Marathi News Update, 23 November 2023 : राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश करण्यास छगन भुजबळांसह राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष सुरू झाला आहे. आज दिवसभरात यासंदर्भातल्या बातम्या पाहायला मिळतील. तसेच उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी हाती घेतलेल्या बचाव मोहिमेचा आजचा १२ दिवस आहे. बचाव मोहीम अंतिम टप्प्यात असून काही वेळात हे मजूर बोगद्यातून बाहेर येतील. त्यामुळे आज या बचाव मोहिमेच्या बातम्यांवरही आपलं लक्ष असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

19:16 (IST) 23 Nov 2023
कोल्हापूर : अखेर ठरलं, मागील तुटलेल्या ऊसाला १०० रूपये, FRP बाबतही मोठा निर्णय; राजू शेट्टींची माहिती

“मागील तुटलेल्या उसाला १०० रूपये व यंदाची पहिली उचल प्रतिटन एफआरपी अधिक १०० रूपये देण्याचे कारखानदारांना मान्य आहे,” अशी माहिती राजू शेट्टींनी दिली आहे.

18:55 (IST) 23 Nov 2023
धाराशिवमध्ये पुढील खासदार महायुतीचाच, माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा दावा

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी व्यक्त केला. मतदारसंघात आपला चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे पक्षाने आपल्याला उमेदवारी दिल्यास आपण ही जागा लढविण्यास इच्छूक असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये शिवसेना शिंदे गटाच्या लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी रवींद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख अजित लाकाळ आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव लोकसभा निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. लोकसभेची जागा भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट यापैकी कोणालाही मिळाल्यास एकत्रितपणे प्रयत्न करून महायुतीचाच उमेदवार लोकसभेवर पाठविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आपला लोकसभा मतदारसंघातील वाड्या, वस्ती, गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे. मागील वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर आपल्याला पुन्हा संधी मिळाली असती, असे सांगून येणार्‍या काळात ११ तालुक्यांमध्ये पक्षबैठका घेवून तसेच गावनिहाय शाखा स्थापन करून पक्षाची ताकद वाढविणार आहे. जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समिती गणनिहाय पक्षमेळावे घेवून पक्षविस्तार केला जाणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

17:42 (IST) 23 Nov 2023
नितीन गडकरी म्हणतात, ‘चांगल्या रस्त्यांमुळेच विदर्भाचा विकास शक्य’

शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि लोकप्रतिनिधींनी तज्ज्ञांमार्फत त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे, अशी अपेक्षा देखील नितीन गडकरींनी व्यक्त केली.

सविस्तर वाचा…

17:40 (IST) 23 Nov 2023
निवडणूक, प्रचारसभा नाही; तरीही नागपुरात राजकीय नेत्यांची मांदियाळी…

नागपूर: राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या पाचही राज्यात निवडणुका होत आहेत. तिकडे सर्वच राजकीय पक्षाच्या सभा, रोड शो होत आहेत. पण, नागपुरात सध्या निवडणूक नाही तरीही राजकीय नेते आज मोठ्या संख्येने येत आहेत.

सविस्तर वाचा…

17:08 (IST) 23 Nov 2023
पुणे : नीरा-भीमा जोड बोगद्यात पडून दोघा शेतकऱ्यांचा मृत्यू

इंदापूर : अकोले-काझड (ता. इंदापूर) येथे निरा-भीमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यात पडलेल्या दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री साडेअकराच्या सुमारास या दोघांचे मृतदेहच बचाव कार्य पथकाच्या हाती लागले. अनिल बापूराव नरूटे (वय ३२) आणि रतिलाल बलभीम नरुटे (वय ५०) अशी या दोन शेतकऱ्यांची नावे असून ते इंदापूर तालुक्यातील काझड येथील सिद्धेश्वर वस्ती येथील रहिवासी आहेत.

सविस्तर वाचा…

17:07 (IST) 23 Nov 2023

17:05 (IST) 23 Nov 2023
“…तर मी पंकजा मुंडेंना मुख्‍यमंत्री करेल”, महादेव जानकर यांची घोषणा

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर सध्या पक्षबांधणीसाठी जनस्वराज्य यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत.

सविस्तर वाचा…

16:51 (IST) 23 Nov 2023
एकल बेलदार समाजाचे २४ नोव्हेंबरपासून नागपुरात उपोषण; मागण्या काय? जाणून घ्या….

नागपूर: एकल बेलदार समाजाकडून सातत्याने माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांची जयंती व पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, न्याय मिळत नसल्याने काही समाज बांधवांकडून २४ ते २६ दरम्यान नागपुरातील संविधान चौकात उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

16:46 (IST) 23 Nov 2023
नागपूर : ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल सोमवारपासून; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर : कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या वर्धापन दिनानिमित्त २७ आणि २८ नोव्हेंबरला ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या संस्थापक अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला ज्ञानेश्वर रक्षक, माजी नगरसेविका वंदना भगत, नंदा गोडघाटे उपस्थित होते.

सविस्तर वाचा…

16:30 (IST) 23 Nov 2023
भंडारा : महाविद्यालयाचा निष्काळजीपणा; एमबीए प्रथम वर्षाचे १७ विद्यार्थी परीक्षेला मुकले

स्थानिक जे.एम.पटेल महाविद्यालयात एम.बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या १७ विद्यार्थ्यांना काल परीक्षेपासून मुकावे लागले.

सविस्तर वाचा…

16:24 (IST) 23 Nov 2023
पालकमंत्री म्हणाले, “पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक लावतो”; तुपकर म्हणतात, “मुदतीत कार्यवाही करा अथवा… “

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ही बैठक लावण्यात येईल असे वळसे पाटील म्हणाले.

सविस्तर वाचा…

15:55 (IST) 23 Nov 2023
पाषाणयुगीन कलाकृतींवर नागपुरात होणार संशोधन, देशातील पहिलेच केंद्र…

पाषाणयुगीन कलांवर संशोधन करण्यासाठी भारतात स्वतंत्र केंद्र नव्हते. भारतीय पुरातत्त्व विभागाच्यावतीने आता नागपुरात केंद्र सुरू केले गेले आहे.

सविस्तर वाचा…

15:53 (IST) 23 Nov 2023
नागपूर : जिल्हा बँक रोख घोट्याळ्यावर २८ नोव्हेंबरला निर्णय, माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी

नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावर येत्या मंगळवारी, २८ नोव्हेंबरला निर्णय होणार आहे. राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी जे.व्ही. पेखले-पूरकर यांच्यासमक्ष खटल्याची अंतिम सुनावणी पूर्ण झाली आहे.

सविस्तर वाचा…

15:48 (IST) 23 Nov 2023
“आमच्या काळात कोणताही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, विरोधकांकडून नुसतीच बोंबाबोंब”, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

राज्यात महायुती सरकार आल्यानंतर आमच्या काळात कोणताही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

सविस्तर वाचा…

15:42 (IST) 23 Nov 2023
नियमित कर्ज फेडूनही शेतकरी अनुदानापासून वंचित; राज्य सरकारची घोषणा हवेतच

नागपूर : नियमित कर्जफेड करणारे शेतकरी ५० हजार रुपयांच्या अनुदान योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची बाब समोर आली आहे.

सविस्तर वाचा…

15:21 (IST) 23 Nov 2023
तमाशातील मृत कामगारांच्या नातेवाईकांचा आक्रोश; पार्थिव घेण्यास नकार, जिल्हा रुग्णालयात तणाव

परिसरात दिर्घकाळ तणाव होता. शवविच्छेदन गृहाजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

15:10 (IST) 23 Nov 2023
नागपूर : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काल रक्तदान, आज निदर्शने; स्थायी करण्याची मागणी

कर्मचाऱ्यांकडून स्थायी करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून संविधान चौकात आंदोलन सुरू आहे.

सविस्तर वाचा…

15:10 (IST) 23 Nov 2023
“… तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमची बंद करु”; बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना अंनिसचं खुलं आव्हान

अंनिसचं हे खुलं आव्हान धिरेंद्र शास्त्री महाराज स्वीकारणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सविस्तर वाचा…

15:06 (IST) 23 Nov 2023
मुंबईतील रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार, ताशी १३० किमी वेगाने रेल्वे धावणार

मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि वेळेत होण्यासाठी, रेल्वे गाड्यांची गती वाढवण्यावर रेल्वे प्रशासन भर देत आहे. मध्य रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून गाड्यांचा वेग वाढवण्यात येत आहे. सध्या मध्य रेल्वेच्या १२०६.७३ किमी रेल्वे मार्गावरून ताशी १३० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावण्यास सज्ज आहेत. येत्या काळात मुंबई विभागातील सीएसएमटी ते कसारा, कर्जत दरम्यान ताशी १३० वेगाने रेल्वेगाडी धावण्यास सज्ज होणार आहे.

सविस्तर वाचा…

14:52 (IST) 23 Nov 2023
मुंबई : कोट्यवधींच्या खजिन्याचे आमिष दाखवून दीड कोटींची फसवणूक

मुंबई : कोलकात्यातील जमिनीत दडवलेला हजारो कोटी रुपयांचा खजिना सापडला असून त्याचा लाभार्थी बनवण्याचे आमिष दाखवून मुंबईमधील भुलेश्वर परिसरातील ५८ वर्षीय व्यक्तीची दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

14:36 (IST) 23 Nov 2023
राज्यातील शाळांमध्ये आता ‘वाचन चळवळ’, शालेय शिक्षण विभागाची मान्यता

पुणे – राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात इयत्ता तिसरीच्या ३० टक्केपेक्षा जास्त मुलांना लहान मजकूर, पाचवीपर्यंतच्या ४१ टक्के मुलांना त्यांच्या श्रेणीचा योग्य मजकूर वाचता येत नसल्याचे आढळून आले आहे. मात्र आता हे चित्र बदलण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये वाचन चळवळ राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सविस्तर वाचा…

14:31 (IST) 23 Nov 2023
नवी मुंबई: शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक

नवी मुंबई: सट्टा बाजार अर्थात शेअर मार्केट हे गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. मात्र त्याचा अभ्यास आवश्यक असल्याचे नियमित गुंतवणूक सांगतात.

सविस्तर वाचा…

14:30 (IST) 23 Nov 2023
“अपराधी वाटण्याचं कारण काय?” कॅसिनोमधील फोटोवरून राऊतांचा बावनकुळेंना प्रश्न; म्हणाले, “साडेतीन कोटी…”

चंद्रशेखर बावनकुळेंचा कॅसिनोमधला फोटो शेअर करत संजय राऊतांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं होतं. त्यावर रावसाहेब दानवेंसह अनेक भाजपा नेत्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले, “मकाऊला जाणं हा गुन्हा आहे असं मी कुठे म्हणतोय? पण तुम्ही लपवताय कशाला? तिथे कॅसिनो, पर्यटनातून चीननं आपली अर्थव्यवस्था भक्कम केली. जर बावनकुळे हे पाहायला गेले असतील तर त्यात अपराधी वाटण्याचं काय कारण आहे? खुलासे का करताय? उडवले असतील त्यांनी साडेतीन कोटी रुपये, आहेत त्यांच्याकडे पैसे. मान्य करा आणि शांत बसा. दानवे किंवा त्यांचे इतर लोक खुलासे का करतायत? त्यांचं मन का खातंय? तुम्ही मकाऊला जाऊन असं काय केलंय?”

14:15 (IST) 23 Nov 2023
मेळघाटात आढळल्‍या ८७ फुलपाखरू प्रजाती; पाच प्रजातींची प्रथमच नोंद

अमरावती : मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍पात नुकत्‍याच झालेल्‍या फुलपाखरू सर्वेक्षणात एकूण ८७ फुलपाखरू प्रजातींची नोंद करण्‍यात आली असून पाच प्रजाती प्रथमच आढळून आल्‍या आहेत.

सविस्तर वाचा…

14:11 (IST) 23 Nov 2023
“राजू शेट्टी, स्वाभिमानीशी फारकत घेतली काय?” रविकांत तुपकर म्हणतात, “मी आजही….”

तुपकरांनी स्वाभिमानी संघटनेशी फारकत घेतली का? हा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रश्नाचे उत्तर आता स्वतः रविकांत तुपकर यांनीच दिले.

सविस्तर वाचा…

14:00 (IST) 23 Nov 2023
पुणे : ‘ससून’चा कारभार अधांतरी! नवीन अधिष्ठात्यांच्या नियुक्तीचा आदेशच नाही

पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना राज्य सरकारने पदमुक्त केले होते. त्याच दिवशी उच्च न्यायालयानेही डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द करून आधीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर डॉ. काळे हे अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारून लगेचच रजेवर गेले. मात्र, तब्बल ११ दिवसांनंतरही डॉ. काळे यांच्या नियुक्तीचा आदेश न निघाल्याने ससूनचा कारभार अधांतरी सुरू आहे.

सविस्तर वाचा…

13:59 (IST) 23 Nov 2023
“पाऊले चालती शेगावची वाट…” ‘कार्तिकी’निमित्त संतनगरीत हजारो भक्तांची मांदियाळी; १५० दिंड्या दाखल

कार्तिकी एकादशीला जे भाविक व वारकरी पंढरपूरला जाऊ शकत नाही, ते दरवर्षी शेगावात दाखल होऊन श्रीचरणी नतमस्तक होतात.

सविस्तर वाचा…

13:52 (IST) 23 Nov 2023
पुणे स्थानकावर ‘रेस्टॉरन्ट ऑन व्हील्स’! प्रवाशांसाठी अनोखी सुविधा सुरू

पुणे : रेल्वेने गाडीच्या जुन्या डब्यांचा वापर करून त्यातच उपाहारगृह सुरू करण्याची अभिनव योजना राबविली आहे. पुणे स्थानकावर ताडीवाला रस्त्याच्या बाजूच्या वाहनतळात रेल्वेच्या डब्यात उपाहारगृह उभारण्यात आले आहे. हे उपाहारगृह बुधवारपासून (ता. २२) सुरू करण्यात आले.

सविस्तर वाचा…

13:44 (IST) 23 Nov 2023
संघर्ष यात्रेच्या समारोपासाठी शरद पवार १२ डिसेंबरला नागपुरात, विधानभवनावर धडकणार यात्रा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांची संघर्ष यात्रा १२ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर धडकणार आहे.

सविस्तर वाचा…

13:32 (IST) 23 Nov 2023
नागपूर ‘एम्स’मध्ये स्वतंत्र ‘ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी’ कक्ष; कर्णदोषाच्या रुग्णांना होणार लाभ

कान-नाक-घसा रोग विभागात स्वतंत्र ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

“मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरच्या पुढे एकही दिवस देणार नाही : मनोज जरांगे पाटील

आम्ही जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्यं केलेली नाहीत. ज्यांनी केली त्यांना अडवायचं होतं. आम्ही त्यांना उत्तर दिलं. घरात कुणी काही बोललं तर दुसरा माणूस विचारतोच की असं का बोललास बाबा? तसंच आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही आता २४ डिसेंबर पेक्षा जास्त वेळ सरकारला देणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. माझ्या समाजाला मी विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. २४ तारखेनंतर काय करायचं तो निर्णय मी त्यांनाच विचारुन घेणार आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.