Marathi News Live Update: लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भाजपानं पहिली १९५ उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. तर दुसरीकडे सर्वपक्षीय महत्त्वाच्या नेतेमंडळींनी विविध ठिकाणी सभांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवातही केली आहे. या सभांमधून दिल्या जाणाऱ्या घोषणा, केले जाणारे दावे-आरोप सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू लागले आहेत.

Live Updates

Maharashtra Breaking News Live 05 March 2024: लोकसभा निवडणुकांसंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

18:29 (IST) 5 Mar 2024
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात, “२०२४ तर जिंकूच! पुढील लक्ष्य २५ वर्षांच्या विजयाचे…”

अकोला : भारतीय जनता पक्षातील चार पिढ्यांच्या संषर्घामुळेच पक्षाला आता चांगले दिवस आले आहेत. २०२४ ची निवडणूक तर जिंकूच. मात्र, भाजपचे पुढील २५ वर्षांतील निवडणुकांमधील विजयाचे लक्ष्य आहे, अशी महत्त्वाकांक्षा केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज येथे व्यक्त केली.

सविस्तर वाचा…

18:28 (IST) 5 Mar 2024
धक्कादायक! नागपुरात शंभरात सहा रुग्णांना मोबाईलचे व्यसन!

नागपूर: उपराजधानीत भ्रमनध्वनीचे व्यसन ही एक गंभीर समस्या होत चालली आहे. शहरातील विविध मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या एकूण शंभर रुग्णांपैकी सहा रुग्णांना मोबाईलचे व्यसन असल्याचे निरीक्षण मानसोपचार सोसायटी नागपूरने नोंदवले आहे.

सविस्तर वाचा…

18:26 (IST) 5 Mar 2024
मुंबई : ग्राहकांचे तीन कोटी रुपये किंमतीचे सोने लुटणारा बँक कर्मचारी अटकेत

ग्राहकांनी बँकेत गहाण ठेवलेले तीन कोटी रुपये किंमतीचे सोने बँक कर्मचाऱ्यानेच लुटल्याचा धक्कादायक प्रकार भांडुप येथे घडल्याचे उघडकीस आले.

सविस्तर वाचा…

18:14 (IST) 5 Mar 2024
पिंपरी : ‘त्या’ उपनिरीक्षकाच्या मोटारीतून दोन किलो मेफेड्रोन जप्त

पिंपळेनिलख रक्षक चौकात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या नमामी झा या हॉटेल कामगाराला पोलिसांनी दोन कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थासह अटक केली होती.

सविस्तर वाचा…

18:04 (IST) 5 Mar 2024
तळोजा गृहप्रकल्प प्रकरणात विकासक ललित टेकचंदानींविरोधात गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी टेकचंदानी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे सांगून मूळ जमीन मालक नरेंद्र भल्ला यांच्याशी झालेल्या वादामुळे आणि प्रकल्प राबवण्यास न्यायालयाने मज्जाव केल्याने तो रखडल्याचा दावा टेकचंदानी यांच्यातर्फे सुनावणीच्या वेळी करण्यात आला.

सविस्तर वाचा…

18:02 (IST) 5 Mar 2024
हळद दराचा ऐतिहासिक उच्चांक

जागतिक स्तरावर ‘यलो सिटी’ अशी ओळख पुन्हा एकदा सिद्ध करत सांगली बाजारात हळदीला क्विंटलला ४१ हजार १०१ रूपयांचा दर मंगळवारच्या सौद्यामध्ये मिळाला.

सविस्तर वाचा…

17:09 (IST) 5 Mar 2024
Maharashtra Breaking News Live: मी शरद पवारांना सांगेन की… – अमित शाह

मी शरद पवारांना सांगेन, मोदींना १० वर्षं झाली, पण ५० वर्षांपासून महाराष्ट्राची जनता तुम्हाला सहन करतेय. ५० वर्षं सोडा, फक्त ५ वर्षांचा हिशेब द्या. मी तर १० वर्षांचा हिशेब द्यायला आलोय – अमित शाह</p>

17:02 (IST) 5 Mar 2024
Maharashtra Breaking News Live: अमित शाहांची जळगावमध्ये विरोधकांवर टीका

जे पक्ष घराणेशाहीने चालतात, ते देशाच्या लोकशाहीसाठी काम करू शकतात का? इंडिया आघाडीचे सर्व पक्ष घमंडिया पक्ष आहेत. मोदींसमोर एकत्र आलेले पक्ष कोण आहेत? सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचंय. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचंय. शरद पवारांना मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे. स्टॅलिनला त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. यांच्यात तुमच्यासाठी कुणीही नाहीये. तुमच्यासाठी नरेंद्र मोदी आहेत – अमित शाह</p>

16:39 (IST) 5 Mar 2024
“मावळमधून गद्दारांचा पराभव करून खासदार होणार”, ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा विश्वास

महायुतीचा उमेदवार हा कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सविस्तर वाचा…

16:35 (IST) 5 Mar 2024
डोंबिवली एमआयडीसीतील १५ कंपन्यांना जप्तीच्या नोटिसा, कल्याण डोंबिवली पालिकेचा लाखोचा मालमत्ता कर थकविला

कल्याण – डोंबिवली एमआयडीसीतील १५ कंपन्यांंनी मालमत्ता कर थकबाकीची रक्कम भरणा करण्यासाठी वारंवार नोटिसा देऊनही कंपनी चालक त्यास दाद देत नसल्याने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने या कंंपन्यांना जप्तीपूर्व अखेरची सूचना देणाऱ्या नोटिसा काढल्या आहेत.

सविस्तर वाचा…

16:34 (IST) 5 Mar 2024
वर्धा : डॉक्टरची पदवी देतो म्हणून टाकला फास, केले साडेतेरा लाख रुपये लंपास…

वर्धा : अशी ही बनवाबनवी अनेक ठिकाणी चालू असते. मात्र त्यात जुजबी डिग्रीवर प्रॅक्टिस करणारा डॉक्टरच फसावा, हे जरा धक्कादायक म्हणावे लागेल. बोरगाव मेघे या गावात इलेक्ट्रो होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारे विशाल देवराज गाडेगोने यांनी या प्रकरणात तक्रार केली आहे.

सविस्तर वाचा…

16:04 (IST) 5 Mar 2024
नाशिक : गोदावरी नदीपात्रात झोपलेल्या कामगाराचा मृत्यू

नाशिक : गोदावरी नदीपात्रात गंगापूर धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यावर रात्री नदीपात्रात झोपलेल्या एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. जलालपूर परिसरातील नदीपात्रात असलेल्या बाणेश्वर मंदिराजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.

सविस्तर वाचा…

16:03 (IST) 5 Mar 2024
उरण पनवेलच्या रस्त्यावरील वाढत्या प्रदूषणा विरोधात उरण सामाजिक संस्थेची निदर्शने

उरण : रस्त्यावर निर्माण होणाऱ्या धुळीचा बंदोबस्त करून वाढते प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना करा या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी पाडेघर-गव्हाण फाटा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर उरण सामाजिक संस्थेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

सविस्तर वाचा…

15:40 (IST) 5 Mar 2024
वर्धा : डॉक्टरची पदवी देतो म्हणून टाकला फास, केले साडेतेरा लाख रुपये लंपास…

वर्धा : अशी ही बनवाबनवी अनेक ठिकाणी चालू असते. मात्र त्यात जुजबी डिग्रीवर प्रॅक्टिस करणारा डॉक्टरच फसावा, हे जरा धक्कादायक म्हणावे लागेल. बोरगाव मेघे या गावात इलेक्ट्रो होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारे विशाल देवराज गाडेगोने यांनी या प्रकरणात तक्रार केली आहे.

सविस्तर वाचा…

15:23 (IST) 5 Mar 2024
डोंबिवलीतील विकासकाला भूमि अभिलेख विभागातून बनावट मोजणी नकाशा, पोलीस तपासात उघड

कल्याण – डोंबिवलीतील महाराष्ट्रनगरमधील विनोद बिल्डर्सचे मालक विनोद किसन म्हात्रे, जमीन मालक रमेश कचरू म्हात्रे यांना येथील भूमि अभिलेख कार्यालयातून जमिनीचा बनावट मोजणी नकाशा दिला गेला असल्याचे बाजारपेठ पोलिसांंच्या चौकशीत उघडकीला आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आपली चौकशीची दिशा भूमि अभिलेख विभागाकडे वळविली आहे.

सविस्तर वाचा…

14:56 (IST) 5 Mar 2024
भिवंडी महापालिकेच्या शिक्षकांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज, शिक्षकांचे निलंबन

ठाणे : भिवंडी महापालिकेतील दोन महिला शिक्षकांनी चार व्यक्तींच्या नावाने शिक्षण विभागाचे बनावट वेतन दाखले तयार करून ठाण्यातील एका सहकारी बँकेतून लाखो रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा…

14:42 (IST) 5 Mar 2024
गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडणे अशक्य, मुंबई पालिकेला उलगडा; उत्तर शोधण्यासाठी व्हीजेटीआयची मदत

कठीण उतार दिल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याचा महापालिका प्रशासनाला अखेर उलगडा झाला आहे.

सविस्तर वाचा…

14:30 (IST) 5 Mar 2024
ज्येष्ठ नागरिक म्हाडातील विकासकाची नियुक्ती रद्द करु शकतात!

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वसाहतीतील गृहप्रकल्प विकासकाच्या अकार्यक्षमतेमुळे रखडला तर सर्वसाधारण सभा घेऊन अशा विकासकाची नियुक्ती रद्द करता येते.

सविस्तर वाचा…

14:28 (IST) 5 Mar 2024
नाशिक : राष्ट्रीय लोक न्यायालयात ११ हजारहून अधिक प्रकरणे निकाली, ७९ कोटींचे तडजोड शुल्क वसूल

नाशिक : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयात जिल्ह्यातून एकूण ११ हजार ४४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे ७९ कोटी ८९ लाख १२ हजार ९०८ रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले .

सविस्तर वाचा…

14:27 (IST) 5 Mar 2024
रुग्णालयात काका-पुतण्या जेवणाचा डबा घेऊन जात असताना घडले असे काही की…

जळगाव : काकांचा मुलगा रुग्णालयात दाखल असल्याने त्याचा जेवणाचा डबा घेऊन जात असताना काका-पुतण्याच्या दुचाकीला मागून भरधाव मालमोटारीची जोरदार धडक बसली. त्यात अंगावरून मालमोटारीचे चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे काका गंभीर जखमी झाले.

वाचा सविस्तर…

14:23 (IST) 5 Mar 2024
अकोला : दोन दुचाकींचा अपघात अन् मागून येणाऱ्या ट्रकने अपघातग्रस्तांना चिरडले; तीन जणांचा दुर्दैवी अंत

अकोला : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकने अपघातग्रस्तांना चिरडल्यामुळे तीन जणांचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री बाळापूर-पातूर मार्गावर वाडेगावजवळ घडली.

सविस्तर वाचा…

14:22 (IST) 5 Mar 2024
मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करता येणार ‘स्मार्ट प्रिपेड मीटर’, सर्वप्रथम शासकीय कार्यालये, वसाहतींमध्ये लागणार

नागपूर : राज्यातील महावितरणच्या २.६१ कोटी ग्राहकांकडे ‘स्मार्ट प्रिपेड मीटर’ लागणार आहे. पहिल्या टप्प्यात हे मीटर सर्व शासकीय कार्यालय आणि शासकीय वसाहतींमध्ये लागणार असून त्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांकडे लावण्याचे नियोजन आहे. मार्च २०२४ पासून हे मीटर लावण्याचे नियोजन होते, हे विशेष.

सविस्तर वाचा…

14:14 (IST) 5 Mar 2024
मोठी नोकर भरती! पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘या’ पदासाठी मागविले अर्ज

राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवार राज्यभरात एका घटकातच अर्ज करू शकतो.

सविस्तर वाचा…

14:13 (IST) 5 Mar 2024
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तांची कारवाई : ‘मेफेड्रोन’ प्रकरणात सापडलेला पोलीस उपनिरीक्षक निलंबित; दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा…

14:05 (IST) 5 Mar 2024
महायुतीत नाशिकच्या जागेचा घोळ कायम

नाशिक : महायुतीच्यावतीने वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. कुठे कोणाची किती ताकद आहे यावर मंथन सुरू आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ कुणाला मिळणार, याबाबत महायुतीत अद्याप एकमत झाले नसल्याची कबुली छगन भुजबळ यांनी दिली.

वाचा सविस्तर…

14:02 (IST) 5 Mar 2024
मालेगाव : अद्वय हिरे यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी

मालेगाव : नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेचा घोटाळा केल्याच्या आरोपावरुन साडे तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी जामिनासाठी आता जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

13:47 (IST) 5 Mar 2024
पुणे : आभासी चलन प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारीच चौकशीच्या फेऱ्यात

गेल्या आठवडाभरापासून पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोपनीय चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सविस्तर वाचा…

13:46 (IST) 5 Mar 2024
पुणे : संसाराची गाडी पुन्हा रुळावर… लोकअदालतीत १६ दाम्पत्यांचा एकत्र येण्याचा निर्णय

पुणे : कौटुंबिक न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत कौटुंबिक वादाचे १६ दावे निकाली काढण्यात यश आले. १६ दाम्पत्यांनी पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा…

13:46 (IST) 5 Mar 2024
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून अमित शहांच्या दौऱ्याचा ‘श्री गणेशा’, अकोल्यातील बैठकीत विदर्भातील सहा मतदारसंघांवर मंथन

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अकाेल्यात दाखल झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांनी आपल्या दौऱ्याचा ‘श्री गणेशा’ केला.

सविस्तर वाचा…

13:44 (IST) 5 Mar 2024
Maharashtra Breaking News Live: सचिन सावंत यांनी शेअर केला आशिष शेलार यांच्या मुलाखतीचा ‘तो’ व्हिडीओ!

लॉजिकची खुलेआम निघृण हत्या… सूचना:- मन विचलित करणारे दृश्य – कमजोर हृदयाच्या लोकांनी हा व्हिडीओ मुळीच पाहू नये… – काँग्रेस नेते सचिन सावंत यांचं खोचक ट्वीट!

महाराष्ट्र न्यूज टुडे लाइव्ह

Maharashtra Breaking News Live 05 March 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा.