Mumbai News Today : महिला आरक्षण म्हणजेच ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर झालं आहे. लोकसभा आणि देशातल्या सर्व राज्यांमधील विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षणाच्या विधेयकाला सोमवारी (१८ सप्टेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तर, कॅनडा आणि भारत यांच्यातील वाद कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. दुसरीकडं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून १६ आमदार अपात्रतेच्या कारवाईबाबत कारवाईला वेग आला आहे. यासही विविध बातम्या जाणून घेणार आहोत…

Live Updates

Maharashtra News Today : राजकीय, क्रीडा, क्राइम यासह प्रत्येक घडामोड एका क्लिकवर...

17:31 (IST) 22 Sep 2023
अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी ६८ अभ्यासक्रम; बार्टी, एनआयईएलआयटीतर्फे उपक्रम

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एनआयईएलआयटी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

सविस्तर वाचा...

17:31 (IST) 22 Sep 2023
पिस्तूल बाळगणारे दोन सराईत गुन्हेगार गजाआड; दोन पिस्तूल, तीन काडतुसे जप्त

सहकारनगर भागात एकजण थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती सोनुने, चव्हाण यांना मिळाली.

सविस्तर वाचा...

15:56 (IST) 22 Sep 2023
"पंतप्रधानांनी NCP ला 'नॅचरल करप्ट पार्टी' म्हटलं होतं, पण...", तटकरेंचं विधान

"२०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत विधानसभेच्या प्रचाराला आल्यावर एनसीपी म्हणजे 'नॅचरल करप्ट पार्टी' हे वक्तव्य केलं होतं. पण, विधानसभा निवडणूक झाल्यावर भाजपाला न मागता आम्ही पाठिंबा दिला. २०१७ आणि २०१९ चा घटनाक्रम सर्वांसमोर आहे," असं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

15:27 (IST) 22 Sep 2023
रायगड : तडीपारीच्या प्रस्तावांवर तीन वर्षानंतरही निर्णय नाही; गुंड मोकाट…

समाजात अशांतता आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यकींवर तडीपारीची कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. मात्र रायगड जिल्हा प्रशासनाला याचा विसर पडला की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

वाचा सविस्तर....

14:43 (IST) 22 Sep 2023
"१०० उद्धव ठाकरे किंवा १०० आदित्य ठाकरे आले, तरी…", भाजपा आमदाराचं विधान

१०० एकनाथ शिंदे किंवा १०० अजित पवार आले, तरी मुंबई महापालिका जिंकू शकत नाहीत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. याला आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "१०० उद्धव ठाकरे किंवा १०० आदित्य ठाकरे आले, तरी एकटे देवेंद्र फडणवीस भारी पडतील. एकनाथ शिंदे आणि भाजपा मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार," असं नितेश राणे यांनी म्हटलं.

13:12 (IST) 22 Sep 2023
सांताक्रुझ येथे महिलेच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक

आरोपी व मृत महिलेमध्ये प्रेमसंबंध होते. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती.

सविस्तर वाचा...

13:11 (IST) 22 Sep 2023
डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे मार्गातून प्रवाशांची ये-जा

रेल्वे मार्ग ओलांडून प्रवास करणे रेल्वे कायद्याने गुन्हा आहे. तरीही अनेक प्रवासी या कायद्याकडे दुर्लक्ष करुन दररोज रेल्वे मार्गातून ये-जा करतात.

सविस्तर वाचा...

13:11 (IST) 22 Sep 2023
कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बस थांब्यांना खासगी वाहनांचा विळखा

रस्ते वाहतुकीला अडथळा ठरत असलेले बस थांबे केडीएमटी प्रशासनाने काढून टाकावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सविस्तर वाचा...

12:40 (IST) 22 Sep 2023
बंडखोरांच्या अपात्रतेबाबतच्या घडामोडींना वेग, दिल्लीतील भेटीगाठीवर राहुल नार्वेकर म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आमदार अपात्रतेच्या याचिकांवरून हालचालींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गुरुवारी (२१ सप्टेंबर) दुपारी नवी दिल्लीला गेले. त्यानंतर या दिल्ली भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच राहुल नार्वेकरांनी दिल्लीत कुणाला भेटले आणि या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावर प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (२२ सप्टेंबर) दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

सविस्तर वाचा...

12:18 (IST) 22 Sep 2023
पुणे : पीएमपीचे आजपासून दोन नवे मार्ग

हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानक आणि मुंढवा चौक ते केसनंद फाटा या दोन नव्या मार्गांवर शुक्रवारपासून पीएमपीची सेवा देण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

12:17 (IST) 22 Sep 2023
शहरी गरीब योजनेच्या उत्पन्न मर्यादेत वाढ…ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक

या योजनेची वार्षिक एक लाखापर्यंतच्या उत्पन्नाची मर्यादा १ लाख ६० हजार एवढी करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

11:57 (IST) 22 Sep 2023
उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंना सुनावणीसाठी बोलवणार? राहुल नार्वेकर म्हणाले...

"१४ सप्टेंबरला आमदार अपात्रतेबाबत सुनावणी झाली आहे. येत्या आठवड्यात सुनावणी घेणार आहोत," अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

पक्षाच्या प्रमुखांना सुनावणीसाठी बोलावणार का? या प्रश्नावर राहुल नार्वेकर म्हणाले, "गरज पडली तर त्यांनाही बोलावण्यात येणार आहे."

11:42 (IST) 22 Sep 2023
अतिक्रमण विरोधी पथकातील सहायक निरीक्षकाला कानाखाली मारली; बेकायदा पथारी लावणाऱ्या महिलेवर गुन्हा

बेकायदा पथारी लावणाऱ्या महिलेने सहायक निरीक्षकाला धक्काबुक्की केली.

सविस्तर वाचा...

11:41 (IST) 22 Sep 2023
पिंपरी-चिंचवडमध्ये मूर्तिदान, निर्माल्य संकलनासाठी रथ; विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक

महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मूर्ती, निर्माल्य संकलनाकरिता फुलांनी सजवलेले सुशोभीकरण रथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा...

11:29 (IST) 22 Sep 2023
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तिकर यांची ६ तास चौकशी, अडचणी वाढणार?

शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांची कथित खिचडी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं गुरूवारी ( २१ सप्टेंबर ) सहा तास कसून चौकशी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आजही अमोल कीर्तिकर यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिली. त्यामुळे अमोल कीर्तिकर यांच्या अडचणीत वाढ होणार का? हे पाहवं लागणार आहे. गजानन कीर्तिकर शिंदे तर अमोल कीर्तिकर ठाकरे गटात आहेत.

11:20 (IST) 22 Sep 2023
नाशिकमध्ये मोटारीतून मिरवणूक मार्गाची पाहणी, मनपा आयुक्तांकडून अतिक्रमण हटविण्याची सूचना

या मार्गावर लोंबळकणाऱ्या तारा, अतिक्रमणे, मार्गावरील खड्डे आणि तत्सम अडचणी गणेश मंडळांकडून याआधी झालेल्या बैठकांमधून मांडल्या गेल्या आहेत.

सविस्तर वाचा...

11:19 (IST) 22 Sep 2023
कांजूरमार्ग कारशेडच्या कामासाठी १५ दिवसांत निविदा मागवणार

मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कांजूरमार्ग कारशेडच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

11:15 (IST) 22 Sep 2023
"एकनाथ शिंदे अन् राष्ट्रवादीतील नेत्यांना फक्त लोकसभेसाठी जवळ घेतलं, पण…", रोहित पवारांची भाजपावर टीका

देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची 'इंडिया' आघाडी आणि भाजपा कामाला लागले आहेत. महाराष्ट्रतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बरोबर घेऊन जास्त जागा निवडून आणण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. पण, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे.

वाचा सविस्तर...

10:49 (IST) 22 Sep 2023
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

रामदास कदम म्हणतात, “कुणाला राजकीय दृष्ट्या कायमचं स्मशानात जायला लागेल याचं…!”

वाचा सविस्तर

10:48 (IST) 22 Sep 2023
“राहुल नार्वेकरांना जर दिल्लीत यावं लागत असेल, तर…”, संजय राऊतांचा हल्लाबोल!

संजय राऊत म्हणतात, “ज्या बाईच फुटून गेल्या आहेत, त्यांच्यासमोर सुनावणी घेणं हा सरळ सरळ…!”

वाचा सविस्तर

10:37 (IST) 22 Sep 2023
‘मेडिकल’च्या वसतिगृहात रॅगिंग? रात्री विद्यार्थ्यांना…

दिल्लीतून ही तक्रार मेडिकल प्रशासनाकडे वर्ग होताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.

सविस्तर वाचा...

10:36 (IST) 22 Sep 2023
घे भरारी! चिमूरड्या अर्णवची थाय बॉक्सिंग स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुवर्णझेप

ग्रामीण भागात शिकणाऱ्या चिमूरड्या अर्णवने मुष्ठीयुध्द स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुवर्णभरारी घेतली असून आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे.

सविस्तर वाचा...

10:35 (IST) 22 Sep 2023
प्राणवायू निर्मात्या कंपन्यांसाठी नव उद्योगांचा गालिचा, जुन्याच भुखंडावर नवा व्यवसाय सुरु करण्याचा पर्याय खुला

प्राणवायूचा तुटवडा निर्माण होताच सरकारने जुलै २०२१ पर्यंत आखलेल्या एका विशेष धोरणाच्या माध्यमातून एकूण ७९ भूखंड वेगवेगळ्या कंपन्यांना विकले.

सविस्तर वाचा...

10:27 (IST) 22 Sep 2023
ठाकरे गट मध्यप्रदेशची निवडणूक लढणार? आदित्य ठाकरे म्हणाले....

शिवसेना ( ठाकरे गट ) आदित्य ठाकरे मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुका ठाकरे गट लढणार का? असा प्रश्न विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांचा निर्णय घेतील."

09:56 (IST) 22 Sep 2023
"शहाण्याला शब्दांचा मार, सर्वोच्च न्यायालयाने चपराक मारली, पण...", ठाकरे गटातील खासदाराची नार्वेकरांवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर वाजवी वेळेत निर्णय घेण्याचे निर्देश देऊनही त्यात दिरंगाई होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्याच वेळी येत्या आठवडाभरात कारवाईची कालमर्यादा निश्चित करावी, असे आदेशही विधानसभाध्यक्षांना दिले आहेत. आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार अरविंद सावंत यांनीही राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे.

वाचा सविस्तर...

09:55 (IST) 22 Sep 2023
"आपल्या त्या चुकीमुळं पेपर फोडणाऱ्या टोळ्यांचा आत्मविश्वास वाढला अन्...", असा आरोपही रोहित पवारांनी फडणवीसांवर केला.

पेपरफुटी प्रकरणावर गुन्हा दाखल झालेल्या दोघाचं नाव गुणवत्ता यादीत आल्याचं समोर आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. पावसाळी अधिवेशनात पेपरफुटीचा मुद्दा मांडला. पण, फडणवीसांनी त्या मुद्द्याकडं दुर्लक्ष केलं आणि पेपर फोडणाऱ्या टोळ्यांची बाजू घेतली होती, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.

वाचा सविस्तर...

09:54 (IST) 22 Sep 2023
"विधानसभा अध्यक्षांची भूमिका संविधानाला...", आदित्य ठाकरे यांचं विधान

"राज्यात घटनाबाह्य सरकार बसलं आहे. सर्व घोषणा आणि पैसे बॅनरवरती आहेत. पण, लोकांना कोणतीही मदत झाली नाही. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. विधानसभा अध्यक्षांची भूमिका संविधानाला न्याय देईल, अशी असली पाहिजे. संविधानाप्रमाणे हे चाळीस लोक गद्दार आहेत. त्याप्रमाणे हे अपात्र झाले पाहिजेत," असं शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

dhangar reservation

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी दाखले काढण्यासाठी तातडीने शासन निर्णय काढण्याची हमी देणाऱ्या राज्य सरकारवर अन्य समाजांचाही दबाव वाढत आहे. मराठय़ांना कुणबी दाखले देण्याच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाने आंदोलन सुरू केले आहे तर, आता धनगर समाजानेही आरक्षणाबाबत तातडीने शासन आदेश काढावा, असा आग्रह धरला आहे. सरकारला कोंडीत पकडणारी ही आंदोलने शमवताना सरकारची कसोटी लागत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी बैठक घेत मुस्लीम आरक्षणाचा आढावा घेतला.

Story img Loader