नाकारला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले. तसेच परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) दाखल खटल्यातील आरोपीला परीक्षा केंद्रावर पोलीस सुरक्षा शुल्क जमा न करता उपस्थित राहण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली.
पुणे: दांडेकर पूल भागात एकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली. खूनामागचे कारण समजू शकले नाही.
कल्याण: पाच वर्षापूर्वी डोंबिवलीतील एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फसवून स्वताच्या घरात आणून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका २४ वर्षाच्या तरुणाला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. अस्थुरकर यांनी सक्तमजुरी आणि ११ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून परीक्षांचे विस्कळीत वेळापत्रक, प्रवेशपत्रे, रखडलेले निकाल व जाहीर झालेल्या निकालांमधील असंख्य त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना सातत्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थी संघटनांकडून मुंबई विद्यापीठ प्रशासनावर सडकून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या काळातही प्राध्यापकांकडून मूल्यांकनाचे काम सुरू आहे आणि प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे रखडलेले सर्व निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील, असे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी स्पष्ट केले.
सांगली : मिरज तालुक्यातील दोन गावांत दोन खूनाच्या घटना बुधवारी घडल्या असून एरंडोली येथे पत्नीने पतीचा चाकूने भोसकून, तर बेडग येथे मुलाने वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्याचा प्रकार घडला. संशयित पत्नी फरार झाली असून मुलाला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे : लष्कराच्या रस्ते बांधणी संस्थेतील (ग्रेफ) भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा देणाऱ्या तोतया उमेदवारांना पकडण्यात आले. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक – सिन्नर औद्योगिक वसाहतीत कोयत्याचा धाक दाखवून २० लाख रुपये असलेली बॅग पळविणाऱ्या चोरट्यास गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
चंद्रपूर : भद्रावती जवळ ‘जुरासिक’ ते ‘पर्मियन’ या २८ ते १९.५ कोटी वर्षादरम्यानच्या काळातील ‘ग्लासोप्टेरिस’ (Glassopteris) या प्रजातीच्या वनस्पती पानांची सुंदर जिवाष्मे मिळाल्याचा दावा येथील पर्यावरण आणि जीवाष्म संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे.
वर्धा : करोना संक्रमण काळात अनेक गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते. वर्षभरापासून बहुतांश थांबे टप्प्याटप्प्याने सुरू झाले. हिंगणघाट येथे मात्र स्थिती ‘जैसे थे’ असण्याच्या पार्श्वभूमीवर खासदार रामदास तडस यांनी पाठपुरावा सुरू केला होता.
भाजपा नेते आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल, भेटीचं कारण अस्पष्ट, राजकीय चर्चा की मुंबई क्रिकेट असोसिएशनबाबत भेट? चर्चांना उधाण
पुणे : राज्य मंडळाकडून गुरुवारी (२५ मे) बारावीचा निकाल दुपारी दोन वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. निकालानंतर लगेचच राज्य मंडळाकडून श्रेणीसुधार परीक्षेची अर्ज प्रक्रियाही सुरू केली आहे. त्या बाबतची माहिती राज्य मंडळाने जाहीर केली आहे.
अमरावती : आईने दुधातून दिलेले विष पिणाऱ्या ११ वर्षीय चिमुकलीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ११ मे रोजी मृत्यूशी सुरू झालेली तिची झुंज नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात संपली. मुलीला दुधातून विष देणाऱ्या आईविरुद्ध कुऱ्हा पोलिसांनी हत्या, हत्येचा प्रयत्न आणि आत्महत्येचा प्रयत्न आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
आता शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू होईल. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जाऊ लागू नये म्हणून राज्य सरकारने विविध नियोजनांसाठी राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच, यंदा दुबार पेरणीची वेळ येऊ देणार नाही, असं नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं.
येथील प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी केल्यावरही जवळपास पाच हजार चालकांना वाहन परवाने वितरित होऊ शकलेले नाहीत. परवाना नसल्याने अनेकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत असून नाहक दंड भरावा लागत आहे. सविस्तर वाचा…
पालघर : रेशन, पाणी आणि रोजगार हमीमध्ये काम द्या, अशा प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेमार्फत सुमारे १२००० महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून कार्यालयाला घेराव घातला आहे.
अनिल देशमुख सांगत आहेत ते खरं आहे. मला ते संपूर्ण प्रकरण माहिती आहे. अनिल देशमुखांवर कोणत्या प्रकारचा दबाव होता आणि त्यांना भाजपाने काय ऑफर दिली होती त्याचे पुरावे अनिल देशमुखांकडे आहेत. इतकंच नाही, तर त्याबाबतचे काही व्हिडीओही त्यांच्याकडे आहेत.
- संजय राऊत (खासदार, शिवसेना - ठाकरे गट)
पुणे : विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात जयेंद्र उर्फ भाई ठाकूर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले.
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले आहेत. आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. तेच देशमुख यांच्या अंगलट आले.
नागपूर : लष्करामध्ये रँक महत्त्वाची असते. संबंधित अधिकाऱ्याने परिश्रमपूर्वक आणि गुणवत्तेच्या आधारे ती प्राप्त केली असते. ती रँक म्हणजे गौरव असते. त्यामुळे लष्करी अधिकाऱ्यांना संबोधित करीत असताना त्या पदाची गरिमा ठेवून पदनाम योग्यप्रकारे वापरला जाणे आवश्यक आहे. अन्यथा त्या पदाचा अवमान होत असतो.
काही दिवसांपासून सुरु झालेली नैसर्गिक संकटांची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याचे दिसत आहे. तालुक्यातील कजवाडे येथे पुन्हा झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पॉलीहाउस, माध्यमिक शाळा, घरांची पडझड होऊन लाखो रुपयांची हानी झाली.
गोंदिया: जिल्हा परिषदेत शार्टसर्किटने आग लागल्याची घटना आज बुधवारला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. गोंदिया जिल्हा परिषदेत नेहमीच शार्ट सर्किटने आग लागल्याचे बघावयास मिळते.
https://twitter.com/shreebikkad/status/1661278458356576258
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी, राहुल गांधी, नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य अंगलट, काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडून कारवाई
नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसने चालत्या टँकरला मागील बाजूने धडक दिली. रात्रीची वेळ असल्याने प्रवासी गाढ झोपेत असताना वरील बर्थ वरून खालच्या बर्थवर कोसळले. सुदैवाने यामधे जीवितहानी टळली असली तरी १२ जण गंभीर जखमी झाले.
कल्याण: पाच वर्षापूर्वी डोंबिवलीतील एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फसवून स्वताच्या घरात आणून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका २४ वर्षाच्या तरुणाला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर. अस्थुरकर यांनी सक्तमजुरी आणि ११ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
दोन किंवा दोनपेक्षा अधिक पक्षांची निवडणूक आघाडी करणे तसे सोपे नसते. कुणाविरोधात निवडणूक लढवायची आहे, हे आघाडीतील पक्षांना माहीत असले किंवा त्यावर एकमत असले तरी, आघाडीत आपापल्या पक्षाचे वर्चस्व राखण्यासाठी किंवा नसलेले वर्चस्व वाढविण्यासाठी निवडणुकांच्या आधी अशा आघाड्यांमध्येच एकमेकांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण खेळले जाते. अशाच प्रकारे महाविकास आघाडीत सध्या निवडणूकपूर्व दबावतंत्रा खेळ सुरू आहे.
मोदी सरकारमधील मंत्र्यांनी, नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घाणेरड्या शिव्या दिल्या. हे लोक न्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेविरोधात सोशल मीडियावर मोहीम राबवतात. यांचे लोक निवृत्त न्यायाधीशांना देशद्रोही म्हणतात. त्यांचा न्यायव्यवस्थेवरच विश्वास नाही. आता हे म्हणत आहेत की, सर्वोच्च न्यायालयाने काहीही निर्णय दिला तरी आम्ही ऐकणार नाही. आम्ही अध्यादेश आणून सर्वोच्च न्यायालयाचे निकाल उलथवून टाकू, अशी त्यांची भूमिका आहे.
- अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली)