Maharashtra Breaking News Updates, 02 August 2024: राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असताना राज्यात राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी पक्षात असणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वेगवेगळे दावे व आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्यावरील खटला, उद्धव ठाकरेंवरील आचारसंहिता भंगाचा आरोप आणि संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Today, 02 August 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा

11:25 (IST) 2 Aug 2024
पिंपरी : मेट्रोच्या कामासाठी ५७ झाडांवर कुऱ्हाड

पुणे महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गाचे काम सुरू आहे. या कामास अडथळा ठरणाऱ्या ५७ झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. त्यामुळे वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

वाचा सविस्तर…

11:22 (IST) 2 Aug 2024
Ajit Pawar Marathi news: अजित पवारांची ‘त्या’ आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया!

मी गेल्या ५-६ दिवसांपासून बघतोय. काही राजकीय लोकांनी त्यावर वक्तव्यंही केली आहेत की अजित पवारांनी जो निर्णय घेतला, त्यासाठी अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे. धादांत खोटं आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की हे बदनामी करण्याचं काम चालू आहे. माझ्याबाबत गैरसमज करण्याचं काम चालू आहे. काहींनी पार शून्य प्रहरात काढलं. अजित पवार नाव बदलून गेले म्हणे. मी ३५ वर्षं राजकीय जीवनात कार्यरत आहे. खासदरा, आमदार, राज्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदं मी सांभाळली आहेत. एक जबाबदारी मलाही कळते. एखाद्यानं नाव बदलून जाणं हा गुन्हा आहे. सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. खुशाल काहीही बोललं जातंय. कोण बहुरुपी म्हणतंय, कोण काय म्हणतंय.. म्हणणाऱ्यांना लाज, लज्जा, शरम वाटली पाहिजे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत – अजित पवार, उपमुख्यमंत्री

11:16 (IST) 2 Aug 2024
ठाणे शहरातील रिक्षा चालकांचा संपाचा इशारा, दंड स्वरुपात आकारण्यात येणारी रक्कम कमी करण्याची मागणी

ठाणे : शहरात ज्यादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या रिक्षा चालकांकडून १५०० रुपये दंड आकारला जात आहे. दररोज मिळत असलेल्या उत्पन्नातून आर्धी रक्कम दंडाला जात असल्यामुळे अनेक रिक्षा चालक त्रासले आहेत.

सविस्तर वाचा…

11:15 (IST) 2 Aug 2024
पिंपरी : अपार जिद्दीच्या जोरावर ‘प्रगती’चा मार्ग सुकर; वाचा ‘एमपीएससी’तील दुहेरी यशाची कहाणी

पिंपरी : जिद्द असेल, तर यश साध्य होतेच. घरची परिस्थिती गरीब असूनही जबरदस्त इच्छाशक्ती आणि कठोर मेहनतीच्या जोरावर येथील प्रगती काशीद हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत दुहेरी यश मिळवले आहे.

सविस्तर वाचा…

11:03 (IST) 2 Aug 2024
कात्रज आगारात पीएमपी बसला आग

पुणे : कात्रज आगरातील पीएमपी बसला मध्यरात्री आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

कात्रज आगारात रात्री साडेबाराच्या सुमारास सीएनजी बसमधून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्रातील जवानांनी तेथे धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आली. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली.

11:02 (IST) 2 Aug 2024
घोडबंदर मार्गावर कंटेनर उलटला, उड्डाणपूलाखालील मार्गिका बंद, वाहनांच्या रांगा

घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ शुक्रवारी भरधाव कंटेनर उलटल्याने येथील उड्डाणपूलाखालील मार्गिका बंद झाली आहे. त्यामुळे पातलीपाडा ते मानपाडा पर्यंत वाहतुक कोंडी झाली असून, घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांना कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

वाचा सविस्तर…

11:00 (IST) 2 Aug 2024
Ajit Pawar Marathi News: विरोधकांचे दावे धादांत खोटे – अजित पवार

मी अनेक योजनांच्या घोषणा अर्थसंकल्पात केल्या. पण त्यावर माझ्या विभागाच्या नावावर एक बातमी चालवली गेली. वास्तविक त्या बातमीत काहीही तथ्य नव्हतं. मी अर्थमंत्री आहे. मी दहावा अर्थसंकल्प सादर केला आहे. अनेक वर्षं मी महाविकास आघाडी आणि आता महायुतीतही काम केलं आहे. माझी कामाची एक पद्धत आहे. कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी मी घेत असतो. तरी माझी दोन दिवस बदनामी केली गेली. अर्थविभागाच्या आक्षेपानंतरही योजना दिली गेली, निधी नाही असं बोललं गेलं. हे धादांत खोटं आहे. मी सांगितलं की ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. ९ महिन्यांसाठीच हे पैसे हवे आहेत. आर्थिक वर्षाचे पहिले तीन महिने संपले आहेत. त्यामुळे ९ महिन्यांसाठी ते पैसे पुरतील. त्याला सभागृहानंही मान्यता दिली आहे. इतर योजनांसाठीही निधीची तरतूद केली आहे. तरीही वेगळ्या प्रकारच्या बातम्या करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ऑगस्टमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या त्या महिलांच्या खात्यावर जातील – अजित पवार, उपमुख्यमंत्री

10:59 (IST) 2 Aug 2024
Ajit Pawar Press Conference: विचार करून बोला – अजित पवारांचा कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सल्ला

काही राजकीय लोकांची आणि कार्यकर्त्यांची मतं येत आहेत. प्रत्येकानं त्यावर आपण काय बोलायला हवं याचा अभ्यास करावा. बोलण्याचा अधिकार सगळ्यांनाच हवा. पण अभ्यास करून बोला – अजित पवार, उपमुख्यमंत्री

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Marathi News Live Today, 02 August 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा