Mumbai News Update Today : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (१ जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. त्याचे पडसाद आजही (२ जून) पहायला मिळत आहेत. या भेटीवर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दुसरीकडे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चाही सुरू आहेत. अशातच राज्यातील राजकारणासह प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai News Updates Today : राज्यातील राजकारणासह प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर…
भंडारा: लग्न हे जीवनात एकदाच होत असत, म्हणून प्रत्येकाला वाटत की ते खास असावं. अलीकडे हटके पद्धतीने लग्नसोहळा करण्याकडे तरुणांचा कल असतो. त्यातल्या त्यात विवाह मंडपात पाहुण्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नववधू अनोख्या शक्कल लढवताना दिसतात. लक्षवेधी प्रयोग करून विवाह मंडपात एन्ट्री करतात.
नवी मुंबई : ठाणे – नवी मुंबई – पनवेल अर्थात ट्रान्स हार्बर लाईन रेल्वे मार्गावर दिघा हे नवीन रेल्वे स्थानक पूर्ण बनवून तयार आहे. मात्र राजकीय श्रेयवादात याचे उद्घाटन रखडले गेल्याचा दावा केला जातो. त्यामुळे आज (शुक्रवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी रेल रोको आंदोलन केले. आंदोलन रेल रोको असले तर रबाळे पोलिसांनी चोख बंदोबस्त लावल्याने रेल रोको करता आले नाही. केवळ घोषणा बाजी करीत मनसे कार्यकर्ता निघून गेले.
मुंबई: विवाहासाठी धर्मांतर केलेल्या प्रियकराने वांद्रे बॅंण्ड स्टॅण्ड येथे प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीने प्रेयसीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तिचे डोके जमिनीवर आदळले आणि तिला गटारात बुडविण्याचाही प्रयत्न केला.
नागपूर: राज्यात अलीकडच्या काळात विविध वास्तू, शहरांची नावे बदलण्याची मोहीमच सुरू झाली आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आता नागपूर यात मागे नाही.
जळगाव: दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी प्रश्नासंदर्भात केलेल्या आंदोलनात दोनशे लोकही नव्हते. मी कापसाला चांगला भाव मिळावा, या मागणीसाठी त्यावेळी केलेल्या आंदोलनात १५ हजारांवर लोक सहभागी झाले होते.
नागपूर : सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या कणाहीन नेतृत्वामुळे या विभागावर त्यांची पकड राहिलेली नाही. याचाच प्रत्यय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्यासह बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वारे समतादुतांच्या कार्यशाळेत बेभान डान्स करत असल्याची व्हायरल झालेली चित्रफीत होय. यावेळी वक्ते वसंत हंकारेदेखील उपस्थित होते.
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाचा निकाल ९३.२२ टक्के लागला आहे. नऊ विभागीय मंडळांमध्ये गेल्या वर्षी ९६.८१ टक्के निकालासह अमरावती विभाग राज्यात सातव्या स्थानी होता यावेळी सहाव्या स्थानी सुधारणा झाली आहे.
बुलढाणा : येथील सोळंके लेआउटमध्ये एका घराला आग लागून एक वृद्ध गंभीररित्या होरपळल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. यावेळी अग्निशमन दलासह घटनास्थळी आलेले आमदार संजय गायकवाड यांनी पाण्याचा मारा करीत आग विझविण्यासाठी नागरीकांच्या खांद्याला खांदा लावून शर्थीचे प्रयत्न केले.
चंद्रपूर : गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांच्या मधून वाहणाऱ्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वैनगंगा नदी पात्रात मृतदेह दफन विधी तथा अंत्यसंस्कार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नदी पात्रतील पाणी ओसरल्याने मृतदेहाचे सांगाडे दिसू लागले आहेत. हा प्रकार जिल्हातील सावली तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे या नदीतून शेकडो गावांना पाणी पुरवठा केला जातो.
नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या एप्रिल-मे महिन्यात कराव्यात, असा नियम असूनही सरकारकडून दरवर्षी मुदतवाढ देऊन नियमभंग केला जात आहे. यंदाही ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंबामुळे मुलांच्या शाळा प्रवेशासह इतरही अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
बुलढाणा : महाविकास आघाडीत राज्यपातळीवर मोठा भाऊचा वाद, वादंग रंगला असतानाच काँग्रेसने स्वतःला मोठा भाऊ गृहीत धरल्याचे चित्र आहे. भाजपाचे जगजाहीर मिशन- ४५ एक वर्षापासून गाजत असतानाच आता काँग्रेसचे अघोषित मिशन -४२ समोर आले आहे. आज २ जूनच्या मुहूर्तावर मुंबईत या मिशनचा प्रारंभ होत असून टिळक भवन येथे प्रदेश समिती व दिग्गज नेते जिल्हा निहाय स्थानिक नेत्यांशी विचारमंथन व खलबते करणार आहे.
नागपूर: घरात अठराविश्व दारिद्र्य त्यात आईचे आजारपण आणि बहिणीच्या शिक्षणासाठी १४ वर्षीय मुलीने घरातील चूल पेटविण्यासाठी थेट देहव्यापाराचा मार्ग पत्करला. मैत्रिणीच्या सांगण्यावरून ती स्वतःचे शरीर विक्री करून पैसे कमविण्यासाठी मजबूर झाली.
पिंपरी: चार महिन्यांपूर्वी झालेला बालविवाह उघडकीस आला असून पतीला पिंपरी पोलिसांनी अटक केली. तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच मावळ लोकसभा मतदारसंघावरही राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याने महाविकास आघाडीतील मित्रपक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. या मतदारसंघावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
जलतरण तलावांचा वार्षिक उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याचा दावा करून महापालिकेकडून शहरातील पाच जलतरण तलाव खासगी संस्थांना सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत.
नदीपात्रात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या नदीसुधार योजनेअंतर्गत (जायका प्रकल्प) सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेला खराडी येथील वनविभागाची जागा मिळाली आहे. त्यामुळे प्रस्तावित अकरा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांपैकी दहा प्रकल्पांसाठीच्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या असून जायका प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेस भवनाचे छायाचित्र समाजामाध्यमातून प्रसारित करून काँग्रेस भवनाचा उल्लेख ‘राजवाडा’ असा करत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला डिवचल्याचे संतप्त पडसाद काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमटले. काँग्रेस-भाजपमधील समाजमाध्यमातील वाद थेट रस्त्यावर आला. आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाने दहावी व बारावीतील २५० गुणवंत विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर १० हजारांऐवजी दुप्पट २० हजार रुपये जमा केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना दोनवेळा बक्षिसाची रक्कम दिल्याने पालिकेला २५ लाखांचा आर्थिक फटका बसला आहे.
कोरेगाव पार्कमधील एका तारांकित हाॅटेलची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तारांकित हाॅॅटेलमधील मद्यालयातील बिल तसेच ऑनलाइन बुकिंगचे पैसे क्रेडिट कार्डवरुन अदा करतो, असे सांगून आरोपींनी पाच लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
डोंबिवली येथील एका नोकरदाराला वाढीव व्याजाचे आमीष दाखवून युनिक कन्सलटन्सीचे मालक, भागीदार यांनी गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत चार कोटीची फसवणूक केली आहे. वाढीव व्याजाचा परतावा नाहीच, मूळ रक्कम परत मिळत नसल्याने नोकरदाराने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल (१ मे) वर्षा बंगल्यावर भेट झाली. या भेटीनंतर राज्यातील राजकारणात बरीच चर्चा झाली. परंतु, एका कार्यक्रमाचे आमंत्रण देण्याकरता ही भेट झाली असल्याची माहिती खुद्द शरद पवारांनी ट्वीटद्वारे दिली. यावरून आज ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेवर प्रहार केले आहेत.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत फारच आक्रमक झाले आहेत. विविध मुद्द्यांवरून ते शिंदे गट आणि भाजपाला हेरत असतात. सरकारच्या विविध धोरणांवर आणि योजनांवर ते टीका करत असतात. तसंच, कधीकधी थेट नेत्यांवर निशाणा साधतात. रोज सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना ते सत्ताधारी पक्षाला टार्गेट करतात. आज तर भर पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या खासदाराचं नाव ऐकताच त्यांनी थूं असं म्हटलं.
गेल्या काही महिन्यांमध्ये गौतम अदाणी आणि अदाणी उद्योह समूह या दोन बाबी चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. हिंडेनबर्गनं दिलेल्या अहवालामध्ये गौतम अदाणींनी शेअर बाजारात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा करण्यात आला. यानंतर अदाणींचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरले. त्यांचं जागतिक श्रीमंतांच्या यादीतलं स्थानही मोठ्या प्रमाणावर घसरलं. या पार्श्वभूमीवर अदाणींशी संबंधित सर्वच व्यक्तींकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जात असताना आता गौतम अदाणींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. यांच्यात नेमकी कशावर चर्चा झाली? यासंदर्भात तर्क-वितर्कांना उधाण आलं असताना त्यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
Maharashtra 10th Result 2023 Declared Date and Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दिलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजेच २ जून २०२३ ला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. २ जूनला दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. प्राप्त माहितीनुसार mahahsscboard.in वर ऑनलाईन पाहता येईल. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल उपलब्ध असेल.