Maharashtra News Today, 07 November 2023 : मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देणे म्हणजे मागील दाराने ओबीसीमध्ये प्रवेश देण्यासारखे आहे, अशी टीका राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली. भुजबळांच्या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच, ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयावरून दावे-प्रतिदावे करण्यात येते आहेत. यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Updates Today : राजकीय, क्राइम आणि महाराष्ट्रातील अन्य घडामोडी एका क्लिकवर….

18:41 (IST) 7 Nov 2023
ठाण्यात राडारोडा वाहतूकीसह बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी भरारी पथके; हवा गुणवत्ता खालावल्याने पालिकेची उपायोजना

ठाणे : मुंबई पाठोपाठ ठाणे शहरात हवा प्रदुषणात वाढ झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने मुंबईहून शहरात येणाऱ्या राडारोड्याच्या गाड्या रोखण्यासाठी मुलूंड चेक नाक्यावर पथक नेमण्याचा तसेच बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा

18:28 (IST) 7 Nov 2023
सातारा: डॉ. बाबासहेब आंबेडकर नव्या पिढ्यांसाठी प्रेरणास्तोत्र

वाई: डॉ बाबासहेब आंबेडकर म्हणजे नव्या पिढ्यांसाठी, नवभारतासाठी प्रेरणेचा ऊर्जास्तोत्र आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहातच साजरा करायला हवा, असे विचार विद्यार्थी दिवस सोहळ्याच्या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले. सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात शाळा प्रवेश दिन संपन्न झाला.

अरुण पोळ म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक प्रेणास्त्रोत असून भारतीय समाजाने आणि सबंध विद्यार्थी वर्गाने त्यांपासून प्रेरणा घेऊन वाटचाल केली पाहीजे. अरुण जावळे मागील अनेक वर्षे या दिवसाचे महत्व विषद करत आहेत, त्यामुळे हा विद्यार्थी देशपातळीवर लवकर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

18:14 (IST) 7 Nov 2023
बुलढाणा: आईची मुलासह आत्महत्या; विहिरीतून काढायला गेलेल्या युवकाचाही मृत्यू

बुलढाणा: चिखली तालुक्यातील भरोसा गावासाठी काल सोमवार (दि. ६) ची रात्र काळरात्र ठरली. चिमुकल्यासह विहिरीत उडी घेतलेल्या मातेचा शोध घेण्यासाठी उडी मारणाऱ्या युवकाचाही बुडून मृत्यू झाला. सुदैवाने उडी मारणारा अन्य युवक केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावला.

सविस्तर वाचा…

17:59 (IST) 7 Nov 2023
जुन्या पेन्शनसाठी दिवाळीच्या तोंडावर कर्मचारी सहकुटुंब रस्त्यावर उतरणार

नागपूर: जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी बुधवारी ८ नोव्हेंबरला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व इतर संघटनांच्या समन्वय संमितीतर्फे कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

17:28 (IST) 7 Nov 2023
नाशिक: भेसळीच्या संशयासह अप्रमाणित एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; अन्न औषध प्रशासनाची कारवाई

नाशिक: दीपावलीच्या पार्श्वभूमिवर दुग्धजन्य पदार्थांसह मिठाईला असणारी मागणी लक्षात घेऊन या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाणही वाढत असते.

सविस्तर वाचा…

17:24 (IST) 7 Nov 2023
मालेगावसह धुळे जिल्ह्यात साडेसोळा लाखाचा गुटखा जप्त – ग्रामीण पोलिसांची कारवाई

नाशिक – नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अवैध व्यवसायांविरूध्द मोहीम सुरू असून मालेगावसह धुळे जिल्ह्यातील पुरमेपाडा येथे छापा टाकून साडेसोळा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. तीन विक्रेत्यांना अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा

17:23 (IST) 7 Nov 2023
विटभट्टी मजुराचा पेहराव करून पोलिसांनी सराईत चोरट्याला पकडले; २२ घरफोड्या करणारा चोरटा आझमगडमधून अटक

डोंबिवली कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल भागात २२ हून अधिक घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशातील आझमगड येथून एका वीटभट्टीवरून अटक केली.

सविस्तर वाचा

17:22 (IST) 7 Nov 2023
कल्याणमधील स्वच्छतेची अतिरिक्त आयुक्तांकडून दुचाकीवरून पाहणी

कल्याण- कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये नियमित घनकचरा विभागाकडून शहराचा प्रत्येक कोपरा साफ केला जातो की नाही याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी कल्याण शहराचा दुचाकीवरून पाहणी दौरा केला.

सविस्तर वाचा

16:34 (IST) 7 Nov 2023
महानगरपालिकेच्या वाहनतळात भीषण आग ; १६ चारचाकी आणि दोन दुचाकी जळून खाक

मुंबई : दादर येथील महानगरपालिकेच्या कोहिनूर सार्वजनिक वाहनतळात सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली होती. या आगीत १६ चारचाकी आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या. मध्यरात्री २.३० च्या सुमारास ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

सविस्तर वाचा

16:28 (IST) 7 Nov 2023
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन आक्रमक; भेसळयुक्त दूध, मावा, सूर्यफूल आणि पामोलिन तेल जप्त

विलेपार्ले येथील संभाजी नगरमधील दुधविक्रेता साईदुळू मल्लेशवर कारवाई करून अमूल कंपनीचे ५ हजार ७९८ रुपये किमतीचे १०७ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले.

सविस्तर वाचा…

16:26 (IST) 7 Nov 2023
“मराठा अन् ओबीसी समाज समोर येण्याला उद्धव ठाकरे जबाबदार”

“मराठा आणि ओबीसी समाज समोर येतोय, त्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध केला नसता, तर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाजा न्याय मिळवून दिला असता,” असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे.

16:24 (IST) 7 Nov 2023
दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी घसरण, ‘हे’ आहेत आजचे दर

नागपूर: सोन्याच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मोठी चढ- उतार बघायला मिळत आहे. मध्यंतरी नागपुरात हे दर प्रति दहा ग्राम ६२ हजार रुपयांच्या जवळपास गेले होते.

सविस्तर वाचा…

15:54 (IST) 7 Nov 2023
सोने-चांदी व्यावसायिकांच्या चार भट्टी व धुरांड्यांवर हातोडा; वायू प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची कारवाई

सोने – चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराड्यांवर ‘सी’ विभागाने हातोडा चालविला.

सविस्तर वाचा…

15:47 (IST) 7 Nov 2023
बुलढाणा: जिल्हा परिषद शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; बालाजी मंदिरानजीक वाहनात केले दुष्कर्म

बुलढाणा: जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने एका १३ वर्षीय विद्यार्थीनिवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. मलकापूर मार्गावरील बालाजी मंदिर परिसरात एका वाहनात त्याने हे दुष्कृत्य केले.

सविस्तर वाचा…

15:27 (IST) 7 Nov 2023
भारतातील वन्यजीव संशोधकांनी शोधली रंगीत पाल

पालींच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी अमित सैय्यद आणि त्यांच्या चमूतील दोन सहकारी तामिळनाडूच्या घनदाट जंगलात अनेक वर्ष शोध घेत होते.

सविस्तर वाचा…

15:24 (IST) 7 Nov 2023
मालेगावात अमली पदार्थ निर्मूलनासाठी स्वतंत्र पथक

नाशिक – मालेगाव शहरासह तालुक्यातील अमली पदार्थांच्या निर्मूलनासाठी आता स्वतंत्र पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. दुसरीकडे, नाशिक ग्रामीण पोलिसांकडून गुटखा विरोधी अभियान चालूच राहणार असून अवैध प्रवासी वाहतूकविरूध्द कारवाई करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

15:24 (IST) 7 Nov 2023
नागपूर: शाळेच्या सुरक्षारक्षकाने केले विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

नागपूर: आष्टीतील भवन्स शाळेतील विद्यार्थी सारंग नागपुरे याच्या मृत्यूमुळे शहरातील पालक वर्ग चिंतेत असतानाच आणखी एका घटनेने पालक वर्गाच्या चिंतेत भर घातली आहे. नंदनवनमधील स्टार पॉईंट शाळेतील एका विद्यार्थिनीशी शाळेच्या सुरक्षारक्षकाने अश्लील वर्तन केल्याची घटना उघडकीस आली.

सविस्तर वाचा…

15:03 (IST) 7 Nov 2023
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, कोकण व मध्य महाराष्ट्रावर परिणाम

नागपूर : मोसमी पावसाने काढता पाय घेतला असला तरीही अरबी समुद्रात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील सहा ते सात दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

वाचा सविस्तर…

14:59 (IST) 7 Nov 2023
महारेरा क्रमांक, क्यूआर कोड नियमाचे उल्लंघन : ३७० प्रकल्पांविरोधात दंडात्मक कारवाई; २२ लाख २० हजार रुपये दंड वसूल

रेरा कायद्यानुसार कोणत्याही गृहप्रकल्पाची जाहिरात वा सदनिकांची विक्री करण्यासाठी महारेरा नोंदणी क्रमांक आणि क्यूआर कोड बंधनकारक आहे.

सविस्तर वाचा…

14:44 (IST) 7 Nov 2023
“निवृत्त न्यायाधीश आणि मंत्र्यांना पाठवून सरकारनं जरांगे-पाटलांवर…”, ठाकरे गटातील खासदाराचा गंभीर आरोप

“सरकारनं जरांगे-पाटील आणि मराठा समाजाची फसवणूक केली आहे. निवृत्त न्यायाधीश आणि संबंध नसलेल्या मंत्र्यांना पाठवून दबाव आणण्याचं काम केलं. त्यातून जरांगे-पाटील यांनी २ महिन्यांचा वेळ दिला. सरकारला वेळ देण्याची गरज नव्हती. ३१ डिसेंबरला आमदार अपात्र होणार असल्याने शिंदे सरकारनं राजकीय निवृत्तीचं मरण पुढं ढकलण्यासाठी २ महिन्यांची मुदत वाढवून घेतली,” अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

14:41 (IST) 7 Nov 2023
ठाणे: लोकलमध्ये प्रवाशावर ब्लेडने हल्ला

ठाणे : ठाणे ते कळवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकल डब्यामध्ये एका तरूणावर धारदार ब्लेडने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

सविस्तर वाचा

14:40 (IST) 7 Nov 2023
कल्याण पूर्वेत रस्त्यांवरील फटाक्यांचे स्टाॅल भुईसपाट; आय, ड प्रभाग साहाय्यक आयुक्तांची कारवाई

कल्याण – कल्याण पूर्व भागातील मलंग रस्ता, कोळसेवाडी, चिंचपाडा, काटेमानिवली या वर्दळीच्या भागातील रस्त्यांवर उभारण्यात आलेले फटाक्यांचे स्टाॅल सोमवारी आय, ड प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांच्या पथकाने जमीनदोस्त केले.

सविस्तर वाचा

14:03 (IST) 7 Nov 2023
वाशिम: आरोग्य विभागातील ६०० डॉक्टर, कर्मचारी बेमुदत संपावर; आरोग्य यंत्रणा सलाईनवर!

वाशिम: गेल्या १५ ते २० वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध संवर्गातील डॉक्टर, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविकांसह इतर कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहेत.

सविस्तर वाचा…

13:55 (IST) 7 Nov 2023
२२ वर्षांच्या सेवेत १७ वर्षे प्रतिनियुक्तीवर! जलसंपदा अभियंत्याला अखेर कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव

मिलिंद वाणी असे या अभियंत्याचे नाव असून ते झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत.

सविस्तर वाचा…

13:54 (IST) 7 Nov 2023
डोंबिवली: भागशाळा मैदानावरील फटाक्यांच्या स्टॉलला नागरिकांचा विरोध, पालिका आयुक्तांना सामाजिक कार्यकर्त्याचे पत्र

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानावर फटाके विक्री स्टॉलना परवानगी देण्यात आली तर त्याला कठोर विरोध केला जाईल, असा इशारा या मैदानावर नियमित खेळणे, फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी दिला आहे.

वाचा सविस्तर…

13:53 (IST) 7 Nov 2023
डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाची अभ्यासिका खासगी संस्थेला देण्याचा घाट?

कल्याण- डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाची नव्याने नुतनीकरण केलेली अभ्यासिका ग्रंथसंग्रहालयाकडून काढून राजाश्रय लाभलेल्या एका वजनदार संस्थेला देण्याच्या जोरदार हालचाली सध्या महापालिका वर्तुळात सुरु आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेने ४० लाखाचा खर्च करुन या ग्रंथसंग्रहालयाचे नूतनीकरण केले आहे.

वाचा सविस्तर…

13:17 (IST) 7 Nov 2023
नवी मुंबई : मेफेड्रोन अमली पदार्थ विकणाऱ्याला अटक

कोपरीगाव सेक्टर २६ येथे हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूस एक इसम संशयास्पद वावरताना पोलीस हवालदार सुनील पाटील यांना आढळून आला.

सविस्तर वाचा…

13:17 (IST) 7 Nov 2023
कोल्हापुरी बंधाऱ्यांमुळे शेतशिवार हिरवळीने बहरला; २ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा, ६ तालुक्यात ८४ बंधारे

वाशिम: पावसाचे पाणी इतरत्र वाहून गेल्याने जिल्ह्यात शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची चणचण भासू लागते. मात्र, यावर्षी जिल्ह्यात मृद व जलसंदारण विभागाच्यावतीने सहाही तालुक्यात ८४ कोल्हापुरी बंधारे, गेटेड बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले.

सविस्तर वाचा…

13:04 (IST) 7 Nov 2023
पनवेल पालिका क्षेत्रात १५ पैकी १२ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू

पनवेल महापालिकेने १५ पैकी १२ आरोग्यवर्धिनी केंद्र सूरू केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 7 Nov 2023
विविध वेबसाईटवरील टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक, चार्टर्ड अकाउंटंट आरोपीला अटक

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट ) असून एका खाजगी कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी आहे.

सविस्तर वाचा…

एकनाथ शिंदे लोकाभिमुख मुख्यमंत्री आहेत. ते आमदारांचे म्हणणे ऐकून घेतात. ते प्रभाविपणे काम करत आहेत . उद्धव ठाकरे यांच्यात कृतीशिलतेचा अभाव आहे. ते कर्यकर्त्यांना वेळ देत नाहीत. त्यांच्या कार्यशैलीवर कार्यकर्ते आजही नाराज आहेत, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.