Marathi News Update, 27 November 2023: महाराष्ट्रासह गुजरातमधील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. पुणे, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, अहमदनगर परिसरात गारपिटीसह पाऊस कोसळला आहे. यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी, भुईसपाट, भाजीपाला, तूर, हरभरा अशा पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी घराचं मोठं नुकसान झालं असून पशूहानीही झाली आहे. आज पुन्हा उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पिवळा इशारा दिला आहे.
दुसरीकडे, मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी प्रक्षोभक विधान केलं आहे. ओबीसी विरोधात कुणी बोलण्याची हिंमत केली, तर त्याचे हात-पाय कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा, असं विधान तायवाडे यांनी केलं. यावर आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहे. यासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…
Maharashtra Breaking News Live Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
सत्य बाहेर काढणं हे सरकारचं काम असतं. ते सत्या बाहेर निघालंच पाहिजे, त्यासाठी समितीचं काम संपू शकत नाही. त्यामुळे नोंदी शोधण्याचं काम थांबवायचं नाही, नाहीतर मराठा समाजाच्या रोषाला बळी पडावं लागेल – मनोज जरांगे पाटील
कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. तृणाली महातेकर यांना पालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी आणलेल्या एका फिरस्ती महिलेला दाखल करून घेऊन तिच्यावर उपचार करण्याऐवजी तिला अन्यत्र जाण्याची सूचना डाॅ. महातेकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी दिली होती. याप्रकरणी चौकशी समितीने त्यांच्यावर ठपका ठेवला होता.
जिल्ह्यात वृद्ध कलावंत निवड समिती अद्यापही गठीत न झाल्याने शेकडो वृद्ध कलावंताचे अर्ज जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात प्रलंबित आहेत.
आमदार डॉ.पंकज भोयर यांनी स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक व जिल्ह्याची ओळख असलेला गांधी चरखा डव्हिस यांना भेट दिला.
पुढे गेलेले तानाजी सावंत पुन्हा मागे येऊन पत्रकाराच्या खांद्यावर हात ठेवत आणि त्याच्या गालास हात लावून ‘थोडं शांत’ असं म्हणाले.
वाडा: दोन दिवस वादळीवाऱ्यासह कोसळत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या भात पिकाचे, रब्बी पिकाचे तसेच भाजीपाला शेतीचे नुकसान तर केलेच पण या वादळीवाऱ्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली.
नागपूर: राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली आहे. याबाबत जिल्हाधिका-यांना अहवाल पाठवण्यास सांगितले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नागपूर : राज्यात शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, दरवर्षीप्रमाणे यावेळीही निकालाचा टक्का घसरला आहे. ३ लाख १९६२ पैकी केवळ ६४ हजार ८३० परीक्षार्थी सीईटीसाठी पात्र ठरले आहेत.
नागपूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.
नागपूर : फेसबुकवरून ओळखी झालेल्या युवकाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला मौद्यातील बालाजी लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तरुणीचे अश्लील छायाचित्र काढून समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय टारजन मेश्राम (३४, शिवसुंदरनगर, दिघोरी) असे आरोपीचे नाव आहे.
अकोला : जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सर्वत्र पाऊस सुरू आहे. हिवाळ्याच्या दिवसांत अवकाळीमुळे सर्वत्र जलमय परिसर झाला. वादळी वाऱ्यामुळे विविध भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
कोल्हापूर: प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त येथील पंचगंगा घाट हजारो दिव्यांनी प्रकाशमान झाला. दीपोत्सवाने पंचगंगेला चढलेला साज पाहण्यासाठी करवीरकरांनी एकच गर्दी केली होती. पंचगंगा नदी घाट आणि दीपोत्सव हे अनोखं नातं आता घट्ट झाले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा करण्यासाठी गेले दोन दिवस आधी तयारी सुरू होती.
मुंबईत सुमारे पाच लाख ल आस्थापना असून त्यात दुकाने, कार्यालये, हॉटेल, दवाखाने या सगळ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत मुंबईतील ८० टक्के आस्थापनांनी मराठी नामफलक लावले असून २० टक्के अस्थापनांनी देवनागरीत फलक लावलेले नाहीत.
प्रज्वल आणि दोन आरोपी हे तिघेही एकमेकांचे मित्र असून यातील मृताचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते.
रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यावर चालकाच्या मानेत खुपसलेला चाकू तशाच अवस्थेत टाकून आरोपींनी पळ काढला.
विरार रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक सहाच्या जवळ असलेल्या केबलमध्ये शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
तंत्र-मंत्राने घरातील ब्रम्हराक्षसाला पळवून लावण्याची बतावणी करीत महिलेकडून १२ लाख रुपयांचा माल तीन भोंदूबाबांनी उकळला.
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला ‘डिसक्वालिफाय’ करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून ‘या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?’ असा प्रश्न पडतो. एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहिर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहिर माफी मागितली पाहिजे. – सुप्रिया सुळे (खासदार, शरद पवार गट)
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला 'डिसक्वालिफाय' करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून 'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?' असा प्रश्न पडतो. एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहिर सभांतून जनतेला… pic.twitter.com/XTOxk9A6nx
— Supriya Sule (@supriya_sule) November 27, 2023
पनवेल: पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) कार्यालयात वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी सामान्यांकडून अतिरीक्त शुल्क वसूल केले जाते. या भ्रष्टाचाराबाबत अनेक तक्रारी सामान्य नागरिकांकडून केल्यानंतर पनवेल आरटीओ विभागाच्या कारभारात काहीच सुधारणा होत नव्हती.
मुंबई: मुंबई शहर तसेच उपनगरांत रविवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. अनेक भागात विजांचा कडकडाटदेखील अनुभवायला मिळाला. दरम्यान, पुढील तीन चार तासांत मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जी वेळमर्यादा दिली आहे. त्यानुसार लवकरात लवकर निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न आहे. परंतु हा निर्णय घेताना संपूर्ण प्रक्रिया राबवणं महत्त्वाचं आहे. नैसर्गिक न्याय तत्त्व आणि विधानसभेचे नियम न डावलता लवकरात लवकर निर्णय घेण्याचा माझा प्रयत्न असेन. -राहुल नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष)
मुंबईः फॉरेक्स ट्रेडिंग अॅपद्वारे शिपिंग कंपनीच्या कॅप्टनची ३७ लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्या प्रकरणी एकाला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. सतीश गुप्ता असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दमयंतीचे हेच माहेर तसेच दशरथ राजाची आई राणी इंदुमती आणि प्रभू रामाची भक्त शबरी हिचे जन्मस्थान हेच असल्याचा दाखला आहे.
भारतीय हवामान विभागाने २६ आणि २७ नोव्हेंबर असे दोन दिवस पालघर जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे.
ठाणे: आपल्याकडे पाहून हसत असल्याच्या संशयातून तीन महिलांनी एका तरूणीला मारहाण करत डोके जमीनीवर आपटून तिची हत्या केली. मुक्ता कळशे (२२) असे मृत महिलेचे नाव आहे.
मुंबई: बोरीवली पूर्व येथे नाकाबंदी दरम्यान एकाच दुचाकीवरून तिघे प्रवास करत असल्यामुळे पोलिसांनी रोखले असता आरोपी दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने दुचाकी चालवून सहाय्यक फौजदाराला धडक देऊन जखमी केले.
वनमंत्री व वनाधिकारी यांच्यावर ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.
विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या तेराही तालुक्यात हजेरी लावत पिकांची नासाडी केली.
पालघर जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात ९ हजार हेक्टर क्षेत्रावर वाडा कोलमची लागवड करण्यात आली होती.
ठकसेनाने त्यांना अमेरिकेतील शिकागो येथील एका आंतरराष्ट्रीय कमर्शियल मॅनेजमेंट कंपनीची वेबसाईट पाठविली.
मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी नियुक्त केलेली न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती बरखास्त करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. यावरून बच्चू कडूंनी भुजबळांना खुलं आव्हान दिलं आहे.