Marathi News Update, 29 November 2023 : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हबाबत निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी पार पडणार आहे. त्यासह शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. तसेच, मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाच्याप्रकरणावरून राजकीय वातवारण चांगलंच तापलं आहे. यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra Breaking News : राजकीय, क्राइम, खेडोपाड्यातील प्रत्येक घडामोड फक्त एका क्लिकवर…
ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) शुक्रवारी काटई नाका येथे जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
पुणे: शासकीय रक्तपेढ्यांतील रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी साखळी पद्धतीने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे. या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न ९३ महाविद्यालयांमध्ये डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय रक्तपेढ्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
“छगन भुजबळांना ओबीसींचं भलं करायचे असेल, तर आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. पण, मराठ्यांना वेगळं करून भलं होतं नाही,” असं विधान आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचे? याप्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. यावेळी वकील देवदत्त कामत यांनी अजित पवार तिखट सवाल विचारला. “शरद पवारांनी हुकूमशाही पद्धतीनं पक्ष चालवला, तर अध्यक्षपदाची निवडणूक का लढली नाही? निवडणूक फॉर्मवर अजित पवारांची सही आहे,” असं देवदत्त कामत यांनी म्हटलं.
मुंबई: काळबादेवीतील एका रस्त्याला अनधिकृतपणे एका व्यक्तीचे नावे देण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने या प्रकरणी पालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे.
पुणे: शहर आणि परिसराला सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने तडाखा दिला. मात्र त्यानंतर शहरातील तापमानात घट होऊन बुधवारी सकाळी शहरात धुके पसरले होते.
राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांची युवा संघर्ष यात्रा आज वाशीम जिल्ह्यात दाखल झाली.
रिसोड येथील मालेगाव रोडवरील विश्वा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल या शाळेला शासनाची कुठलीही मान्यता नसताना, ही शाळा अनधिकृतपणे सुरु असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या होत्या.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन संदर्भातला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे.
आत्मघाती निर्णयामागील कारण अद्याप समोर आले नसून सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
देहू संस्थानच्या विश्वस्तांनी देहूच्या हक्काच्या गायरानासाठी बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे.
छगन भुजबळ यांनी राईचा पर्वत करत मुक्ताफळे उधळू नयेत असा सल्ला त्यांनी मंत्री भुजबळांना दिला.
शहरात सुरू करण्यात आलेल्या ‘सखी वन स्टॉप सेंटर’कडून आतापर्यंत ३८५ संकटग्रस्त महिला व बालिकांना मदत पुरविण्यात आली आहे.
यामध्ये प्रवाशांचे हरवलेले किंवा विसरलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख यांसारख्या मौल्यवान वस्तूचा समावेश आहे.
धुळे : देवपूर बस स्थानकात बसलेल्या तरुणींसमोर एका गाण्यावर रिल बनवतांना अश्लील हावभाव करुन नाचणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले.
मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात आणखी १० विद्युत दुमजली वातानुकूलित बस दाखल झाल्या आहेत. या बस वांद्रे – कुर्लादरम्यान धावणार असल्याने पूर्व – पश्चिम उपनगरीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
“कुणीतरी हिंदूहृदयसम्राट लिहिलं, तर तुम्ही टीका करायला सुरूवात केली. बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी लीन व्हायला जाणाऱ्या शिवसैनिकांवर दगडफेक करता. नालाXXXX हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे,” असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला दिला आहे.
पिंपरी: अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील वायू प्रदूषण कमालीचे घटले आहे. धुलिकणांचे प्रमाण ५० च्या दरम्यान आले आहे.
ठाणे: रेल्वे रूळ ओलांडतांना होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन तसेच पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी ठाणे आणि लगतच्या स्थानक परिसरात प्रवाशांकडून रुळ ओलांडण्याचे प्रकार सुरुच असल्याचे चित्र आहे.
मुंबई: दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालास राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीने हिरवा कंदिल दाखविल्यानंतर आता म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने सविस्तर प्रकल्प अहवालासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
वसईत प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा अडचण भेडसावत असल्याने आता सार्वजनिक बांधकाम खात्याची (पीडब्ल्यूडी) मागणी करण्यात आली आहे.
काही भागात मजुरांना बोलावून कामही सुरू केले होते. त्यातच रविवारी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे.
यवतमाळच्या धम्मानंद आणि प्रणाली जाधव या जोडप्याने कोविड काळात २०२० मध्ये धनगरवाडीतील मुलांसाठी संध्याकाळची शाळा सुरू केली.
कुजट, कोंदट आणि उग्र अशा दर्पामुळे मुंबईच नव्हे तर नवी मुंबईतील ठराविक उपनगरांमधील रहिवाशांना नकोसे झालेल्या देवनार येथील कचराभूमीवर गेल्या १४ वर्षापासून ठाण मांडून असणारा मुंबईतील वैद्यकिय कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प अखेर रायगड जिल्ह्यातील पातळगंगा अैाद्योगिक पट्टयात हलविण्याचा महत्वपुर्ण निर्णय राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने घेतला आहे.
पुणे: लोकसभेला पुण्यात जेमतेम ५० टक्क्यांच्या आसपास मतदान होते. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात १३ हजार ३९३ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) माजी महापौर दत्ता दळवींना पोलिसांनी अटक केली होती. दत्ता दळवींना मुलुंड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांना १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ठाणे: कापूरबावडी येथील नळपाडा भागात अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह बुधवारी पहाटे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत चितळसर पोलीस तपास करत आहेत.
“विधिमंडळ अधिवेशन ३ आठवड्याचं व्हावं, असा आमचा आग्रह होता. पण, सरकारने पळ काढला आहे. तीन आठवड्यांऐवजी दोन आठवडेच अधिवेशन होणार आहे. अर्थात फक्त १० दिवसच कामकाज होणार आहे. सरकार गंभीर नाही. विदर्भात मोठे प्रश्न आहेत. नागपूर कराराला सरकारनं वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. सगळ्या परिस्थितीत सरकारला चर्चा करायची नाही. केवळ वेळ मारून न्यायची आहे, असं कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून समोर आलं,” अशी टीका विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
ठाणेः महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी देऊन त्यांच्या हाताला काम देण्याचा महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून लवकरच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील चिंदीपाडा येथे काथ्यापासून विविध गोष्टी निर्मितीचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प उभा राहत आहे.