Marathi News Update, 27 November 2023: महाराष्ट्रासह गुजरातमधील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. पुणे, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, अहमदनगर परिसरात गारपिटीसह पाऊस कोसळला आहे. यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी, भुईसपाट, भाजीपाला, तूर, हरभरा अशा पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी घराचं मोठं नुकसान झालं असून पशूहानीही झाली आहे. आज पुन्हा उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पिवळा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दुसरीकडे, मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी प्रक्षोभक विधान केलं आहे. ओबीसी विरोधात कुणी बोलण्याची हिंमत केली, तर त्याचे हात-पाय कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा, असं विधान तायवाडे यांनी केलं. यावर आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहे. यासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

11:38 (IST) 27 Nov 2023
रेल्वेमार्गाच्या निर्मितीत कोट्यवधींचा खर्च अन् वर्षभरात केवळ एकच रेल्वेगाडी, ‘या’ रेल्वेमार्गावर…

कोट्यवधींच्या खर्चातून निर्मिती करण्यात आलेल्या या मार्गावर वर्षभरापासून केवळ एकाच डेमू गाडीच्या तीन फेऱ्या होत आहेत.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 27 Nov 2023
चंद्रपूर : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

चांदा फोर्ट – गोंदिया रेल्वे मार्गावर नागभीड तालुक्यातील किटाळी मेन्ढा येथे रेल्वेखाली येऊन वाघाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 27 Nov 2023
यवतमाळ : जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

या पावसामुळे तुर आणि कापसाला फटका बसला आहे.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 27 Nov 2023
विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा; बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत “ऑरेंज अलर्ट”

उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 27 Nov 2023
नवी मुंबईतील उद्धव ठाकरे गटाचे नेते पवारांच्या भेटीला

साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवली होती.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 27 Nov 2023
पुणे: जिल्ह्यातील २२ धरणांत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

पुणे: जिल्ह्यातील २२ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवाळीतही अशाच प्रकारे धरणांच्या परिसरात पाऊस पडला होता.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 27 Nov 2023
मुंबई सेंट्रलमधील बहुमजली इमारतीला आग

मुंबई: मुंबई सेंट्रल येथील आग्रीपाडा पोलीस स्थानकानजिक असलेल्या एकवीस मजली इमारतीला सोमवारी सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

सविस्तर वाचा…

10:57 (IST) 27 Nov 2023
संविधान बदलण्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, “कुणाचाही बाप…”

सध्याचं सरकार संविधान बदलू इच्छित आहे, असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. आंबेडकरांच्या या वक्तव्यावर आता भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणाचाही बाप संविधान बदलू शकणार नाही. संविधानाचा मूळ गाभा कुणालाच बदलता येत नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

सविस्तर बातमी

10:54 (IST) 27 Nov 2023
“तुम्ही हातपाय कापा, आम्ही…”, बच्चू कडूंचा ओबीसी नेत्याला इशारा

ओबीसी नेते तायवाडे त्यांनाही माझा इशारा आहे की, तुम्ही हातपाय कापा आम्ही जोडण्याचं काम करू. तुमची बुद्धी इतक्या खालच्या पातळीवर गेली असेल तर मी त्याचा निषेध करतो. -बच्चू कडू

सविस्तर बातमी

मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी नियुक्त केलेली न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती बरखास्त करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. यावरून बच्चू कडूंनी भुजबळांना खुलं आव्हान दिलं आहे.