Mumbai News Updates : राज्यातील राजकारणात एकीकडे महाविकासआघाडीच्या घटकपक्षांमध्येच शाब्दिक चकमक सुरू आहे, तर दुसरीकडे कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे महाराष्ट्रातही पडसाद उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील मतदारसंघात निवडणुकीची चुरस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा संपूर्ण आढावा फक्त एका क्लिकवर…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Political News Updates, 09 May 2023 : महाराष्ट्रातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा संपूर्ण आढावा फक्त एका क्लिकवर…
वाई : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली. मंगळवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या सूत्रांनी सांगितले. संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांना सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आगामी काळात या पदावर माजी सनदी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार असल्याची चर्चा आहे.
अमरावती: डिजिटल युगाने आपल्यासोबत अनेक फायदे आणि सुविधा आणल्या आहेत, परंतु फसवणूक करणारे आणि घोटाळे करणाऱ्यांना मोठी संधी देखील मिळवून दिली आहे.
नागपूर : भारतीय सैन्यदलातील ब्रिगेडिअर आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना एक समान गणवेश १ ऑगस्टपासून दिला जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सेवाविषयक बाबींमध्ये समान ओळख आणि दृष्टीकोन वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या बदलामुळे रेजिमेंट, कोर, शस्त्र यावर आधारित वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख पुसली जाणार आहे.
अमरावती : गेल्या अनेक दिवसांपासून तरुणीचा पाठलाग करून तिच्यासोबत सलगी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाने महाविद्यालयात जाऊन तिचा विनयभंग केला आणि मारहाणही केल्याची धक्कादायक घटना येथील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व कामांतर्गत शहरात वृक्ष छाटणी, धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण या कामांना मे महिन्याआधीच सुरुवात होते. शहरात धोकादायक वृक्ष छाटणीला सुरुवात झाली आहे. मात्र यंदा उन्हाचा पारा ४० अंश गेल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने मान्सूनपूर्व वृक्ष छाटणी उशिराने करण्यात आली असून, आता फक्त सुकलेल्या धोकादायक वृक्षांची छाटणी करण्यात येत आहे. तर उर्वरित हिरवळ झाडांची छाटणी मे महिन्याअखेर केली जाईल, अशी माहिती उद्यान विभागाने दिली.
नाशिक: नांदगाव तालुक्यातील साकोरे (पुनर्वसाहत पांझण) येथील वन व महसूल जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम कायमस्वरुपी बंद करावे आणि जमीन कसणाऱ्या कब्जेदारांच्या नावे करावी, या मागणीसाठी १५ मेपासून किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक – अवकाळी पाऊस, गारपीट, खराब हवामानामुळे आता चाळीत साठवणूक केलेला कांदा सडत असल्याने शेतकरी नव्या संकटात सापडला आहे. कांदा खराब होऊ लागल्याने लागवडीवरील खर्चही भरून निघणार नसल्याची भावना व्यक्त होत आहे. काही ठिकाणी कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत.

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अश्रू अनावर झाले. शरद पवार यांच्यासमोर भाषण करताना सुषमा अंधारेंनी पवारांनी कशी मदत केली याचा एक किस्सा सांगितला. हे सांगताना त्या भावनिक झाल्या आणि ढसढसा रडल्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यामुळेच माझं संपूर्ण कुटुंब सुरक्षित असल्याचंही नमूद केलं. त्या मंगळवारी (९ मे) साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या फुले आंबेडकर साहित्य पंचायत पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या.
पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हे आदेश दिले.

उल्हासनगर: पहिल्यांदाच आलेल्या मासिक पाळीबाबत असलेल्या अज्ञानातून आपल्याच बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत एका भावाने तीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे.
वाई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार पुढे पुढे ढकलत आहे, याचा अर्थ या सरकारला लोकांना सामोरे जायला भीती वाटते आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे सांगितले.
पिंपरी : धर्मांतरावर आधारित ‘दि केरला स्टोरी’ या चित्रपटाचे पिंपरी-चिंचवडमध्ये तीन शो मोफत दाखवण्यात येणार आहेत. यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच, धर्मांतरापासून हिंदू मुलींना वाचवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींची खंडणी मागून बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्या जयेश पुजारी व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) बंगळुरूमध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहात असलेल्या जयेशला दोन दिवसांत ‘एनआयए’ ताब्यात घेणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
वर्धा : महाराष्ट्र व छत्तीसगड या राज्यातील यात्रा करण्यास इच्छूक असणाऱ्यांना दक्षिण मध्य पूर्व रेल्वे विभागाने विशेष सोय दिली आहे. विलासपूर ते रामेश्वरम् या दरम्यान दक्षिण भारत शुभ यात्रा ही विशेष गाडी धावणार आहे.
चंद्रपूर : वर्ग पहिली ते आठवीपर्यंतच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत दरवर्षी २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून १८६ शाळांमध्ये या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले व त्यांचे शिक्षणही सुरू आहे. परंतु १८६ शाळांना ‘राईट ऑफ एज्युकेशन’ अंतर्गत मिळणारे कोट्यावधी रुपयांचे अनुदान शासनाने थकविले आहे.
पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा या मागणीसाठी पवना धरणग्रस्तांच्या वतीने मंगळवारी तीव्र आंदोलन करून पवना धरणातून पिंपरी चिंचवडला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जोपर्यंत आमचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही पवना धरणातून पाणीपुरवठा होऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. सविस्तर वाचा
ठाणे: कोपरी येथील आनंदनगर भागात शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भाजपचे पदाधिकारी प्रमोद चव्हाण आणि गणेश दळवी यांच्याविरोधात ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक : शासकीय कार्यालयांच्या आवारात सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला शेतीमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात मदत होणार आहे.
पुणे : पुण्यातील मावळमध्ये पवना धरणग्रस्तांनी मोर्चा काढला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. पवनानगर बाजारापेठेतून मोर्चा काढण्यात आला.
बुलढाणा : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बुलढाण्यात ‘पोस्टर’वॉर सुरू झाले आहे. मवाळ समजल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या जयश्री शेळके यासुद्धा या अघोषित प्रचार व वातावरण निर्मितीच्या ‘युद्धात’ अपवाद ठरल्या नाहीये! त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शेकडोच्या संख्येने शुभेच्छा फलक लागले आहे. यामुळे पक्षांतर्गत व विरोधी प्रतिस्पर्धी सावध झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर – बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत अक्षरबदल आढळून आल्याच्या कारणावरून शेकडो विद्यार्थ्यांना औरंगाबाद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पाचारण केल्याने खळबळ उडाली आहे. पाचारण केलेले विद्यार्थी हे अंबाजोगाई येथील योगेश्वरी व तेथीलच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे आहेत.
डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ‘मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणा’च्या (एम.एम.आर.डी.ए.) ३७५ कोटींच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्त्यांलगतच्या गटारांवर काही ठिकाणी ’बी. एम. सी’चा (मुंबई महानगरपालिका) शिक्का असलेली झाकणे गटारांवर बसविली जात आहेत.
अमरावती : लैंगिक शोषणाच्या विरोधात काही दिवसांपासून कुस्तीपटूंचे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असतानाच कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ अमरावतीत इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
मालेगाव : वेगवेगळ्या प्रयोजनार्थ शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम बँकांनी कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात परस्पर वर्ग करु नये, असा शासन आदेश असताना या आदेशाला धाब्यावर बसवित राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांचे अनुदान गोठविण्याची दंडेली होत असल्याच्या तक्रारी होत आहेत.
विमाननगर भागातील आयटी बिझनेस हब या माहिती-तंत्रज्ञान कंपनीत मंगळवारी दुपारी आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही.
सविस्तर वाचा…
ऑनलाइन टास्क पूर्ण करुन पैसे कमविण्याच्या आमिषाने अभियंता तरुणीची तब्बल २४ लाखांची फसवणूक झाली. हा प्रकार २ ते ५ मे दरम्यान पुनावळे येथे घडला.याप्रकरणी ३० वर्षीय तरुणीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सविस्तर वाचा…
उल्हासनगर शहरात एका लग्नाच्या वरातीत नवरदेवाच्या वाहनाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात ११ वऱ्हाडी मंडळी लग्न मांडवाऐवजी थेट रुग्णालयात पोहोचले आहेत. यात एकाची प्रकृती चिंताजनक असून या वऱ्हाड्याला मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…
धुळे: तालुक्यातील मोराणे गावात बनावट दारू तयार करुन विक्री करण्यात येणारा अड्डा पोलिसांनी उदध्वस्त केला.