News Updates Today, 19 May 2023 : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निर्णय देताना आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं. यानंतर त्यावर भाजपा-शिंदे गट आणि महाविकासआघाडीच्या घटकपक्षांमध्ये शाब्दिक चकमक होत आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवरील कारवाईचीही जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना बीडमध्ये पक्षाच्या जिल्हाध्याक्षाने मारहाण केल्याचाही आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या सर्व राजकीय घडामोडींसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…
Mumbai News Updates Today : राजकीय घडामोडींसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर...
पुणे: हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी पुणे जिल्ह्यात २४ मे रोजी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
बुलढाणा: उकळलेल्या दुधाच्या कढईत पडून गंभीररित्या भाजलेल्या मलकापूरच्या ओमश्री जाधव हिने मृत्यूशी तब्बल तीन आठवडे झुंज दिली. मात्र, ही झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. यामुळे मलकापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
सीबीआयने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर वानखेडेंवर अटकेची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा आणि अंतरिम संरक्षण मिळावं म्हणून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. यात शाहरूख खान आणि समीर वानखेडे यांच्या झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचाही समावेश आहे.
गोंदिया: आज १९ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापतीची निवडणूक पार पडली.
बुलढाणा: आमचे नेते सध्या राज्यसभा सदस्य असले तरी येत्या लोकसभा निवडणुकीत ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.
चंद्रपूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करा, तथा अहवाल सादर करा, असे निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांना दिले आहेत.
नवी मुंबई : बाळासाहेब ठाकरे गटाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी चौगुले यांना केलेला कॉल व त्याचे रेकॉर्डिंगच माध्यमांसमोर ऐकून संबंधित महिलेची नार्को टेस्ट करावी व तिला पोलिसांनी संरक्षण द्यावे अशी मागणी सानपाडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
"मी एससी कमिशनकडे तक्रार केल्यावर माझ्यावर कारवाई झाली. मात्र, माझी सीबीआयविषयी कोणतीही तक्रार नाही. त्यांना चौकशी करू द्या. दीड वर्षांपासून माझ्यावर भ्रष्टाचाराचे जे घाण आरोप केले जात आहेत त्याची चौकशी सीबीआयला करू द्या. मी त्यांना सहकार्य करेन आणि चौकशी होत असल्याचा मला आनंद आहे."
"चौकशीत मी जिंकणार आहे. कारण सत्यमेव जयते. मी घरी नसताना सीबीआयचे २२ अधिकारी माझ्या घरी आले आणि त्यांनी अनेक वस्तू जप्त केल्या. मात्र, त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं. ज्या घाण लोकांनी माझ्यावर घाण आरोप लावले. माझ्यावर आरोप करणारे काही घाण अधिकारी आहेत. त्यांच्याशी मी मरेपर्यंत लढणार आहे."
- समीर वानखेडे
जुहूमध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी केलेल्या कारवाईत लहान लहान मुलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्या मुलांवर कलम २७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या सर्वांना कलम ६२ (अ) नुसार संरक्षण देण्यात आलं होतं. ती मुलं आज त्यांचं आयुष्य व्यवस्थितपणे व्यतीत करत आहेत. त्यामुळे कलम २७ अंतर्गत आरोपीला तुरुंगात जावं लागावं असा गुन्हा नाही.
आर्यन खानवर कलम २७ चा गुन्हा नोंदवण्याला मान्यता मिळाली म्हणजे त्याला काही ना काही आधार असणार. त्याआधारेच डेप्युटी लिगल अॅडव्हायजरने कलम २७ नुसार गुन्हा नोंदवण्यास सांगितलं. त्यांना कलम २७ अंतर्गत गुन्हा रद्द करायचा होता, तर त्यांनी कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून करायला हवा होता.
- समीर वानखेडेंचे वकील
यवतमाळ: सध्या कापसाला योग्य हमीभाव नाही. जिनिंगमध्ये रुईच्या गाठी पडल्या आहेत. गिरण्यांमध्ये कापसाचा धागा पडून आहे.
यवतमाळ: सध्या कापसाला योग्य हमीभाव नाही. जिनिंगमध्ये रुईच्या गाठी पडल्या आहेत. गिरण्यांमध्ये कापसाचा धागा पडून आहे. यामुळे कापूस पीक धोक्यात आले आहे.
चंद्रपूर: विद्युत खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित – भंजारी मार्गावर घडली. या घटनेत दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मिथुन पांडुरंग मडावी, अंकुश राजू गंदेरशीरवार अशी मृतांची नावे आहेत.
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा, २४ मेपर्यंत अटकेपासून संरक्षण, सीबीआयकडून वानखेडेंवर तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप, न्यायालयाकडून वानखेडेंनी तपासात सहकार्य करावे असे निर्देश
नाशिक: पांजरापोळ संस्थेच्या जागेत आश्रयासाठी ठेवण्यात आलेल्या १११ पैकी १२ उंटांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून केवळ ९९ या ठिकाणी उरले आहेत. राजस्थान येथील रायका संस्थेचे सहकारी १६ दिवसानंतर पांजरापोळ येथून ९८ उंट घेऊन राजस्थानकडे शुक्रवारी रवाना झाले.
अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याबद्दल विशेष चौकशी समितीने अनेक खुलासे केले आहेत. एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुंबई: लोकलमधील गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरणाऱ्या आरोपीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून समीर वानखेडेबद्दल जे बोलत होते तेव्हा अनेक लोक माध्यमांसमोर येऊन वानखेडेंची बाजू घ्यायचे. आता जे नवाब मलिक सांगत होते, तेच सीबीआय सांगत आहे. सीबीआयने वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्या सर्व गोष्टी समोर येत आहेत. तेव्हा वानखेडेंचं समर्थन करणारे आता बॅकफुटवर गेले आहेत.
- अजित पवार (विरोधी पक्षनेते, विधानसभा)
डोंबिवली: शास्त्रीय संगीत शिकताना चांगले गुरू मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट असते. अशा गुरुंकडून चांगले शास्त्रीय संगीत शिकण्याबरोबरच मनुष्य कोण असतो आणि माणुसकी काय असते याची आदर्शवत शिकवणी मिळते.
आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे आणि शाहरूख खानचं संभाषण, वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत मोठा खुलासा, शाहरूखने केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉटही न्यायालयासमोर ठेवला, आर्यनच्या सुटकेसाठी शाहरूखने सहकार्याची विनंती केल्याचाही उल्लेख
गेल्या तीन वर्षापासून बंद असलेला आणि जिल्हा बँकेने थकित कर्जासाठी ताब्यात घेतलेल्या आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणुक भाजप विरूध्द शिवसेना शिंदे गट यांच्यात अत्यंत चुरशीने होण्याची चिन्हे आहेत. या कारखान्याच्या निमित्ताने राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातच राजकीय संघर्ष पाहण्यास मिळण्याची चिन्हे आहेत.
पुणे: विवाह समारंभात झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून उपहारगृहाची तोडफोड केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात घडली.
डोंबिवली: डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील १५ गुंतवणूकदारांकडून सोन्याचे दागिने घेऊन, त्यांना कर्जाचे आमिष दाखवून त्यांची ३१ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या जवाहिऱ्याला रामनगर पोलिसांनी राजस्थान मधून बुधवारी अटक केली.
नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पारा चढल्याने उकाडा वाढला आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने उष्माघाताच्या ३ संशयित मृत्यूची नोंद केली आहे. परंतु, शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.
पिंपरी: ‘मी कोयता भाई आहे, तुला माहिती नाही का? तू माझा फोन का उचलला नाही, आता तुला संपवतो’ असे म्हणत पाच जणांच्या टोळक्याने एकाला कोयत्याने मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास संत तुकारामनगर येथे घडली.
चंद्रशेखर बावनकुळे एवढे मोठे नेते असते तर मागील निवडणुकीत त्यांचं तिकीट कमी का झालं असतं. त्यांची निवडून येण्याची खात्री नव्हती म्हणून त्यांना नाकरण्यात आलं होतं. आता ज्याला स्वतःच्या निवडून येण्याची खात्री नाही, जो व्यक्ती मागच्या दाराने विधान परिषदेत आला त्याने बारामतीविषयी काय बोलावं. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी ते तसं बोलत असतील. उर्जा खातं अजित पवारांकडे होतं तेव्हा बावनकुळे ठेकेदारीचं काम करत होते हे आम्ही पाहिलं आहे. ते तेव्हा दिवस दिवस अजित पवारांच्या ऑफिसमध्ये बसलेले असायचे. आता पद आल्यावर ते बारामतीविषयी बोलत असतील, तर त्यांनी एकदा अनुभव घ्यायला हरकत नाही. अनेकांनी बारामतीत जाऊन अनुभव घेतले आहेत. बावनकुळेंनीही बारामतीचा अनुभव घ्यावा. माझी विनंती आहे की, चंद्रशेखर बावनकुळेंनीच बारामतीतून उभे राहावे. म्हणजे त्यांना कळेल. त्यांनी इतरांचा बळी देऊ नये. बावनकुळे सरकार आहेत, तर त्यांनीच बारामतीत येऊन अजित पवारांविरोधात लढावे. त्यानंतर त्यांना अजित पवारांची ताकद कळेल.
- दिलीप माोहिते पाटील (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा हे अत्यंत घनदाट आणि आकर्षक जंगल असूनही गेल्या १० वर्षात जय-वीरूसारख्या वाघांच्या स्थलांतरामुळे नागझिरा अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने घटत आहे. या जंगलात एकूण १२ वाघ असले तरी त्यापैकी ९ वाघ आणि ३ वाघिण आहेत.
वाघांनी अनेकदा पर्यटकांची वाट अडवली आहे, पण अस्वलही त्याच वाटेवर जात असेल तर.. नागझिरा अभयारण्यात हे घडले आहे आणि पर्यटक मार्गदर्शक अमित डोंगरे यांनी हा क्षण कॅमेऱ्यात टिपला आहे. नागझिरा अभयारण्य आणि अस्वलाचा उल्लेख होणार नाही असे शक्यच नाही.
मुंबई: मुंबई पोलिसांनी बोरिवली येथील स्पा सेंटरवर छापा टाकून देहव्यापारातून पाच महिलांची सुटका केली. पोलिसांनी स्पा सेंटरच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस मालकाचा शोध घेत आहेत.
जळगाव: शहरात शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत वीज पुरवठा बंद राहणार असल्याने पुन्हा पाणीबाणीची स्थिती राहणार आहे. या दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे जळगावकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
सहकार नेते व माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याचे आयोजन शनिवारी वर्धेत करण्यात आले आहे. वीस मे ते पुढील वीस मे असा वर्षभर हा कृतज्ञता सोहळा विविध उपक्रमांनी साजरा होत असल्याचे सत्कार समितीने नमूद केले. उद्या होणाऱ्या या सोहळ्यात महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी,माजी मंत्री अनिल देशमुख,माजी आमदार उल्हास पवार, खासदार रामदास तडस उपस्थित राहणार आहे.