Marathi News Update, 23 November 2023 : राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश करण्यास छगन भुजबळांसह राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष सुरू झाला आहे. आज दिवसभरात यासंदर्भातल्या बातम्या पाहायला मिळतील. तसेच उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी हाती घेतलेल्या बचाव मोहिमेचा आजचा १२ दिवस आहे. बचाव मोहीम अंतिम टप्प्यात असून काही वेळात हे मजूर बोगद्यातून बाहेर येतील. त्यामुळे आज या बचाव मोहिमेच्या बातम्यांवरही आपलं लक्ष असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर
बाळ कमी वजनाचे जन्मले. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच बाळाला अपस्मारचे झटके आले.
उरण: उरण- पनवेलच्या विविध खाड्या, किनारपट्टीवरील जलप्रदूषण वाढले आहे. तर दुसरीकडे मातीचा भराव करून खाडीमुख बुजविण्यात येत आहेत. खाडीतील वाढते जलप्रदूषण आणि भराव यामुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या विविध माश्यांच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
जुन्या अधिसूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसींच्या ४६ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली.
पनवेल: करंजाडे वसाहतीमध्ये नववी इयत्तेत शिकणा-या विद्यार्थीनीने घरातील गॅलरीमध्ये गळफास घेऊन जिवनयात्रा संपवली. ही घटना १ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता घडली. सविस्तर वाचा….
डोंबिवली – हवा प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई उच्च न्यायालयाने कठोर आदेश दिले आहेत. पालिका, पोलीस, वाहतूक सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. परंतु, डोंबिवली एमआयडीसी परिक्षेत्रात धूळ नियंत्रणासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या आहेत. धुळीमुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारी आहेत.
नवी मुंबई: दिवाळी सुट्ट्यांमुळे राज्यात सर्वच ठिकाणी रक्त तुटवडा जाणवत आहे. निगेटिव्ह ग्रुपचे रक्त जवळपास संपल्यात जमा आहे. याची गांभीर्याने दखल घेत नियमित रक्तदान शिबीर आयोजित करणाऱ्यांना लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात शिबिरे घेण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे.
पुणे : सणासुदीच्या काळात वाहने खरेदीला प्राधान्य दिले जाते. यंदा दसरा ते दिवाळी या कालावधीत पुण्यात २५ हजारांहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत सुमारे ३ हजाराने वाढ झाली असून, ग्राहकांची सर्वाधिक पसंती दुचाकींना आहे.
नवी मुंबई: अनेक अडथळ्यांनंतर वाशी सेक्टर ३ येथे पालिकेची बहुउद्देशीय इमारत उभी राहिली असून बरीच वर्षे विविध ठिकाणी भाड्याने जागा घेऊन कार्य करणाऱ्या साहित्य-संस्कृती, कला, सामाजिक संस्था पुन्हा एकाच छताखाली आल्याचा आनंद जुन्याजाणत्या नवी मुंबईकरांसह नेटाने संस्था चालवणाऱ्या संस्थांना झाला आहे.
पिंपरी : उद्यान, नगररचना आणि आरोग्य विभागाच्या सात लाचखोर निलंबित कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पुन्हा सेवेत घेतले आहे. निलंबन आढावा समितीच्या शिफारशीनुसार सेवेत घेतल्याचे प्रशासनाने सांगितले.
डोंंबिवली – येथील पूर्व भागातील सुनील नगरमधील ग प्रभाग कार्यालयासमोरील रस्ते, गटाराला बाधा न येणारे बहरलेले गुलमोहराचे जुने झाड तोडण्यात आले आहे. या प्रकाराबद्दल रहिवाशांबरोबर पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या नियोजनशून्यतेमुळे वर्दळीच्या ठिकाणी वाहने कोठे उभी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दरवर्षी २३ नोव्हेंबरला शहीद बांधवांना आदरांजली वाहिली जाते. यावेळी अनेक नेतेही आदरांजली अर्पण करून गोवारी समाजाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देतात.
पिंपरी : शहरातील नागरिकांना विजेवरील वाहने चार्जिंग करण्याची सुविधा देण्यासाठी महापालिकेने २२ ठिकाणी खासगी संस्थेद्वारे चार्जिंग स्थानके उभारण्याचे नियोजन केले आहे. मात्र, दीड वर्षात तीन वेळा राबविलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे आता निविदेमधील अटी-शर्तीत बदल करून चौथ्यांदा सुधारित निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.
हातकणंगले, शिरोळ तालुक्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कार्यकर्त्यांमुळे पोलीस ठाण्यांमध्ये गर्दी झालेली आहे.
ठाणे : डुबी रेतीच्या व्यवसायाचे यांत्रिकीकरण केल्यास या व्यवसायावर अवलंबून असलेले मुंब्रा, कशेळी आणि घोडबंदर अशा ३५ गावांतील ३ हजार ग्रामस्थ कुटुंब, कष्टकरी आदिवासी मजुरांची उपजीविका नष्ट होईल. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे गंभीर संकट ओढवेल. त्यामुळे डुबी रेती व्यवसाय बंद करून त्याचे यांत्रिकीकरण करू नका अशी मागणी रेती व्यवसायिकांचे प्रतिनिधी दशरथ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
५२ टक्के आरक्षण ओबीसींना देण्यात यावे. त्यानंतर इतरांना आरक्षण द्यावे, अशी मागणी लोकजागर अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुणे : लसीकरणासाठी आणलेल्या श्वानाचा गळफास लागून मृत्यू झाल्या प्रकरणी दोन पशुवैद्यकीय तज्ज्ञांसह चौघांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पाषाण परिसरातील एका पेट क्लिनिकमध्ये ही घटना घडली.
दरवर्षी कार्तिकी एकादशीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. यात्रे निमित्ताने लाखो भाविक ताकई येथे दाखल होत असतात.
पनवेल: तालुक्यामधील जुन्या पूणे मुंबई महामार्गावर बारवाई गावासमोरील मार्गात दुचाकीवरुन रेल्वेस्थानकापर्यंत जाणा-या एका दुचाकीस्वाराला अनोळखी वाहनाने पाठीमागून धडक देऊन ठार केले. या अपघातामध्ये ५६ वर्षीय अनैय्या दोडाघट्ट रंगप्पा यांचा मृत्यू झाला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझं मराठा समाजाला आव्हान आहे की शांततेत राहा. कारण आरक्षणाचा दिवस जवळ आला आहे. छगन भुजबळांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेवर आणि विरोधावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, बहुतेक त्यांना सरकारनेच पाठबळ दिलं असावं. नाहीतर त्यांना भाजपाकडून काहीतरी ऑफर आली असेल. किंवा भाजपाने त्यांना पाठबळ दिलं असेल. कारण गृहमंत्री यावर काही बोलत नाहीत. गृहमंत्री त्यांना (भुजबळांना) थांबवत नाहीत. आरक्षण देतो सांगून मराठा समाजाला त्रास देण्यासाठी पलटी मारायचं ठरलंय की काय अशी शंका येत आहे.
“मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरच्या पुढे एकही दिवस देणार नाही : मनोज जरांगे पाटील
आम्ही जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्यं केलेली नाहीत. ज्यांनी केली त्यांना अडवायचं होतं. आम्ही त्यांना उत्तर दिलं. घरात कुणी काही बोललं तर दुसरा माणूस विचारतोच की असं का बोललास बाबा? तसंच आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही आता २४ डिसेंबर पेक्षा जास्त वेळ सरकारला देणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. माझ्या समाजाला मी विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. २४ तारखेनंतर काय करायचं तो निर्णय मी त्यांनाच विचारुन घेणार आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.