Mumbai News Updates : राज्यातील राजकारणात एकीकडे महाविकासआघाडीच्या घटकपक्षांमध्येच शाब्दिक चकमक सुरू आहे, तर दुसरीकडे कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे महाराष्ट्रातही पडसाद उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील मतदारसंघात निवडणुकीची चुरस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा संपूर्ण आढावा फक्त एका क्लिकवर…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Political News Updates, 09 May 2023 : महाराष्ट्रातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा संपूर्ण आढावा फक्त एका क्लिकवर…
वल्लभनगर आगारातील पार्किंगमधील एसटी बस काढताना ब्रेक न लागल्याने समोर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर आदळून झालेल्या अपघातात ऑइल तपासत असलेल्या मॅकेनिक विभागातील महिला सहाय्यकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. सविस्तर वाचा…
वाशीम: रस्त्यावर उभ्या ट्रकला भरधाव खासगी बसने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत चालक आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.
पुणे: महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या चुकीमुळे घरमालक स्वत: वापर करत असलेल्या मिळकतींची ४० टक्के सवलत काढून घेत सुमारे लाख मिळकतींना फरकाच्या रकमेची देयके पाठविण्यात आली.
येथील सागाव भागातील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. मागील १२ वर्ष ते विश्वस्तांच्या सहकार्याने ट्रस्टचा कारभार पाहत आहेत. सविस्तर वाचा…
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथील पंचायत समितीमधील बांधकाम विभागाच्या कनिष्ठ सहायकास सोमवारी दुपारी साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना पकडले. कनिष्ठ सहायकाची हिंमत इतकी की थेट शाखा अभियंत्यांकडूनच लाच मागितल्याचे उघड झाले.
माझा लंडन दौरा पूर्वनियोजित होता. या दौऱ्याचा सत्तासंघर्षाशी काहीही संबंध नाही. संविधानानुसार आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. त्यामुळे संवैधानिक शिस्तीशी तडजोड होणार नाही याची मला खात्री आहे. आपल्या न्यायव्यवस्थेला जबाबदारी आणि कर्तव्य पूर्णपणे माहिती आहे.
– राहुल नार्वेकर
ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २१ मे रोजी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या येथील संपर्क कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मोर्चासंदर्भातील निवेदन मंत्री महाजन यांच्या संपर्क कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकार्यांनी दिले आहे. सविस्तर वाचा…
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र तांत्रिक कारणाने बंद पडले. त्यामुळे येथील महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णांची तपासणी खोळंबल्याने हे रुग्ण योजनेच्या मंजुरीसाठी ताटकळत असल्याची माहिती आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) वरीष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानच्या ‘पीआयओ’ला माहिती पुरविल्याच्या आरोपावरून एटीएसने त्यांना अटक केली. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली. प्रदीप कुरुलकर यांच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
नागपूर : ‘सी-२०’ परिषदेच्या निमित्ताने १४० कोटी रुपये खर्च करून शहराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. पण, परिषद आटोपल्यावर चोरट्यांनी ठिकठिकाणी लावलेल्या जाळ्या (नेट), सुशोभित झाडे पळवण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे नागपूरकरांना शहर सौंदर्यीकरणाचे वावडे आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागपूर : गोमूत्र हे आहार द्रव्य नाही. त्यामुळे गोमूत्राचा औषध म्हणून उपयोग केला गेला पाहिजे. मात्र प्रक्रिया न करता गोमूत्र वापरू नये. तसे केल्यास ते आरोग्याला अपायकारक ठरते, अशी माहिती आयुर्वेद तज्ज्ञ आणि गोमूत्रावर गेल्या अनेक वर्षांपासून शंशोधन करणाऱ्या डॉ. नंदिनी भोजराज यांनी दिली.
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. त्यावरून काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले होते. त्याविरोधात भाजपाने तक्रार केली आणि २४ तासांत अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हुसेन यांना दुसऱ्या एका प्रकरणात अटक झाली आहे.
नागपूर : वस्तू चोरी जाणे आणि त्यांची पोलिसात तक्रार करणे हे काही नवीन नाही. परंतु मलवाहिनीवरील झाकण चोरीला गेल्यानंतर पोलिसात तक्रार होण्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी.
भंडारा : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे आपत्तीजनक फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत या अल्पवयीन मुलीवर अनेकदा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुणे: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने हडपसर परिसरातून तब्बल तीन कोटी ४२ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
शौचालयांमध्ये स्वच्छता करणाऱ्या कंत्राटदाराला त्याच्या बिलाची रक्कम, मिळवून देण्यासाठी एक लाखांची लाच घेणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेच्या विलास भोपी या लाचखोर स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. विलास भोपी याने ३ लाख ७५ हजारांची लाचेची मागणी केली होती. सविस्तर वाचा…
नागपूर: राज्यातील अवकाळी पाऊस जाऊन तापमानाचा पारा पुन्हा वाढत असतानाच आज “मोचा” या चक्रीवादळाच्या आगमनाची वर्दी हवामान खात्याने दिली आहे.
वर्धा: नियमित पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी या सोबतच गुन्हे शाखा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडत असते.
गेल्या काही दिवसांपासून तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक कंत्राटदाराची भाषा करत आहेत. सामान्य पुढारी अशा वार्ता करत नसतो. त्यांना बरोबर दर माहिती आहे, कंत्राटदाराची भाषा माहिती आहे. ते २५ वर्षे तेच काम करत आले आहेत.
– खासदार श्रीकांत शिंदे
पुणे: गेल्या सात वर्षांचा विचार करता यंदा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांत समाधानकारक पाणीसाठा आहे.
पुणे: गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात एप्रिलमध्ये टँकरची मागणी झालेली नव्हती. त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी टँकर सुरू करण्याची गरज भासली नाही.
नागपूर: ‘मी लेस्बियन असून भविष्यात लग्नासाठी खूप अडचणी येतील. लग्नानंतर मला सुखी संसारही करता येणार नाही.
केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील ३६ टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी २.३६ लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर ९६ टक्के आहे, भारताचा ७६ टक्के आहे.
केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या ०.७६ टक्के आहे, देशातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची संख्या २२ टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये ६ टक्के आहे. आसाममध्ये ४२ टक्के आहे आणि उत्तरप्रदेशमध्ये ४६ टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या ७ टक्के अधिक आहे.
केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील 36 टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर 96… pic.twitter.com/86TZ8nnGK2
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 8, 2023
त्या चित्रपटामध्ये जी ३२ हजार महिलांची कथा सांगितली गेली त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा प्रोड्यूसर म्हणतो की, ही कथा फक्त ३ महिलांची आहे. चित्रपट चालावा यासाठी ३२ हजार महिला सांगितल्या होत्या.
म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या महिला भगिनींची बदनामी करायची. आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत त्यांना काही समजतच नाही त्या वाटेल तशा वागतात असे प्रदर्शित करायचं. शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिला गौण आहेत असं चित्र उभं करायचं. हेच केरळवर आधारीत चित्रपटाचं खरं सत्य आहे.
असत्याच्या आधारावर हिंसा, द्वेष निर्माण करायचा आणि त्याच माध्यमातून पुढे निवडणूका जिंकायच्या हे गणित लावूनच असे चित्रपट काढले जातात.
– जितेंद्र आव्हाड (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)
कथित लव्ह जिहादवर आधारित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, या चित्रपटातील दाव्यांवरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाठिंबा दिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या वादावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच या चित्रपटाला दिलेल्या पाठिंब्यावरून त्यांनी पंतप्रधान मोदींना टोलाही लगावला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. विश्वनाथ महाडेश्वर यांनी मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या दरम्यान मुंबईचं महापौरपद भूषवलं होतं.

Former Mumbai Mayor Vishwanath Mahadeshwar Passes Away : शिवसेनेच्या ठाकरे गटाने ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. विश्वनाथ महाडेश्वर यांनी मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या दरम्यान मुंबईचं महापौरपद भूषवलं होतं.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातून बेपत्ता होणाऱ्या मुली व महिलांचा प्रश्न उपस्थित केल्यावर एकच खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही हा मुद्दा उपस्थित करत राज्यातील बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का? असा सवाल केला. यावर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच महाराष्ट्रात दरवर्षी ४ हजार मुली, तर ६४ हजार महिला बेपत्ता होतात, असंही नमूद केलं.