News Updates Today, 19 May 2023 : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निर्णय देताना आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं. यानंतर त्यावर भाजपा-शिंदे गट आणि महाविकासआघाडीच्या घटकपक्षांमध्ये शाब्दिक चकमक होत आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवरील कारवाईचीही जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना बीडमध्ये पक्षाच्या जिल्हाध्याक्षाने मारहाण केल्याचाही आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या सर्व राजकीय घडामोडींसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…
Mumbai News Updates Today : राजकीय घडामोडींसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…
इतिहासात जाऊन बघितलं तर जेव्हा जेव्हा धनानंद हा सत्तेनं अंध झाला आणि ती सत्ता निरंकुश झाली, त्या त्या वेळी चाणक्य पैदा झाला आणि त्यानं चंद्रगुप्त पैदा केला आणि धनानंदाला खाली आणलं. आता चाणक्याचं काम डॉ. पोतदार करत आहेत आणि चंद्रगुप्त तुमच्यातलाच असेल – देवेंद्र फडणवीसांचं कार्यकर्त्यांना उद्देशून विधान
पुणे: सोसायटीत घरकामासाठी जात असलेल्या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न करून तिने दुर्लक्ष केले असतानाही अश्लिल चाळे करून विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली.
आपल्या पाठित खंजीर खुपसणाऱ्यांना आपण गनिमी काव्यानं उत्तर देऊन पुन्हा सत्तेवर आलो – देवेंद्र फडणवीस
डोंबिवली: डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील मुख्य वर्दळीच्या, अंतर्गत रस्त्यांवर सेवावाहिन्या टाकण्यासाठी विविध कंपन्यांनी रस्त्यांच्या कडा खोदून ठेवल्या आहेत. जागोजागी खड्डे आणि मातीचे ढिगारे, खोदलेले रस्ते असे चित्र शहरात दिसत आहे.
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा हे अत्यंत घनदाट आणि आकर्षक जंगल असूनही गेल्या १० वर्षात जय-वीरूसारख्या वाघांच्या स्थलांतरामुळे नागझिरा अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने घटत आहे. या जंगलात एकूण १२ वाघ असले तरी त्यापैकी ९ वाघ आणि ३ वाघिण आहेत.
राज्य शासनाच्या ४३ विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच १ जून ते १५ ऑगस्ट या अडीच महिन्यांत ७५ हजार पदांची मेगाभरती केली जाणार आहे.
निवडणुकीत मतांची जुळवाजुळव करण्याकरिता विविध प्रयोग केले जातात. धार्मिक वा जातीय आधारांवर मतांचे ध्रुवीकरण केले जाते तर कधी प्रादेशिक अस्मितेला फोडणी दिली जाते. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नियोजित मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा ‘अहिंदा’चा प्रयोग यशस्वी झाला.
भाजपा हा बहुजनांचा पक्ष नाही असं भाजपातल्या अनेक बहुजनांना वाटू लागलं आहे. त्यातलं दादा केचेंचं एक उदाहरण समोर आलंच आहे. यावर निवडणुकीच्या काळात सविस्तर बोलूच – नाना पटोले
कल्याण: ‘द केरला स्टोरी’ हा चर्चेचा विषय ठरलेला चित्रपट पाहण्यासाठी गुरुवारी कल्याणमध्ये तरुणी, महिलांनी चित्रपट गृहात गर्दी केली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक महिलांनी लव्ह जिहाद सारख्या प्रकारांना बळी पडणार नसल्याची शपथ घेतली.
आमच्या आमदारांना हे माहिती आहे की भाजपात मंत्री होण्यासाठी पैसे लागत नाहीत. त्यामुळे आम्ही तात्काळ संबंधित व्यक्तीला ट्रॅप केलं आणि पक्ष व पोलिसांना सांगितलं – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करून महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न कोण करतंय हे समोर आलं पाहिजे. त्यासाठी आम्ही आज राज्याच्या पोलीस महासंचालकांना भेटणार आहोत – अकोला घटनेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
शिवसेनेचे (ठाकरे गट) बीड जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून त्यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना दोन चापट्या मारल्याचा दावा केला. तसेच गंभीर आरोप केले. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. आता स्वतः सुषमा अंधारेंनी या घटनाक्रमावर पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच खरंच त्यांना मारहाण झाली का यावर स्पष्टपणे भूमिका व्यक्त केली. त्या शुक्रवारी (१९ मे) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.
नागपूर: शहरातील विविध भागातील मैदाने खेळाडूंसाठी सोयी सुविधांसह चांगली करण्यात यावी, असे केंद्रीय मंत्र्यांचे आदेश असताना उत्तर नागपूरसह शहरातील विविध भागातील अनेक मैदानांची अवस्था खराब असून सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना नाहीत.
कारगील युध्दात आघाडीवर लढणारे पुलगाव येथील कृष्णाजी समरीत हे शहीद झाले होते. त्यावेळी त्यांचे पार्थीव पुलगावला आले असतांना सामान्यांचेही डोळे पाणावले हाेते. तर समरीत कुटुंबात अश्रुचा बांधच फुटला. शहीद कृष्णाजी यांची गर्भवती पत्नी व दोन वर्षाचा मुलगा यांचा आधारच गेला होता.
यंदा आषाढी एकादशी महोत्सव २९ जून रोजी आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील भाविक मोठ्या संख्येने जातात. पंढरपूर यात्रेनिमित्त एसटी गाड्यांमध्ये भाविकांची गर्दी उसळते. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी बस गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येतात.
पंढरपूर यात्रेसाठी भक्तांच्या सेवेत लालपरी संपूर्ण क्षमतेने धावणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आतापासूनच अतिरिक्त बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातून पंढरपूरसाठी तब्बल २०० बस गाड्या चालवण्यात येणार आहेत.
महाप्रबोधन यात्रा २० मे रोजी होणार आहे. ही सभा ग्रामीण भागातील समारोपीय सभा आहे. आतापर्यंत जेवढ्या महाप्रबोधन सभा झाल्या त्या सर्व वादळी झाल्या. महाप्रबोधन यात्रा म्हटलं की चर्चा, वाद हे आलेच. विशेष म्हणजे या समारोप सभेला संजय राऊत असणार आहेत. म्हणजे पहिल्यांदाच महाप्रबोधन सभेला मी आणि संजय राऊत एकत्र असणार आहोत. त्यामुळे बऱ्याच लोकांना अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे. बीडमध्ये बरेच वर्षे शिवसेनेची पडझड होत आहे. आता नव्याने शिवसेना उसळी मारत आहे.
काल आम्ही स्टेजची पाहणी करायला गेलो होतो. स्टेजची पाहणी झाली आणि त्यानंतर आम्ही परत आलो. त्यानंतर आप्पासाहेब जाधव काही गोष्टींवर बोलले. ते बऱ्यापैकी नाराज होते. या नाराजीचं कारण बॅनरवर फोटो नाही असं होतं. यावर मी त्यांना आपण बोलू असं सांगितलं. आमचे दुसरे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी इथं बोलायला नको, हॉटेलवर जाऊन बोलू असं सांगितलं. त्यानंतर मी ठीक म्हणून गाडीत बसले. गाडीत मी फेसबूक लाईव्ह करून सभेच्या तयारीची माहिती देत होते. त्याचवेळी त्यांनी एका मुलाला काही कामं सांगितली. तेव्हा त्या मुलाने मी मजूर नाही, नीट बोला असं सांगितलं. यानंतर मी जिल्हाप्रमुख आहे, माझ्याशी असं बोलतो का, असशील तू जहागिरदार असं म्हणत शाब्दिक बाचाबाची वाढत गेली. त्याचं भांडणात रुपांतर झालं आणि मारामारी झाली.
– सुषमा अंधारे (उपनेत्या, ठाकरे गट)
बीड जिल्ह्यात झालेला सुषमा अंधारे यांच्याबरोबरचा प्रकार धक्कादायक आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. हे खरे आहेत का? सुषमा अंधारे तुमचं म्हणजे जिकडे राशन तिकडेच भाषण हे खरं आहे का? महाप्रबोधन यात्रेच्या वेळेला अवकाळी पाऊस पडला तरी सुषमा अंधारे म्हणतील ही शिंदे गटाची स्क्रिप्ट आहे.
– ज्योती वाघमारे (शिवसेना शिंदे गट प्रवक्त्या)
नाशिक: प्रलंबित देयकांविषयी महाराष्ट राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या शिष्टमंडळाने शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांना निवेदन देत तक्रारींचा पाढा वाचला.
नाशिक: आजारपणातून बरे झालेल्या कर्मचाऱ्याला वैद्यकीय रजेचे वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्या गेलेल्या जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांच्यासह दोन आरोग्य सेवकांची न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. अलीकडेच जिल्हा उपनिबंधकाला ३० लाखांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते.
आज पहाटे चार वाजता पाच लुटारुंच्या टोळीने ठिकठिकाणी हल्ले केले. दीपक वाघमारे व नवनाथ हे दुचाकीने चालले असताना त्यांना या टोळीने अडवून वाटमारी केली. मोबाईल व पैसे हिसकले. नंतर रस्त्यातील ट्रक अडविला. त्याच्या तावडीतून निघून पळत ट्रक चालक गावात आला.
नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात आज सकाळी १० ते संध्याकाळी पाचपर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. पॉवर शट डाऊन हे सेक्टर १४ ते २३ मध्ये असणार आहे. त्यामुळे साधारण पाऊण लाख ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. या वेळेत मान्सून पूर्व कामाचा भाग म्हणून सर्व ठिकाणी मेंटेनन्सची (दुरुस्ती) काम केले जाणार आहे अशी माहिती कोपरखैरणे इथल्या वीज वितरण विभागाने दिली आहे.
दोन मित्रांनी दारू प्यायल्यानंतर एकमेकांशी अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्याने नकार दिल्यामुळे त्याच्याशी बळजबरी संबंध प्रस्थापित करून डोक्यात दगड घालून खून केला. घनश्याम सिरसाम (शिवनी-मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे.
वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेचे एका २३ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. या तरुणासोबत पीडित महिला ५ मे रोजी घरून निघून गेली, पण तिच्यावर कारमध्ये प्रियकराने बलात्कार केला, त्यावेळी एका मित्राने हात पकडून ठेवले, तर दुसऱ्याने मोबाईलमध्ये व्हीडिओ काढला.
गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चर्चेत असणारं आर्यन खान प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. मुंबई क्रूज प्रकरणाची चौकशी करणारे तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. समीर नावखेडे यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याल आला आहे. आता समीर वानखेडेंनी या प्रकरणासंदर्भात तेव्हा त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्याची केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. ‘फ्री प्रेस जर्नल’नं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून या चॅटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.
Sushma Andhare Beaten By Thackeray Group Leader, Viral Video: शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. बंडखोरी होऊन जवळपास अकरा महिने पूर्ण झाले आहेत. तरीही ठाकरे गटाची गळती थांबत नाहीये. दररोज कोणता ना कोणता नेता शिंदे गटात प्रवेश करत आहे. असं असताना उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालावरून राज्यात दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत टीका केली. पोपट मेला आहे, पण उद्धव ठाकरेंना हे कुणी सांगत नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला. तसेच, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’च्या नव्या आवृत्तीत केलेल्या टीकेचाही फडणवीसांनी उल्लेख केला. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.