Marathi News Live Update: लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भाजपानं पहिली १९५ उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. तर दुसरीकडे सर्वपक्षीय महत्त्वाच्या नेतेमंडळींनी विविध ठिकाणी सभांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवातही केली आहे. या सभांमधून दिल्या जाणाऱ्या घोषणा, केले जाणारे दावे-आरोप सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू लागले आहेत.

Live Updates

Maharashtra Breaking News Live 05 March 2024: लोकसभा निवडणुकांसंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

13:34 (IST) 5 Mar 2024
ईडीद्वारे टाच आणलेल्या मालमत्ता मोकळ्या करण्याचा एनसीएलटीला अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

एनसीएलटीने मामलत्ता मोकळ्या करण्याचे आदेश देऊन पीएमएलए कायद्यातील तरतुदी अर्थहीन ठरवल्या आहेत, असा दावा ईडीने केला होता.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 5 Mar 2024
कल्याणमध्ये बेकायदा फलकांवर कारवाई, विद्रुपीकरणाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा

कल्याण पूर्व आय प्रभागात पालिकेच्या परवानग्या न घेता वाढदिवसांच्या शुभेच्छा, गृहसंकुले, व्यापार विषयक जाहिरातींचे फलक लावून शहर विद्रुप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेते, नागरिक, व्यापाऱ्यांचे रस्त्यांवरील जाहिरात फलक आय प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडून टाकले.

वाचा सविस्तर…

13:12 (IST) 5 Mar 2024
वकिलीची सनद पाच वर्षासाठी रद्द, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर…

वर्धा : पक्षकाराची बाजू जोरकसपणे मांडून त्यास न्याय मिळवून देण्याचा प्रत्येक वकिलाचा प्रयत्न असतो. सर्व हुशारी पणास लावून तो जिद्दीने केस लढतो, असे न्यायालयीन वर्तुळत म्हटल्या जाते. मात्र, या प्रकरणात जरा हटकेच झाले. वकीलच व्यवसायिक गैर वर्तवणूकीचा आरोपी ठरला.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 5 Mar 2024
नवी मुंबई : पालिकेच्या लेखी या पाणथळी नाहीत? छायाचित्रे प्रसारीत पर्यावरणप्रेमींचा सवाल

नवी मुंबई : पामबीचलगतच्या एनआरआय संकुलाच्या मागील बाजूस असलेल्या सेक्टर ६० येथील जमिनींवरील ‘पाणथळ’ आरक्षण हटवून त्या निवासी बांधकामासाठी खुल्या करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप आहे.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 5 Mar 2024
“मी ‘त्या’ लोकांना सोडून जाणार नाही”, आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर मागील सात महिन्यांच्या कालावधीत दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहेत.

सविस्तर वाचा…

12:36 (IST) 5 Mar 2024
कल्याण-तळोजा मेट्रोने दररोज अडीच लाख प्रवाशांची वाहतूक

कल्याण, डोंबिवली परिसरातील प्रवाशांना नवी मुंबईत जाण्यासाठी बसने दीड ते दोन तास आणि ठाणे येथून लोकलने दीड तासाचा प्रवास करावा लागत होता. तळोजा मेट्रो मार्गामुळे हा प्रवास येत्या तीन वर्षात प्रकल्प पूर्ण झाल्यावर ४५ मिनिटावर येणार आहे.

वाचा सविस्तर…

12:22 (IST) 5 Mar 2024
अनिल देसाई मुंबई पोलीस मुख्यालयात दाखल

शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार अनिल देसाई मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात मंगळवारी दाखल झाले. आर्थिक गुन्हे शाखेने ५ मार्चला चौकशीला उपस्थित राहण्यासाठी त्यांना समन्स बजावले होते.

सविस्तर वाचा…

12:20 (IST) 5 Mar 2024
अवकाळी पावसाचा अंदाज आजही कायम, काही भागात मात्र थंडी

नागपूर : मार्च महिना सुरु होताच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज दिला आणि तो खराही ठरला. वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे.

सविस्तर वाचा…

12:19 (IST) 5 Mar 2024
१९ उद्योग कंपन्यांशी ७५ हजार कोटींचे सामंजस्य करार, ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर २०२४- इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे आयोजन

चंद्रपूर : प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचा उद्योग समूह चंद्रपूरमध्ये ४० हजार कोटींची गुंतवणूक करून एक मोठा ‘स्टील प्लान्ट’ उभारणार आहे. ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर २०२४-इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’मध्ये एकाच दिवशी १९ उद्योग कंपन्यांशी ७५ हजार ७२१ कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.

सविस्तर वाचा…

12:18 (IST) 5 Mar 2024
नागपूर : नरेंद्रनगर चौकात उड्डाण पुलाची लँडिंग धोक्याची, वाहतूक कोंडीने मनस्ताप

नागपूर : वर्धा मार्गावरील छत्रपती चौक ते मानेवाडा रिंगरोडवरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी आणि अपघातांच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी नरेंद्रगर ते वर्धा रोडवरील जयप्रकाश नगर असा उड्डाण पूल बांधण्यात आला.

सविस्तर वाचा…

12:17 (IST) 5 Mar 2024
‘समृध्दी’मुळे नाशिक-मुंबई महामार्गावरील कोंडी कशी कमी होईल ?

नाशिक : भिवंडी वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिककडे येणारी ७० टक्के वाहने समृध्दी महामार्गावरून मार्गक्रमण करतील.

सविस्तर वाचा…

12:13 (IST) 5 Mar 2024
विरार मध्ये टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

वसई : विरार पूर्वेच्या नारंगी फाटा येथे दुचाकीला पाठीमागून टॅंकरने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली.शैलेश कोरगावकर (३२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास विरारच्या नारंगी फाटा येथे शैलेश हा दुचाकीवर रस्त्याच्या बाजूला उभा होता इतक्यात टँकरने धडक दिल्याने तो टँकरच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिली आहे.

12:12 (IST) 5 Mar 2024
Maharashtra Breaking News Live: शिरूरवरून अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गट!

शिरूर लोकसभेच्या विकासाकरिता दादांनी केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या माध्यमातुन पाठपुरावा करत विकास निधी मिळवुन दिला.केंद्र सरकारकडून शिरूर लोकसभेमध्ये आलेला विकास निधी केवळ अजित दादांच्या पाठपुराव्यावर आलेला आहे िनेते

अमोल कोल्हेंनी शिरुर लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामं आपल्यामुळे झाल्याचा दावा माध्यमांशी बोलताना केला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी एक्स (ट्विटर)वर पोस्ट केली आहे.

11:52 (IST) 5 Mar 2024
अमित शाहांच्या स्वागताचे फलक फाडले की फाटले? अकोल्यात नेमकं काय घडल? वाचा…

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह मंगळवारी अकोल्यात दाखल होत आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी स्वागताचे फलक फाटलेल्या अवस्थेत आढळून आले.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 5 Mar 2024
Maharashtra Breaking News Live: अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज त्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे. या सभेपूर्वी त्यांची देवेंद्र फडणवीस, भागवत कराड यांच्याशी जवळपास तासभर चर्चा झाली असून महायुतीच्या जागावाटपासंदर्भातील मुद्द्यांवर ही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

11:25 (IST) 5 Mar 2024
ठाणे : महिन्याभरासाठी घोडबंदर मार्गावर मध्यरात्री वाहतूक बदल

घोडबंदर मार्गावर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. येथील मानपाडा, विजय गार्डन आणि कासारवडवली भागात गर्डर बसविण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

11:24 (IST) 5 Mar 2024
शहापूर : शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

विशेष म्हणजे या गुन्ह्याची माहिती उशीरा दिल्यामुळे मुख्याध्यापक जगन्नाथ नामदेव घायवट यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:23 (IST) 5 Mar 2024
यंदा मासळी सुकविण्याच्या बांबूच्या पराती रिकाम्या, मत्स्य दुष्काळाचा परिणाम

ऐन मासळी सुकविण्याच्या हंगामात समुद्रातून हवी त्या प्रमाणात मासळीच येत नसल्याने मासळी सुकविण्यासाठी तयार केलेल्या पराती रिकाम्या असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सविस्तर वाचा…

11:22 (IST) 5 Mar 2024
भाईंदर : विकासकाकडून महापालिकेची फसवणूक, मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेले पाचशे खाटांचे रुग्णालय तात्पुरते स्थगित

मागील दीड वर्षांपासून महापालिकेची फसवणूक करत आर्थिक लाभ मिळवणाऱ्या विकासकांसोबत अखेर झालेला करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:21 (IST) 5 Mar 2024
भाजप नगरसेवकाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप, व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल

पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आमदार प्रताप सरनाईक आपल्या हॉटेल व्यवसायाला त्रास देत असल्याचे आरोप भाजपच्या एका माजी नगरसेवकाने केले आहेत.

सविस्तर वाचा…

11:20 (IST) 5 Mar 2024
नागपूर : सावधान! ब्युटीपार्लर-स्पाच्या नावावर ‘सेक्स रॅकेट सक्रिय

नागपूर : झेंडा चौकातील एका ब्युटी पार्लर-स्पाच्या नावावर सुरु असलेल्या ‘सेक्स रॅकेट’वर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला.

सविस्तर वाचा…

11:18 (IST) 5 Mar 2024
राज्यातील वीज पुरवठा धोक्यात! कंत्राटी वीज कर्मचारी संपावर

नागपूर : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी नुकतेच दोन दिवस संप केला. त्यानंतरही मागणीकडे कुणी लक्ष दिले नसल्याने हे कर्मचारी ४ मार्चच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहे.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 5 Mar 2024
Maharashtra Breaking News Live: “अजित पवार डिस्टर्ब आहेत की नाही ते…”

अजित पवार गटातले अनेक आमदार भाजपाच्या चिन्हावर लढायचं का? असाही विचार करत आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व अजित पवारांच्या जवळचे काही नेते करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे काही आमदार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, तर काही आमदार लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच विधानसभा निवडणुका नेमक्या कशा होतील? यावर बोलता येईल – रोहित पवार, आमदार, शरद पवार गट

11:03 (IST) 5 Mar 2024
Maharashtra Breaking News Live: अनिल देसाईंची आज चौकशी…

ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांची आज आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाणार आहे. यासाठी अनिल देसाई आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षनिधीतून ५० कोटी रुपये काढल्याचा आरोप देसाईंवर ठेवण्यात आला आहे.

10:58 (IST) 5 Mar 2024
Maharashtra Breaking News Live: देशातील लाखो कुटुंबांना मोदींनी भिकारी केलं – संजय राऊत

ज्यांच्या घरवापसीसाठी २०१४ आणि २०१९ला आश्वासनं दिली, ते लाखो कश्मिरी पंडित तुमच्या परिवारात येत नाहीत का? तुमचा परिवार मूठभर श्रीमंत, धनिक व ठेकेदारांचा आहे. तुमचा परिवार पक्षफोड्यांचा, लुटमार करणाऱ्यांचा आहे हे आता स्पष्ट झालं आहे. तुमच्या परिवारवादी जाहिरातीला जनता फसणार नाही. देशातील लाखो परिवार तुम्ही फेकलेल्या ५ किलो अन्नावर जगत आहेत. तुम्ही त्यांना भिकारी केलं आहे – संजय राऊत</p>

10:57 (IST) 5 Mar 2024
Maharashtra Breaking News Live: संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल!

२०१९मध्ये ‘मी चौकीदार’, आता काय तर ‘मेरा परिवार’. या देशातल्या १४० कोटी जनतेचा परिवार कोणत्या हालअपेष्टा भोगतोय हे मोदींना माहिती आहे. कालच आम्ही त्यांना विचारलं की तुमच्या परिवारात मणिपूर येत नाही का? मणिपूर जळतंय, तिथे महिलांची नग्न धिंड काढली जाते, लोकांना रस्त्यावर मारलं जातंय. हा मणिपूर मोदींच्या परिवारात येत नाही? – संजय राऊत</p>

महाराष्ट्र न्यूज टुडे लाइव्ह

Maharashtra Breaking News Live 05 March 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा.