Maharashtra Breaking News Updates, 02 August 2024: राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असताना राज्यात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी पक्षात असणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वेगवेगळे दावे व आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्यावरील खटला, उद्धव ठाकरेंवरील आचारसंहिता भंगाचा आरोप आणि संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Live Updates

Marathi News Live Today, 02 August 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा

19:30 (IST) 2 Aug 2024
“जय मालोकारला विनाकारण गुंतवले कारण…”, अमोल मिटकरींचा आरोप; म्हणाले, “अमेय खोपकरांनी माझ्या शर्टाच्या बटनाला…”

अकोला : दिवंगत मनसैनिक जय मालोकार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे मनसेच्या आढावा बैठकीत त्याला जाब विचारला गेला व वाहन तोडफोड प्रकरणांत गुंतवले गेले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. शर्टाच्या बटनालाच हात लावून दाखवावे, असे प्रत्युत्तर देखील मिटकरी यांनी मनसेचे नेते अमेय खोपकरांना दिले.

वाचा सविस्तर...

18:33 (IST) 2 Aug 2024
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च केला खुलासा, म्हणाले “फक्त माध्यमांमध्ये चर्चा”

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा एनडीए सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर पक्षाचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. नव्या अध्यक्षाबाबत भाजपकडून अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत.

वाचा सविस्तर...

18:11 (IST) 2 Aug 2024
नवी मुंबई : शिरवणेतील अतिधोकादायक इमारत रिकामी, ६१ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

नवी मुंबई : नेरुळ विभागात शिरवणेगाव, सेक्टर १ येथील तस्लीम बिल्डींग, घर नं. १६०३ ही तळमजला अधिक दोन मजली इमारत अतिधोकादायक झाल्याचे निदर्शनास आल्याने तेथील रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून इमारतीत राहणाऱ्या १२ कुटुंबांतील ६१ नागरिकांना पालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार विभाग अधिकारी तथा सहायक आयुक्त डॉ. अमोल पालवे यांनी गावदेवी समाजमंदिर, जुईनगर, सेक्टर २३ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

17:55 (IST) 2 Aug 2024
शिवरायांची जयंती आता आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-खास’मध्ये दरवर्षी होणार…!

चंद्रपूर : आग्रा येथील दिवाण-ए-खासमध्ये महाराजांची शिवजयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी परवानगी घेण्याची गरज पडू नये, यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने राज्य सरकारसोबत एक सामंजस्य करार करावा, असा प्रस्ताव राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

वाचा सविस्तर...

17:52 (IST) 2 Aug 2024
नवी मुंबई : एपीएमसी फळ बाजारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

नवी मुंबई : एपीएमसी बाजार आवारात अनेक घटना घडत असतात. लूटमार, चोरी, अवैध धंदे, गांजा विक्रीच्या घटनाही घडतात. एपीएमसी फळ बाजारात ६३ सीसीटीव्ही आहेत, मात्र यातील बहुतांश सीसीटीव्ही बंदच आहे.

सविस्तर वाचा...

17:35 (IST) 2 Aug 2024
Sharad Pawar Faction on Ajit Pawar - शरद पवार गटाचा अजित पवारांना टोला!

मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था पाहून महायुती सरकारमधील मंत्रीच गयावया करू लागले. त्यामुळे विकासाभिमुख उपमुख्यमंत्री नेमका कोणाचा विकास करतात याचा अंदाज त्यांच्या खासगी विमानप्रवासातून येऊ लागलाय - शरद पवार गट

https://x.com/NCPspeaks/status/1819301628085973355

17:34 (IST) 2 Aug 2024
कल्याणमधील होर्डिंग दुर्घटनेतील ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती

कल्याण : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल अशा निष्काळजीपणाने होर्डिंगची उभारणी केल्यामुळे सहजानंद चौकातील होर्डिंग दुर्घटनेतील ठेकेदारावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या दुर्घटनेत ज्या वाहन मालकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे.

सविस्तर वाचा...

17:19 (IST) 2 Aug 2024
डोंबिवलीतील बेकायदा राधाई कॉम्प्लेक्सवर हातोडा, दोन दिवसात इमारत भुईसपाट करण्याचे नियोजन

डोंबिवली : येथील नांदिवली पंचानंद भागातील डॉन बॉस्को शाळेमागील बेकायदा सात माळ्याची राधाई कॉम्प्लेक्स इमारत शुक्रवारी भुईसपाट करण्याची कारवाई पालिकेच्या ई प्रभागाच्या तोडकाम पथकाने पोलीस बंदोबस्तात सुरू केली.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 2 Aug 2024
पंतप्रधान मोफत लॅपटॉप योजना काय आहे? कसा अर्ज कराल

नागपूर: तरुणाई हा आपल्या देशाचा पाया आहे. तरुणांचा जितका विकास होईल तितका आपला देश प्रगती करेल. हे लक्षात घेऊन केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक योजना सुरू करत असते. भारत सरकारची अशीच एक नवीन योजना आणली आहे. ‘एआयसीटीई मोफत लॅपटॉप’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देणार आहे. तांत्रिक आणि डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करू शकतील.

वाचा सविस्तर...

17:10 (IST) 2 Aug 2024
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आंबेडकरी समाजातून नाराजीचे सूर, काँग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले…

नागपूर : सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयास मंजुरी दिली आहे. या निर्णयावर आंबेडकरी समाजातून नाराजी व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या निर्णयांवर टीका केली आहे. केंद्रातील भाजप सरकार जातीवादी असून ते सामाजिक एकजूटता कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

वाचा सविस्तर...

16:46 (IST) 2 Aug 2024
छत्रपती संभाजीनगर : आष्टीतील ‘एकात्मिक बालविकास’मधील दोन महिला पाच हजार रुपये घेताना सापळ्यात

छत्रपती संभाजीनगर - अंगणवाडीचा सकारात्मक अहवाल दिल्यामुळे पगार सहा हजारांवरून दहा हजार रुपये झाल्याचे बक्षीस म्हणून पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या पर्यवेक्षिका व कनिष्ठ सहायक महिलेस रक्कम घेताना पकडण्यात आल्याची माहिती शुक्रवारी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळाली.

16:37 (IST) 2 Aug 2024
उरणला जोडणाऱ्या जलमार्गाची कामे कधी पूर्ण होणार? सेवा सुरू होण्यापूर्वीच करंजा जेट्टीची दुरवस्था

उरण : जल प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या करंजा-रेवस व मोरा- मुंबई हे दोन्ही मार्ग अर्धवट आहेत. त्यामुळे उरणला जोडणारे जलमार्ग कधी पूर्ण होणार असा सवाल प्रवासी करीत आहेत. करंजा-रेवस मार्गावरील करंजा जेट्टी तयार होऊनही सुरू न झाल्याने जेट्टीची दुरवस्था सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा...

16:36 (IST) 2 Aug 2024
‘ते’ दोघे एकत्र आले, पण संवाद न साधताच निघून गेले…

नागपूर : विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वाद सुरू आहे. दोघांकडून परस्परांच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचे दावे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी दोन्ही नेते नागपुरात जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र व्यासपीठावर आले. मात्र कार्यक्रम संपताच दोघेही जवळ आले. मात्र एकमेकांशी संवाद न साधता निघून गेले.

वाचा सविस्तर...

16:20 (IST) 2 Aug 2024
वसई : प्राध्यापिकेला चिरडणारा तरुण मद्यधुंद असल्याचे स्पष्ट, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वसई : वसई- विरारच्या गोकुळ टाऊनशीप येथे प्राध्यापिका आत्मजा कासाट यांना धडक देणारा चालक शुभम पाटील (२४) हा मद्याच्या नशेत असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

15:55 (IST) 2 Aug 2024
ख्यातनाम चित्रकार सुधा मदन यांचे निधन

कोल्हापूर : मूळच्या कोल्हापूरच्या पण मुंबईत स्थायिक असलेल्या ख्यातनाम चित्रकार सुधा मदन म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुधा पांडुरंगराव ऊपळेकर यांचे वयाच्या शहाण्णवव्या वर्षी शुक्रवारी सकाळी मुंबईत वार्धक्यात निधन झाले.

सविस्तर वाचा...

15:34 (IST) 2 Aug 2024
‘महारेल’च्या व्यवस्थापकीय संचालकांची मुदतवाढ वादाच्या भोवऱ्यात! नवी नियुक्ती करणे अपरिहार्य

मुंबई : राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून यात महत्त्वपूर्ण असलेल्या महाराष्ट्र रेल्वे पायाभूत विकास महामंडळाच्या (महारेल) व्यवस्थापकीय संचालकांना दिलेली मुदतवाढ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आपली चूक लक्षात येताच राज्याच्या गृह (परिवहन) विभागावर ही मुदतवाढ रद्द करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्याची नामुष्की ओढवली आहे.

वाचा सविस्तर...

14:21 (IST) 2 Aug 2024
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात ट्रॅक्टर उलटला, सातजण बेपत्ता, शोध मोहीम सुरू

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील अकिवाट – बस्तवाड मार्गावरून जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने त्यातून प्रवास करणारे सात जण कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात बेपत्ता झाल्याचीधक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.

वाचा सविस्तर...

14:18 (IST) 2 Aug 2024
डोंबिवलीत देवीचापाडा येथील महिलेची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा गोपीनाथ चौक भागात कलावती आई मंदिर परिसरात राहत असलेल्या एका ३९ वर्षाच्या महिलेला तुमचे मंत्रालयात नोकरी लावण्यासाठी भामट्याने घेतलेले पैसे परत मिळवून देतो. असे सांगून या महिलेशी लगट करून तिच्या बरोबर लग्न करण्याची तयारी दाखवून भांडुपमधील एका भामट्याने महिलेची चार लाख रूपयांची फसवणूक केली आहे.

सविस्तर वाचा...

13:51 (IST) 2 Aug 2024
केंद्रीय हवाई राज्यमत्र्यांच्या पुण्यातील विमानतळच नापास!

पुणे : पुणे विमानतळ प्रवासी सुविधांमध्ये नापास ठरले आहे. विमानतळ सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळाचे स्थान घसरले आहे. विमानतळावरील प्रवासी संख्या वाढत असताना प्रवासी सुविधांचा दर्जा घसरत असल्याचे चित्र आहे. सुविधा अपुऱ्या पडू लागल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा...

13:34 (IST) 2 Aug 2024
काय द्याचं बोला! कनिष्ठ अभियंत्याच्या लाचखोरीमुळे गडचिरोली बांधकाम विभागातील टक्केवारीची चर्चा…

गडचिरोली: रस्ता कामाची मोजमाप पुस्तिका (एम.बी.) देण्यासाठी एक लाख ७० हजार रुपयांच्या लाचेची कंत्राटदाराकडे मागणी करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. ही कारवाई १ ऑगस्टला धानोरा येथे बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात करण्यात आली. या कारवाईने पुन्हा एकदा बांधकाम विभागातील टक्केवारीची चर्चा सुरु झाली आहे.

वाचा सविस्तर...

13:34 (IST) 2 Aug 2024
“पाऊस खूप झाला, बहीण लाडकी झाली मग शेतकरीच का परका झाला?” लाखांदुरातील शेतकऱ्याची फलकबाजी

भंडारा : जिल्ह्यात १९ ते २९ जुलै या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामांतर्गत लागवड केलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धान पिकाची शेती पुर्णतः पाण्याखाली बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात युतीचे सरकार असून शिंदे – फडणवीस – पवार या सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनहिताच्या मोठमोठ्या योजनांचा पाऊस पाडला.

वाचा सविस्तर...

13:28 (IST) 2 Aug 2024
१०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या अमिषाने लाखो गमावले

ठाणे : व्यवसायासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे सांगून मुंबईतील एका व्यवसायिकाची ५३ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

12:54 (IST) 2 Aug 2024
पुण्यात झिकाचा धोका वाढला! ४ रुग्णांचा मृत्यू

पुणे : शहरातील झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णसंख्या ५२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या मृत्यूंचे परीक्षण करणार आहे.

सविस्तर वाचा...

12:42 (IST) 2 Aug 2024
Amol Mitkari on Raj Thackeray: अमोल मिटकरींची मनसेवर आगपाखड!

जय मालोकार प्रकरणात राज ठाकरेंपासून सगळ्यांच्या चौकशा व्हायला हव्यात. जय मालोकार १० दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता. पण हे खुनशी लोक आहेत. त्यांना वाटतं की रमेश किणी प्रकरणात आपण मोकाट झालो तर आपण कुणाचाही जीव घेऊ शकतो असा विश्वास त्यांना आहे. ते काहीही करू शकतात. स्वत:च्या बापाची हत्या करण्याचीही यांची तयारी असते. मी विधिमंडळाचा सदस्य आहे. जर एकेक प्रकरणात मी घुसलो, तर यांना अवघड होईल - अमोल मिटकरी</p>

12:30 (IST) 2 Aug 2024
पुणे: शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्याध्यापकाला शिक्षा

पुणे: शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्याध्यापकाला लष्कर न्यायालयाने दोन वर्ष साध्या कारावासाची आणि एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सह प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. अटकारे यांनी याबाबतचे आदेश दिले.

सविस्तर वाचा...

12:30 (IST) 2 Aug 2024
नागपूर : सुनेचे टोमणे असह्य, मुलाच्या संसारात विघ्न नको म्हणून आई-वडिलांनी सोडले घर; भरोसा सेलने…

नागपूर : मुलाचे थाटामाटात लग्न करून दिल्यानंतर नवीन नवरी सून घरात आली. मॉर्डन असलेल्या सुनेला राजा-राणीच्या संसारात सासू-सासरे खुपायला लागले. त्यामुळे लग्नाच्या काही दिवसानंतरच सून ही सासू-सासऱ्यांना टोमणे मारायला लागली. पत्नीचा विचित्र स्वभाव बघून पती तिची समजूत घालत होता. मात्र, यात पती-पत्नीचे भांडण व्हायला लागले. ही बाब आईवडिलांना कळली. कुटुंबाचा ऱ्हास होताना बघता आईवडिलांनी भरोसा सेलमध्ये धाव घेतली.

वाचा सविस्तर...

12:29 (IST) 2 Aug 2024
लोकसत्ता इम्पॅक्ट : ६६० पोलीस हवालदार झाले पीएसआय; गृहमंत्रालय, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून…

नागपूर : राज्यात २०१३ मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ६६० पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीसाठी डिसेंबर महिन्यातच संवर्ग मागितल्यानंतरही पोलीस हवालदारांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले होते. अनेक पोलीस हवालदारांनी पोलीस महासंचालक आणि गृहमंत्रालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. ‘लोकसत्ता’ने पोलिसांच्या पदोन्नतीसंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित केली. गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने वृत्ताची गांभीर्याने दखल घेऊन पदोन्नतीचा तिढा सोडवला.

वाचा सविस्तर...

11:53 (IST) 2 Aug 2024
दिवा रेल्वे उड्डाण पुल उभारणीचा मार्ग मोकळा

ठाणे : दिवा पुर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुल उभारणीच्या कामामध्ये बहुमजली इमारती, उच्च दाब विद्युतवाहिन्या आणि भुसंपादनचा अडथळा निर्माण झाल्याने काम रखडले आहे. यामुळे पालिका प्रशासनाने पुलाच्या कामाचा आरखड्यात काही बदल करत सुधारित आराखडा तयार केला असून या आखड्यास प्रशासकीय सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्याने दिवा रेल्वे उड्डाण पुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

वाचा सविस्तर...

11:50 (IST) 2 Aug 2024
पूर्व द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघात, दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू; तर दोनजण जखमी

ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी पहाटे डम्परचे चाक पंक्चर झाल्याने मागून आलेल्या एका ट्रकची या डम्परला धडक बसली. त्यानंतर या ट्रकला एका दुचाकीस्वाराची धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार वैभव डावखर (२७) याचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा...

11:27 (IST) 2 Aug 2024
Ajit Pawar News: अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

सकाळचा भोंगा लागतो त्यांनीही लगेच टीका करायला सुरुवात केली. अरे काय केलं? उगीच उचलली जीभ, लावली टाळ्याला असं चाललंय. तुम्हाला कुठे पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदलून प्रवास केला? मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो. मला समाज ओळखतो. कुणी म्हटलं मिशा लावल्या होत्या, टोपी घातली होती, मास्क घातलं होतं. साफ चुकीचं आहे. जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईन. जर सिद्ध झालं नाही, तर ज्या लोकांनी ही नौटंकी चालवली आहे, त्यांना जनाची नाही, मनाची लाज वाटायला हवी. उगीच कुणीतरी एखादं चॅनल बातमी लावतं. त्या बातमीचा कुठेही आधार नाही, पुरावा नाही. कॅमेऱ्यात तसं काही दृश्यही नाही. फक्त माझी बदनामी करण्यासाठी केलं जात आहे. मी ठरवलं होतं की कुणाबद्दलही बोलायचं नाही. विकासाचं काम सांगायचं. आपल्या योजना लोकांसमोर सांगायच्या. मी शब्दाचा पक्का आहे. मी सांगतोय, या योजना पुढेही चालू राहतील - अजित पवार</p>

Live Marathi News | Mumbai Pune Thane Nagpur Latest News Updates | Weather Report Today

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Marathi News Live Today, 02 August 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Story img Loader